आरक्षण हा सध्या चळवळीतील एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. जातीनिहाय जनगणना हवी कि नको यावरही वितंड घातले जात आहे. मराठा समाज (जात?) हा कुणबी या संज्ञेत मोडतो असाही एक युक्तिवाद सध्या सुरु आहे. ओ. बी. सी. समाजाचे विचारवंत/नेते मराठ्यांना ओ. बी. सी. मध्ये सामावून घेण्यास तयार नाहीत. यामागे प्रत्येकाची विचारधारा असेल ती असो...माझी मते मी येथे नोंदवत आहे.
१. मी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाविरुद्ध आहे. आरक्षण पद्धतीने जाती-व्यवस्था अधिकच तीव्र होत जात आहे आणि सामाजिक स्वास्थ्य त्यामुळे अधिकाधिक धोक्यात येत असून परस्पर संशय/द्वेष वाढत जात आहे.
२. आरक्षणामुळे समाज उपेक्षित घटक सबळ होतील हा घटनाकारान्चा विश्वास समाजाने/राजकीय व्यवस्थेने खोटा ठरवला आहे. आज जेही उपेक्षित उच्च पदावर पोहोचलेले दिसतात त्यामागे आरक्षणापेक्षा त्यांची व्यक्तिगत योग्यता महत्वाची ठरलेली दिसते. आरक्षण ही तात्कालिक गरज असणे वेगळे आणि तो जन्मसिद्ध हक्कच आहे असे मानणे वेगळे. आरक्षणाची गरज आता संपली आहे.
३. जातेनिहाय आरक्षणे भारतीय समाजाने (हिंदू) आजवर भोगलीच आहेत. पूजा/पौरोहित्य हे जसे धर्मानेच ब्राह्मण समाजासाठी आरक्षित होते तसेच शिंपी, तेली, आदी १२ बळूतेदारही समाजव्यवस्थेत आरक्षण भोगतच होते...म्हणजे त्यांच्या व्यवसायात अन्य लोकाना प्रवेशच नव्हता.
४. पेशवाईच्या काळात दलित समाजावर पराकोटीचे अन्याय व्हायला सुरुवात झाली. त्याची परिणती म्हणजे याच समाजाने पराक्रम गाजवत पेश्वाइचा अंत घडवून आणला. त्यांची समतेची संधी पुरेपूर हिरावून घेण्यात आली. श्रुती-स्मृतींनी काहीही म्हटले असो, समाज व्यवस्थेत दलितांचा मोठा वाटा होता...आणि तो तत्कालीन कायद्यान्नीही मान्य केला होता. दामाजी पंताला मोठा दंड भरून सोडवणारा विठू महारच होता....विठ्ठल नव्हे.
५. वैदिकाभिमानी ब्राह्मणांनी सर्वांनाच शुद्र लेखत (मग ते राज्यकर्ते का असेनात...) एक दुष्ट परंपरा निर्माण करत समाज रचनेलाच सुरुंग लावला. इतरांच्या व्यवसायात (मग ते क्षात्र कर्म असो, व्यापार असो, कि सेवा कर्म आणि कृषिकर्म असो) ते जोरात घुसले...आणि इतरांना मात्र त्यांनी पारंपारिक व्यवसायच करावेत असे फर्मान काढले...आणि स्वता: मात्र पारंपारिक आरक्षणे (पूजा/धर्मकार्य/पौरोहित्य इ.) भोगत इतरांच्या व्यवसायांवरही डल्ला मारला.
६. या रीतीने पारंपारिक का होईना जेही काही आरक्षण होते ते संपत गेले.
७. त्यामुळेच घटनाकारांना नवीन परिप्रेक्षात आरक्षणाची गरज भासली कि ज्यायोगे समाजातून नष्ट झालेली समानता यावी. सर्वांनाच संध्या मिळाव्यात.
८. आर्थिक आधारावर आरक्षण असावे असा मतप्रवाह उच्च जातींतील लोकांनी प्रसृत केला आणि त्याविषयक रान उठवले. पण भारतीय माणूस हा मुळातच खोटा असल्याने आर्थिक आधार हा फुसका आहे...म्हणजे...मी स्वत: पहिले आहे कि जमीनदारांची मुलेसुद्धा नादारी दाखवत (कागदोपत्त्री) फी माफी मिळवत होते. म्हणजे प्रामाणिक लोकांचा अशा स्थितीत निभाव लागणे अशक्यच आहे.
९. ब्राह्मण ही जात आहे कि वर्ण याबाबत ब्राह्मणी नेत्यांनी आजवर मौन पाळले आहे. ती जात असेल तर त्या जातीतील अपरिहार्य उतरंड दाखवण्यात ते असमर्थ ठरले आहेत. आज ब्राह्मण समाजात ५५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि श्रेष्ठ-कनिष्ठता त्यांच्यातही आहे. जर तो वर्ण असेल तर ते वर्णाश्रम धर्म जर पाळत नाहीत तर त्यांना ब्राह्मण वर्णीय समजता येत नाही.
१०. मराठा समाज सोयीप्रमाणे स्वता:ला ९६-९२ कुली समजतो आणि आता सोयीस्कर रीत्या आम्ही कुणबी आहोत असे प्रतिपादन करत आहे. माझे स्पष्ट मत असे आहे कि मराठा ही "जात" कधीच नव्हती. सातवाहन कालापासून महारत्ठी हा शब्द प्रचलित झाला आणि हा शब्द पदवाचक होता. जात- वाचक नव्हे. हे पद कोणालाही, लायक माणसाला मिळू शकत होते आणि ते वंश-परंपरात्मक नव्हते. उदा. सात्वाहानातील नागनिका या राणीचा पिता "महाराठ्ठी" होता (पद) पण तो नाग वंशाचा होता.
११. दलित समाजाला आजही आरक्षणाची गरज आहे काय? माझ्या मते नाही. त्यांत मराठा समाजही आरक्षण हवे असे प्रतिपादित करत असेल तर तेही चुकीचे आहे. ओ. बी. सीना तर मुळीच नाही. ओ. बी. सी. समाज हा सेवा आणि उद्योग यांत जातीय उतरंडीत का असेना, महत्वाचा आणि अर्थोत्पादक घटक होता. माळी समाज हा शेतकरीच, परंतु बागायती शेती करणारा...फुले/भाज्या पिकवणारा...तो ओ. बी. सी. कसा असू शकतो हा मला न कळणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न सोनार, शिंपी, इ.इ. यांच्याबद्दल विचारता येवू शकतो.
१२. मराठा समाज कोणत्या न कोणत्या पातळीवर सतीत होता हे अमान्य होवू शकत नाही. मग ते गाव पाटील असोत, जमीनदार असोत, सरंजामदार असोत कि कोणत्या ना कोणत्या सत्तेचे प्रतिनिधी असोत. त्यांनी सत्तेच्या राजकारणात मोठा रोल बजावला आहे. आजही तेच वास्तव आहे. आता असंख्य मराठे दारीद्र्यातील जिने जगात आहेत हेही वास्तव आहे आणि तसे नको हे मान्यच आहे. पण जातीनिहाय अहंकारात त्यांनीच स्वताची जर वात लावली असेल तर त्याला समाज कसा जबाबदार असेल? आजही जेही कोणी गुंठा सम्राट आहेत ते कोण आहेत? एड्स पासून ग्रस्त होणारे कोण आहेत? बारबालांना धनाढ्य करणारे कोण आहेत? महाराष्ट्रात आजही जी लोक-कला केंद्रे चालतात त्यांचे आश्रयदाते कोण आहेत? त्यांचे प्रबोधन कोणी करतांना मला तरी दिसत नाहीत. पण आरक्षण हवे आहे...जी भाकरच मुळात थोडकी आहे त्यात वाटा हवा आहे...हा सर्व परभुतान्चा खेळ आहे.
१३. आरक्षण आता विघातक आहे. ते कोणालाही नको. वंचितांची काळजी आहे म्हणून आरक्षण हवे हे म्हणणारे सारे खोटारडे आहेत...कारण वान्चीतांपर्यंत काहीच पोहोचले नाही...नाही तर कुनाब्यांनी आत्महत्या केल्या नसत्या...मेळघाटात आजही हजारो बालमृत्यू झाले नसते.
१४. जातीव्यावस्थेखेरीज भारतीय समाज jaguu शकत नाही हे सत्य मनुवाद्यांना आनंदाचे वाटू शकते, पण तेही सुपात आहेत.
१५. थोडक्यात मुळात आरक्षण रद्द व्हायला हवे...तरच सारे आपापली बुद्धी पणाला लावत पुढे जातील असे मला वाटते.
यावर व्यापक चर्चेची अपेक्शा आहेच.
Wednesday, February 9, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
व्रात्य कोण होते?
हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...