Wednesday, November 29, 2017

करबचतीबरोबरच आता गुंतवणुकही वाढवा!


गुंतवणूक करत असतांना गुंतवणुकदारांसमोर अनेक उद्दिष्टे असतात. म्युच्युअल फंड हे बहुतेक उद्दिष्टांना साथ देतील अशा विविध योजना आपल्या समोर ठेवत असतात. त्यापैकी आपल्या उद्दिष्टाला अनुकूल असे फंड निवडणे आपल्या हातात असते.

करबचतही व्हावी आणि त्याच वेळीस आपल्या गुंतवणुकीत म्हणजेच संपत्तीतही वाढ व्हावी असे प्रत्येक करदात्या नागरिकास वाटत असते. त्यासाठी आधी भविष्य निर्वाह योजना (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), करबचतपात्र मुदत ठेवी, इंश्युरन्स एंडोमेंट असे काही प्रकार उपलब्ध आहेत. आयकर अधिनियम कलम ८०सी नुसार उत्पन्नावर कर वाचवण्यासाठी करदाते यापैकी एखाद्या मार्गाचा वापर करत गुंतवणुक करत असतात. परंतू हे गुंतवणुकीचे मार्ग आज जवळपास निरर्थक ठरलेले असुन त्यात करबचत होत असली तरी गुंतवणुकीत मात्र अत्यंत नगण्य अथवा शून्य वाढ होते त्यामुळे हे पर्याय आता आकर्षक उरलेले नाहीत.

करबचत करत असतांनाच संपत्तीच्या अधिकाधिक निर्मितीसाठी म्युच्युअल फंडांनीही उलट आता व्यापक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत हेही करदात्यांनी आता लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात करही वाचेल आणि आपल्या संपत्तीतही भर पडेल असा मार्ग इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम फंडांद्वारे आपल्याला निवडता येतो. रिलायन्स म्युच्यूअल फंडाच्या ईएलएसएस योजनांनी आजवर गुंतवणुकदारांना करबचतीबरोबरच जवळपास १७% नी गुंतवणुकीत वाढ करुन दिली आहे. कर वाचवण्याबरोबरच गुंतवणुकीत वृद्धी व्हावी हेच प्रत्येक करदात्याचे आर्थिक उद्दिष्ट असल्याने करबचत करण्याचे इतर मार्ग व रिलायंस म्युच्युअल फंडाच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधुन मिळालेल्या सरासरी परताव्याची तुलना केली तरी ते जुने मार्ग आता निरुपयोगी झाले असल्याचे आपल्या लक्षात येईल. ते कसे या तक्त्यातुन पहा-


         ८० सी गुंतवणुक         पर्याय
गुंतवणुक रुपये
पाच वर्षांनंतरचे मुल्य
परतावा[%]
कर [%]
महागाई वाढ [%]
महागाईवाढ व
 कर जाता उत्पन्न
         ईएलएसएस
१,५०,०००
४,२५,०८५
२३.१%
नाही
%
१७.१%
        भविष्य निर्वाह   निधी
१,५०,०००
२,२६,११८
८.६%
नाही
%
२.६%
        एनएससी VIII इश्यू
१,५०,०००
२,२२,०३७
८.२%
शेवटच्या वर्षाच्या व्याजावर ३०%
%
.0%
       ५ वर्षाची        करबचत मुदत ठेव
१,५०,०००
,६१,४४३
७.६%
३०%
%
-०.७%
        इंश्युरन्स         एंडोमेंट #
१,५०,०००
२,००,७३४
.%
नाही
%
0.0%

वरील तक्ता अभ्यासल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल की करबचतीच्या अन्य पारंपारिक पद्धतींत प्रत्यक्षात हातात काहीच पडत नाही. उलट गुंतवणुक मात्र अडकुन पडते ते वेगळेच. हे एका अर्थाने गुंतवणुकदाराचे नुकसानच आहे. पण रिलायंस म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने आजवर सरासरीने दिलेला परतावा पाहता आपल्या संपत्तीत होणारी वाढ ही लक्षणीय असल्याने ईएलएसएस फंड आपल्याला अधिक आकर्षक पर्याय ठरतो हे लक्षात घ्यायला हवे. याचे दुसरे महत्वाचे कारण असे की अन्य पारंपारिक मार्गातील करबचत गुंतवणुकीपेक्षा कमी काळ अडकावुन ठेवावी लागते. भविष्य निर्वाह योजना (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), करबचतपात्र मुदत ठेवी इत्यादि पारंपारिक मार्गांत गुंतवणुक किमान पाच ते पंधरा वर्ष अडकावून ठेवावी लागते. म्हणजेच ही गुंतवणूक Lock In काळाशी निबद्ध असते. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम फंडांत मात्र हा Lock In कालावधी मात्र केवळ तीन वर्ष एवढाच असतो. या काळानंतर इच्छा असेल तर आपली गुंतवणूक मोकळी करुन घेता येते. म्हणजेच तरलता प्राप्त करण्याचा मार्ग लवकर मोकळा होतो, हाही या गुंतवणुकीतला मोठा फायदाच आहे.

शिवाय आपण आवश्यकता असेल तर लाभांश देणा-या ईएलएसएस फंडाचेही पर्याय निवडू शकता. म्हणजे मुख्य गुंतवणुकीसाठी जरी Lock In कालावधी असला तरी या काळात लाभांशही मिळवू शकता. त्याची आवश्यकता नसेल तर आपण "ग्रोथ" पर्याय निवडून आपला लाभ एकाच वेळीस मुदत संपल्यावर मिळवू शकता.

या स्कीममध्ये एकदम रक्कम गुंतवली पाहिजे असेही नाही. आपण दरमहा अथवा ठरावीक मुदतीने काही रक्कम "सिप" (Systematic Investment Plan) अंतर्गत अशा योजनांत गुंतवू शकता व करबचतीचे तेच लाभ उठवू शकता. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंड आपल्याला विविध पर्याय तर देतातच पण आपल्याला करबचतीचीही सोय उपलब्ध करुन देतात. अर्थात शेयरबाजारातील गुंतवणुक ही बाजारातील जोखिमेच्या अधीन असते हे विसरायला नको. त्यामुळे याबाबत आपल्या गुंतवणुक सल्लागाराची मदत घेत योग्य तो पर्याय निवडणे श्रेय:स्कर आहे.

यामुळेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंड अलीकडच्या काळात लोकप्रिय झाले आहेत. करदाते करबचत करण्याचे अधिक किफायतशीर मार्ग शोधत व वापरत असल्याचे ते निदर्शक आहे. शिवाय अशा गुंतवणुकदारांनी योग्य फंड निवडल्यास अन्य मार्गांपेक्षा त्यांनी अधिक परतावा मिळवला असल्याचेही चित्र आहे. यामुळेच की काय गेल्या ऑक्टोबर १६ पर्यंतच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर १७ पर्यंतच्या वर्षाखेरपर्यंत  ईएलएसएस म्युच्युअल फंड योजनांत तब्बल ४६% ची वाढ नोंदवली गेली व सात लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा अनोखा टप्पा ओलांडला गेला. १  म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधील बचतीस अधिकाधिक करदाते पसंती देत आहेत असे दिसते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या

https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html

(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)


Ref: 1. http://www.moneycontrol.com/news/business/mutual-fund-aums-breache-rs-21-lakh-crore-mark-amfi-2439325.html

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...