महाभारतात युधिश्ठीर एके ठिकाणी म्हणतो, ज्याच्या अंगी "दान, दया, शील, विनय, द्न्यान आणि संयम आहे त्यालाच ब्राह्मण म्हणावे." मला वाटते युधिष्टीराची व्याख्या अधिक सत्याच्या जवळ जाणारी आहे. येथे तो जन्माधारीत जातींबद्दल बोलत नाहीये. त्याला मुळात विचारला गेलेला प्रश्न असा होता कि, सद्ध्या वर्णसंकर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने, क्षत्रीय ब्राह्मणीशी तर ब्राहमणी शुद्रांशी संबंध देवु लागल्या असल्याने ब्राह्मण कोणास म्हणावे? खुद्द भग्वद्गीतेत वर्ण संकर चर्चिला गेलेला आहे. कारण ती तत्कालीनच् नव्हे तर आजचीही स्थिती आहे...तरी आम्ही शुद्ध रक्ताचे...९६ कुळी-९२ कुळी ते भरद्वाज गोत्री ते वशिष्ठ गोत्री मानण्याचा अहंकारी स्वभाव आहे, पण ते वास्तव नाही. जिद्न्यासुंनी यंदाच्या यंदाच्या "रोहीणी" दिवाळी अंकातील माझा लेख अवश्य वाचावा...म्हणजे जातीअभिमान...वंशाभिमान हे केवढे मुर्खपणाचे आहेत हे लक्षात येइल.
प्रत्येक काळात कालसुसंगत महामानव जन्माला येतात. ते त्या-त्या काळातील समाजाला नवे आत्मभान देतात आणि तेच त्या त्या काळाचे गुरु-धर्मगुरु असतात. येथे धर्म हा शब्द युधिश्ठीर प्रयुक्त व्याखेशी वापरला आहे. कालचे महामानव आज उपयुक्त नाहीत, जसा राम आणि अगदी क्रुष्णही आज उपयुक्त नाहीत.,..अगदी गांधीही सर्वस्वी उपयुक्त नाहीत...ते महामानव त्या-त्या काळाचे अपत्य होते...त्यांचा उपयुक्तता नवीन काळानुसार तपासुन घेत त्यांत बदल घडवले गेले पहिजेत, पण प्रत्यक्षात मानवी समुदाय त्या-त्या नेत्यांना आपापल्या जातीय चष्म्यातुन पहात त्यांना अशा बंदिस्त काराग्रुहात टाकुन त्यांच्या भक्तीची नाटके करत तो विचारप्रवाह आज संयुक्तिक कि असंयुक्तिक याचा कसलाही विचार करत नाहीत. यातुन नवीन सामाजिक प्रक्षोभ निर्मान होत प्रत्येक्जण आपापल्या जातींतील महापुरुष, मग ते खरे असोत कि खोटे शोधु लागतात त्यातुन एक नवी सामाजिक वंचना निर्माण होत जते आणि मानवी समाजाची मानसिक प्रगति खुंटते याचे भान रहात नाही.
मानवी इतिहासात एक काळ असा होता जेंव्हा बंधु-भगिनी, मुल-आइ...मुलगी-बाप असा शरीरसंबंधांसाठी कोणताही विधीनिषेधच नव्हता...मनुष्य हा एक टोळीमानव होता आणि सर्व स्त्रीया सर्वांची मालमत्ता असे. त्या काळाला तर्कतीर्थ लक्ष्मण्शास्त्री जोशी यांनी "गोधर्म" असे सार्थ नाव दिले आहे. ब्रह्मदेवाने आपली मुलगी सरस्वतीपासुन ४ अपत्ये उत्पन्न केली ही पुराण कथा या आदिम काळावर प्रकाश टाकते आणि त्यात वावगे वाटण्याचे काहीच नाही...प्रत्येक काळाची एक व्यवस्था असते आणि जेन्व्हा त्यातील दोष समोर येतात तेंव्हा त्यांत बदल घडवण्याचा प्रयत्न होतो. नवी नीतीमुल्ये सांगितली जावु लागतात...परंतु जगातील सारीच मानवी जमात ही या "गोधर्म" अवस्थेतुन गेली असल्याने, असंख्य टोळ्यांत संकर होत गेला असल्याने वंश ही सद्न्याच मुळात बाद ठरते...मग जाती-अभिमानाचे मुळ -शुद्ध रक्ताचे कोणीही कसे असु शकतील? ती नंतर प्राप्त झालेली एक सामाजिक स्थिती आहे आणि त्याच परिप्रेक्षात या बाबींकडे पहयला हवे. कोणीही कनिष्ठ वा श्रेष्ठ असु शकत नाही. धर्मकारण. समाजकारण, अर्थकारण या परिवर्तीत राहणार्या परिस्थित्यांतुन समाजव्यवस्था बदलत, अभिसरण करत राहते.
पण "भारतीय/हिंदु संस्क्रुती" बद्दल मात्र एक गोंधळ आहे. हे जे सामाजिक अभिसरण घदणे अनुस्युत असते कि ज्यायोगे समाजाची सर्वांगीण उन्नती होते हे या संस्क्रुतीला कधीच समजले नाही...म्हणुन ती सातत्याने रसातळाला जात गेल्याचे आपल्याला दिसते. संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे तर सांगता येत नाही/धर्म म्हणजे काय हे सांगता येत नाही आणि आजचा वर्तमान कोणत्या नैतिक पायांवर असावा हे तर ठावुकच नाही...मग ते आज कोणती नीती असावी हे कोठुन सांगणार? कारण संस्क्रुतीचे नेमके मापदंड कोणते...हेच माहित नाही. त्यामुळे निर्माण होणारी ही एक अवस्था आहे. नव्या अर्थाने हा एक "गोधर्म" बनला आहे कि काय असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे.
धर्म हा समाजाच्या धारणेसाठी असतो...म्हणजे मनुष्यमात्राच्या ऐहिक, नैतीक, आर्थिक, सांस्क्रुतीक आणि पारलौकिक इछा आणि आकांक्षा याची परिपुर्ती करतो त्याला मी धर्म मानतो. व्यक्तिगत समज-अपसमजातुन धर्माविषयीची मते वेगळी असु शकतात. पण सारा समाज एकजीव होत एकमेकांसाठी, सर्व हितासाठी जेंव्हा कटीबद्ध असतो तेंव्हा तो-तो समाज धार्मिक आहे असे समजता येइल. अशा धर्माला नाव असलेच पाहिजे ही काही पुर्व अट नाही.
राहीली गोष्ट जातींची. भारतीय विवाह संस्थेतुन जातीव्यवस्था उगम पावली. जातीव्यवस्थेचे निर्माते ब्राह्मण आहेत हे आता समाजैतिहासिक पुरव्यानुसार अमान्य करता येते. फारतर ब्राह्मणांनी जातीव्यवस्थेला धार्मिक अधार दिले, कर्मकांडॆ दिली असे म्हनता येते. समव्यवसायिकांतच मुली देण्याची प्रथा जातीव्यवस्थेला कारक ठरली. (अधिक जाणण्यासाठी क्रुपया "रोहीणी" दिवाळी अंकातील माझा लेख वाचावा.) पुरोहितवर्ग समाजावर काय थोपु शकतो आणि काय नाही यावर विचार करणे आवष्यक आहे. पुढे मात्र पुरोहित वर्गाने (सारेच ब्रह्मण हे कधीच पुरोहित नव्हते.) धार्मिक विषमतेचे बीज रोवले आणि समाजात तुकडे-तुकडे पाडले हेही तेव्हढेच खरे आहे. एवढेच नव्हे तर पोथीनिष्ठ होत त्यांनी द्न्यानाची कवाडे सर्वच समाजासाठी बंद करुन टाकली...कारण वेदांपार काही असु शकते याची विचारप्रक्रियाच थांबवली गेली.
ती एक दुर्दैवी आणि समाजविघातक घटना होती...
पण आज जातीप्रमाणे कोणीही व्यवसाय वा सेवा करत नाही. एखादा दलित हा न्यायाधीशही असु शकतो आणि एखादा ब्राह्मन सामान्य कर्मचारी...कारण आजची अर्थव्यवस्था-मुल्य व्यवस्था वेगळी आहे आणि ती जागतीक झाली आहे. तिचे संदर्भच बदलले आहेत. त्यामुळे जातीनिष्ठ उच्च-निच्चता हीच मुळात सन्दर्भहीण झाली आहे. परंतु हे लक्षात घेतले जात नाही.
आज जेंव्हा काही ब्राह्म्ण मुस्लिम द्वेशाची भुमिका घेतात आणि काही बहुजन ब्राह्मण द्वेशाची भुमिका घेतात...हे मला संपुर्णपणे अमान्य आहे. विरोध प्रव्रुत्तींशी आहे. नवी आजच्या समाजाला उपयुक्त ठरेल अशी मुल्यव्यवस्था निर्माण करणे हे कर्तव्य आहे...जुन्याचा अभिमान दुराभिमानात बदलवने हे अनैसर्गिक आहे. आणि सध्याचे सारे विरोध हे "जातीद्वेशाने" ग्रस्त आहेत याला मी विरोध करतो. कोणीही जातीविरोधात वा कोणत्याही धर्माविरोधात असुच नये यासाठी हा अट्टहास आहे. पण धर्म शुद्ध करावा हे प्रयत्न तर असणारच...तेथे कोणाचाही अहंकार आडवा येत असेल आणि तो केवळ अमुक जातीचा म्हणुन कोण समर्थ करेल वा विरोध करेल तर धर्म कधीही हाती येणार नाही.
मराठा ते सर्वच जातीयांना जसा वंश्श्रेश्ठत्वाचा गंड आहे तसाच तो ब्राह्मणांनाही आहे. त्या भ्रामक गंडांतुन किती बाहेर पडलेत आणि स्वता:च निर्माण केलेल्या अन्यायी व्यवस्थेतुन जी दलित समाजाची पराकोटीची अवहेलना केली गेली त्याबद्दल खरोखर किती जणांना खेद वाटतो आणि त्यांच्यासाठी कोनते सामाजिक/धार्मिक न्यायाचे प्रयत्न केले हा प्रश्न जेही लोक सामाजिक न्याय आणि नीतिमुल्ल्यांची चर्चा करतात त्यांनी स्वता:ला विचारावा.
Tuesday, February 15, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
व्रात्य कोण होते?
हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...