Tuesday, October 26, 2010

बहुजन नव्हे: शैवजन म्हणा!

आज जे स्वता:ला बहुजन समजताहेत त्यांना आपली सांस्क्रुतीक आणि धार्मिक पाळेमुळे अनेकदा माहित नसतात. भारतात सर्वात प्राचीन, सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेला धर्म म्हनजे मुर्तीपुजा प्रधान शैव धर्म. नमुचि, व्रुत्र, बळी, कपिल, जनक इ. महान पुर्वजांनी या संस्क्रुतीला घडवले. भारतत इ.स.पु. २५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला धर्म म्हणजे यद्न्यिक कर्मकांड असणारा वैदिक धर्म. या धर्माला मुर्तीपुजा मान्य नव्हती. ते शिवपुजेविरुद्ध होते. त्यांचा अत्मा, पुनर्जन्म, मोक्ष आदि शैव संकल्पनांवर विश्वास नव्हता. पुरे करुन राहण्याला त्यांचा विरोध होता. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता तर शैवजन हे क्रुषीसंस्क्रुतीचे. देश-विदेशात व्यापार करणारे.

गौतम बुद्धाच्या उदयानंतर स्थिती पालटली. गौतम बुद्धाचा धर्म म्हनजे वैदिक धर्माची पुढची अवस्था होती...आणि तो शैवविरोधी होता. त्याने यद्न्ययागांचा तिरस्कार केला नाही..फक्त त्यातील पशुहिन्सेविरुद्ध प्रचार केला. त्याची "आर्य"सत्ये जगजाहीर आहेत. तोही वैदिकांप्रमाणेच आत्मा, पुनर्जन्मादि कल्पनांवर विश्वास ठेवत नव्हता. "वेद हे उत्तमच पण काही ब्राह्मणांनी त्यांचे विक्रुतीकरण केले एवढाच त्याचा आक्षेप होता.

पण या धर्मात वैदिकही घुसले पण त्याहुनही मोठ्या प्रमाणात शैवजन घुसले. येथेच शैव धर्माचा र्हास सुरु झाला. शैव परंपरा १००० वर्षांच्या काळात जवळपास विस्म्रुतीत गेल्या. वैदिकांनी या काळात असुर संस्क्रुतीचे जेही काही श्रेश्ठ होते ते पुरते बदनाम करुन टाकले. असुर, राक्षस, नाग, पणी, इ. मानवी समुह शिविवाचक बनले. (शिवी" हा शब्दही शिवाला बदनाम करण्यासठी वापरला गेला. पुढे भारतातुन बौद्ध धर्माचा पुरता नाश झाला...आणि जे आपल्या पुरतन धर्माकडे आले खरे पण त्यांना आत यायला एकच दरवाजा उरला...तो म्हणजे "शुद्र".

आणि याच काळात वैदिकांनी परकियांनी दिलेले नाव धर्माला चिकटवुन घेतले...ते म्हणजे "हिंदु". त्यापुर्वी असे नव्हते. हा आजचा "हिंदु" धर्म म्हनजे वैदिक आणि शैव या दोन विभिन्न धर्मधारांचे एक विक्रुत कडबोळे बनला आहे. शुद्रांना वेदबंदी होती कारण सरळ आहे ते कधी वैदिकच नव्हते. पण बौद्ध धर्मात जावुन त्यांनी स्वत:च्या परंपरेला खंडित केले हेही खरे. बौद्ध धर्म चांगला कि वाइट हा प्रश्न येथे नाही. पण बौद्ध धर्म नंतरच्या काळात अध:पतीत होत गेला हे खरे. नंतर जरी ते पुन्हा शैव उद्घोष करु लागले असले तरी वैदिकांनी त्यालाही "वैष्णव" पाचर ठोकली. विष्णु हा ऋग्वेदातील अत्यंत गौण देव...पण त्याला शिवाच्या बरोबरीला आणुन ठेवले आणि शैव-वैष्णव झगडा लावुन दिला. पण पौरोहित्याचा अधिकार बव्हंशी आपल्याच हाती ठेवला. एका अर्थाने ब्राह्मणांचेही हे अर्धवट धर्मांतर होते...म्हणजे मुर्तीपुजा वैदिक धर्माला मान्य नसुनही ते मुर्तीपुजक बनलेच पण स्वत:च्या वैदिक प्रथा-परंपराही पाळत बसले. त्यातुन जी विक्रुती निर्माण झाली त्यातुन ब्राह्मण समाजही अजुन सुटला नाही. आणि धर्मात परत आल्यावर बहुजनांनी मुर्तीपुजा पुन्हा स्वीकारली असली तरी मुळ तत्वधारा, तत्वद्न्यान ...जे त्यांच्या पुर्वजांचे होते...तो मधल्या प्रदिर्घ काळात तेच विसरला आणि गुलाम बनला. थोदक्यात बौद्ध धर्माने एक पुरातन संस्क्रुतीच दुषित करुन टाकली. बरे बौद्ध धर्मही टिकुन राहीला असता तरी हे सांस्क्रुतीक अभिसरण घडले नसते.

असो. हा इतिहास आहे. शैव परंपरा जेवीत करत नेत, वैदिकांनी ज्या-ज्या दैवतांचे अपहरण केले आहे त्यांना मुक्त करणे हे खरे शैवजनांचे ध्येय असले पाहिजे. त्याचवेळीस ती सांस्क्रुती, त्यातील उदात्तता आणि वैभव पुन्हा प्राप्त केले पाहिजे. स्वत:ला बहुजन न समजता अभिमानाने "शैवजन" म्हटले पाहिजे. ( याचा नव्या शिव धर्माशी काही एक संबंध नाही)

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...