दीपावली हा सण मुळचा क्रुषिवल संस्क्रुतीचा "यक्षरात्री" उत्सव आहे. कुबेर हा शिवाचा खजीनदार मानला जातो. रावण हा त्याचा बंधु होता हे तर सर्वांना माहितच आहे. म्हणजेच हा सण "असुर" संस्क्रुतीचा सण होता आणि आहे...पण कालौघात त्यावरही वैदिक कलमे झाल्याने यक्ष (कुबेरपुजन) बाजुला पडुन वैदिक लक्ष्मिपुजन सुरु झाले...आणि ते आंधळ्यासारखे स्वीकारले गेले.
यक्ष हा जल, अन्न-धान्य-पशु व संपत्तीचा संरक्षक मानला गेला आहे. यक्ष पुजा ही पुरातन आहे, एवढी कि यक्ष म्हणजेच पुजा असे दक्षीणेत आजही मानले जाते. यक्षपुजा ही आजही शैवजन करत असतात...पण ते यक्ष आहेत हेच माहीत नसते. उदाहरणार्थ मारुती, वीरभद्र, खंडोबा, भैरवनाथ इ. दैवते हे मुळचे यक्ष आहेत. ते संरक्षक आहेत ही जनमानसाची श्रद्धा आहे...आणि म्हणुनच त्यांचे स्थान हे गाव शिवेबाहेर असते...कारण ते ग्रामरक्षक असतात ही श्रद्धा.
कुबेर हा शिवाचाच प्रतिनीधी...यक्षांचा राजाधिराज...एक क्रुषि-हंगाम जावुन दुसरा येण्याच्या मद्धे जो अवकाश मिळतो...त्या काळात या कुबेराचे अभिवादन करत क्रुषिवल असुर संस्क्रुतीचा जो महानायक बळी त्याच्या स्मरणाने नवीन वर्ष सुरु करण्याची ही पद्धत. त्यालाच आपण बळी प्रतिपदा म्हणतो...पण वैदिक त्याला "बलीप्रतिपदा" असे मुद्दाम म्हनतात. वामनाने बळीस पाताळात गाडुन "बली" केले असा त्याचा सांस्क्रुतीक अन्वयार्थ. मग खरे तर ती "वामनप्रतिपदा" व्हायला हवी होती...पण तसे झाले नाही...थोडक्यात शैवजनांनी आपल्या सांस्क्रुतीक श्रद्धा जपल्या पण वैदिक कथानके डोक्यात घुसवुन घेतली. बळीला, ज्याला पाताळात गाडुन वैदिक टेंभा मिरवणा-या वामनसमर्थकांच्या हे लक्षात येत नाही कि नववर्षारंभ बळीच्या नावाने का? कारण ते बळीमहात्म्य संपवुच शकत नव्हते...एवढेच...म्हणुन भारतात या वामन-अवताराची पुजा कोणी करत नाही...त्याची मंदिरे नाहीत. पण बळीचे तसे नाही...तो आजही क्रुषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे.
वसुबारस, धनतेरस (धनतेरस हा शब्द "धान्यतेरस" असा वाचावा...कारण धन हा शब्द धान्य शब्दाचा पर्यायवाची आहे.) हे सण क्रुषिवल असुर संस्क्रुतीचीच निर्मिती आहे. वैदिकांनी त्यावर अतिक्रमण करुन त्यांना वैदिक रुप बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच.
त्यामुळे माझे आवाहन आहे कि शैवजनांनी दीपोत्सव हा यक्षरात्री म्हाणुन साजरा करावा...कुबेराचे वंदन करत पुजा करावी...लक्ष्मीची नव्हे...आणि बळीप्रतिपदेस महात्मा बळीचे स्मरण करत...त्याचे वंदन करत नववर्ष बळीक्रुपेने सुखसम्रुद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी.
खरे तर बळीप्रतिपदेस महात्मा बळीची भव्य मिरवणुक काढावी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
Sanjayji.. Tumchya ya goshtich mala avdat nahit.. adhich lakho shradhashtane aslelya ya samajat.. sambhram nirman karu naka.. kalachya oghat devghev chalnarach... vad na hota je ahe te changle kashe hoil te pahayla pahije.. spashta bolto mhanun kshama asavi...
ReplyDeleteVivekjee, tumache mhanane maany kele tar sanshodhanach thambel. san-utsavanche itihas sanganari sarvach pustake/granth baad karavi lagatil. ha sambhram nirman karanyacha prayatn nasun to dur karanyacha ahe.
ReplyDeletefaar sundar likh aahe ha !
ReplyDeleteGulamgiri granth vachya paun davya vicharat odhala gelo tevha pasun yekhi sansajara kela naahi....
karan pratek san ha brahman nirmit ase vatat ase..
dhanya vad sanjayji aapan divalichi chhan mahiti dilit
Pharach chhan lekh aahe ! Nice !!
ReplyDeleteपण बळीचे तसे नाही...तो आजही क्रुषिवल संस्क्रुतीचा श्वास आणि ध्यास आहे. there is no relation with King BALI and the KRISHIVAL SANSKRUTI. THESE IS A NEW PHRASE. PLEASE READ BALI-VAMAN STORY AGAIN .REFER BHAGWAT PURAN. PAGE NO 853 TO 887. GITA PRESS , GORAKHPUR.
ReplyDeleteसोनवणी हा स्वतःला शहाणा समजणारा एक बावळट माणूस आहे
ReplyDeleteएकतर त्याची जाणच कमी आणि त्याला स्वतःला पाठ थोपटून घेण्याची सवय
कायम याची काहीना काही पिरपिर चालू असते यांनी कितीही बोंब मारली तरीही
सर्वत्र उच्च सर्जन आणि अतिशय उच्च क्षेत्रात ब्राह्मणांचे वर्चस्व नेहमीच राहणार आहे
मोठमोठ्या हॉस्पिटल मधून आज सर्वत्र ब्राह्मण दिसतात ते कसे काय ?
कायम कसल्यातरी कथा काढून कसेतरी वैदिक समाजावरील त्यांची पिरपिर अत्यंत हास्यास्पद वाटते जित्याची खोड मेल्या शिवाय जाणार नाही