Tuesday, October 12, 2010

राग त्यांना का?

जगामधे सध्या एक सिद्धांत चर्चीला जातो आहे आणि तो म्हनजे "थियरी ओफ़ ओदर्स". भारतात त्याचे "अभिजनांचा बहुजनांविषयीचा सिद्धांत" असे सुटसुटीत रुपांतर करता येइल. पण हा सिद्धांत येथे लागु पडत नाही कारण अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि जे ब्राह्मणेतर आहेत ते म्हणजे बहुजन असा सर्वांचाच लाडका तर्क आहे आणि त्यावर आधारीत हा वाद आहे.

पण प्रथम आपण "अभिजन-बहुजन" या शब्दाची व्याख्या पाहू. "जे संस्क्रुती घडवतात, ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तीत वेळोवेळी कालानुरुप दुरुस्त्या करतात, समाजासमोर नवनवे ध्येय/प्रेय आणि तशी उत्तुंग आदर्शे घडवतात ते अभिजन होत तर या संस्क्रुतीशी जुळते घेत त्याचे अनुसरण करतात ते बहुजन होत."

आता भारताच्या परिप्रेक्षात संस्क्रुती घडवणारे कोण होते याचा प्राचीन काळापासुन विचार करुयात.

अ. सिंधु संस्क्रुती...ही संस्क्रुती ब्राह्मण समाजाने घडवली नाही हे उघडच आहे आणि याच संस्क्रुतीची अव्याहत धारा देशात आजही वहात आहे.
ब. बळी, मौर्य, शिशुनाग, सातवाहन, वाकाटक, पुन्ड्र, पांड्य, हर्शवर्धन, अशोक, असे हजारो सम्राट जे संस्क्रुती सम्रुद्ध करत राहिले तेही ब्राह्मण नव्हते.
क. गौतम बुद्ध आणि महावीर हेही ब्राह्मण नव्हते. या उभयतांनी जगाला एक संस्क्रुती दिली.
ड. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला एक क्रांतीकारी संस्क्रुती दिली.
इ. १९व्या शतकात ब्राह्मण समाजाने शुद्र ठरवलेल्या, अगदी ब्राह्मण स्त्रीयांनाही आसरा देत, शिक्षणाचा हक्क देत रुढी-परंपरांवर लाथ मारणारे महात्मा फुले आणी सावित्रीबाइ फुले यांनी समाजाला एक नवे आत्मभान दिले.
फ. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वतंत्र्य मिळवुन तर दिलेच पण जगालाही प्रेरणा दिली. उर्मी दिली.

ही फार थोडकी उदाहरणे आहेत. यात संतांचा समावेश करा. मग लक्षात येइल कि संस्क्रुती घडवणारे कोण होते आणि त्या संस्क्रुतीचा पाठपुरावा करणारे कोण होते. ब्राह्मण समाजाने त्यांचा वैदिक धर्म सोडला कारण त्यांना पर्यायच राहीला नाही. कोणत्याही ब्राह्मणाचा इन्द्र, वरुण, मित्र इ. वैदिक देव कुळ्देवता नाही. ते आजही त्यांची पुजा करत नाहित...त्यांची मंदिरे नाहित...तथाकथित बहुजनांची दैवतेच ते भजतात, कुळदेवता मानतात...ाअणि तरीही वैदिक श्रेष्ठत्ववाद मिरवतात... त्यांना अभिजन कसे म्हणायचे? कारण ते आज तरी इतेरांची संस्क्रुती पाळत आहेत.

म्हणजे ज्या संस्क्रुतीचे निर्माते जे नाहीत ते अभिजन असु शकत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण-बहुजन असे लेबल लावुन घेवुन उगाचाच गळा काढण्यात अर्थ नाही. फार तर एवढेच म्हणता येइल कि आपल्या खर्या अर्थाने अभिजनीय असलेल्या संस्क्रुतीला आपण समजावुन घ्यायला चुकलो आहोत...आणि कारण नसतांना स्वता:ला "बहुजन" म्हणवत आहोत...हा मात्र खास अपराध आहे. ज्यांनी संस्क्रुतीच घडवली नाही, ती आधुनिकतेशी नाळ जोडत पुढे नेली नाही त्यांना अभिजन कसे म्हणायचे? आणि ज्यांनी संस्क्रुती न घदवता श्रेय घेणे एवढेच उद्दिष्ट ठरवले आहे त्यांना राग येण्याचे काही-एक कारण दिसत नाही.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...