Monday, November 1, 2010

दीपावली हा सण मुळचा क्रुषिवल संस्क्रुतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे.

दीपावली हा सण मुळचा क्रुषिवल संस्क्रुतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. रावण हा त्याचा बंधु होता हे तर सर्वांना माहितच आहे. म्हणजेच हा सण "असुर" संस्क्रुतीचा सण होता आणि आहे...पण कालौघात त्यावरही वैदिक कलमे झाल्याने यक्ष (कुबेरपुजन) बाजुला पडुन वैदिक लक्ष्मिपुजन सुरु झाले...आणि ते आंधळ्यासारखे स्वीकारले गेले.
यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. यक्ष पुजा ही पुरातन आहे, एवढी कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवते हे मुळचे यक्ष आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे गाव शिवेबाहेर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा.
कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा राजाधिराज...एक क्रुषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत क्रुषिवल असुर संस्क्रुतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...पण वैदिक त्याला "बलीप्रतिपदा" असे मुद्दाम म्हनतात. वामनाने बळीस पाताळात गाडुन "बली" केले असा त्याचा सांस्क्रुतीक अन्वयार्थ. मग खरे तर ती "वामनप्रतिपदा" व्हायला हवी होती...पण तसे झाले नाही...थोडक्यात शैवजनांनी आपल्या सांस्क्रुतीक श्रद्धा जपल्या पण वैदिक कथानके डोक्यात घुसवुन घेतली. बळीला, ज्याला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याची मंदिरे नाहीत. पण बळीचे तसे नाही...तो आजही क्रुषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे.
वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण क्रुषिवल असुर संस्क्रुतीचीच निर्मिती आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच.
त्यामुळे माझे आवाहन आहे कि शैवजनांनी दीपोत्सव हा यक्षरात्री म्हाणुन साजरा करावा...कुबेराचे वंदन करत पुजा करावी...लक्ष्मीची नव्हे...आणि बळीप्रतिपदेस महात्मा बळीचे स्मरण करत...त्याचे वंदन करत नववर्ष बळीक्रुपेने सुखसम्रुद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी.
खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी...

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...