Wednesday, October 5, 2016

आई... अंगाई गाऊ नकोस....

आई...
अंगाई गाऊ नकोस
मला झोपायचे नाहीय
वाटले कितीही तरी
डोळ्यांवर झोपेचे गारुड कितीही
तरी
मला सूर्य
उगवायच्या आत
तो हैवानांचा होण्याआत
त्याला दिठीत जक्ख पकडायचेय
ही रात्र विधात्याने मला
त्यासाठीच
क्षितीजाकडे
बेदम
धावण्यासाठीच दिलीय...
अंगाई गाऊ नकोस
ही आजची गहन
क्रूर रात्र
तुझ्या कुशीत निवांत झोपण्यासाठीची नाहीय...
अनंत सूर्य असेच माझ्या अनंत
बांधवांसाठी
येऊ देत जरा हृदयात
कोणाहीसाठी
अंगाई गाऊ नकोस....
प्लीज....

1 comment:

  1. सुंदर !
    संजय सर - सुंदर !
    आई अंगाई गाऊ नकोस या ओळी फारच छान झाल्या आहेत !
    असेच फुलत राहा , जे पानेच्या पाने लिहून सांगता आले नसते ते आपण एका कवितेत सांगितले आहे हीच कवितेची ताकद आहे !
    खलील जिब्रानची आठवण झाली .
    ही कविता अजून दूरवर पोचण्यासाठी अजून लोकप्रिय माध्यमे वापराल का ?
    दैनिक म टा किंवा दिवाळी अंक ?
    अभिनंदन !

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...