Friday, November 4, 2016

षठपूजा

षठपूजा हा बिहारमधील सूर्यपुजेचा अत्यंत महत्वाचा उत्सव आहे. बिहारमध्ये सूर्यपूजा पुरातन असून इसपू पाचव्या शतकापासून, अगदी सम्राट अशोकाच्या काळातही, नाण्यांवर सूर्याचे प्रतीकचिन्ह असे. मगध जानपदाचे (व नंतर साम्राज्याचे) शतकानुशतके ते प्रतीक चिन्ह राहिले. प्रत्येक जानपद त्या काळी विशिष्ट चिन्हांनी ओळखले जात असे. 

(Symbols on the Magadha Coins, 5th to 4th BC) 

तशी सूर्यपूजा जगाला नवीन नाही. जीवनदायी सूर्य हा सर्वांनाच पूजनीय वाटने स्वाभाविक आहे. अहूर (असूर) धर्माचेही प्रतीक सूर्यच असून इजिप्तमद्ध्ये सूद्धा ओसिरियस (सुर्यदेवता) या असूर निदर्शक शब्दाने एक देवता होता. असुर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असुर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. संस्कृतमद्ध्ये "सूर्य" या शब्दाची नेमकी व्युत्पत्ती नाही.  निरुक्त व निघंटुही ती  स्पष्ट देत नाहीत. मुळात सूर हा शब्दच कृत्रीम आहे असे संस्कृत विद्वान मानतात. त्यामुळॆ सूर्य शब्द मुळचा कि असूर्य मुळचा याचाही विचार करणे आवश्यक आहे. असूर्य शब्द हाच मुळचा आहे हे मी एका अन्य लेखात स्पष्ट केले आहे.

भारतात मगध हे असूर संस्कृतीचे महत्वाचे केंद्र राहिले आहे. वैदिकांना दिर्घकाळ पर्यंत त्या भागात आपला धर्म नेता आला नाही. अथर्ववेदात त्यामुळे "मगधात तक्मा (ज्वर) पाठवून दे", (अ. ५.२२.१४) व "पूर्वदिशा व्रात्यांचे (अवैदिकांचे) प्रियधाम आहे" (अ. १५.२-४) असे उल्लेख अवमानार्थी अर्थाने येतात. खरे तर वैदिकही अगदी पुरातन काळी असूर पुजकच होते व सुर्याला उद्देशून "असूर" हे संबोधन बहुमानार्थी वापरत होते, पण नंतर सांस्कृतिक संघःर्षात त्यांनी असुरांची बाजू सोडली. ते कधीतरी नंतर. पण बिहारमध्ये पुरातन काळापासून सुर्यपूजा होती. ती येथे बाहेरुन आयात झाली असे नसून पुरातन काळात असूर संस्कृती ही भारत ते इजिप्त अशी वेगवेगळ्या स्थानीय प्रारुपांत पसरली होती. बिहारमधील छठपुजा हा त्या संस्कृतीचाच अवशेष आहे.
ऋग्वेदात उल्लेखलेला कीकट देश म्हणजे मगध असा एक समज आहे, पण त्यात तथ्य नाही. मग लोकांवरून मगध हे नांव पडले असे मानले जाते. हे मग लोक म्हणजे पारशी धर्मातील सूर्यपूजक मागी पुरोहित व ते येथे येत मगध प्रांतात स्थाईक झाले म्हणून त्याला मगध म्हणतात अशी व्युत्पत्ती अनेकांनी दिली असली तरी अशा स्थलांतराचा समांतर पर्यायी पुरावा उपलब्ध नाही. पुराणांत काही कथा यासंदर्भात येतात तसेच सांबाला रक्तपितीचा रोग झाल्याने कृष्णाने अठरा मग लोकांना आनले व ते द्वारकेच्या भोजक कन्यांशी विवाह करुन द्वारकेच्या परिसरात वसले असे म्हटले आहे. या कथांत मगधाचा संबंध येत नाही. पारशी मगी पुरोहित व मगधाचा संबंध जोडणे बादरायणी आहे.
वास्तव हे आहे कि मगध हा मुख्यत्वे सुर्याला मानणारा प्रभाग होता. त्या जानपदाचे प्रतीकचिन्हही सुर्यच राहिले. अशोक कालातही ते बदलले नाही. आजही बिहारी लोक सुर्यपूजा करतात एका उत्सवाच्या रुपात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

3 comments:

  1. माननीय,आपण माझी कालची प्रतिक्रिया छापली नाहीत.अर्थातच त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही.अाता या वरील विषयातसुद्धा तुमच्यासारख्या विद्वानांना माहित नसलेला एखादा ज्ञानाचा मार्ग असू शकतो.आणि तो चर्चेतूनच समजू शकतो.

    ReplyDelete
    Replies
    1. There was no comment from you Maitreya yesterday or recently. You may post it again.

      Delete
  2. मैत्रेय सर , आपण संजय सरांवर आरोप केले आणि त्यांनी त्यांच्या संयत स्वभावाला अनुसरून उत्तर दिले हे एक बरे झाले अनेकजण आपले मत वाचायला उत्सुक आहेत कृपया आपण आपली मते ई मेल द्वारा सर्वांपर्यंत पोचवायला संजय सरांना मदत करावी
    संजय सरांचा लेख अनेक विषयांना तोंड फोडतो हे मात्र नक्की !
    अशीच सकस चर्चा घडत राहो हि सदिच्छा.
    हा ब्लॉग अत्यंत वाचनीय होत चालला आहे परंतु मत प्रदर्शन करणारे अगदी तुरळक झाले आहेत . संजय सर यावर काही लिहितील का ?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...