दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते या भ्रमातुन महाराष्ट्राचे समाजमन ढवळुन काढनारी, संतप्त बनवनारी एक विक्रुत कहाणी जेम्स लेन या स्वता:ला इतिहासकार समजणार्या ग्रुहस्थाने प्रस्रुत केली. पण मुळात हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आलिलशामधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)
शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेन्व्हा निजामशाहीत होता. त्या काळी दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....दादोजी जरी पुढे शहाजी राजांतर्फे पुणे-सुपे प्रांताचेही कारभारी नियुक्त झाले असले तरी दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पुढे शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडुन तसे प्रयत्न केले असले तरीही हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी पुढे १६५७ साली काबीज केला...
१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्याही सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.
आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.
दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.
वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही...ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.
शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजी आधीपासुनच आदिलशहातर्फे कोंडाना, दौन्ड आणि लातुर विभागाचा कारभारी म्हनुन काम पहातच होते. पुणे-सुपे प्रांत छोटा होता आणि त्याला फारसे महत्वही नव्हते. पुण्यावरुन मुरारपंत जगदेव या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने गाढवाचा नांगर फिरवौन ते जवळपास नष्ट केले गेले होते. अशा स्थीतीत आदिलशहाच्या सेवेत यावे लागल्याने शहाजी महाराजांनी या प्रांतासाठी नवी नेमनुक करण्यापेक्षा त्याच विभागातील, आदिलशहाच्या विश्वासातील आणि अनुभवी प्रशासक मानसाला नेमणे स्वाभाविकच होते. एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.
पण शिवापुर आमराइतील आंबा तोडला आणि त्याचा पश्चाताप होवुन त्यांनी शिवाजी महाराजांना हात तोडायची विनंती केली आणि ती शिवरायांनी मानली नाही म्हणुन त्यांनी अर्धा हात कापलेली बाराबंदी घालायला सुरुवात केली ही भाकडकथा इतिहासकारांना (?) (बाबासाहेब पुरंदरे यांना) निर्माण करावी लागली यावरुन या तथाकथित इतिहासकारांना द्न्यातीबांधवाचे काही पाप लपवायचे होते हे स्पष्ट होते.
येथे आपण तत्कालीन घडामोडी पाहुयात.
१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे तेंव्हा निजामशाहीत होते तर दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते.
१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.
त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.
१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत बगलोर येथे घेवुन गेले. म्हणजेच १६३६ पर्यंत दादोजी आणि भोसले परिवाराचा काडीएवढाही संबंध नव्हता.
थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे (सिंहगड) सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या ब्राहमण नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच ब्राह्मण कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी आपल्या पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.
या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे...
आता दादोजींचा हात का तोडला गेला आणि त्यांना वीष घेवुन आत्महत्या का करावी लागली याबद्दल:
सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.
यावरुन माझ्यासमोर आलेली ही हकिकत जी ऐतिहासिक निवाड्यांवरुन सिद्ध होते, हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. तसाच ते शहाजीराजांचा महसुल हडपत नसतील असे नाही. ही घटना १६४५ ची आहे. दादोजींनी वीषप्रयोग करुन एका स्व-बांधवाची हत्या केली आहे. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळाली असनारच आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे (कारण ब्रह्महत्या हे महापापात गणले जात होते...म्हणुन) आणि तदनंतर स्वत:च वीष घेवुन आत्महत्या करणे.
थोडक्यात दादोजी कोंड्देव हे कोनत्याही समाजाला आदर्श वाटावेत असे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ते शहाजी राजांचे आपत्कालीन परिस्थितीत नेमले गेलेले कारभारी होते. ते एकाच वेळेस आदिलशहा आणि शहाजीराजांचे सेवक होते, ही दुहेरी निश्ठा कोणत्याही स्वाभिमानी माणसाला शोभणारी नव्हे. १६३६ पुर्वी शहाजीराजे आणि दादोजींची मैत्री असण्याचेही पुरावे नाहीत आणि तशी शक्यताही नाही. पुणे सर्वप्रथम (१६३०) मुरारपंत जोगदेवाने उद्द्वस्त केले त्याला जवळच सुभेदारी करणार्या दादोजींनी कसलाही विरोध केलेला दिसत नाही. त्याच उद्ध्वस्त गावात सोण्याचा नांगर चालवल्याचे श्रेय त्यांना देता येत नाही. त्यांनी एका ब्राह्मणाचाच खुन केला आहे असे इतिहासावरुन दिसते. हा खुन त्यांनी आपला भ्रष्ट आचार लपवण्यासाठी केला आणि त्याची शिक्षा त्यांना त्यांचे हुजुर आदिलशहाने दिली आणि त्याचीच परिणती त्यांच्या आत्महत्येत झाली असे एकुन घटनाक्रमावरुन दिसते. ते शिवरायांचे प्रेरकही नव्हते कारण ते सतत शहाजी राजांकडे शिवरायांच्या स्वरज्य प्रयत्नांबद्द्ल कागाळ्या करत असत. सिवरायांनी १६४६ साली तोरणा जिंकला...पण हयातीत कोंडाना किल्ला त्यांनी शिवरायांच्या हवाली केला नाही कारण ते आदिलशहाचेही निष्ठावंत सेवक होते. ते शिवरायांचे गुरु असु शकत नाहीत...नव्हते हेही पुराव्यांवरुनच सिद्ध होते.
अशा स्थितीत त्यांचे कोड आजही कोणी पुरवायचे हा ज्याचा त्याचा आणि ज्याच्या त्याच्या नैतिक जाणीवेंचा प्रश्न आहे. ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही हा जातीय अहंकार आता चालणार नाही. पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही.
Sunday, October 10, 2010
Subscribe to:
Comments (Atom)
अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!
पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...