Sunday, October 15, 2023

गाथा सप्तशती

 इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गाथा सप्तशती मधील अप्रतिम गाथा लिहिणा-या कवयित्री-

१. रेवा
२. प्रहता
३. आंध्रलक्ष्मी
४. मुईक
५. शशिप्रभा
६. मृगांकलक्ष्मी
७. रेखा
८. गिरिसुता
९. झेज्झा
१०. रेहा
११. कुरंगी
१२. कुब्जरंगी
(आणि अजून किमान १६)
(“या गाथासप्तशतीतील गाथा ग्रामीण कबीनी ग्रामीणांसाठी लिहिल्या आहेत....गाथा सप्तशतीत ब्राह्मनांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.....त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र या वर्गाचा वा वर्णाचा गाथा सप्तशतीमध्ये मागमूसही आढळत नाही. समाजात व्यवसाय आहेत पण त्याचे जातीत वर्गीकरण झालेले नाही.....आर्य संस्कृतीचा मुलाधार मानलेल्या यज्ञसंस्थेची येथे हेटाळनी केलेली आहे....कदाचित ब्राह्मण सातवाहनांच्या राज्यात अत्यल्प असावेत...- स. आ. जोगळेकर, गाथा सप्तशतीच्या प्रस्तावनेत.)
पुरुष व स्त्रीयांना हजारो वर्ष शिक्षण नाकारले गेले हा एक लाडका आरोप असतो. स्त्रियाही नुसते लिहू-वाचू शकत नव्हत्या तर काव्य लिहून आपल्या प्रतिभेचे दर्शन देत होत्या. ही परंपरा पुढेही सुरु राहिली. ती डोळ्यांसमोर असूनही तिकडे दुर्लक्ष करून चळवळीच्या सोयीसाठी न्युनगंडात्मक सामाजिक सिद्धांत बनवणे आणि प्रचारित करणे हा एक सामाजिक गुन्हा नाही काय?

1 comment:

  1. मग स्त्री शिक्षणाच्या सुरुवात किंवा चळवळी का सुरु कराव्या लागल्या. हाच मुलाधार देऊन स्त्री जीवनाला न्याय देणे तत्कालिन समाज व्यवस्थेला का शक्य झाले नाही. समाज वास्तवावर नेहमी परखड भाष्य करणाऱ्या आपल्या सारख्यांकडून काही लोकांचे डोळे उघडण्यासाठी तत्कालिन परिस्थतीसंदर्भात असे केलेले समर्थन उचित वाटत नाही. किंवा अत्याचारांचे सातत्याने भांडवल करीत बथ्थड चळवळी चालवणाऱ्यांचाही नवीन जमान्यातील सामान्य व्यक्तीलाही वीट आला आहे. आता स्वतंत्र भारतात गरज आहे ती संस्कृती/ परंपरेच्या नावावर भीती घालून चरितार्थ चालवणाऱ्या व त्यातच रममाण होणाऱ्या भाबडया लोकांसाठी व अशा अनेक संघटीत घटकांशी संघर्षाची. व पुरोगामी चळवळी का अपयशी ठरल्या त्या बाबत आपण चांगला लेख लिहिला आहे.
    काय आहे modern शिक्षण विचार व technology ने आलेला अर्धवट व सोयीचा शिक्षीत साक्षरपणा व जुन्या पिढीकडून डोक्यात बसवले गेलेले बऱ्याचशा outdated practices व त्याचे काही चाणाक्ष् व्यवहारी मंडळींकडून होत गेलेले व्यावसायिकत्व या गर्तेत नवीन पिढी सातत्याने सापडते आहे. सगळीच मिसळ झालेली असल्याने ती तिखटही, नकोशी व हवीशीही वाटते.

    ReplyDelete

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...