Sunday, November 28, 2010

"संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल": महावीर सांगलीकर

श्री महावीर सांगलीकर यानी लिहिलेले "संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल" हे प्रबंधात्मक पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. संस्क्रुत भाषा ही "देववाणी" आहे, जवळपास सर्वच युरोपिअन आणि भारतीय भाषांची जननी आहे असे साधारणता: मानण्याकडे कल आहे. एवढेच नव्हे तर कोंप्युटरसाठी (सोफ़्ट्वेअर) साठी संस्क्रुत भाषा हाच पर्याय आहे असे गेली २०-२५ वर्ष आपण ऐकत आलो आहोत. श्री सांगलीकर यांनी या समजांना तडा देणारे महत्वपुर्ण संशोधन केले आहे आणि अपवाद वगळता त्यांचा युक्तिवाद आणि पुरावे खोडुन काढता येणे अवघड आहे. हे मोलाचे कार्य करुन त्यांनी संस्क्रुत प्रेमींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे असे म्हणावे लागेल.

प्राक्रुत भाषा या मुळच्या बोली/लिखित आणि लिप्यांकित भाषा. त्या अनादि आहेत. मनुष्य बोलु लागला...भाषांचा निर्माता झाला ही फार मोठी क्रांती होती. पण संस्क्रुत भाषेला कधीच लिपी नव्हती कारण ती क्रुत्रीम भाषा होती आणि म्हणुनच ती शिकावी लागत असे आणि ती कधीच बोलीभाषा नव्हती, हे सांगलीकरांचे म्हनने विचारात घ्यावे लागते, कारण ते वास्तव आहे. वेद मुखोद्गत का करावे लागत कारण संस्क्रुतला कधीच लिपी नव्हती.

सांगलीकर म्हणतात कि बुद्ध-महावीरांनी संस्क्रुतचा उपयोग केला नाही. ते खरेच आहे...कारण ती कधीच जनभाषा नव्हती. ब्राह्मणही संस्क्रुतमद्धे बोलत असत याचे पुरावे नाहीत. ती फार तर प्रक्रुत भाषांना ग्रांथिक करण्यासाठी बनवली गेली वा वापरली गेली. एव-तेव ती क्रुत्रीम भाषा होती...जशी लटीन. वैदिक संस्क्रुत हे पाणिनीय संस्क्रुतपेक्षा पुरेपुर वेगळे आहे. पाणिनी हा ब्राहमण/वैदिक नव्हता...तर तो पणी समाजाचा होता. असे असले तरी पाणीनिमुळे, त्याने संस्क्रुत अधिक किचकट व बोजड करुन टाकल्यामुळे पाणिनी-उत्तर काळात संस्क्रुत ग्रांथिक भाषा म्हणुनही नामशेष झाली हे एक वास्तव आहे. सांगलीकरांनी अत्यंत अभ्यासपुर्ण पद्धतीने आपले विवेचन केले आहे आणि ते साधार आहे.

ग्रीक-युरोपेअन भाषांवर संस्क्रुतचा प्रभाव आहे असे मानले जाते...हा अहंगंड आहे. त्याचे कारण असे कि मुळात ग्रीक इतिहास हा ६-७ इ.स.पु. पार जात नाही. आर्य तर इ.स.पु. २५०० मद्ध्ये भारत आणि युरोपात घुसले असे आपले काही इतिहास तद्न्य मानतात. इंग्लंड आणि पार स्वत:ला आर्य समजणार्या जर्मनीचा इतिहास तर ६ व्या शतकापार जात नाही. हे ऐतिहासिक अंतर आजतागायत संस्क्रुत भाषाअभिमानी भरु शकलेले नाहीत. त्यांना ते कधीही शक्य होणार नाही. मग हे आर्य कोण होते आणि ते एवढ्या काळात (म्हणजे इ.स.पु. २५०० त भारतात आले, आणि इ.स.पु. ६०० मद्धे ग्रीस मद्धे गेले आणि इ.स. ६-७ व्या शतकात जेर्मनीत घुसले...मग हे कोठे मधला वेळ थांबले होते? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

संस्क्रुत ही क्रुत्रीम भाषा आहे, व्याकरणबद्ध आहे, आणि म्हणुनच ती शिकावी लागते...ती कोणाचीही कधीच मात्रुभाषा नव्हती तर एक ग्रांथिक भाषा होती हे सांगलीकरांचे मत बरोबरच आहे.

परंतु, सांगलीकर खंत व्यक्त करतात ती ही कि संस्क्रुतवादी संस्क्रुताळलेले प्राक्रुत शब्दच आणि तेच व्याकरणाचे नियम पाळा हा आग्रह म्हणजे संस्क्रुतवाद्यांचा भारतीय भाषेंवरचा हल्ला आहे. आणि ते बरोबरच आहे. प्रमाण भाषा हा एक वेडा आग्रह आहे कारण प्रमाण करावी अशी गोष्ट म्हणजे भाषा नव्हे...तर ती प्रवाहित असते आणि तीचे रुप बदलत असते. गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही, नामदेवांची मराठी ही आजची मराठी नाही, द्न्यानेश्वरांची मराठी ही आजची मराठी नाही...पण ही भाषा टिकली आहे कारण त्यात प्रवाहीपणा आहे. संस्क्रुतसारखा नियमबद्ध साचलेपणा नाही....म्हणुनच प्रक्रुत भाषा टिकल्या आहेत...संस्क्रुत कधीच म्रुत झाली आहे.

सांगलीकरांनी या प्रबंधात्मक पुस्तकामुळे एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे कारण त्यामुळे भाषा आणि त्यांची उत्पत्ती याकडे पहाण्याचा नवा द्रुष्टीकोण मिळतो. हे पुस्तक अगदी संस्क्रुत प्रेमींनीही वाचावे अशी मी शिफारस करतो.

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...