Wednesday, May 31, 2017

शेतकरी संप

पिकवले तरी तोट्यात जाण्यापेक्षा फक्त स्वत:पुरतेच पिकवले तर काय बिघडले, किमान नुकसान तर होणार नाही हा विचार गेल्या ३-४ वर्षांत अधून मधून व्यक्त होत होता. तो आता प्रत्यक्षात आणला जात आहे असे दिसते. या शेतकरी संपाबाबतही असंवेदनशील उद्गार निघाले. पण ज्यांना एकंदरीत देशातील अर्थव्यवस्थेचीच पर्वा नाही, देश रसातळाला जाऊनही आकडेवा-यांचा जुळवता न येणारा खेळ खेळण्यात जे धन्यता मानतात त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा धरणे गैरच ठरावे अशी स्थिती आहे. ही स्थिती निवळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी राज्य सरकार फुटीचे राजकारण करण्याची अथवा एखादा विचित्र अध्यादेश काढण्याचीच अधिक शक्यता आहे. दमनाची ही सवय विकृतीचे लक्षण आहे. सध्या देशात काहीही घडू शकते हे उच्च न्यायालयांच्या गायीबाबतच्या बेताल आदेशांवरून व जनावर बाजारांवर आणलेल्या निर्बंधातून सिद्ध होते. जनतेवरील निर्बंध वाढत जाणे ही हुकूमशाहीकडील वेगाने होणारी वाटचाल असते हे समजून घेण्याची गरज आहे.

पण यातून जो विनाशकारी वाटचालीचा संकेत मिळतो आहे त्याकडे किमान जनतेने तरी दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. शेतक-यांचा संप हा हतबलता, उद्विग्नता यातून आलेला आहे. यात काहींचे राजकारणही असेल, पण असे काही मुर्ख आहेत असेच म्हणावे लागेल. प्रश्न विकलांग केल्या गेलेल्या शेतीचा आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतक-याचा आहे. कायद्यांच्या कचाट्यात त्याला अडकावत खोल दरीत भिरकावणा-या समाजवादी व्यवस्थेचा आहे. हा संप किती टिकेल हा प्रश्न नसून ही वेळच का आली हा खरा प्रश्न आहे. प्रश्नाच्या मुळाशी जात उत्तरे शोधणे व राबवणे हेच काय ते उत्तर आहे. 

6 comments:

  1. संजय सर , गाय हा खाण्याचा पदार्थ आहे असे स्पष्ट सांगितले पाहिजे त्याच्या पोटात ३३ कोटी देव अजिबात नसतात हे सत्य पण आपल्या पक्षाने मांडले पाहिजे गायीचे मांस हे खाण्यास उत्तम असते . पौष्टिक असते . खरेतर तुम्ही तशी चळवळ केली पाहिजे.
    दुसरी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ,
    सहकारी चळवळ या प्रांताच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे आणि आतातर कर्जमाफी हा राजकारणाचा लाडका अविभाज्य भाग झाला आहे. शेतकरी वर्गाला ही सवय कोणी लावली ?
    बागायती जमिनींसाठी वेळ पडली तर शहरांचे पाणीही तोडणाऱ्या दादा आणि भाऊंना जनतेने रस्ता दाखवला पिण्याचे पाणी हा मुख्य मुद्दा करून ठिबक शिंचं इत्यादी योजना शेतकरी वर्गात लोकप्रिय करायला हव्या आहेत . भारताचा साखर उत्पादनात जगात २ रा क्रमांक आहे. ब्राझील पहिला येतो ,साखरेची शेती ही हुकमी पैसे देणारी म्हणून तिचे कौतुक झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या नाडी लागला , सहकारी कारखान्यांनी काय वाटोळे केले ते आपण जाणतोच !त्यावर अनेक लेख , कथा , सिनेमे आणि कादंबर्या निघाल्या !
    शेतीक्षेत्राची वाढ , आणि त्यासाठी सरकारने केलेली गुंतवणूक आणि त्याचा शेतकर्याने केलेला सदुपयोग हे गणित कोणीतरी तपासले पाहिजे
    सरसकट घरबांधणी सोनेखरेदी लग्न यासाठी या पैशाचा वापर होतो आणि शेवटी कर्जमाफीची गाऱ्हाणे सुरु होते !जगात आपण शेतमालाचा दर्जा टिकावू शकत नाही नवी तंत्रे आत्मसात करत नाही. आपली सुपीक जमीन खाते वापरून वापरून रेताड झाली आहे !याला जबाबदार दरवेळी सरकार कसे असेल ? पक्षीय आढावा घेतला तर काय दिसते ?
    स्पष्ट सांगायचे तर यशवंतराव यांच्या काळापासून सातारा सांगली कोल्हापूर नगर पुणे सोलापूर हा भाग पद्धतशीर कालव्यांचे जाळे विणून सुजलाम सुफलाम करत दक्षिण पश्चिम भागाने आपले भले केले आणि पावसावरची शेती असलेले मात्र आकाशाकडे डोळे लावून बसू लागले .
    सत्ता बदल झाला तरी चांगले दिवस काही १०-१५ वर्षात दिसणार नाहीत . कृष्णा खोरे आणि तत्सम योजना काय झाले ते आपण जाणतोच !
    सध्याचे सरकार जुनी धुणी धुण्यातच अडकलेले आहे हेही खरेच आहे .मुळात ते ज्या मुद्यावर निवडून आले त्याची चिरफाड झाली पाहिजे
    २०१९ च्या आत भाजप हा एक छोटेसे युद्ध नक्कीच करणार आणि ३७० कलाम रद्द करून एक देश एक घटना असे करत , काश्मीरचा स्पेशल दर्जा रद्द करायची हाक देत पाकिस्तानचे तुकडे करणार हे नक्की !अमेरिकेसकट सर्वानाच ते हवे आहे , खरेतर आपण या विषयावर लिहिले पाहिजे !
    राम मंदिर हेही होणार असा डाव दिसतो . हे सगळे आरशा सारखे स्वच्छ असताना आपण ते सोडून हे काय लिहीत आहात ?
    खरेतर शेतकरी जमिनी विकायला हपापलेला आहे हेच सत्य आहे .खरा हाडाचा शेतकरी शहरीकरणामुळे संपत चालला आहे . काहीतरी करून एखाद्या सरकारी योजनेत आपली जमीन गेली तर अधिक दरासाठी धरणे धरणे हाच आजच्या शेतकऱ्याचा उद्योग झाला आहे .
    म्हणून संजयजी ,
    आपण तडकाफडकी गोहत्या विरोधी लेखन सुरु करा . सावरकरांचा आधार घ्या . (तात्पुरता ! )
    कारण शहरातून मोकाट फिरणारी जनावरे ही भीषण समस्याच बनत चालली आहे . भाजप आचारात कायदे करत आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहे . ते पुढच्या ५ वर्षांचा विचार जनतेच्या मतांचा विचार न करता , दुसर्या आंतर राष्ट्रीय मुद्द्यांवर करणार हे नक्की , कारण ५० वर्षे विरोधात बसलेले सत्ता कशी राबवणार ?

    ReplyDelete
  2. शेतकऱ्यांना संपा पेक्षा इतरही कायदेशिर मार्ग आहेत लढायला. केवळ भावनीक मुद्यांवर न लढता शेतकरी शेत मालाचे व्यवस्थापन विक्री पाणी पुरवठा वीज चोरी, हमी भाव, मोठया बागायदार शेतकऱ्यांवर आवश्यक असणारा इन्कमटॅक्स, टॅक्सलेस पैशांचा व्यवहारात राजकारणात गैरवापर, उजाड पडलेली शेतीचे काय करावे, सामुहिक शेती सुक्ष्मसिंचन, पाण्याचा /खतांचा अतिरेकी गैरवापर त्यातून आलेली सधनता,टोयोटा फॉर्च्युनर /होंडांसारख्या गाडया. मोठमोठी लग्ने, हुंडा खोटा मानपान जात व्यवस्था प्राबल्य कर्जबुडवणे किंवा माफ होण्याची वाट पाहणे इ. प्रश्नांवरही आंदोलन व परखड विचार मांडावेच लागतील. सरकारकडून अपेक्षा करतांना काय जे असेल ते मुद्यांवर वस्तुस्थितीवर आधारीत व कायद्याचे उल्लंघन न करता मंथन होणे व शेवटी न्याय्य तत्वानुसारच मागणी करणे योग्य होईल. कृषी विषयक वेगवेगळे अहवाल, विचार उपाययोजना याबाबत जन रेटा मोठा व्हायला हवा. निवडणुकीतही त्यांचा सजगपणे प्राथम्यक्रम असावा. पीक पध्दतीत बदल, जमीनीची नापीकी यावर शास्त्रशुध्द संशोधन उपलब्ध आहे. किंवा सुरु आहे. त्यानुसार अंमलबजावणीची मागणी /जानकारी ठेवून आंदोलनाची दिशा हवी. दुधाची नासाडी पाहीली. मात्र काही दिवस जर असे चालले तर हे शेतकऱ्यांच्या नावाखाली मग्रुर धनदांडगे लोक सामान्य जनतेची सहानुभूती गमावतील.गरीब सामान्य शेतकऱ्याचे मोठे नुकसानच त्यामुळे होईल.

    ReplyDelete
  3. डोळ्यावर कातडे ओढून घेतलेल्या सध्याच्या व्यवस्थेकडून उत्तराची अपेक्षा वा या किंवा सर्व सामान्यांच्या बाबतीत विचार करणे म्हणजे समुद्रातुन सुई शोधून काढणेच ठरेल.

    ReplyDelete
  4. संजय सर , गाय हा खाण्याचा पदार्थ आहे असे स्पष्ट सांगितले पाहिजे त्याच्या पोटात ३३ कोटी देव अजिबात नसतात हे सत्य पण आपल्या पक्षाने मांडले पाहिजे गायीचे मांस हे खाण्यास उत्तम असते . पौष्टिक असते . खरेतर तुम्ही तशी चळवळ केली पाहिजे.
    दुसरी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ,
    सहकारी चळवळ या प्रांताच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे आणि आतातर कर्जमाफी हा राजकारणाचा लाडका अविभाज्य भाग झाला आहे. शेतकरी वर्गाला ही सवय कोणी लावली ?
    बागायती जमिनींसाठी वेळ पडली तर शहरांचे पाणीही तोडणाऱ्या दादा आणि भाऊंना जनतेने रस्ता दाखवला पिण्याचे पाणी हा मुख्य मुद्दा करून ठिबक शिंचं इत्यादी योजना शेतकरी वर्गात लोकप्रिय करायला हव्या आहेत . भारताचा साखर उत्पादनात जगात २ रा क्रमांक आहे. ब्राझील पहिला येतो ,साखरेची शेती ही हुकमी पैसे देणारी म्हणून तिचे कौतुक झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या नाडी लागला , सहकारी कारखान्यांनी काय वाटोळे केले ते आपण जाणतोच !त्यावर अनेक लेख , कथा , सिनेमे आणि कादंबर्या निघाल्या !
    शेतीक्षेत्राची वाढ , आणि त्यासाठी सरकारने केलेली गुंतवणूक आणि त्याचा शेतकर्याने केलेला सदुपयोग हे गणित कोणीतरी तपासले पाहिजे
    सरसकट घरबांधणी सोनेखरेदी लग्न यासाठी या पैशाचा वापर होतो आणि शेवटी कर्जमाफीची गाऱ्हाणे सुरु होते !जगात आपण शेतमालाचा दर्जा टिकावू शकत नाही नवी तंत्रे आत्मसात करत नाही. आपली सुपीक जमीन खाते वापरून वापरून रेताड झाली आहे !याला जबाबदार दरवेळी सरकार कसे असेल ? पक्षीय आढावा घेतला तर काय दिसते ?
    स्पष्ट सांगायचे तर यशवंतराव यांच्या काळापासून सातारा सांगली कोल्हापूर नगर पुणे सोलापूर हा भाग पद्धतशीर कालव्यांचे जाळे विणून सुजलाम सुफलाम करत दक्षिण पश्चिम भागाने आपले भले केले आणि पावसावरची शेती असलेले मात्र आकाशाकडे डोळे लावून बसू लागले .
    सत्ता बदल झाला तरी चांगले दिवस काही १०-१५ वर्षात दिसणार नाहीत . कृष्णा खोरे आणि तत्सम योजना काय झाले ते आपण जाणतोच !
    सध्याचे सरकार जुनी धुणी धुण्यातच अडकलेले आहे हेही खरेच आहे .मुळात ते ज्या मुद्यावर निवडून आले त्याची चिरफाड झाली पाहिजे
    २०१९ च्या आत भाजप हा एक छोटेसे युद्ध नक्कीच करणार आणि ३७० कलाम रद्द करून एक देश एक घटना असे करत , काश्मीरचा स्पेशल दर्जा रद्द करायची हाक देत पाकिस्तानचे तुकडे करणार हे नक्की !अमेरिकेसकट सर्वानाच ते हवे आहे , खरेतर आपण या विषयावर लिहिले पाहिजे !
    राम मंदिर हेही होणार असा डाव दिसतो . हे सगळे आरशा सारखे स्वच्छ असताना आपण ते सोडून हे काय लिहीत आहात ?
    खरेतर शेतकरी जमिनी विकायला हपापलेला आहे हेच सत्य आहे .खरा हाडाचा शेतकरी शहरीकरणामुळे संपत चालला आहे . काहीतरी करून एखाद्या सरकारी योजनेत आपली जमीन गेली तर अधिक दरासाठी धरणे धरणे हाच आजच्या शेतकऱ्याचा उद्योग झाला आहे .
    म्हणून संजयजी ,
    आपण तडकाफडकी गोहत्या विरोधी लेखन सुरु करा . सावरकरांचा आधार घ्या . (तात्पुरता ! )
    कारण शहरातून मोकाट फिरणारी जनावरे ही भीषण समस्याच बनत चालली आहे . भाजप आचारात कायदे करत आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहे . ते पुढच्या ५ वर्षांचा विचार जनतेच्या मतांचा विचार न करता , दुसर्या आंतर राष्ट्रीय मुद्द्यांवर करणार हे नक्की , कारण ५० वर्षे विरोधात बसलेले सत्ता कशी राबवणार ?

    ReplyDelete
  5. होऊ घातलेल्या आर्थिक पुनर्रचनेला अपशकून करणे हे या संपाचे सध्याचे उद्दिष्ट असल्याने संपाचे नेते यावर बोलणार नाहीत.

    ReplyDelete
  6. संजय सर ,
    प्रतिक्रिया आपण छापत नाही हे पाहून मौज वाटली .हा ब्लॉग मोकळ्या मानाने लिहिण्यासाठी आहे असा समज आहे तो आपण खोटा ठरवत आहात का ?
    संप कसा मिटला हे एक रहस्यच आहे !
    आदरणीय शरद पवार साहेब यांची मुलाखत अतिशय सुंदर झाली ,संप मिटवणे म्हणजे खरेतर या सरकार साठी धोक्याची घंटा आहे . नुसता वेळकाढूपणा झाल्यास ते सरकारच्या चांगलेस अंगाशी येणार आहेत . आजकाल फडणवीस एकांडे शिलेदार असल्या सारखे वागत आहेत बाकी मंत्री जरा लांबच असतात . शिवसेना म्हणजे तर अवघड जागी दुखणे आहे त्यातच खडसे गप्प बसणारे नाहीत विनोद तावडे विंगेमधे आहेतच , असे सर्व असताना फक्त संघाच्या जीवावर एकतरुण ब्राह्मण ( वैदिक ) किती काळ राज्य करणार ? राणे सारखे खानदानी कसे गप्प बसतील ?
    शरदजी पवारजी यांची विषण्ण मुलाखत सहन होत नव्हती इतकी हृदयद्रावक होती. पराभव कसा पत्करावा हे त्यांच्याकडूनच शिकावे . माधव भांडारी बद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भावना खऱ्याच आहेत . संजय सर , आपण हे सर्व छापाल अशी आशा आहे आणि संप खरंच मिटला का यावर लिहाल असे वाटते .
    भाजप ची निवडणुकांतील चढती कमान , येत्या वर्षातील गुजराथ निवडणुका ,राष्ट्रपती निवडणूक असे अनेक मुद्देही आहेत.
    विषय गंभीर आहे आणि आपल्या भावना अपेक्षित आहेत
    महाराष्ट्राचे राजकारण इतके गुंतागुंतीचे होत चालले आहे की आपण त्यावर बहुपदरी कादंबरी लिहू शकता !
    आपला नम्र ,
    आगाशे

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...