Tuesday, October 26, 2010

बहुजन नव्हे: शैवजन म्हणा!

आज जे स्वता:ला बहुजन समजताहेत त्यांना आपली सांस्क्रुतीक आणि धार्मिक पाळेमुळे अनेकदा माहित नसतात. भारतात सर्वात प्राचीन, सिंधु संस्क्रुतीपासुन चालत आलेला धर्म म्हनजे मुर्तीपुजा प्रधान शैव धर्म. नमुचि, व्रुत्र, बळी, कपिल, जनक इ. महान पुर्वजांनी या संस्क्रुतीला घडवले. भारतत इ.स.पु. २५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला धर्म म्हणजे यद्न्यिक कर्मकांड असणारा वैदिक धर्म. या धर्माला मुर्तीपुजा मान्य नव्हती. ते शिवपुजेविरुद्ध होते. त्यांचा अत्मा, पुनर्जन्म, मोक्ष आदि शैव संकल्पनांवर विश्वास नव्हता. पुरे करुन राहण्याला त्यांचा विरोध होता. पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता तर शैवजन हे क्रुषीसंस्क्रुतीचे. देश-विदेशात व्यापार करणारे.

गौतम बुद्धाच्या उदयानंतर स्थिती पालटली. गौतम बुद्धाचा धर्म म्हनजे वैदिक धर्माची पुढची अवस्था होती...आणि तो शैवविरोधी होता. त्याने यद्न्ययागांचा तिरस्कार केला नाही..फक्त त्यातील पशुहिन्सेविरुद्ध प्रचार केला. त्याची "आर्य"सत्ये जगजाहीर आहेत. तोही वैदिकांप्रमाणेच आत्मा, पुनर्जन्मादि कल्पनांवर विश्वास ठेवत नव्हता. "वेद हे उत्तमच पण काही ब्राह्मणांनी त्यांचे विक्रुतीकरण केले एवढाच त्याचा आक्षेप होता.

पण या धर्मात वैदिकही घुसले पण त्याहुनही मोठ्या प्रमाणात शैवजन घुसले. येथेच शैव धर्माचा र्हास सुरु झाला. शैव परंपरा १००० वर्षांच्या काळात जवळपास विस्म्रुतीत गेल्या. वैदिकांनी या काळात असुर संस्क्रुतीचे जेही काही श्रेश्ठ होते ते पुरते बदनाम करुन टाकले. असुर, राक्षस, नाग, पणी, इ. मानवी समुह शिविवाचक बनले. (शिवी" हा शब्दही शिवाला बदनाम करण्यासठी वापरला गेला. पुढे भारतातुन बौद्ध धर्माचा पुरता नाश झाला...आणि जे आपल्या पुरतन धर्माकडे आले खरे पण त्यांना आत यायला एकच दरवाजा उरला...तो म्हणजे "शुद्र".

आणि याच काळात वैदिकांनी परकियांनी दिलेले नाव धर्माला चिकटवुन घेतले...ते म्हणजे "हिंदु". त्यापुर्वी असे नव्हते. हा आजचा "हिंदु" धर्म म्हनजे वैदिक आणि शैव या दोन विभिन्न धर्मधारांचे एक विक्रुत कडबोळे बनला आहे. शुद्रांना वेदबंदी होती कारण सरळ आहे ते कधी वैदिकच नव्हते. पण बौद्ध धर्मात जावुन त्यांनी स्वत:च्या परंपरेला खंडित केले हेही खरे. बौद्ध धर्म चांगला कि वाइट हा प्रश्न येथे नाही. पण बौद्ध धर्म नंतरच्या काळात अध:पतीत होत गेला हे खरे. नंतर जरी ते पुन्हा शैव उद्घोष करु लागले असले तरी वैदिकांनी त्यालाही "वैष्णव" पाचर ठोकली. विष्णु हा ऋग्वेदातील अत्यंत गौण देव...पण त्याला शिवाच्या बरोबरीला आणुन ठेवले आणि शैव-वैष्णव झगडा लावुन दिला. पण पौरोहित्याचा अधिकार बव्हंशी आपल्याच हाती ठेवला. एका अर्थाने ब्राह्मणांचेही हे अर्धवट धर्मांतर होते...म्हणजे मुर्तीपुजा वैदिक धर्माला मान्य नसुनही ते मुर्तीपुजक बनलेच पण स्वत:च्या वैदिक प्रथा-परंपराही पाळत बसले. त्यातुन जी विक्रुती निर्माण झाली त्यातुन ब्राह्मण समाजही अजुन सुटला नाही. आणि धर्मात परत आल्यावर बहुजनांनी मुर्तीपुजा पुन्हा स्वीकारली असली तरी मुळ तत्वधारा, तत्वद्न्यान ...जे त्यांच्या पुर्वजांचे होते...तो मधल्या प्रदिर्घ काळात तेच विसरला आणि गुलाम बनला. थोदक्यात बौद्ध धर्माने एक पुरातन संस्क्रुतीच दुषित करुन टाकली. बरे बौद्ध धर्मही टिकुन राहीला असता तरी हे सांस्क्रुतीक अभिसरण घडले नसते.

असो. हा इतिहास आहे. शैव परंपरा जेवीत करत नेत, वैदिकांनी ज्या-ज्या दैवतांचे अपहरण केले आहे त्यांना मुक्त करणे हे खरे शैवजनांचे ध्येय असले पाहिजे. त्याचवेळीस ती सांस्क्रुती, त्यातील उदात्तता आणि वैभव पुन्हा प्राप्त केले पाहिजे. स्वत:ला बहुजन न समजता अभिमानाने "शैवजन" म्हटले पाहिजे. ( याचा नव्या शिव धर्माशी काही एक संबंध नाही)

9 comments:

  1. I wish to join your dharma if you start one. Very good line of thinking. Where do you get sucha knowledge and information. Be my GURU.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. वैदिक आणि बौद्ध साहित्याचे गाढे एकमात्र अभ्यासक व प्रकांड पंडित रामटेके साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम,
    आपले ओपेन च्यालेंगे स्वीकारण्यास मी असमर्थ असल्या कारणाने आपणास साष्टांग दंडवत घालतो आणि आपणास बौद्ध धर्माचे शंकराचार्य हि पदवी बहाल करतो.
    भारतरत्न बौधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, एम.ए., पीएच.डी., डी.एस.सी., एल.एल.डी., लिट.,बर. एट लौ, यांना बौद्ध धर्मातील जे तत्वज्ञान गवसले नाही ते आपण उद्धृत केलेत आणि सर्व मानवजातीला कृतार्थ केलेत याबद्दल आपली वाजत गाजत दिंडी काढणे भाग आहे.
    आपण सर्व त्रीपीठकाना उकळून प्याला आहात, तर ती कोणत्या भाषेत आणि कुठे उपलब्ध झाली ह्याचे स्पष्टीकरण द्याल तर माझ्या सारख्या पामरावर आपले अनंत उपकार होतील.
    माझे क्लोज च्यालेंगे आहे कि जगातील कुठलाही प्राणी आपणास वैदिक धर्माचा शंकराचार्य होण्यापासून आता रोखू शकत नाही.
    आपण म्हणता आपण बुद्धिष्ट आहात. तर आपण असे बुडा व शेंडा नसलेले बुद्धिष्ट(बुद्धी भ्रष्ट) का आहात? आपण शैवजन का नाहीत? (अधिक विश्लेषण संजय सोनवणी साहेबाना विचारावे)
    शेवटी जाता जाता एकच विनम्र अपेक्षा आपण सांगत असलेली हजारो बौद्ध साहित्यातील वैगुण्ये संग्रहित केलीत तर 'रामटेके वेद संग्रह' या नावाने त्यांना प्रकाशित करण्याची जबाबदारी मी माझ्या बोडक्या शिरावर घेण्यास तयार आहे.
    आपल्या उत्तर प्रसादाने सर्वाजानांस उपकृत करावे.

    ReplyDelete
  4. सर्व बांध्वानान्ना अशी विनंती आहे की धर्म या विषयावर भाष्य करतांना संयम पालने अतिशय आवश्यक आहे धर्म कोणताही असो तो दुसर्याचा अनादर करायला शिकावित नाही एवढे लक्षात ठेवले म्हणजे पुरे. चर्चा तशी छान आहे वाचायला आवडली.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. रामटेके साहेब,

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "माझी बौद्ध धम्माची संकल्पना समजायची असेल तर मी लिहिलेली तीन पुस्तके तुम्हाला वाचली पाहिजेत, १. क्रांती आणि प्रतिक्रांती २. बुद्ध आणि त्यांचा धम्मं ३. बुद्ध कि कार्लमार्क्स." ते असंही म्हणतात, "काळाच्या ओघात बुद्धांच्या तत्वज्ञानात फार भेसळ झाली आहे म्हणून बौद्ध साहित्यात बुद्धांचे कोणते आणि भेसळ कोणती हे विचारवंताने समजले पाहीजे."

    धम्माचे विश्लेषण करतांना तथागत बुद्धांनी काही कसोट्या सांगितल्या आहेत आपणा साठी इथे देतो आहे,

    १. तथागत म्हणतात माझ्या धम्माचा कुठल्याही काल्पानिक, अदृश, चमत्कारी गोष्टीशी संबंध नाही. सत्याला सत्य समाजणे आणि असत्याला असत्य समजणे म्हणजे धम्म होय.

    २. कुणी सांगितले म्हणून, कुठे लिहिले आहे म्हणून, शास्त्रात लिहिले आहे म्हणून किंवा मी बोलतो म्हणून मान्य करू नका तुमच्या बुद्धीला जे पटते, तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा, जे पटते त्याचा स्वीकार करा अन्यथा सोडून द्या. काळबाह्य आहे ते सोडावे आणि जे काळसंगत, तर्कसंगत आहे त्याचा स्वीकार करावा.

    ३. माझे तत्वज्ञान कसे ओळखावे, तर जे अकल्याणकारी, अमंगलकारी, अतार्किक, अप्रामाणिक आहे ते माझे नाही आणि जे कल्याणकारी, मंगलदायक, तार्किक आणि प्रामाणिक आहे ते माझे समजावे. माझा धम्म सर्व प्रकारच्या दु:खांपासून मनुष्यामात्राची मुक्ती करण्याचा मार्ग आहे.

    कृपया धम्म विषयक वाचन करताना वरील बुद्धांच्या मुलभूत तत्वांचा प्रमाणभूत म्हणून वापर करावा म्हणजे संभ्रम किंवा दिशाभूल होणार नाही.

    वैचारिक संभ्रमामुळे निर्माण होणारया दु:खापासून आपली मुक्ती होओ.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  7. वैदिक धर्म म्हणजे कुठला धर्म? वेदप्रामाण्य मानणारा तो वैदिक धर्म का? ऋगवेदातल्या अनेक ऋच्या या स्वर्गातील देवांच्या, पितरांच्या स्तुतीपर गायल्या आहेत, मग वैदिक नास्तिक कसे? वेद हे उत्तमच फक्त काही ब्राम्हणानी त्याचे विकृतीकरण केले या व्याक्याला पुरावा काय आणी तो पुरावा ग्राह्य का मानण्यात यावा?

    ReplyDelete
  8. Nitin jee, Vaidik nastik navhate...pan tyanche dharmik karmkand sarvasvee vegale hote. Tatvadnyaan vegale hote. Goutam Buddhaanee je vidhan kele tyala Vinay Pitakaatel adhaar aahe. Ani samaja to purava grahy maanaaychaa nasala taree vastusthiti (any puravyaanvarun) ved he kaaloughaat badalale gele. VEd he jashechyaa tase jatan kele gelele nahit anyathaa tyaant 600 BC madhye hovun gelelya Zarthrustaachaa ullekh aalaa nasataa. Vedant bhatrputr badal kele gele ahet. vadik tatvadnyanahee pratyek mandalaat badalate..daivatanchee kramvaaree badalate...uda. Asdur varunache mahatv kami hot Indrache maahatmya vaadhavalele aahe.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...