Tuesday, September 18, 2018

दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज ए)



शेयर बाजारात जेंव्हा उलथा-पालथी होत असतात तो काळ नवीन संधींनाही जन्म देत असतो हे अनेकदा गुंतवणुकदारांच्या लक्षात येत नाही. तेजीवाल्यांचा काळ असो की मंदीवाल्यांचा, ते शेयर्सच्या किंमती कमी अधिक करण्याच्या प्रयत्नांत काही विसंगती सोडून देत असतात. उदाहणार्थ काही ठरावीक शेयर्सचे भाव खुपच जास्त वाढतात व सेंसेक्सही त्यामुळे उंचावला गेलेला दिसतो तर काहींचे भाव खुपच कमी होतात व सेंसेक्सच कोसळलेला आपल्याला दिसतो. यात अनेकदा ब-याच शेअर्सचे चुकीचे मुल्यांकण होत असल्याने त्यांचे भाव मात्र योग्यतेपेक्षा किमान पातळीवर रेंगाळत असतांना दिसतात. यालाच शेअर्सचे चुकीचे मुल्यांकण म्हणतात. अशा चुकीच्या मुल्यांकणात भविष्यकाळासाठी अनेक संधी लपलेल्या असतात, पण त्या आधीच ओळखाव्या लागतात. भविष्यकालात नेमके काय घडू शकते याचे काही निर्णायक घटक असतात. त्यांचा साकल्याने विचार व विश्लेशन करुन हुशार गुंतवणूकदार योग्य त्या गुंतवणुकी करत असतो.

उदाहणार्थ २००३ ते २००८ या काळात तेजीवाल्या दलालांनी फार्मा आणि आयटी क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते. पण नंतर याच दोन क्षेत्रांनी तेजीत आघाडी घेतली होती. २००७-८ साली एकट्या भारती एयरटेलचे बाजारमुल्य सर्व फार्मा कंपन्यांच्या एकुण बाजारमुल्याएवढे होते. पण २०१३ साली एकट्या सन फार्माचे बाजारमुल्य एकुण इंजिनियरिंग उद्योगाच्या बाजारमुल्याच्या दीडपट होते. ज्या गुंतवणूकदारांनी योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली ते अर्थात लाभात राहिले. पण सर्वांनाच हे अंदाज आधीच करता येतात असे नाही. परिणामी गुंतवणुकीवरील परताव्याचे अंदाज अनेक वेळा चुकतात. 

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे पाहिले तर केवळ पाच स्टॉक्सनी निफ्टीच्या परताव्यात ६६‍% भर घातल्याचे दिसुन येईल आणि तळाच्या ५ स्टॉक्सने २५ ते ३०%नी घसरण दाखवल्याचे लक्षात येईल. (CYTD बेसीसवर). पण कोणत्याही शेयरच्या मुल्यात झालेली वध अथवा घट कायमस्वरुपी रहात नसते. त्यांच्या मुल्यांवर परिणाम करणारे घटकांचे ऐतिहासिक आकडेवारीचे तक्ते आणि भविष्यातील संभाव्य ट्रेंड्सच्या आधारावर निवडक शेयर्समध्ये संधी शोधता येतात.

आणि नेमक्या या तत्वाचा विचार करुन रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज ए) या म्युच्युअल फंड योजनेला सात सप्टेंबर २०१८ रोजी बाजारात आणले असून येत्या २१ सप्टेंबरपर्यंत खुल्या असलेल्या या योजनेत सध्या योग्य बाजारमुल्य असलेल्या शेअर्सचा मजबूत पोर्टफोलियो बनवण्याची योजना आहे. ज्या कंपन्यांची कामगिरी पुढील दोन-तीन वर्षांत चांगली होणे दृष्टीपथात आहे अशाच निवडक कंपन्यांत हा फंड गुंतवणूक करणार आहे. यात ज्या कंपन्यांचे बाजारमुल्य त्या कंपन्यांच्या नफ्यापेक्षा बरेच कमी झाले आहे अशा कंपन्या, तसेच ज्या कंपन्यांचा लाभांश मुंबई शेयर बाजाराच्या सर्वोच्च १०० इंडेक्समधील कंपन्यांपेक्षा अधिक आहे अशा कंपन्या इतर अनेक निकष लावून गुंतवणुकीसाठी निवडण्यात येणार आहेत. येत्या अधिकाधिक ३ वर्षांत ज्या कंपन्यांचा विकासदर अधिक असण्याची शक्यता आहे अशाच कंपन्यांत किमान धोका पत्करत गुंतवणूक करण्याची या फंडाची योजना आहे.

अशा निवडक पंचवीस ते तीस स्टॉक्सवरच लक्ष या फंडाकडून केंद्रीत केले जाईल असे फंडाने आपल्या ऑफरमध्ये म्हटले आहे. हे स्टॉक्स घेतांना योग्य त्याच मुल्यांकणाचा विचार केला जाईल म्हणजे किमान किंमतीत खरेदी करणे. या फंडाच्या पोर्टफोलियोत एनर्जी, हेल्दकेअर, फिनांशियल यासारख्या क्षेत्रातील स्टॉक्स असण्याची शक्यता आहे. या योजनेत ग्रोथ पर्यात्य जसा उपलब्ध आहे तसाच डिव्हिडंड हाही पर्याय आहे. आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूकदार योग्य पर्यायाची निवड करु शकतात.

या फंडाची गुंतवणूक योजना दिर्घकालीन ट्रेंड लक्षात घेऊन केली जाणार असल्याने हा फंड साडेतीन वर्ष मुदतीचा क्लोज एंडेड फंड असणार आहे. म्हणजेच या मुदतीआधी या फंडाचे युनिटस विकता येणार नाहीत.

ज्या गुंतवनूकदारांना साडेतीन वा त्याहुन अधिक काळासाठी व चांगला संभाव्य परतावा देऊ शकणा-या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी रिलायंस ऑपॉर्चुनिटीज फंड (सिरीज १)  ही म्युच्युअल फंड योजना एक चांगला पर्याय ठरु शकेल. या फंडाच्या योजनेची लिंक https://www.reliancemutual.com/InvestorServices/ApplicationForms/KIM-cum-Application-Form-Reliance-India-Opportunities-fund-Series-A.pdf

(वैधानिक सुचना- म्युचुअल फंडातील गुंतवणूक ही भाग-भांडवल बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापुर्वी योजनेची कागदपत्र नीट अभ्यासावीत अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)


No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...