Sunday, October 10, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते या भ्रमातुन महाराष्ट्राचे समाजमन ढवळुन काढनारी, संतप्त बनवनारी एक विक्रुत कहाणी जेम्स लेन या स्वता:ला इतिहासकार समजणार्या ग्रुहस्थाने प्रस्रुत केली. पण मुळात हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आलिलशामधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेन्व्हा निजामशाहीत होता. त्या काळी दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....दादोजी जरी पुढे शहाजी राजांतर्फे पुणे-सुपे प्रांताचेही कारभारी नियुक्त झाले असले तरी दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पुढे शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडुन तसे प्रयत्न केले असले तरीही हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी पुढे १६५७ साली काबीज केला...
१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्याही सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.

दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते.

वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही...ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत.

शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजी आधीपासुनच आदिलशहातर्फे कोंडाना, दौन्ड आणि लातुर विभागाचा कारभारी म्हनुन काम पहातच होते. पुणे-सुपे प्रांत छोटा होता आणि त्याला फारसे महत्वही नव्हते. पुण्यावरुन मुरारपंत जगदेव या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने गाढवाचा नांगर फिरवौन ते जवळपास नष्ट केले गेले होते. अशा स्थीतीत आदिलशहाच्या सेवेत यावे लागल्याने शहाजी महाराजांनी या प्रांतासाठी नवी नेमनुक करण्यापेक्षा त्याच विभागातील, आदिलशहाच्या विश्वासातील आणि अनुभवी प्रशासक मानसाला नेमणे स्वाभाविकच होते. एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे.

पण शिवापुर आमराइतील आंबा तोडला आणि त्याचा पश्चाताप होवुन त्यांनी शिवाजी महाराजांना हात तोडायची विनंती केली आणि ती शिवरायांनी मानली नाही म्हणुन त्यांनी अर्धा हात कापलेली बाराबंदी घालायला सुरुवात केली ही भाकडकथा इतिहासकारांना (?) (बाबासाहेब पुरंदरे यांना) निर्माण करावी लागली यावरुन या तथाकथित इतिहासकारांना द्न्यातीबांधवाचे काही पाप लपवायचे होते हे स्पष्ट होते.

येथे आपण तत्कालीन घडामोडी पाहुयात.

१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे तेंव्हा निजामशाहीत होते तर दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत बगलोर येथे घेवुन गेले. म्हणजेच १६३६ पर्यंत दादोजी आणि भोसले परिवाराचा काडीएवढाही संबंध नव्हता.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे (सिंहगड) सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या ब्राहमण नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच ब्राह्मण कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी आपल्या पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे...


आता दादोजींचा हात का तोडला गेला आणि त्यांना वीष घेवुन आत्महत्या का करावी लागली याबद्दल:

सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.

यावरुन माझ्यासमोर आलेली ही हकिकत जी ऐतिहासिक निवाड्यांवरुन सिद्ध होते, हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. तसाच ते शहाजीराजांचा महसुल हडपत नसतील असे नाही. ही घटना १६४५ ची आहे. दादोजींनी वीषप्रयोग करुन एका स्व-बांधवाची हत्या केली आहे. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळाली असनारच आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे (कारण ब्रह्महत्या हे महापापात गणले जात होते...म्हणुन) आणि तदनंतर स्वत:च वीष घेवुन आत्महत्या करणे.

थोडक्यात दादोजी कोंड्देव हे कोनत्याही समाजाला आदर्श वाटावेत असे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ते शहाजी राजांचे आपत्कालीन परिस्थितीत नेमले गेलेले कारभारी होते. ते एकाच वेळेस आदिलशहा आणि शहाजीराजांचे सेवक होते, ही दुहेरी निश्ठा कोणत्याही स्वाभिमानी माणसाला शोभणारी नव्हे. १६३६ पुर्वी शहाजीराजे आणि दादोजींची मैत्री असण्याचेही पुरावे नाहीत आणि तशी शक्यताही नाही. पुणे सर्वप्रथम (१६३०) मुरारपंत जोगदेवाने उद्द्वस्त केले त्याला जवळच सुभेदारी करणार्या दादोजींनी कसलाही विरोध केलेला दिसत नाही. त्याच उद्ध्वस्त गावात सोण्याचा नांगर चालवल्याचे श्रेय त्यांना देता येत नाही. त्यांनी एका ब्राह्मणाचाच खुन केला आहे असे इतिहासावरुन दिसते. हा खुन त्यांनी आपला भ्रष्ट आचार लपवण्यासाठी केला आणि त्याची शिक्षा त्यांना त्यांचे हुजुर आदिलशहाने दिली आणि त्याचीच परिणती त्यांच्या आत्महत्येत झाली असे एकुन घटनाक्रमावरुन दिसते. ते शिवरायांचे प्रेरकही नव्हते कारण ते सतत शहाजी राजांकडे शिवरायांच्या स्वरज्य प्रयत्नांबद्द्ल कागाळ्या करत असत. सिवरायांनी १६४६ साली तोरणा जिंकला...पण हयातीत कोंडाना किल्ला त्यांनी शिवरायांच्या हवाली केला नाही कारण ते आदिलशहाचेही निष्ठावंत सेवक होते. ते शिवरायांचे गुरु असु शकत नाहीत...नव्हते हेही पुराव्यांवरुनच सिद्ध होते.

अशा स्थितीत त्यांचे कोड आजही कोणी पुरवायचे हा ज्याचा त्याचा आणि ज्याच्या त्याच्या नैतिक जाणीवेंचा प्रश्न आहे. ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही हा जातीय अहंकार आता चालणार नाही. पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही.

39 comments:

  1. chan Mahiti ahe ... Dhanyavad Sonawani Sir

    www.mulniasinayak.com

    ReplyDelete
  2. Baba'saheb' Purandare aani tatsam lokanparyant hi mahiti pochavinyachi vyavasta konitari karach.

    ReplyDelete
  3. धन्यवाद सोनावणी साहेब, खूप छान वाटले माहिती वाचून!!!!!!!!!!!!!
    राम दाभाडे

    ReplyDelete
  4. @Kishor Gaikwad: सोनवणी साहेबांनी दादू कोंडदेव चा सत्य इतिहास आहे तो उजेडात आणला . काय आपल्या लोकांत 'बरं' बोलणारे खूप आहेत 'खरं' बोलणारे तुरळक आहेत. सोनवणी सोनवणीसारखे लोक पण तुरळक आहेत कारण ते खरं बोलण्याचे धाडस करतात. त्यामुळे त्यांनी दिलेली 'माहिती' नसून इतिहास आहे आणि तो 'छान' नसून सत्य आहे. कारण जो तुमच्यासाठी छान आहे तो ब्राह्मणांसाठी छान कसा वाटेल. तेंव्हा इतिहास नेहमी सत्य असतो. तो निष्पक्ष, निधर्मी असतो.

    ReplyDelete
  5. aaplya marathyanchya dokaya prakash padala tar bare hoil. prakash padul brahmanyachi sangat tari sodatil. sadya evadhe zale tari pure. maharashtra dharma vadhavayla upyogi padel.

    ReplyDelete
  6. maratyanya kay tumi hindu dramatun vegle karnar aahet ka dadoji shivajiche sevak hote he ter kare mag tyachi jat konti hi aso shi vajiraja shathi hatat tlvar ghenara pratek mavla sresta hota
    banavaycha aahe ter abhjal kanacya kabriver bola sambhaji nagaver bola dadoji kay shivajiche shatru navte nokr hote
    jai bhavani jai shivaji

    ReplyDelete
  7. great blog..dadoji sandarbhatla lekh www.dadojikonddev.blogspot.com
    ithe punarprakashit kela ahe...dhanywaad...

    ReplyDelete
  8. SONAWANI SIR PLEASE WRITE BOOK ON IT

    ReplyDelete
  9. Mati gung hote... What I learned in my school days was so wrong..! who is responsible for teaching false histry to so many generations ... We must ask them .. everybody cant be Mr Sanjay Sonawni, who goes to the root of the things.. thatswhy it is responsibility of the government to change the things ..Now..!

    ReplyDelete
  10. Thanks for the detail information on the subject...truth is always bitter...soon many will experience it...!!

    ReplyDelete
  11. Indeed nice article, nice research ! ... & ofcourse 'true' history !

    ReplyDelete
  12. Sir, Tumchya itar articlesna bharbharun pratisaad denari mandali ithe nemki gairhajar kashi?

    ReplyDelete
  13. सोप्या आणि चांगल्या भाषेत इतिहास प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद....
    यात कोणाचा हि तेजोभंग न करता खरे सांगितले आहे.....
    हि कला या पोस्ट चे गैरवापर करून संगठना चालवणार्यांना हि शिकवा....
    :-)
    गम्मत केली.... गैरवापर करणारे तुमच्या माझ्या पेक्षा पण जास्त हुशार आहेत.... त्यांना कोणीही शिकवू शकत नाही.....

    पुनः एकदा तुमच्या पोस्ट बद्दल धन्यवाद.....
    :-)

    ReplyDelete
  14. varil utaryat apan dileli mahiti khari asel kadachit... pan me vachalelya pustaka pramane jems len ni tyachya pustakat konatya brahmanani mahiti puravali te sangitalele nahi. tari varil majkuratil Babasaheb Purandare ani itaranchi nave bhakkam puravyashivay lihu nayet.
    Ani ajun ek Jar tyani tya kathakathi brahmananchi nave sangitali asati tar me swataha jaun tyana ubhe jalale asate. mala mazya jivachi parva nahi, pan "Rajyancha" apaman sahan kela janar nahi he nakki.

    ReplyDelete
  15. कडक....!!!
    एखादं पुस्तक लिहा कि राव....!!!

    http://www.proknowliz.info/

    ReplyDelete
  16. सोनवणी सर... तुमचे विचार अगदी मनापासून पटले. पुराव्यांसकट तुम्ही जे मांडता त्याला तोड नाही. अलिकडेच लोकसत्तात पांडुरंग बलकवडे यांचा एक लेख वाचनात आला. हा त्याचा दुवा -

    http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm

    यांनीदेखील पुराव्यांची यादी दिलेली आहे. यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकलात तर आभारी राहीन सोनवणीसाहेब. पुराव्यासकट २ वेगळे परस्परविरोधी विचार मान्य होणे अशक्यच आहे. तेव्हा सामान्यजनांना जे खरे आहे त्याकडे नेण्यासाठी मदत करावी ही आग्रहाची विनंती

    व्यक्तीशः मला असे वाटते की भ्याडपणे जीवनाला पाठ दाखवून विष प्राशन करुन आत्महत्या करणारी व्यक्ती शिवाजी महाराजांसारख्या युगप्रवर्तक व्यक्तीची गुरु असूच शकत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हा पांडुरंग बलकवडॆ संदर्भ घेताना महत्वचे मुद्दे गाळतो.
      इथे पहा..
      http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_4034.html

      आणि जो ७ जानेवारी २०११ ला लेख आला होता बलकवडेंचा त्यासंबंधी......
      पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवारी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहीकात (याच साप्ताहीकात ४ महीन्यापुर्वी म्हणजेच ओक्टोंबर २०१० मध्ये डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रदीर्घ लेखातून आपलं म्हणनं मांडलं होतं)३० वर्षापुर्वीचं डॉ.पवारांचं मत पुन्हा एकदा आपल्या समर्थनासाठी मांडलेलं आहे.
      एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध हरामखोरपणा आहे.

      इथे पाहा
      http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post.html

      Delete
    2. aani sanjayji sarva khot lihitat aani purava nit det nahit...

      Delete
    3. अभिजित पाटील तुम्ही माझ्या शंकेचे निरसन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेला दुवापण पाहिला.
      यावरुन संजय सरांनी जे वर सिद्ध केले आहे तेच खरे आहे हे अगदी सहजपणे कळून येते.


      "एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध हरामखोरपणा आहे."

      तुमच्या या मताशी अगदी सहमत आहे

      Delete
  17. sonawani saaheb... brahman haa ullekh khatakato..
    kaaran majhya mate pratyek jaatit changale waait lok asataatach...
    2 re mhanje waril loksattachi link hi waachali... ani ataa donhi paksha kade bakkal puraave aahet.. doghe hi mhanat aahet aamhi barobar.. satya konaache jaanaave??

    ReplyDelete
  18. anik ek GURU mhanje nakki kai he suddha samajawaa... Ramdas swammin baddal hi tumache mat kalale tar anand waatel..

    ekandar rosh asa aahe ki brahmanaanche naav itihaasatun pusanyachaa ek praytna chalalaa aahe to nischitach khed janak aahe..

    kityek uttam brahman sardaar, kaarbhari, sevak, vakil maharajanshi paaik raahile tyabaabat koni kaa bolat naahi.. ki .. tyanchaa number yenaar aahe ajun kat shijat aahe ase samajaayache kaa??

    ReplyDelete
  19. आपल्या ब्लॉग वरचे लेख खुप छान आहेत .

    ReplyDelete
  20. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)--- which JEDHE SHAKAVALI(I have 3 versions of that) are you referring? it's your bad habit to conceal the details. KINDLY PROVIDE EXACT DETALS ABOUT THE PAGE NO AND PUBLICATION AND THE EDITOR OF THE SAME. SAME THIND ABOUT THE TARIKH-E-SHIVAJI. SO PROVIDE DETAILS OTHERWISE YOU ARE SOURCE OF MISINFORMATION, NOTHING ELSE.

    ReplyDelete
  21. सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले.
    Dear Sanjayji whenever you are referring or quoting from the historical books , please provide the details about the publication, editor and page nos. otherwise all your efforts are in vain and no use.

    ReplyDelete
  22. आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.
    please verify your own statement. what information these above referred persons provided to that bastard James Lane? can u please give proofs about your above piece of writing or you write only suitable to your own thinking? manovikrut kon aahe he jara aapan tapasun bagha. Oxford press la sarvapratham nishedhache patra koni pathvale he mahiti karun ghya tasech oxford press ne mafi magitali he hi jara vikrut likhantun vel milala tar vachun bagha. otherwise Sambhaji brigrade and you become same .

    ReplyDelete
  23. in my view the Dadoji Kondadev was AADILSHAI SERVANT AND SHAHAJI RAJE TOLD HIM TO LOOK TO HIS SUBHA. HOWEVER IT IS VERY WRONG TO SAY THAT HE WAS THE TEACHER(GURU) OF BAL SHIVAJI RAJE. DADOJI HAS GIVEN SOME JUDGEMENTS WHICH ARE ON RECORDS SO HE MIGHT BE SAID TO TEACH THE BALSHIVAJI RAJE . AT THAT TIME NO FORMAL SCHOOLS AND COLLEGES WERE EXISTED.STILL IT IS 100% WRONG TO SAY THAT THE DADOJI WAS GURU OF SHIVAJI RAJE.

    ReplyDelete
  24. दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली)
    Dear Sanjayju which jedhe shakavali you are useing. kindly give details or stop writing nonsense.
    पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही. this applies to you also.

    ReplyDelete
  25. "ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही" या जातीय अहकारातूनच बरेचसे लिखाण झाले. आपल्यासमोर आला तो फक्त कल्पनेतील, रचलेल्या कथांचा इतिहास. बाकी इतर प्रगत देशात इतिहास सखोल मांडला जात असताना महाराष्ट्राच्या भागी हे भोग यावे हे दुर्देव.

    यातून येणाऱ्या पिढीवर काय परिणाम होतोय याचा कोण विचारच करत नाही.

    ReplyDelete
  26. ब्राह्मण द्वेष केला तर आपण चांगले इतिहासकार बनतो,विचारक बनतो असे गेले १ शतक चालू आहे ,
    मुळात तुम्ही एक पण पुरावा न देत हवेत गोळीबार केला आहे ,


    ReplyDelete
  27. सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!
    मी अमरावती वरून सचिन चौधरी.
    सर्वप्रथम अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की मी मराठा सेवा संघ या संघटनेशी संलग्न आहे.
    सध्या पुरंदरे प्रकरणा संबधी सुरू असलेल्या वादाबाबत आपण ६ मे रोजी "राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!" हा लेख लिहून पुरंदरे यांचेवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण एक वैचारिक लेखक असल्याने आपणास सर्व प्रकारचे लिखाण करण्याचा निश्चितच अधिकार आहे. या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत "असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल" असे गौरवास्पद उद्‌गार सुद्धा लिहीलेले आहे. पुरंदरे यांचेबाबत आपणास असलेल्या या आपुलकीबाबत माझ्यासकट कुणालाही आक्षेप असण्याचा अजिबात अधिकार नाही.
    परंतु आपल्या Sunday, October 10, 2010 च्या ब्लॉग मधील "दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव" या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण लिहिता की "आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे."
    आता मात्र तुमच्या या दोन भूमिकॉमधील तफावत मला खूप प्रयत्न करूनही समजवुन घेता आली नाही.
    आपल्या ६ मे च्या शेवटच्या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत एक सुंदर वाक्य लिहिलेले आहे, "पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे."
    सर आपणास नम्रपणे विचारू इच्छितो की आपल्या १०-१०-२०१० च्या लेखा नंतर आज ६ मे च्या लेखाच्या कालावधी दरम्यान आपल्या विचारांत/निष्ठेत तर बदल नाही ना झाला? कारण बदलामुळेच भरभराट होते हा हल्ली आधुनिक डार्विनचा नवसिद्धांत आहे.
    कृपया गैरसमज नसावा. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. सचिन चौधरी.
    ९४२२८६९३०९

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय सचीनजी,
      मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वापरल्याबद्दल पुन्हा आभार. खरे म्हणजे आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ते अनेकांनी केलेत. त्यावर उत्तरेही दिली आहेत. तरीही तुमच्यासाठीही उत्तरे देतो: १) उपहास हा भाग आपल्याला समजत नाही अनेकदा. पुरंदरेबद्दल विकीवर जी माहिती दिलीय ती कोणी पुरंदरे भक्तानेच. आपण इतिहास संशोधक नाही तर केवळ शाहीर असा दावा पुरंदरेंनी अनेकदा केला आहे. आता ग. ह. खरेम्सारख्या इतिहासकाराच्या मार्गदर्शनाखाली भारत इतिहास संशोधन मंडळात काम केले असे जत्र येथे म्हटले जात असेल तर दावा खोटा कोणाचा ठरतो? मी उपहास केला आहे हे लक्षात सहज यायला हवे. "ही माहिती खरी असेल तर..." अशी माझी सुरुवात आहे. २) मला पुरंदरेंबद्दल आपुलकी असण्याचा संबंध नाही. त्यांन मी कधी प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. ना कधी फोनवरुनही बोलणे झाले. आयबीएन लोकमत व अन्य च्यनेल्सनी मलाही चर्चेला बोलावले होते. पण मी मुळ पुस्तक वाचलेलेच नसल्याने नकार दिला. आयबीएनवरील चर्चा झाल्यावर मला अनेक पत्रकारांनी फोन करुन माझ्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांनाही मी प्रतिक्रिया दिली नाही. पुस्तक मिळवले व वाचले व जे आक्षेप आहेत ते खरे आहेत कि नाही हे पडताळून पाहिले. आक्षेपांवरचे माझे मत तुम्ही वाचलेलेच असल्याने द्विरुक्ते करत नाही. ३) दादोजी कोंडदेव, २०१०. हा लेख लिहिला त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. या लेखातील , "त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे".हे वाक्य वाचा. त्यावेळेस हे १३ अथवा यापैकी काही संशयित होते. पण नेमका कोण हे तेंव्हाही निश्चित झाले नाही अथवा २०१५ मद्धेही निश्चित झालेले नाही. माझे हेही विधान बरोबरच आहे. पण आजवर आम्ही नेमका दोषी शोधु शकलेलो नाही हा आमचाच दोष नव्हे काय? २०११ साली मी लेनशी पत्रव्यवहारही केला. त्याने "मी अनेकदा ही माहिती ऐकली." असे मोघम उत्तर देवुन त्याने कोणाचेही नांव घेतले नाही. मग आरोपी निश्चित होत नसतांना वारंवार तेच ते आरोप करणे सुज्ञपणात बसत नाही.
      ३) २०१२. मेहंदळेंच्या मुलाखतीतील आक्षेपार्व विधानांना विरोध करणारा लेख लिहिणारा मी एकमेव होतो. तोवर दादोजी शहाजीराजांचा चाकरही नव्हता हे स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. हे मी त्यात लिहिले. कौस्तुभ कस्तुरेचाही प्रतिवाद केला. नवीन पुरावे आले कि आधीचे मत बदलावे ही संशोधकीय शिस्त आहे. केवळ आरोपांची राळ उडवुन देणे आणि पुरावेही न बघणे यात शहाणपणा नाही. ४) पुस्तक वाचल्यानंतर आणि आक्षेप पडताळल्यावर लेखकाच्या तोंडी स्वत:चे शब्द घुसवणे, वाक्ये हवी तशी तोडून हवा तो अर्थ काडणे, पुढचे मागचे संदर्भ न देता एखादेच विधान वेठीला धरणे एवढेच प्रकार झालेले आहेत हे दिसले. ते कोणावरही अन्याय करणारे आहे. ही काही चळवळ होऊ शकत नाही. हे जे मला वाटणे याला "विचार बदलले, किंवा पुरंदरे प्रेम वाढले" वगैरे ते अनेक हेत्वारोप माझ्यावर गेल्या काही दिवसांत झाले आहेत. आरोप सोपे असतात, पण आरोपांना विचारांची बैठक नको काय? कोणीही मला आरोपकर्त्यांनी जे पुरंदरेंचे शब्द बदलले यावर स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजे "आम्ही काय वाटेल ते आरोप करु, तुम्ही मधे पडायचे नाही अन्यथा तुम्ही भटाळले" असाच जर होरा असेल तर या देशात संशोधन/लेखन अशक्य होऊन जाईल. ५) गोतियेने शिवमंदिर बांधायला काढले त्याला विरोध करणारा मी एकमेव होतो. खालील लिंकवरील तिन्ही लेख आवर्जुन वाचा.
      http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post.html
      http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post_26.html
      http://sanjaysonawani.blogspot.in/2013/06/blog-post_3.html

      Delete
    2. यावेळेस माझ्या पाठीशी कोणी का आले नाही? मी कलमनामात जे आरोप केले ते खरे नाहीत हे तुम्ही कसे सिद्ध कराल? ही सरळ सरळ दुटप्पी भुमिका नव्हे काय? जर मंदिर हवे तर तशी भुमिकाही सेवा संघाने अथवा ब्रिगेडने घेतली असती तरी चालले असते, चर्चा झाली असती. पण तसे झालेले नाही हे वास्तव काय सांगते? खाली आपल्याच प्रश्नासारख्या एका मित्राने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर: "बच्छावजी, तुमच्यासारखा सुज्ञ बुद्धीवादीही शब्दच्छल करतो तेंव्हा नवल वाटते. ’ हे सर्व वा त्यापैकी काहीजन.." यातील अर्थ समजला नसावा. मी आधीच सांगितले कि मी पुस्तक आताआता पर्यंत वाचलेले नव्हते. पण एवढे आरोप होत आहेत तर आरोपकर्त्यांचे खरे असले पाहिजे हा विश्वास. पण त्याहीपेक्षा त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. अर्धी-मुर्धी विधने उचलुन सोयिस्कर मांडणी करायची हे ब्रिगेडींना नवीन नाही हे आजही सिद्ध होते. २०१० च्या लेखात मीही दादोजींना नोकर म्हटले होते. २०१२ च्या लेखात नोकरही नव्हते हे सिद्ध केले. २०१५ च्या लेखात दादोजीबद्दलचे माझे स्वतंत्र मत नोंदवले आहे. जेम्स लेनशी मी पत्रव्यवहारही केला होता हे मी नमुद केले आहे. मेहंदळेंना बहुदा दादोजीबाबत उत्तर देणारा महाराष्ट्रात मी एकमेव होतो. गोतियेने शिवमंदिर बांधायचा घाट घातला त्यालाही मी इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतुन विरोध करणारा एकमेवच होतो. याचा मला गर्व नाही. तुमच्याकडुन वा कोणाकडुनही कधी शाबासकीची काडीमात्रही अपेक्षा नाही व नव्हती. मी माझे कर्तव्य व तेही वेळीच बजावले. एवढे सारे असुन तुम्ही जे हेत्वारोप आणि सोफिस्टिकेटेडचे अर्थ काढत नथीतुन तीर मारायचा प्रयत्न करत आहात हे काही नवलाचे नाही. किंबहुना आंधळ्या झालेल्या लोकांना फक्त सोयीचे दिसते. खरे सांगायचे तर यामुळे शिवाजीमहाराजांवरचे लेखन या सर्व वृत्तीमुळे कमी होत जाईल याची खात्री बाळगा. कारण कोण कोणता शब्द अथवा वाक्य घेऊन महिलांच्या आड दडून वार करील याचा नेम राहिलेला नाही. पुरंदरेंवर टीका करतांना त्यांची विधनेही बदलायची हिंम्मत दाखवतात हे मला वाचल्यावर समजले. माझ्या नजरेतुन कोण उतरले असेल? सत्याचा लढा लढताय ना...तर किमान दुस-यांची विधाने तरी आहे तशी उद्घृत करा ना! पण ती पद्धत वापरायची नाही. कोण कशाला लिहिल? हेत्वारोप करुन घ्यायला? शिव्या-धमक्या खायला? माझीही या विषयाव्रील ही शेवटची प्रतिक्रिया. तेही जाधव सरांसारख्या मला आदरणीय असलेल्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली म्हणून. मी मराठा अथवा दलित असतो तर सारे गप्प बसले असते हेही विनोद अनाव्रत आणि मदन पाटील यांच्या पुस्तकावरेल आजवरील मौनातुन दिसते. चालु द्यात. शुभेच्छा. जाती सोडलेल्या माणसाला जातीत ढकलणारी ही दुष्ट माणसे....काय म्हणावे त्यांना? मला आता राग नाही. खिन्नता आहे फक्त. आभार."

      माझे विचार फक्त पुरावेच बदलु शकतात. मला बाकी कोणत्या जाती/धर्माशी घेणे-देणे नाही. मुळात शिवकाळ हा माझ्या अभ्यासाचाही विषय नाही, पण गरज पडली म्हणून करावा लागला तेवढाच. माझा विषय पुरातन संस्कृती हा आहे व त्यावर मी पुस्तके लिहिलेली आहेत.

      एक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हनून आपण शांतपणे विचार कराल यावर मी विश्वास ठेवतो. अविनाश दुधे यांनी प्रकाशित केलेला मराठा सेवा संघावरील दिवाळी विशेशांक आपण वाचला असेल अशी आशा आहे. त्यात माझाही मसेसंघावर लेख आहे. अवश्य वाचा.
      संजय सोनवणी

      Delete
  28. Namaskaar. Me Chandan Jadhav. Satara. (09890266967) Sonavani sir me tumchya lekhanacha chahata ahe. Dadojinsandarbhaat tumche lekhan wachle ani confusion jhale mhanun tumhala prashn vicharnyacha ha chotasa prayatn. Attaparyantchya itihasachya sahityamadhe sarvaat prabhavi ani tarksangat watlele lekhan mhanje Va. Si. Bendre. Apan dadojinsandarbhat je lekhan kele ahe te jastit jast brahmandwesh manaat thewun kele aslyasarkhe bhasate ahe ithe. ( Garaj nastana lekhanamadhe Brahman shabdacha ullekh adhalato. ) Aso lekh lihitana swatachya mansiktechi thodi zalar asne swabhavikach ahe. Pan Bendre yani dilelya ullekhanusar dadoji kondadev he shivrayanche guru nhavate pan swarajyubharanit dadoji pantancha hatbhaar ha shivrayana nicchitach labhla ahe. Ani jyaveli shivrayana swarajyachi shapath ghenyas dadoji pantanai sahayy kele tevha he samajtach chidlelya adilshahane khandoji ghorpade la dadojiwar chaal karnyas pathavle. Sarvpratham he sudha abhyasanyasarkhe ahe ki shivrayana jevha swarajysthapanesathi mavlyanchi garaj bhasli tevha maval prantamadhe swata jaatine laksh ghalun dadojipantani sarv bandal deshmukh jedhe yana ekatr ananyache kaam kele ahe. Tevha kuthe swarajyachi paayabharani jhali. Keval eka vishishth jatiche aslyakarnane dadojinchi aaj ji saseholpat hot ahe he thik nhave. Tumhich sangitlyapramane itihaas ha itihaasch asto na ki to kunachya bhavnancha poor kiwa ekhadya vishishth jaticha varchasvavaad asto. Kahi chukle asle tar jaroor shankanirasan karave hi vinanti. Dhanywaad.

    ReplyDelete
  29. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. जर दादोजी चा संबंध ही नसताना पुरंदरे वारंवार त्याचा उल्लेख करत आहे तर टिका होणे गरजेचे होते तूमची बदलती भूमिका फक्त संभ्रम निर्माण करते....

    ReplyDelete
  32. पुरंदरे नी दादोजी ला गुरू कुठेही म्हटले नाही ... हा वकिली युक्तिवाद आहे आपला....

    आ.ह.साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल काय मत आहे?

    नवीन आवृत्ती मध्ये पूर्वार्ध पृ.215 वर 'पंतांच्या चेल्याने....'
    असे स्पष्ट म्हटले त्याबद्दल काय म्हणणे आहे आपले...

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...