Thursday, February 15, 2024

वैदिक धर्मप्रचार आणि राजाश्रय

भारत देशात आजवर अनेक स्थलांतरे झालेली आहेत. पण दीर्घ काळ नुसते प्रभाव टाकणारेच नव्हे तर वर्चस्व निर्माण करणारे स्थलांतर म्हणून वैदिक धर्मियांच्या स्थलांतराकडे पहावे लागते. भारतीय समाजव्यवस्थेवर या स्थलांतरित वैदिक धर्मियांनी अनेकविध प्रकारे भले-बुरे परिणाम केले, त्यांनी त्यासाठी प्रदीर्घकाळ शिस्तबद्ध आपली पाळेमुळे आधी येथे रुजवण्याचा प्रयत्न सुरु केला. ते सर्वात आधी स्थायिक झाले ते शुद्र जमातीच्या राज्यात. या देशात सर्वत्र शूद्राच राहतात हा त्यांचा गैरसमज त्यांनी आपल्या वैदिक वाड्मयातून दृढ करून ठेवला. प्राचीन इराणमधील असुरांशी असलेल्या वैराच्या स्मृती कायम ठेवत येथील जेही समाज वैदिक धर्माविरुद्ध होते त्यांनाही असुर हे संबोधन वापरायला सुरुवात केली. शूद्रांच्या राज्यातच ऋग्वेदाच्या मुळच्या जुनी पर्शियन भाषेवर स्थानिक प्राकृत भाषेचे संस्कार करून वैदिक भाषा तयार करण्यात आली असे जे. ब्लॉख ते मायकेल वित्झेल यासारख्या अनेक भाषातज्ञांनी दाखवून दिले आहे. शुद्रांशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या लक्ष्मी, मा (माया) यासारख्या अनेक स्थानिक देवता ऋग्वेदाच्या अंतिम मंडळात समाविष्ट केल्या गेल्या. स्थानिक यक्षसंकल्पना तर स्वीकारलीच पण योग, संन्यास, तप इ. अशा एतद्देशीय समन व शिव-शक्तीप्रधान लोकधर्मातील अनेक दैवते व कल्पना बदल करून स्वीकारल्या. यती, तापस, केशी (म्हणजे जटा वाढवलेले मुनी) यांच्याशी परिचय झाल्यामुळे वैदिक धर्मातही या आधी अज्ञात असलेल्या तत्वांचा काही अंशी शिरकाव झाला.
वैदिकांनी स्थानिक लोकांसाठी यज्ञ करून यज्ञसंस्थेचा परिचय एतद्देशीय लोकांना करून तर दिलाच पण इंद्र, विष्णू, वरूण इ. वैदिक देवतांना एतद्देशियात लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. यज्ञविधी दीर्घकाळ चालणारे आणि सामुहिक कर्म असल्याने मूर्तिपूजक व प्रतीमापुजक स्थानिकांना यज्ञांचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. साहचर्याने अशी सांस्कृतिक देवानघेवाण होणे स्वाभाविक होते. शुद्र जमातीच्या परीसरात वैदिक साहित्याची रचना जवळपास पूर्ण केल्यानंतर मात्र पुढे कुरु प्रांताच्या दिशेने सरकले. वैदिक धर्माच्या वाढीसाठी त्यांना राजाश्रय मिळवण्याची गरज होती. आता यज्ञसंस्था त्यांनी ब-यापैकी विकसित करून डामडौलाची व आकर्षक बनवलेली होती. राजांना आकर्षित करण्यासाठी राजसूय, अश्वमेध यासारख्या यज्ञांचे अनिवार माहात्म्य वाढवून ठेवले होते. धर्मांतरासाठी व्रात्यस्तोम विधीचीही निर्मिती केली गेली होती.
कुरु-पांचाल-शौरसेन-मत्स्य भागात राजाश्रयामुळे वैदिकांना चांगला जम बसवता आला. कुरु वंशीय लोक मुळचे उत्तर-कुरु (म्हणजे मध्य आशियातील) आहेत अशा दैवी पुराकथा निर्माण केल्यामुळे स्वाभाविकच कुरु राजांना वैदिकांबद्दल आस्था वाटणे स्वाभाविक होते. कुरु-पांचाल भागाला आर्यावर्त असे नाव देऊन हा भाग वैदिकांसाठी अतिपवित्र आहे असे घोषित केले. आर्य शब्दालाही नवा अर्थ देऊन त्यालाही त्या भागात लोकप्रिय केले. बरेचशे ब्राह्मण साहित्य याच भागात निर्माण केले गेले. आपल्या धर्माच्या संघटनासाठी मनुस्मृतीच्या रचनेची सुरुवात याच आर्यावर्तात केली गेली. वैदिक धर्मात दुसरा महत्वाचा वर्ण म्हणजे राजन्य. भारतात आलेल्या वैदिक धर्मियात आता कोणी राजन्य (राजा) शिल्लक राहिला नसल्याने एतद्देशीय खतीय (जमीनदार योद्धे) वर्गाला खुश करण्यासाठी राजन्य शब्दाला डच्चू देत खतीय शब्दाचेच क्षत्रीय असे वैदिकीकरण केले व त्या शब्दाभोवती अद्भुत वलय निर्माण केले. जसे सुद्द या मूळच्या शब्दाचे रुपांतर शुद्र असे केले गेले तसेच मूळच्या खतीय शब्दाचे झाले. इसवी सनपूर्व दुस-या शतकापर्यंत काही प्रमाणात संख्या वाढलेले वैदिक धर्मीय कुरु-पांचाल परिसरालाच आपले मुख्य स्थान मानत राहिले. आर्यावर्त व वायव्य भाग वगळता भारतीय भूगोल त्यांना माहित नव्हता हे मनुस्मृतीवरून स्पष्ट आहे. ब्राह्मण ग्रंथात मगध व पूर्वेकडे असुर राहतात तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे शुद्र जमाती राहतात असे नमूद केले.
वैदिक धर्माच्या प्रसारासाठी वैदिकांनी आपल्या धर्माची फेररचना केली आणि सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक नेमले. त्यांच्यामार्फत त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. इसपू पहिल्या शतकात दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
वैदिक धर्माचे सामाजिक स्थान वाढवण्यासाठी भारत देशात आजवर अनेक स्थलांतरे झालेली आहेत. पण दीर्घ काळ नुसते प्रभाव टाकणारेच नव्हे तर वर्चस्व निर्माण करणारे स्थलांतर म्हणून वैदिक धर्मियांच्या स्थलांतराकडे पहावे लागते. भारतीय समाजव्यवस्थेवर या स्थलांतरित वैदिक धर्मियांनी अनेकविध प्रकारे भले-बुरे परिणाम केले, त्यांनी त्यासाठी प्रदीर्घकाळ शिस्तबद्ध आपली पाळेमुळे आधी येथे रुजवण्याचा प्रयत्न सुरु केला. ते सर्वात आधी स्थायिक झाले ते शुद्र जमातीच्या राज्यात. या देशात सर्वत्र शूद्राच राहतात हा त्यांचा गैरसमज त्यांनी आपल्या वैदिक वाड्मयातून दृढ करून ठेवला. प्राचीन इराणमधील असुरांशी असलेल्या वैराच्या स्मृती कायम ठेवत येथील जेही समाज वैदिक धर्माविरुद्ध होते त्यांनाही असुर हे संबोधन वापरायला सुरुवात केली. शूद्रांच्या राज्यातच ऋग्वेदाच्या मुळच्या जुनी पर्शियन भाषेवर स्थानिक प्राकृत भाषेचे संस्कार करून वैदिक भाषा तयार करण्यात आली असे जे. ब्लॉख ते मायकेल वित्झेल यासारख्या अनेक भाषातज्ञांनी दाखवून दिले आहे. शुद्रांशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या लक्ष्मी, मा (माया) यासारख्या अनेक स्थानिक देवता ऋग्वेदाच्या अंतिम मंडळात समाविष्ट केल्या गेल्या. स्थानिक यक्षसंकल्पना तर स्वीकारलीच पण योग, संन्यास, तप इ. अशा एतद्देशीय समन व शिव-शक्तीप्रधान लोकधर्मातील अनेक दैवते व कल्पना बदल करून स्वीकारल्या. यती, तापस, केशी (म्हणजे जटा वाढवलेले मुनी) यांच्याशी परिचय झाल्यामुळे वैदिक धर्मातही या आधी अज्ञात असलेल्या तत्वांचा काही अंशी शिरकाव झाला.
वैदिकांनी स्थानिक लोकांसाठी यज्ञ करून यज्ञसंस्थेचा परिचय एतद्देशीय लोकांना करून तर दिलाच पण इंद्र, विष्णू, वरूण इ. वैदिक देवतांना एतद्देशियात लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. यज्ञविधी दीर्घकाळ चालणारे आणि सामुहिक कर्म असल्याने मूर्तिपूजक व प्रतीमापुजक स्थानिकांना यज्ञांचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. साहचर्याने अशी सांस्कृतिक देवानघेवाण होणे स्वाभाविक होते. शुद्र जमातीच्या परीसरात वैदिक साहित्याची रचना जवळपास पूर्ण केल्यानंतर मात्र पुढे कुरु प्रांताच्या दिशेने सरकले. वैदिक धर्माच्या वाढीसाठी त्यांना राजाश्रय मिळवण्याची गरज होती. आता यज्ञसंस्था त्यांनी ब-यापैकी विकसित करून डामडौलाची व आकर्षक बनवलेली होती. राजांना आकर्षित करण्यासाठी राजसूय, अश्वमेध यासारख्या यज्ञांचे अनिवार माहात्म्य वाढवून ठेवले होते. धर्मांतरासाठी व्रात्यस्तोम विधीचीही निर्मिती केली गेली होती.
कुरु-पांचाल-शौरसेन-मत्स्य भागात राजाश्रयामुळे वैदिकांना चांगला जम बसवता आला. कुरु वंशीय लोक मुळचे उत्तर-कुरु (म्हणजे मध्य आशियातील) आहेत अशा दैवी पुराकथा निर्माण केल्यामुळे स्वाभाविकच कुरु राजांना वैदिकांबद्दल आस्था वाटणे स्वाभाविक होते. कुरु-पांचाल भागाला आर्यावर्त असे नाव देऊन हा भाग वैदिकांसाठी अतिपवित्र आहे असे घोषित केले. आर्य शब्दालाही नवा अर्थ देऊन त्यालाही त्या भागात लोकप्रिय केले. बरेचशे ब्राह्मण साहित्य याच भागात निर्माण केले गेले. आपल्या धर्माच्या संघटनासाठी मनुस्मृतीच्या रचनेची सुरुवात याच आर्यावर्तात केली गेली. वैदिक धर्मात दुसरा महत्वाचा वर्ण म्हणजे राजन्य. भारतात आलेल्या वैदिक धर्मियात आता कोणी राजन्य (राजा) शिल्लक राहिला नसल्याने एतद्देशीय खतीय (जमीनदार योद्धे) वर्गाला खुश करण्यासाठी राजन्य शब्दाला डच्चू देत खतीय शब्दाचेच क्षत्रीय असे वैदिकीकरण केले व त्या शब्दाभोवती अद्भुत वलय निर्माण केले. जसे सुद्द या मूळच्या शब्दाचे रुपांतर शुद्र असे केले गेले तसेच मूळच्या खतीय शब्दाचे झाले. इसवी सनपूर्व दुस-या शतकापर्यंत काही प्रमाणात संख्या वाढलेले वैदिक धर्मीय कुरु-पांचाल परिसरालाच आपले मुख्य स्थान मानत राहिले. आर्यावर्त व वायव्य भाग वगळता भारतीय भूगोल त्यांना माहित नव्हता हे मनुस्मृतीवरून स्पष्ट आहे. ब्राह्मण ग्रंथात मगध व पूर्वेकडे असुर राहतात तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे शुद्र जमाती राहतात असे नमूद केले.
वैदिक धर्माच्या प्रसारासाठी वैदिकांनी आपल्या धर्माची फेररचना केली आणि सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक नेमले. त्यांच्यामार्फत त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. इसपू पहिल्या शतकात दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
वैदिक धर्माचे सामाजिक स्थान वाढवण्यासाठी मनुस्मृतीतून ब्राह्मण वर्णावर सर्वाधिक बंधने टाकली गेली. यज्ञोपवीत असणे म्हणजे वैदिक धर्माचे असे ओळख देणारे चिन्हही निर्माण केले. आरंभीच्या काळातील ब्राह्मण हे आपल्यावरील बंधनांचे शक्यतो काटेकोर पालन करत असत. वेदाभ्यास, यज्ञकर्म व कठोर धर्माचरण यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रतिष्ठा वाढतच गेली. इतकी कि समन परंपरेतील योगी-तापस-मुनी यांच्याएवढाच सन्मान त्यांना मिळू लागला. सम्राट अशोकाने आपल्या बहुतेक शिलालेखांत “ब्राह्मण-समण” असा जोडीने उल्लेख केला आहे यावरून ब्राह्मण वर्णाने केवढे मोठे सामाजिक स्थान प्राप्त केले होते हे लक्षात येईल. वैदिक धर्मात प्रवेश करण्याची संख्या उत्तर भारतात वाढत गेली. एतद्देशीय शिव, पार्वती, गणेश इ. देवताही वैदिक धर्मियांनी वैदिक संस्कार करत स्वीकारल्या कारण मुळचे धर्मांतरित हे एतद्देशीय लोकधर्मातून आलेले असल्याने मूळ श्रद्धांचे ते जतन करणार हे उघड होते. पण यातून वैदिक धर्मात पहिली फुट पडली, ती म्हणजे श्रौत्त व स्मार्त. वैदिक धर्माला मूर्तीपूजा मान्य नाही. जे मुळच्याच धर्माशी कट्टर राहिले ते श्रौत तर मूर्तीपूजा करणारे व वैदिक धर्माचरणही करणारे वैदिक ते स्मार्त. इसपू दुस-या शतकाच्या आसपास ही फुट झाली व आदि शंकराचार्यांच्या काळात ही फुट अधोरेखित झाली. इसपू दुसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक या काळात मात्र वैदिक धर्माने संपूर्ण देशात आपले पाय रोवले. तोपर्यंतच्या काळात लोकधर्माचे (ज्यांना आज आपण हिंदू म्हणतो) व समन धर्माचे (जैन, बौद्ध आजीवक इ.)लोक वैदिक धर्माकडे काहीसे कुतूहल, काहीसा आदर आणि काही त्यांच्या धर्मतत्वांना विरोध करत आले असले तरी हा देशाच मुळचा सहीष्णू असल्याने तात्विक विवाद झाले तरी त्याला रक्तरंजित संघर्षाचे स्वरूप कधी आले नाही. पण या काळात साहित्यिक दृष्ट्या वैदिकांनी जे लेखन करून ठेवले ते त्या दीर्घकाळात वैदिकेतरांना उपलब्धच केले जात नसल्याने एतद्देशीय धर्माचे लोक त्यात काय म्हटले आहे हे समजून घेण्यापासून वंचित राहिले पण त्याचे परिणाम आपल्याला आज समजतात. तिस-या शतकानंतर वैदिक धर्माला गुप्त साम्राज्याचा प्रबळ राजाश्रय मिळाल्यानंतर मात्र वैदिक धर्मीय मोठ्या मोहिमेवर निघाले. त्याचे सांस्कृतिक, सामाजिक असे अनेक परिणाम झाले. त्याची चर्चा आपण पुढील लेखात करू.
-संजय सोनवणीस्मृतीतून ब्राह्मण वर्णावर सर्वाधिक बंधने टाकली गेली. यज्ञोपवीत असणे म्हणजे वैदिक धर्माचे असे ओळख देणारे चिन्हही निर्माण केले. आरंभीच्या काळातील ब्राह्मण हे आपल्यावरील बंधनांचे शक्यतो काटेकोर पालन करत असत. वेदाभ्यास, यज्ञकर्म व कठोर धर्माचरण यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रतिष्ठा वाढतच गेली. इतकी कि समन परंपरेतील योगी-तापस-मुनी यांच्याएवढाच सन्मान त्यांना मिळू लागला. सम्राट अशोकाने आपल्या बहुतेक शिलालेखांत “ब्राह्मण-समण” असा जोडीने उल्लेख केला आहे यावरून ब्राह्मण वर्णाने केवढे मोठे सामाजिक स्थान प्राप्त केले होते हे लक्षात येईल. वैदिक धर्मात प्रवेश करण्याची संख्या उत्तर भारतात वाढत गेली. एतद्देशीय शिव, पार्वती, गणेश इ. देवताही वैदिक धर्मियांनी वैदिक संस्कार करत स्वीकारल्या कारण मुळचे धर्मांतरित हे एतद्देशीय लोकधर्मातून आलेले असल्याने मूळ श्रद्धांचे ते जतन करणार हे उघड होते. पण यातून वैदिक धर्मात पहिली फुट पडली, ती म्हणजे श्रौत्त व स्मार्त. वैदिक धर्माला मूर्तीपूजा मान्य नाही. जे मुळच्याच धर्माशी कट्टर राहिले ते श्रौत तर मूर्तीपूजा करणारे व वैदिक धर्माचरणही करणारे वैदिक ते स्मार्त. इसपू दुस-या शतकाच्या आसपास ही फुट झाली व आदि शंकराचार्यांच्या काळात ही फुट अधोरेखित झाली. इसपू दुसरे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक या काळात मात्र वैदिक धर्माने संपूर्ण देशात आपले पाय रोवले. तोपर्यंतच्या काळात लोकधर्माचे (ज्यांना आज आपण हिंदू म्हणतो) व समन धर्माचे (जैन, बौद्ध आजीवक इ.)लोक वैदिक धर्माकडे काहीसे कुतूहल, काहीसा आदर आणि काही त्यांच्या धर्मतत्वांना विरोध करत आले असले तरी हा देशाच मुळचा सहीष्णू असल्याने तात्विक विवाद झाले तरी त्याला रक्तरंजित संघर्षाचे स्वरूप कधी आले नाही. पण या काळात साहित्यिक दृष्ट्या वैदिकांनी जे लेखन करून ठेवले ते त्या दीर्घकाळात वैदिकेतरांना उपलब्धच केले जात नसल्याने एतद्देशीय धर्माचे लोक त्यात काय म्हटले आहे हे समजून घेण्यापासून वंचित राहिले पण त्याचे परिणाम आपल्याला आज समजतात. तिस-या शतकानंतर वैदिक धर्माला गुप्त साम्राज्याचा प्रबळ राजाश्रय मिळाल्यानंतर मात्र वैदिक धर्मीय मोठ्या मोहिमेवर निघाले. त्याचे सांस्कृतिक, सामाजिक असे अनेक परिणाम झाले. त्याची चर्चा आपण पुढील लेखात करू.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...