Sunday, November 28, 2010

"संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल": महावीर सांगलीकर

श्री महावीर सांगलीकर यानी लिहिलेले "संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल" हे प्रबंधात्मक पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. संस्क्रुत भाषा ही "देववाणी" आहे, जवळपास सर्वच युरोपिअन आणि भारतीय भाषांची जननी आहे असे साधारणता: मानण्याकडे कल आहे. एवढेच नव्हे तर कोंप्युटरसाठी (सोफ़्ट्वेअर) साठी संस्क्रुत भाषा हाच पर्याय आहे असे गेली २०-२५ वर्ष आपण ऐकत आलो आहोत. श्री सांगलीकर यांनी या समजांना तडा देणारे महत्वपुर्ण संशोधन केले आहे आणि अपवाद वगळता त्यांचा युक्तिवाद आणि पुरावे खोडुन काढता येणे अवघड आहे. हे मोलाचे कार्य करुन त्यांनी संस्क्रुत प्रेमींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे असे म्हणावे लागेल.

प्राक्रुत भाषा या मुळच्या बोली/लिखित आणि लिप्यांकित भाषा. त्या अनादि आहेत. मनुष्य बोलु लागला...भाषांचा निर्माता झाला ही फार मोठी क्रांती होती. पण संस्क्रुत भाषेला कधीच लिपी नव्हती कारण ती क्रुत्रीम भाषा होती आणि म्हणुनच ती शिकावी लागत असे आणि ती कधीच बोलीभाषा नव्हती, हे सांगलीकरांचे म्हनने विचारात घ्यावे लागते, कारण ते वास्तव आहे. वेद मुखोद्गत का करावे लागत कारण संस्क्रुतला कधीच लिपी नव्हती.

सांगलीकर म्हणतात कि बुद्ध-महावीरांनी संस्क्रुतचा उपयोग केला नाही. ते खरेच आहे...कारण ती कधीच जनभाषा नव्हती. ब्राह्मणही संस्क्रुतमद्धे बोलत असत याचे पुरावे नाहीत. ती फार तर प्रक्रुत भाषांना ग्रांथिक करण्यासाठी बनवली गेली वा वापरली गेली. एव-तेव ती क्रुत्रीम भाषा होती...जशी लटीन. वैदिक संस्क्रुत हे पाणिनीय संस्क्रुतपेक्षा पुरेपुर वेगळे आहे. पाणिनी हा ब्राहमण/वैदिक नव्हता...तर तो पणी समाजाचा होता. असे असले तरी पाणीनिमुळे, त्याने संस्क्रुत अधिक किचकट व बोजड करुन टाकल्यामुळे पाणिनी-उत्तर काळात संस्क्रुत ग्रांथिक भाषा म्हणुनही नामशेष झाली हे एक वास्तव आहे. सांगलीकरांनी अत्यंत अभ्यासपुर्ण पद्धतीने आपले विवेचन केले आहे आणि ते साधार आहे.

ग्रीक-युरोपेअन भाषांवर संस्क्रुतचा प्रभाव आहे असे मानले जाते...हा अहंगंड आहे. त्याचे कारण असे कि मुळात ग्रीक इतिहास हा ६-७ इ.स.पु. पार जात नाही. आर्य तर इ.स.पु. २५०० मद्ध्ये भारत आणि युरोपात घुसले असे आपले काही इतिहास तद्न्य मानतात. इंग्लंड आणि पार स्वत:ला आर्य समजणार्या जर्मनीचा इतिहास तर ६ व्या शतकापार जात नाही. हे ऐतिहासिक अंतर आजतागायत संस्क्रुत भाषाअभिमानी भरु शकलेले नाहीत. त्यांना ते कधीही शक्य होणार नाही. मग हे आर्य कोण होते आणि ते एवढ्या काळात (म्हणजे इ.स.पु. २५०० त भारतात आले, आणि इ.स.पु. ६०० मद्धे ग्रीस मद्धे गेले आणि इ.स. ६-७ व्या शतकात जेर्मनीत घुसले...मग हे कोठे मधला वेळ थांबले होते? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

संस्क्रुत ही क्रुत्रीम भाषा आहे, व्याकरणबद्ध आहे, आणि म्हणुनच ती शिकावी लागते...ती कोणाचीही कधीच मात्रुभाषा नव्हती तर एक ग्रांथिक भाषा होती हे सांगलीकरांचे मत बरोबरच आहे.

परंतु, सांगलीकर खंत व्यक्त करतात ती ही कि संस्क्रुतवादी संस्क्रुताळलेले प्राक्रुत शब्दच आणि तेच व्याकरणाचे नियम पाळा हा आग्रह म्हणजे संस्क्रुतवाद्यांचा भारतीय भाषेंवरचा हल्ला आहे. आणि ते बरोबरच आहे. प्रमाण भाषा हा एक वेडा आग्रह आहे कारण प्रमाण करावी अशी गोष्ट म्हणजे भाषा नव्हे...तर ती प्रवाहित असते आणि तीचे रुप बदलत असते. गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही, नामदेवांची मराठी ही आजची मराठी नाही, द्न्यानेश्वरांची मराठी ही आजची मराठी नाही...पण ही भाषा टिकली आहे कारण त्यात प्रवाहीपणा आहे. संस्क्रुतसारखा नियमबद्ध साचलेपणा नाही....म्हणुनच प्रक्रुत भाषा टिकल्या आहेत...संस्क्रुत कधीच म्रुत झाली आहे.

सांगलीकरांनी या प्रबंधात्मक पुस्तकामुळे एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे कारण त्यामुळे भाषा आणि त्यांची उत्पत्ती याकडे पहाण्याचा नवा द्रुष्टीकोण मिळतो. हे पुस्तक अगदी संस्क्रुत प्रेमींनीही वाचावे अशी मी शिफारस करतो.

9 comments:

  1. क्या बात है सर,
    हे पुस्तक शोधुन वाचायला पाहिजे.
    तुमच्याकडे अत्यंत महत्वाची माहिती असते.
    ती ईथे पुरविल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. niwwal adnyanmoolak.......anya shabda nahit.....

    ReplyDelete
  3. कर्नाटकात मातुल ह्या गावी आजही संस्कृत बोलली जाते. त्यामुळे ही बोली भाषा कधिच न्हवती हे चुकिच आहे.ह्यावर वर्णव्यवस्थेचा फ़ायदा घेवुन ब्राह्मणांनी मक्तेदारी केल्यामुळे ही बोली भाषा म्हणुन लोप पावली. बाकी युरोपीयन भाषा आणी संस्कृत मध्ये काहितरी संबंध निश्चित आहे. मला १२वी ला एक धडा होत. त्यात संस्कृत चे ’मातृ’ हे लॅटिन मध्ये ’मॅटर’ आणि जर्मन मध्ये ’मटर’. इंग्लंड हा देश ऍन्गल्स आणि सॅक्सन्स’ ह्या दोन जमातीं पासुन बनला आहे. ह्या दोन्ही जमाती मुळच्या जर्मन. म्हणुन इंग्रजी मध्ये हा शब्द ’मदर’ झाला.तसच संस्कृत चा ’पितृ’ हा लॅटिन मध्ये ’पॅटर’-जर्मन मध्ये ’फ़ॅटर’ -इंग्रजी मध्ये ’ फ़ादर’. स्पॅनिश आणि पोर्चुगीज मध्ये ’पॅड्रे’आणि ’पापे’ म्हणुन मराठीत ’पाद्री’. संस्कृत आणि इतर युरोपीय भाषांना जोडणारी एखादी भाषा ही असु शक्ते जी आता लुप्त झाली असेल.

    ReplyDelete
  4. हिमांशुजी, ल्याटीन भषेचा उदय फार उशीरा झाला आहे. काही साम्ये आहेत ती भाषांचे मुळ एक असल्याने नव्हेत तर व्यापारामुळे जो संपर्क आला त्यामुळे झालेल्या देवान-घेवानीतुन हे साम्य पाहिले पाहिजे. संस्क्रुत भाषा ही किमान ५००० वर्ष जुनी आहे हे सिद्ध झाले आहे. ल्यटीनचे तसे नाही. काही शब्दांत साम्य आहे पण व्याकरनात नाही. साम्यापेक्षा विभेदांची संख्या अवाढव्य आहे हे लक्षत घ्यातला हवे.

    ReplyDelete
  5. >> गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही,
    >> नामदेवांची मराठी ही आजची मराठी नाही,
    >> द्न्यानेश्वरांची मराठी ही आजची मराठी नाही...
    >> पण ही भाषा टिकली आहे कारण त्यात प्रवाहीपणा आहे.
    >> संस्क्रुतसारखा नियमबद्ध साचलेपणा नाही....
    >> म्हणुनच प्रक्रुत भाषा टिकल्या आहेत...
    >> संस्क्रुत कधीच म्रुत झाली आहे.

    >> संस्क्रुत भाषा ही किमान ५००० वर्ष जुनी आहे हे सिद्ध झाले आहे.

    जी भाषा ५ हजार वर्षे टिकली ती प्रवाही नाही ?

    तसेच ज्ञानेश्वरांची मराठी आणि नामदेवांची मराठी तसेच सध्याची मराठी यात साम्य जास्त आहे कि या भाशेंमाधला फरक जास्त आहे ?
    जर फरकच जास्त आहे आणि सारखे पणा कमी म्हणजेच ज्ञानेश्वरांची मराठी आणि आजची मराठी या दोन्ही हि वेगवेगळ्या भाषा आहेत......

    ???

    ReplyDelete
  6. Mr. Sonawane you mention above that arya`s history did not go belong 2500 years.

    But Lokmanya Tilak discovered that Mahabharat Battel happen before 5000 years before. Bhagawan Shrikrushna Told GITA IN SANSKRIT AND MAHAVIR ARJUN ASKED QUESTION IN SANSKRIT. FURTHER IT ALSO WROTE IN SANSKRIT BY UVYAAS MAHAMUNI.

    He proved it on various grounds. Please read Lokamanya Tilak`s book.

    Then what you or mr. Sangalikar wrote does stand for.

    ReplyDelete
  7. संगणकासाठी संस्कृत भाषा उपयुक्त आहे हा एक खुळचट समज आहे! संगणकाच्या तथाकथित भाषा व संस्कृत यांमध्ये नियमबद्धता एवढंच साम्य आहे. संस्कृतचा वापर करून कोणी एखादा संस्कृताभिमानी एखादा प्रोग्राम लिहून दाखवेल काय?

    ReplyDelete
  8. तुमचा अभ्यास चुकीचा आहे. तो पुर्वग्रहदुषीत असल्याचे आपल्या लिखाणातून जाणवते.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे मत मान्य करायची तयारी आहे. पण हा अभ्यास चुकीचा आहे हे सिद्ध करा.
      दुसरे असे की तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? प्रामाणिकपणे सांगा.
      पुस्तक न वाचताच अशी कमेंट तुम्ही देता म्हणजे पूर्वग्रहदूषित कोण आहे?

      आरोप करणे सोपे असते. किंबहुना ते होणे अपेक्षितही आहे. पण पुराव्यांच्या कसोटीवर ते आरोप केलेत तर आनंद होईल. उगाच संस्कृत भाषेवर कोणी अभ्यास करुन काही निष्कर्ष काढत असेल तर नुसते हॅ म्हणून उडवण्यात अर्थ नाही.
      मी देखील संस्कृतचा अभ्यास केला आहे व त्या दिशेने भरपूर शोधही घेतला आहे. पण मला या पुस्तकांत वा परिक्षणकर्त्याच्या लेखनात आक्षेपार्ह काही आढळले नाही. उलट बुद्धीला आव्हान देणारे अनेक धक्कादायक निष्कर्ष यात आहेत, जे एका वाक्यात उडवून लावणे म्हणजे ज्ञानाची कवाडे बंद करुन घेण्यासारखे होईल.
      माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आरोप जरुर करा, पण सप्रमाण सिद्धही करुन दाखवा.

      Delete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...