जैन धर्माच्या प्रत्येक तीर्थंकरांच्या सेवक रुपात एक यक्ष व एका यक्षीचे स्थान असते. यक्ष आणि यक्षिणी हे तीर्थंकराच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूंना दर्शवतात, यक्ष उजव्या बाजूला आणि यक्षिणी डाव्या बाजूला. ते तीर्थंकराचे भक्त मानले जातात आणि त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असतात. भारतातील यक्ष संस्कृती प्राचीन असून लोकधर्मात यक्षांचे रक्षक स्वरूपात फार मोठे स्थान होते. सरोवरे, गावे, शेते, संपत्ती इ.चे यक्ष रक्षण करतात अशी लोकश्रद्धा होती. लोकसंस्कृतीशी निकटचे नाते टिकवून ठेवण्यासाठी जैनांनीही यक्ष व यक्षिणीना तितकेच महत्वाचे स्थान दिले.
जैन यक्षात प्रामुख्याने पूजनीय असलेले यक्ष असे. गोमुख, महायक्ष, करमुख, त्रिमुख, यक्षेश्वर, तुंबर, कुसुम किंवा पुष्प, मातंग किंवा वारानंदी, कवजय किंवा स्यामा यक्ष, अजीत, ब्रम्ह यक्ष, ईश्वर यक्ष, कुमार चतुर्मुख किंवा संमुख यक्ष, पाताळ यक्ष, किन्नर यक्ष, शांतीनाथांचा गरुड यक्ष, गंधर्व यक्ष, खेंद्र किंवा यक्षेंद्र, धर्मेंद्र, कुबेर, वरूण, भृकुटी, गोमेद, पार्श्व किंवा धरणेंद्र, मातंग यक्ष व सर्व तीर्थकरांचे सेवक यक्ष असतात.
यक्षिणीमध्ये चक्रेश्वरी, अजिता किंवा रोहिणी, निर्वाणी, दुरीतायी किंवा प्रज्ञाप्ती, वज्रश्रीमखाला किंवा काली, महाकाली किंवा पुरुषदत्ता, अच्युता किंवा शामा, मानववेगा, ज्वाला मालिनी, सुतारा, निर्वाणी, गौरी, मानवी, चंदा, गांधारी, विदिता, विजया, अंबुसा, अनंतमती, कोंडर्पा, पुण्णगदेवी, कनववती, महामानसी, बाला, अच्युता, धरणी तारा, वैरोट्या किंवा अपराजिता, नारदत्ता किंवा बहुरूपिणी, गंधारी, चामुंडा, अंबिका, कुस्मडी किंवा आमरा, पद्मावती सिद्धाईका इत्यादी होत.
जैन धर्मातील प्रत्येक तीर्थंकरांचे संरक्षक यक्ष आणि यक्षी खालीलप्रमाणे-
· ऋषभनाथ (आदिनाथ)
- यक्ष: गोमुख
- यक्षिणी: चक्रेश्वरी
· अजितनाथ
- यक्ष: महायक्ष
- यक्षिणी: रोहिणी
· संभवनाथ
- यक्ष: त्रिमुख
- यक्षिणी: दुर्गा
· अभिनंदननाथ
- यक्ष: यक्षराज
- यक्षिणी: काली
· सुमतिनाथ
- यक्ष: तुम्बुरु
- यक्षिणी: महाकाली
· पद्मप्रभ
- यक्ष: कुसुम
- यक्षिणी: स्यामा
· सुपार्श्वनाथ
- यक्ष: मातंग
- यक्षिणी: शांता
· चंद्रप्रभ
- यक्ष: श्याम
- यक्षिणी: विजया
· पुष्पदंत (सुविधिनाथ)
- यक्ष: अजित
- यक्षिणी: सुतारा
· शीतलनाथ
- यक्ष: ब्रह्मा
- यक्षिणी: अशोक
· श्रेयांसनाथ
- यक्ष: यक्षेत
- यक्षिणी: मानवी
· वासुपूज्य
- यक्ष: कुमार
- यक्षिणी: चंडा
· विमलनाथ
- यक्ष: षण्मुख
- यक्षिणी: विदिता
· अनंतनाथ
- यक्ष: पाताल
- यक्षिणी: अंकुशा
· धर्मनाथ
- यक्ष: किन्नर
- यक्षिणी: कंदर्पा
· शांतिनाथ
- यक्ष: गरुड
- यक्षिणी: निर्वाणी
· कुंथुनाथ
- यक्ष: गंधर्व
- यक्षिणी: बला
· अरनाथ
- यक्ष: यक्षनायक
- यक्षिणी: धारिणी
· मल्लिनाथ
- यक्ष: कुबेर
- यक्षिणी: धर्मप्रिया
· मुनिसुव्रत
- यक्ष: वरुण
- यक्षिणी: नरदत्ता
· नमिनाथ
- यक्ष: भृकुटी
- यक्षिणी: गंधारी
· नेमिनाथ
- यक्ष: गोमेध
- यक्षिणी: अंबिका
· पार्श्वनाथ
- यक्ष: पार्श्व
- यक्षिणी: पद्मावती
· महावीर
- यक्ष: मातंग
- यक्षिणी: सिद्धायिका
जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर परंपरांनुसार तीर्थंकरांच्या संरक्षक यक्ष आणि यक्षिणींच्या नावांमध्ये काही भिन्नता आढळते. या भिन्नता मुख्यतः परंपरागत ग्रंथ, आचार्यांच्या व्याख्या आणि स्थानिक श्रद्धांवर अवलंबून असतात. खालीलप्रमाणे काही प्रमुख तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या नावांमधील भिन्नता खाली स्पष्ट केली आहे.
सामान्य भिन्नता:
1. नावांमधील फरक: दिगंबर आणि श्वेतांबर परंपरांमध्ये यक्ष-यक्षिणींची नावे कधी कधी पूर्णपणे वेगळी असतात किंवा एकाच देवतेचे वेगवेगळे रूप मानले जाते.
2. प्राधान्य: काही यक्ष किंवा यक्षिणी दिगंबर परंपरेत अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात, तर श्वेतांबर परंपरेत त्यांचे स्थान भिन्न असू शकते.
3. आकृतिबंध आणि वर्णन: यक्ष-यक्षिणींचे वर्णन (उदा., त्यांचे रूप, रंग, वाहन, आयुधे) दोन्ही परंपरांमध्ये भिन्न असू शकते.
4. स्थानिक परंपरा: काही प्रादेशिक जैन मंदिरांमध्ये स्थानिक परंपरांनुसार यक्ष-यक्षिणींची नावे किंवा पूजा पद्धती बदलतात.
काही प्रमुख तीर्थंकरांच्या यक्ष-यक्षिणींच्या नावांमधील भिन्नता:
1. ऋषभनाथ (आदिनाथ)
o श्वेतांबर:
§ यक्ष: गोमुख
§ यक्षिणी: चक्रेश्वरी
o दिगंबर:
§ यक्ष: गोमुख (समान)
§ यक्षिणी: चक्रेश्वरी (समान, परंतु काही दिगंबर ग्रंथांमध्ये तिचे नाव "अपराजिता" असेही येते).
o भिन्नता: यक्षिणीचे नाव आणि तिच्या मूर्तीचे स्वरूप (उदा., हातांची संख्या, आयुधे) बदलते.
2. पार्श्वनाथ
o श्वेतांबर:
§ यक्ष: पार्श्व (किंवा धर्मेंद्र)
§ यक्षिणी: पद्मावती
o दिगंबर:
§ यक्ष: पार्श्व (समान)
§ यक्षिणी: कुशमांडिनी (पद्मावतीऐवजी).
o भिन्नता: यक्षिणीचे नाव पूर्णपणे वेगळे आहे. श्वेतांबर परंपरेत पद्मावतीला विशेष महत्त्व आहे, तर दिगंबर परंपरेत कुशमांडिनीला प्राधान्य दिले जाते.
3. महावीर
o श्वेतांबर:
§ यक्ष: मातंग
§ यक्षिणी: सिद्धायिका
o दिगंबर:
§ यक्ष: मातंग (समान)
§ यक्षिणी: सिद्धायिका (समान, परंतु काही दिगंबर ग्रंथांमध्ये तिचे नाव "वैरोट्या" असेही सापडते).
o भिन्नता: यक्षिणीचे नाव आणि तिच्या पूजेचे स्वरूप बदलते. दिगंबर परंपरेत वैरोट्याला काही ठिकाणी अधिष्ठायिका म्हणून पूजले जाते.
4. नेमिनाथ
o श्वेतांबर:
§ यक्ष: गोमेध
§ यक्षिणी: अंबिका
o दिगंबर:
§ यक्ष: षण्मुख
§ यक्षिणी: कुशमांडिनी (काहीवेळा अंबिका ऐवजी).
o भिन्नता: यक्ष आणि यक्षिणी दोन्हींची नावे बदलतात. श्वेतांबर परंपरेत अंबिका (किंवा कुशमांडिनी) अत्यंत लोकप्रिय आहे, तर दिगंबर परंपरेत यक्षाचे नाव वेगळे आहे.
5. शांतिनाथ
o श्वेतांबर:
§ यक्ष: गरुड
§ यक्षिणी: निरवाणी
o दिगंबर:
§ यक्ष: किंपुरुष
§ यक्षिणी: महामानसी
o भिन्नता: यक्ष आणि यक्षिणी दोन्हींची नावे वेगळी आहेत. दिगंबर परंपरेत महामानसीला अधिक महत्त्व आहे.
यक्षिणींची लोकप्रियता: श्वेतांबर परंपरेत पद्मावती, अंबिका आणि चक्रेश्वरी यांसारख्या यक्षिणींना विशेष स्थान आहे आणि त्यांच्या स्वतंत्र मंदिरेही आढळतात. दिगंबर परंपरेत कुशमांडिनी आणि अपराजिता यांना प्राधान्य मिळते.
यक्षांचे स्वरूप: यक्षांचे नाव काहीवेळा समान राहते (उदा., गोमुख, मातंग), परंतु त्यांचे चित्रण आणि पूजाविधी बदलतात.
ग्रंथांचा आधार: श्वेतांबर परंपरेत "प्रतिष्ठासार" आणि "त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र" यांसारख्या ग्रंथांवर आधारित नावे ठरतात, तर दिगंबर परंपरेत "हरिवंशपुराण" आणि "आदिपुराण" यांसारख्या ग्रंथांचा प्रभाव आहे.
यक्ष परंपरा
अथर्ववेद आणि बव्हंशी उपनिषदांमध्ये येणारा “ब्रह्म” हा शब्द मूळच्या यक्ष (अद्भुत, अचिंत्य व संरक्षक शक्ती) या शब्दाचे पर्यायी नाव आहे. यक्षपूजा वेदपूर्व काळापासून चालू आहे. यक्षपूजेचा ऱ्हास झाल्यानंतर वैदिक लोकांनी यक्षांची क्षुद्रदेवतांमध्ये गणना केली. वीर व ब्रह्म हे शब्द यक्षाचे पर्याय असून ‘वीरब्रह्म’ या देवतेची पूजा हा यक्षपूजेचाच अवशेष होय. वैदिक संस्कृतीतील येणारी ब्रह्मकल्पना व ब्रह्म हा शब्द ही यक्षसंस्कृतीचीच देणगी आहे असे अनेक विद्वानांचे मत आहे. विशेषता: केनोपनिशषदातून तर हे जास्तच स्पष्ट होते. ऋग्वेदात ब्रम्ह ही देवता नसून त्यातील ब्रम्ह या शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे. यक्ष संस्कृती एतद्देशीय व पुरातन असून लोकधर्मांमध्ये ती अत्यंत प्रिय देवता होती. गौतम बुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नावाचा एक यक्षच होता, स्वत: बुद्धाला यक्ष म्हटले जाई, जैन धर्मियांनी यक्ष-यक्षींना तीर्थंकरांचे सेवक मानले आहे असे असले तरी वैदिक साहित्यात मात्र यक्षांना त्यांना नरभक्षक, मायावी ठरवून बदनाम करण्यात आले. श्रमण संस्कृतीचा उदय मुळात लोकसंस्कृतीतून झाला असल्याने त्यांनीही यक्षाचे स्थान आपल्या तत्वपरंपरेत कायम ठेवले असे दिसून येते. असे असले तरी रामायण व महाभारतामध्ये तसेच पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मणिभद्र ही दशकुमारचरितात आलेली नावे तर मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्, सुप्रतीक यांचे नाव कथासरित्सागरात आले आहे.
बौद्ध धर्मातील स्तूप तसेच हिंदू मंदिरांतही यक्षांच्या प्रतिमा आढळून आलेल्या आहेत. वीर मारुतीही मुळची यक्ष असावी असा अंदाज वर्तवण्यात येतो.
यक्षप्रतिमांचे प्राचीन पुरावे-
परखम (मथुरेजवळ) येथे यक्षाची एक प्राचीन प्रतिमा मिळून आली असून ती मणीभद्र यक्षाची असावी असा विद्वानांचा कयास आहे. मणीभद्र यक्षाच्या अन्य दोन प्रतिमा मिळाल्या असून एक ग्वाल्हेरजवळील पवाया येथे तर दुसरी कोशाम्बी जवळील भीटा येथे आहे.
परखम शिलालेखाखाली एक त्रुटित शिलालेखही आहे त्यावरून ही प्रतिमा इसपू दुसऱ्या शतकातील असावी असा अंदाज विद्वानांनी बांधला हे. हा यक्ष व्यापाऱ्यांचे रक्षण करणारा असावा असेही अनुमान काढले गेलेले आहे. मथुरा परिसरातीलच भारहुत येथील याच काळातील बुद्ध स्तूपातही यक्षिणीच्या प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. सर्व जैन व शैव हिंदू मंदिरांत यक्षाच्या प्रतिमा प्राधान्याने असतात.
संदर्भ-
1. History of Early Stone Sculpture at Mathura, Ca. 150 BCE-100 CE By Sonia Rhie Mace, Sonya Rhie Quintanilla, 2007
गुजरात मध्ये गिरनार वाद आहे जैन आणि हिन्दू असा कदाचित अंबिका ही नेमीनाथांची यक्ष देवी असल्याने असा वाद होत आहे का
ReplyDeleteहो.
Delete