Thursday, September 11, 2025

ग्रेट मराठा महादजी

  

ग्रेट मराठा महादजी

संक्षिप्त रूपरेखा

ओपनिंग दृश्य

पानिपतचे धमासान युद्ध. प्रेतांचे खच. महादजी एकटाच नजीबखानाच्या सैन्याशी वीरासारखा लढतो आहे. या हातघाईत त्याच्या मांडीवर वार होतो. महाद्जे कसाबसा आपला घोडा बाहेर काढतो. पण फार अंतर जाऊ शकत नाही. बेशुद्ध होऊन खाली कोसलतो. रानेखान भिस्ती जखमी सैनिकांना पाणी पाजत असतो. महादजी कोसळला आहे हे पाहताच तो अमला रेडा घेऊन वेगाने महाद्जीज्व्ल जातो. शत्रू पाठलाग करत जवळ येत आहे. रानेखान महाद्जीला बाजूला ओढत नेतो आणि प्रेतांआडे त्याला लपवतो. शत्रू जरा दूर जाताच तो रेड्यावरील पाण्याच्या पखाली काढून फेकतो आणि महाद्जीला त्यावर बसवून युद्धभूमीवरून बाहेर काढून अरण्यात नेतो. मांडीची जखम बांधतो.  वाटेत महादजी शुद्धीवर येतो.  विनाश झाल्याचे ऐकून दुखी होतो. प्रतिज्ञा करतो...मी मराठ्यांची सत्ता येथे  पुन्हा बसवेल..

टायटल्स.

मधल्या काही निवडक घटनांचे निवेदन ग्राफिक स्वरूपात.

१.       महादजीला वारस मानण्यास राघोबादादाचा विरोध. मान्यतेसाठी पैशांची मागणी जे महादजी देऊ शकत नव्हता. मग त्याने मानाजी शिंदे (साबाजी शिंदेचा नातू) यास वारस घोषित केले. यामुळे नाराज होऊन महादजी उज्जैनकडे निघून गेला. राघोबादादाने त्याला कैद करण्यासाठी पथक पाठवले, पण महादजी त्यांच्या हातावर तुरी देऊन माळव्यात सटकला.

२.       महाद्जीने मालवा आणि राजस्थानमधील मराठा सरदारांना एकत्र केले आणि आपली शक्ती वाढवायला सुरुवात केली.

३.       माधवराव पेशव्याने महादजीची योग्यता ओळखली आणि महाद्जीला सरदार घोषित केले. (सन १७६८)

४.       पातशहा शाह आलम त्यावेळेस दिल्लीत नसून इंग्रजांच्या ताब्यात अलाहाबाद येथे होता. माधवराव पेह्स्व्याच्या आज्ञेवरून महादजी व बिनीवाले वगैरे सरदारांना दिल्लीवर चाल करून जायला सांगितले. पण मध्ये नवलसिंग जाट या राजाने त्यांना अडथळा उभा केला. १७७० मध्ये युद्ध झाले त्यात जाट हरले.

५.       बंगश आणि नजीबखानाने (दिल्ली यांच्या ताब्यात होती) मराठ्यांना विरोध केला.. अब्दालीचीही मदत मागितली जी मिळाली नाही. मराठ्यांनी वेढा घातला. पण ३१ ऑक्टोबर १७७० रोजी नजीबखानाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा झाबेताखान याने स्वत:ला मिरबक्षी (सेनापती) घोषित केले. पण दोआबात झालेल्या युद्धात बंगशने शरणागती पत्करली आणि मराठ्यांचे मुळचे प्रांत त्यांना परत दिले.

६.       शाह आलमची आई झीनत महालने त्याला मराठ्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला. इंग्रजांच्या तावडीतून त्यालाही सुटायचे होते. पण त्याच्या अती महाद्जीला मान्य नव्हत्या. महाद्जीने धमकी दिली कि तो त्याच्याऐवजी अन्य कोणाला पातशहा बनवेल.

७.       महादजी शिंदेने १७७१ मध्ये दिल्ली जिंकून झाबेताखानच्या हातून काढून घेतली आणि जवानबख्त (शाह आलमचा मुलगा) याला सम्राट बनवले. मग शाह आलमने अटी घालायचे थांबवले व महाद्जीच्या सर्व अटी मान्य केल्या आणि मराठ्यांच्या संरक्षणात दिल्लीस यायला निघाला. अनुपशहर येथे महादजी त्याला भेटला.

८.       १७७२ मध्ये महादजीने शाह आलमला तख्तावर बसवले. पानिपतमध्ये गमावलेली प्रतिष्ठा मराठ्यांनी पुन्हा हस्तगत केली. यामुळे इंग्रज नाराज झाले. मराठे उत्तरेच्या राजकारणात नको म्हणून त्यांनी दक्षिणेतच त्यांना अडकावून ठेवायचे धोरन ठरवले.

९.       यानंतर लगेच महादजी पात्शाहाला सोबत घेत झाबेताखानला धडा शिकवण्यासाठी दोआबात चालून गेले. रोहिलखंड हा त्याचा प्रांत ताब्यात घेतला. शुक्रतल (जेथे दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाला होता) तेही जिंकून घेतले. शुक्रतालच्या लढाईत झाबेताखान मात्र पळून गेला.संतापलेल्या महाद्जीने नाजेबाच्या दुष्कृत्यांचा सूड घेतला. त्याची कबर, महाल उखडून टाकले. परीवारही कैद केला.

१०.   मराठे अशा रीतीने दिल्लीचे स्वामी बनले. पण माधवराव पेशव्याच्या १८ नोव्हेंबर १७७२ रोजी मृत्यू झाला. नारायणराव पेशव्याचा राघोबादादाने २० ऑगस्ट १७७३ ला सत्तेच्या प्राप्तीसाठी खून केला.  पेशवे पद मिळवण्यासाठी राघोबादादाने इंग्रजांशी संधान बांधले. मराठा राज्यातील अशांततेचा फायदा घेण्यासाठी निजाम सरसावला. निजामाला तोंड देण्यासाठी राघोबादादा निघाला आणि त्याच्या अनुपस्थितीत नानाने राघोबादादाला रोखण्यासाठी बारभाई मंडळाची स्थापना केली. 

११.    राघोबादादाने पेशवे पद मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. गव्हर्नर जनरल वारेन Hastings ने त्याला पेशवा बनवण्यासाठी पूर्ण पाठींबा दिला, महाद्जीला फोडायचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरला.

१२. इंग्रज राघोबाला घेऊन पुण्यावर चाल करायला निघाले. पुण्यात पळापळ माजली.

येथवरची पार्श्वभूमी.

दृश्य कथा येथून सुरु व्हावी... 

पटकथा फ्लो

 

१.       पुण्याच्या दिशेने इंग्रजांची राघोबादादाला घेऊन त्याला पेशवा बनवण्यासाठी वाटचाल. सरदार व लोक पुणे सोडून पळून जाऊ लागले. पण महादजी, तुकोजी यांनी इंग्रजांना कमी सैन्यानिशी खंडाला ते तळेगाव या दरम्यान गनिमी काव्याने तुफानी हल्ले करून इंग्रजांना हरवले. वडगाव येथे तह करून इंग्रजांनी स्वत:ची सुटका करून घेतली. (१७७९)

२.       इंग्रजांचे महत्व वाढते आहे व ते दिल्लीच्या पात्शाहाला अंकित करू पाहत आहेत हे लक्षात आल्याने महाद्जीने इंग्रजांची तह करायचे ठरवले कारण त्यांना दिल्लीकडे लक्ष द्यायचे होते. नाना फडणवीसचा या तहाला विरोध होता. हैदर अलीलाही या तहात सामील करून घ्यावे असे त्याचे म्हणणे होते. पण महाद्जीने दूरदृष्टीने हा तह स्वत:च्या जोरावर केला त्याला सालभाईचा तह म्हणतात. त्यानुसार इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात दखल द्यायची नव्हती.

३.       दिल्ली दरबारात दोन गट होते. एक गट पात्शहाचे रक्षण इंग्रजांकडे द्यावे या मताचा होता तर दुसरा गट महाद्जीच्या ताब्यात द्यावे या मताचा होता. दोघांत कट-कारस्थाने चालू होती. इंग्रज वाट पाहत होतेयोजना आखत होते.

४.       महाद्जीचे दिल्लीला येणे लांबणीवर पडावे म्हणून त्याला वाटेत अनेक ठिकाणी लढाया द्याव्या लागतील अशी व्यवस्था दुसऱ्या गटाने केली. गोहदग्वाल्हेर इ. ठिकाणी महादजी युद्धात अडकून पडला. वेळ गेला. तोवर इंग्रजांनी पातशहाला आपल्या ताब्यात घेण्याचे धोरण जवळ जवळ पुरे केले होतेपण पातशहा शाह आलम नाखूष होता. त्याला इंग्रजांपेक्षा महादजी हवा होता. कारण त्याने पूर्वी त्याला तख्तावर बसवले होते.

५.       महादजी या युद्धांत विजयी झाला असला तरी तो आर्थिक अडचणीत सापडला. त्याने पुणे दरबाराकडे २५ लाख रुपयांची मागणी केलीपण नानाने ती करण्यास नकार दिला. शेवटी अहिल्याबाईनी हे २५ लाख रुपये दिले तेव्हा महादजी सैनिकांचे वेतन भागवून दिल्लीत जाऊ शकला.

६.       त्याला विरोधी गटाशी संघर्ष करावा लागलापण शेवटी अनेक राजकीय युद्धेसंघर्षकाही खून पडूनमहाद्जीच्याही खुनाचा प्रयत्न होऊन शेवटी महाद्जीने कौशल्याने व युधानीतीमुळे त्यांच्यावर मात करत शाह आलमला मुक्त केले. त्याला सोबत घेऊन पातशहाच्या शत्रूलानजीबखानाच्या मुलाला व नातवाला युद्धात पाठलाग करत हरवले आणि नजीबाची कबरही उध्वस्त केली. राज्पुतांनाही शह दिला. शाह आलम या वेळेसही महादजीच्या सोबत होता.

७.       इंग्रज महादजीच्या वर्चस्वामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी महादजीच्या शत्रूंना मदत करण्याचा प्रयत्न केला तर महाद्जीने पातशहाच्या फर्मानाने इंग्रजांना १/४ बंगाल पातशहाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यामुळे देशभर पडसाद उमटले आणि महाद्जीचा देशात आणि दरबारात दरारा वाढला.

८.       यामुळे नाना फडणवीस अस्वस्थ झाला. महादजी उत्तरेत आपले स्वत:चे साम्राज्य बनवेल अशी भीती त्याला वाटली त्यामुळे इंग्रजांना त्याने पुणे दरबारातही इंग्रज वकील कायम असावा अशी मागणी केली. इंग्रजांना सालबाईच्या तहाप्रमाणे महादजीची परवानगी घेणे आवश्यक होते. महाद्जीने इंग्रजांना सुनावलेपण नवीन गव्हर्नर जनरलला मराठयांत फुट हवी होती आणि हैदर अलीवरही चेक हवा होता म्हणून नानाला कन्व्हिन्स करून वकील नेमला. तो पुणे दरबारात हजर झाला.

९.       मग महाद्जीने ज्याही सत्तांना इंग्रजानी संरक्षण दिले होते त्यांच्यावर हल्ले सुरु केले आणि इंग्रजांना वठणीवर आणले. पुणे दरबाराची चाल फेल गेली कारण  इंग्रजांनी महादजी जिवंत असेपर्यंत पुणे दरबारात फारसा हस्तक्षेप केला नाही.

१०.    पातशाही सत्ता राजस्थानमध्येही कायम करत महादजीने जे अलौकिक कार्य केले त्यामुळे पातशहाने खास शाही दरबार भारावून महादजीला वकील इ मुतालीक आणि अमीर उल-उमरा ही पडे बहाल केली आणि महादजी खऱ्या अर्थाने दिल्ली साम्राज्याचे शासक बनले.   

 

 

No comments:

Post a Comment

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...