Monday, January 8, 2024

काही प्रश्न

 रवींद्र गोळे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते माझे सन्मित्र असल्याने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.

1) वैदिक अवैदिक वाद माझ्या आजच्या जगण्यास किती जोडलेला आहे ? 2) या वादामुले माझ्या समाज बांधवाचा काय फायदा होणार आहे ?
-वैदिक-अवैदिक वाद होता व आहे हे सामाजिक/सांस्कृतिक तसेच धार्मिक वास्तव आहे. सिम्धू संस्कृतीला हिंदू संस्कृती न म्हणता आवर्जुन "वैदिक" संस्कृती सिद्ध करु पाहणारे विद्वान अन्य काय सुचवतात? वैदिक धर्म वेगळा आहे हे वास्तवच आहे. वास्तव मांडणे चुकीचे कसे ठरेल? सर्वसामान्य हिंदूंना वैदिक वर्चस्वतावादामुळे न्युनगंडाचा सामना करावा लागतो हे सामाजिक वास्तव आहे. न्युनगंड दूर करायचा असेल तर ही वैदिक पुटेही दुर करावी लागतील. थोडक्यात हा वाद नसून वास्तव आहे आणि वास्तव मांडणे गरजेचे आहे.
3) अशा चर्चा तून समाज एकसंघ होईल की विघातक मानसिकता वाढले ?
-मुळात एकसंघपणा कधी नव्हताच त्यामुळे मी विघातकता वाढवतो असे म्हणणे अन्यायाचे ठरेल. उलट मी द्वेश्ट्यांच्य नेहमीच विरोधात जाहीरपणे ठाम उभा ठाकलेलो आहे हे तुम्हाला माहितच आहे. दोन धर्म वेगळे आहेत. हे वास्तव स्विकारुन हिंदुंमद्ध्ये वैदिक तत्वांतुन आलेली उच्च-नीचता दुर करण्याला एकसंघपणा नाही तर अन्य काय म्हणायचे?
4) चर्चा संवाद याचे मी ही समर्थन करतो पण या चर्चेने आपली पातळी सोडली आहे असे आपणांस वाटत नाही का ?
-माझ्या पोस्टवर खवचटपणे लिहिणारे पातळी सोडतात. मी ठामपणे माझे मुद्दे मांडतो. त्याला पातळी सोडणे असे म्हणायचे असेल तर ठीक आहे.
5) आपण अजून किती दिवस भूतकालीन मढी उकरत बसणार आहेत?
- आम्ही उकरतो ती मढी असतात....दुसरे वैदिकवादी विद्वान करतात ते संशोधन असते असे आहे कि काय रवींद्रजी? तलागेरी, कल्याणरमण, राजाराम, राव, लाल अशा असंख्य मंडळींचे लेखन वाचा . लाल यांचे गेल्याच महिन्यात अजुन एक पुस्तक आलेय. ते हिंदुंचे नव्हे तर वैदिक संस्कृतीचेच संशोधन करत असतात. मग मी माझ्या हिंदु संस्कृतीचे संशोधन केले तर ते चुकीचे कसे हे मला समजावून सांगावे.
6) आपणाला सबळ सशक्त आणि जाती विरहीत समाजाचा ध्यास आहे तो अशा प्रकारे साद्ध्य होईल का ?
-जातीविरहित समाज स्थापन झाला नाही तरी समतेच्या पातळीवरील समाज केवळ याच पद्धतीने साकार होईल यावर माझा विश्वास आहे. जोवर वर्चस्वतावादी व विषमता शिकवणा-या धर्माचे भूत हिंदुंच्या डोक्यावरुन दूर केले जात नाही तोवर या देशात समता येणे अशक्यप्राय आहे.
मी वर्तमान-भविष्य यातील्क समस्या प्रश्न यावर विपुलतेने लिहितच असतो हे तुम्हालाही माहित आहे. (फक्त तेथे ही मंडळी चर्चा करायला फिरकत नाहीत ही बाब अलाहिदा!)

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...