जगामधे सध्या एक सिद्धांत चर्चीला जातो आहे आणि तो म्हनजे "थियरी ओफ़ ओदर्स". भारतात त्याचे "अभिजनांचा बहुजनांविषयीचा सिद्धांत" असे सुटसुटीत रुपांतर करता येइल. पण हा सिद्धांत येथे लागु पडत नाही कारण अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि जे ब्राह्मणेतर आहेत ते म्हणजे बहुजन असा सर्वांचाच लाडका तर्क आहे आणि त्यावर आधारीत हा वाद आहे.
पण प्रथम आपण "अभिजन-बहुजन" या शब्दाची व्याख्या पाहू. "जे संस्क्रुती घडवतात, ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, तीत वेळोवेळी कालानुरुप दुरुस्त्या करतात, समाजासमोर नवनवे ध्येय/प्रेय आणि तशी उत्तुंग आदर्शे घडवतात ते अभिजन होत तर या संस्क्रुतीशी जुळते घेत त्याचे अनुसरण करतात ते बहुजन होत."
आता भारताच्या परिप्रेक्षात संस्क्रुती घडवणारे कोण होते याचा प्राचीन काळापासुन विचार करुयात.
अ. सिंधु संस्क्रुती...ही संस्क्रुती ब्राह्मण समाजाने घडवली नाही हे उघडच आहे आणि याच संस्क्रुतीची अव्याहत धारा देशात आजही वहात आहे.
ब. बळी, मौर्य, शिशुनाग, सातवाहन, वाकाटक, पुन्ड्र, पांड्य, हर्शवर्धन, अशोक, असे हजारो सम्राट जे संस्क्रुती सम्रुद्ध करत राहिले तेही ब्राह्मण नव्हते.
क. गौतम बुद्ध आणि महावीर हेही ब्राह्मण नव्हते. या उभयतांनी जगाला एक संस्क्रुती दिली.
ड. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला एक क्रांतीकारी संस्क्रुती दिली.
इ. १९व्या शतकात ब्राह्मण समाजाने शुद्र ठरवलेल्या, अगदी ब्राह्मण स्त्रीयांनाही आसरा देत, शिक्षणाचा हक्क देत रुढी-परंपरांवर लाथ मारणारे महात्मा फुले आणी सावित्रीबाइ फुले यांनी समाजाला एक नवे आत्मभान दिले.
फ. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वतंत्र्य मिळवुन तर दिलेच पण जगालाही प्रेरणा दिली. उर्मी दिली.
ही फार थोडकी उदाहरणे आहेत. यात संतांचा समावेश करा. मग लक्षात येइल कि संस्क्रुती घडवणारे कोण होते आणि त्या संस्क्रुतीचा पाठपुरावा करणारे कोण होते. ब्राह्मण समाजाने त्यांचा वैदिक धर्म सोडला कारण त्यांना पर्यायच राहीला नाही. कोणत्याही ब्राह्मणाचा इन्द्र, वरुण, मित्र इ. वैदिक देव कुळ्देवता नाही. ते आजही त्यांची पुजा करत नाहित...त्यांची मंदिरे नाहित...तथाकथित बहुजनांची दैवतेच ते भजतात, कुळदेवता मानतात...ाअणि तरीही वैदिक श्रेष्ठत्ववाद मिरवतात... त्यांना अभिजन कसे म्हणायचे? कारण ते आज तरी इतेरांची संस्क्रुती पाळत आहेत.
म्हणजे ज्या संस्क्रुतीचे निर्माते जे नाहीत ते अभिजन असु शकत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण-बहुजन असे लेबल लावुन घेवुन उगाचाच गळा काढण्यात अर्थ नाही. फार तर एवढेच म्हणता येइल कि आपल्या खर्या अर्थाने अभिजनीय असलेल्या संस्क्रुतीला आपण समजावुन घ्यायला चुकलो आहोत...आणि कारण नसतांना स्वता:ला "बहुजन" म्हणवत आहोत...हा मात्र खास अपराध आहे. ज्यांनी संस्क्रुतीच घडवली नाही, ती आधुनिकतेशी नाळ जोडत पुढे नेली नाही त्यांना अभिजन कसे म्हणायचे? आणि ज्यांनी संस्क्रुती न घदवता श्रेय घेणे एवढेच उद्दिष्ट ठरवले आहे त्यांना राग येण्याचे काही-एक कारण दिसत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
अगदी बरोबर.
ReplyDeleteek vinanti...kon brahman hote navate he tharawanyaat wel vayaa ghalawoo nakaa... Jyache je changale waatate te ghyave wait te sodun dyave..
ReplyDeletechanakya laa kase visaralaat.. tyache artha shashtra, akhand bharat chi sankalpanaa wagaire.. to suddha brahmanach hotaa naa...
sanskruti brahman samajane ghadawali kiwaa naahi ghadawali aapan fakt tark karoo shakato.. ani tache khandan hi hou shakate.. je garajeche aahe.. tumhi ji udaharane dilit ti kshatriya aahet.. brahmanaanchi naahit..santan madhye suddha dhnyaneshwar wisaralaat, ramdaas visaralaat ase kaa hote he malaa kalat naahi.
baajirao peshwaa visaralaat kaa.. marathi daulati sathi tyane che kele te khare ki khote... bahutek ataa asahi shodh laagel ki baajirao jasaa rangawalaa aahe itihaasat tasaa navtaach.. jase sadahiv bhau baddal garal okat aahet lok tashi yaa marathi weera war hi oka mhanav an kaay..
waitaa barobar changale hi sangat chalaa
itaranchi sanskruti?? haa kaai prakaar aahe he malaa samajale naahi...??
ReplyDeleteDear parag jee, the purpose of this small peice of article was to make ordinary people feel they too have glorious history and were makers of the culture. I feel unless each and one knows the glorious part of their own past, they cant feel pcychological equality. This is not to underestimate anyone else.
ReplyDeleteपण मला वाटते ब्राम्हणांनी संस्कृती Organise केली तिचे वहन आणि प्रवर्तन/तसेच रुपांतर केले. त्यामुळे संस्कृतीच्या सर्व सुचीबध्द प्रमाणबध्द धारणा किंवा प्रोग्राम्स कल्चरल धार्मिक किंवा सामाजिक गतिशिलतेला मोठया प्रमाणात चालना देतात. किंवा ते बहुजन किंवा इतरेजनांना प्रोग्राम देतात. पण आता अर्थार्जनाचे बरेचसे मार्ग उदा श्रध्दा देवळे,व्यवस्थापन बरेचसे बहुजनातील व्यवहारी लोकांनी ताब्यात घेतले आहेत. व ते जुन्या कालबाहय परंपरांचे स्वहितासाठी कटटर समर्थक आहेत. बघा शिर्डी, शिंगणापूर किंवा गावोगाव निर्माण होणारी प्रति मंदिरे, असोत किंवा छोटी मोठी देवस्थाने मग तुम्हाला देवी, शंकराची देवळे जागोजागी दिसणारच. तो शंकर काय कोण यापेक्षा तो देव ही भावना समाजाची मोठी. मुळात देवधर्म देणगी म्हटले की, एक अदृष्य दबावाने ना म्हणायची हिंमतच नाही.यामुळे शिवाय एक साईबाबाच किंती धन मिळवून देतोय म्हटले तर त्याची इकॉनॉमी आहेच. हे असे हजारो वर्षापासून सुरु आहे. पोटभरु श्रध्दा असेल तर ही सिस्टीम राहणारच. मग बुध्दीप्रमाण्यवाद, विवेक वगैरेंशी फार देणेघेणे नाही. बुध्दीचा हुशारीचा वापर उपरोक्त गोष्टींच्या मॅनेजमेंटसाठी अत्यंत हुशारीने करावयाचा. यात सामाजिक अन्यायाचा प्रश्नच नाही. कारण यात सामान्य जनांची भाबडी श्रध्दा हिच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी सुधारणा काय आपोआप होतच राहणार असे साधे सोपे तत्व आहे. बेसुमार गरीबी, बेसुमार लोकसंख्या, परंपरागत पुर्वग्रह, निर्माण केलेले झालेले पाखंड, हे खासकरुन आशिया व रानटी अवस्थेतून परिक्रमण करणाऱ्या अफ्रिका खंडात मोठया प्रमाणात जाणवते. पण मला वाटते. नीती, आत्मविश्वास विवेक संतुलन व्यवहार उपभोगास लावणारी तृष्णा जशी व्यक्तीपरत्वे/पिढीपरत्वे जसे बदलत असते.तशी ही धर्मव्यवस्था, सांस्कृतीक व्यवस्था व्होलेटाईल झाली पाहिजे. बाकी धार्मिक ब्रँडिग किंती फसवे,व्यक्ती तसेच क्षणिकागणीक बदलणारे असते हे संजय सरांच्या बऱ्याच लेखांमधून वारंवार अनुभवास येते. शेवटी माणूस हा जगण्यासाठीच जगत असतो हेच प्रत्येक व्यवहारातून अनुभवास येते. मग ते मानसिक समाधान असो किंवा इतर, अभिजन शब्दाचा सुयोग्य अर्थ किंवा दिशा संजय संरांनी दिली आहे. त्यामुळे मागील जुन्या शब्दाचा सारखा सारखा आणि गुळगुळीत नाटकी झालेला वापर वगळून सरांनी दिलेल्या नव्या दृष्टीकोनातून वरील लेखाकडे पाहिले पाहिजे. अत्युत्तम लेख. काही उल्लेख जाणीव पूर्वक/रागाने तर वगळले नाहीत ना. खुलासा नको. अभय
ReplyDelete