Friday, February 11, 2011

मग आदिमानवाचा टोळीवाद काय होता?

द्न्यान, तन्त्रद्न्यान आणि आर्थिक विकासाबरोबर मानवी बुद्धीही सामाजिक जाणीवांत समग्रपणे विकसीत होइल हा समाजशास्त्रद्न्यान्चा विश्वास खोटा ठरवण्याचा चंग युवा पिढीने बांधला आहे कि काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. इतिहासाचे विष्लेषन करणे, त्यावर वेगवेगळी मते असणे आणि त्यावर व्यापक चर्चा करत निरलसपणे पुढे जाणे वेगळे आणि आपापल्या जातीय नांग्या सरसावत अन्य जातियांवर/धर्मियांवर तुटुन पडणे, मानवताविरोधी बाबींचे निर्लज्जपणे समर्थन करत जातीय झुंडी बनवणे आता सर्रास झाले आहे असे दिसते. काय ऐकायचे आणि काय नाही हे मुळात पुर्वग्रहदुषित असल्याने त्यावरील प्रतिक्रिया या दम्भ आणि उन्मादपुर्ण झालेल्या दिसतात. यात ज्यांना खरोखर सामाजिक ऐक्याची अपेक्षा आहे अशांची पार दैना उडत असल्याचे दिसते.

असे समजु अजुन आपण पुरेसे प्रगल्भ झालेलो नाहीत...अजुनही आपण आदीमानवाच्या नैसर्गिक हिंसक प्रव्रुत्तींबाहेर आलेलो नाहित...तत्वद्न्य, सन्त, विचारवन्त आणि राजकीय/सामाजिक नेत्यांचा पुरेपुर पराभव झाला आहे...मानवता अपवाद वगळता आम्हाला स्पर्शु शकत नाही. कोनतीही टीका आम्हाला न्रुशंस बनवते...कारण आम्हाला नीट उत्तरे देता येत नाहीत...वा टीका सकारात्मक अर्थाने स्वीकारता येत नाही. उलट टीकेची उत्तरे देण्यासाठी एक नवी झुन्ड बनवली जाते आणि मानसिक विक्रुत्यांना वाट दिली जाते.

मग आदिमानवाचा टोळीवाद काय होता?

हा आणि चक्क असाच की!

ब्राह्मणी टोळ्यांचा द्वेष करणारे आहेत तसेच मराठी टोळ्यांचा द्वेष करणारे आहेत...दलितांचा द्वेष करणारे आहेत तसेच भटक्या विमुक्तांचा द्वेष करणारेही आहेत...कोणी इस्लामचा द्वेष करणार्या टोळ्या बनवतो तसेच ख्रिस्त्यांच्या द्वेशाधारावरील आधारितही टोळ्या आहेत.

हे एक नवे टोळीयुद्ध आहे आणि त्याची जणु काही अपरिहार्य अशी गरज आहे. पण अशी गरज भासणे हेच मुळात मनुष्य अध्याप प्रगल्भ झालेला नाही याचेच लक्षण नाही काय?

प्रत्येक टोळीची एक बाजु आहे. चुक असो कि बरोबर वा अर्धवट अशी भुमिका आहे. या भुमिका समजावुन घेण्याचे काम कोणी करायचे हा खरा प्रष्न आहे. या भुमिका सर्वांनाच एकप्रवाहात कशा आनता येतील यावर चिंतन कसे करायचे आणि कोणी...हाही एक प्रश्नच आहे. कारण प्रत्येक टोळी आपले सामर्थ्य आणि वंचना याच्या दुहाया देण्यात व्यस्त आहे. दुसर्याचे ऐकायची, काही मान्य करण्याची व पटवुन देण्याची तयारी जवळपास अद्रुश्य झाली आहे...

आम्ही सारेच आदिम काळात पोहोचलो आहोत...

तेथुन आम्ही परतण्याची कितपत शक्यता आहे?

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...