Sunday, April 3, 2011

हे काय जाती-अंत करणार?

फक्त आपापल्या जातीच्या हितासाठी "बहुजनीय चळवळ" हे लेबल लावून तोंडी लावण्यासाठी फुले शाहु-आंबेडकर यांचे नाव घेत जाती-स्वार्थगतच भुलभुलैय्या निर्माण करणे हेच चळवळींचे कार्य असेल तर त्या यशस्वीच होवू शकनार नाहीत. जातीअंत तर खूप दुरची बाब आहे. भविष्यातील युद्ध(वैचारिक असो कि रस्त्यावर उतरुन) हे प्रत्येक जाती-जातींत व्हावे अशीच सध्याच्या चळवळींची रणनीति आहे आणि तेच अपरिहार्य फलितही आहे. ब्राह्मण द्वेष हा फक्त बागुलबुवा आहे.

सध्या ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आस्तित्त्वात आहेत हे वास्तव भोगुनही आणि क्षत्रिय आणि वैश्य या धर्मप्रमाणित एकेकाळचे वर्ण संपुष्टात आनले गेले आहेत हे लक्षात न घेता एक वर्णीय पद्धत सांगायची प्रथा नव्याने पडली आहे. प्रत्यक्षात क्षत्रिय वा वैश्य गेल्या हजार वर्षांच्या काळात धर्म-मान्यता पातळीवर आस्तित्वातच नसतानाही कथित वैश्य वगळता सत्ताधारी मर्यादित समाजाने क्षत्रियत्वाचा हट्ट बाळगला आहे असे इतिहासावरुन दिसते. याचा अर्थ चातुर्वर्ण्य व्यवस्था जिंकली आहे असे म्हनायचे का?

पण वास्तव हे आहे कि तथाकथित हिंदु समाज हा गेली हजार वर्ष तरी फक्त द्वैवर्णीक आहे...म्हनजे ब्राह्मण आणि शुद्र. अशा वास्तवात सर्वच शुद्र हे एकसमान असुन त्यांच्यातील जाती या व्यवसायाधिष्ठीत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान एकसारखेच आहे हे समजावून घायला हवे. शुद्राति-शुद्र म्हणुन एक पंचम वर्ण धार्मिक परिप्रेक्षात निर्माण केला गेला...त्यांच्यावर या शुद्रांनीही अन्याय केले आहेत. आपल्या जातीय उतरंडी या अन्याय्य, अनैसर्गिक असून प्रत्येक जात ही समाजाच्या हितासाठीच राबत होती हे वास्तव दुर्लक्षीत ठेवले गेले. त्यांची अद्रुष्य संपत्ती-निर्मिती (निर्मितीचे वास्तव मुल्य आनि मिळनारा मोबदला यातील फरकामुळे) कधीही आर्थिक पातळीवर मोजलीच गेली नाही. जवळपास सर्वच समाजापैकी सरासरी ५०% असलेला स्त्री-वर्ग शुद्रच असुनही तिची सेवा-किंमत संस्क्रुतीच्या नावाखाली दडपली गेली आणि तीही शोषित बनली तसेच शोषितांचीही शोषित बनली. स्त्रीया घरातही जे काम करतात त्यांचे वेतन त्यांना मिळण्याचा अधिकार आहे हे मी २ वर्षांपुर्वी एका लेखात लिहिले आहे.

थोडक्यात आजमितीला, पारंपारिक व्व्यवसाय व सेवा संपुष्टात आल्या असल्याने सारेच शुद्र हे एकाच पातळीवर आहेत म्हणुन त्या मुद्द्यावर तरी त्यांनी समतेचा विचार करून जातीय आधारावरील संघटना आणि चलवळी संपवल्या पाहिजेत. आजच्या ब्राह्मण समाजाचाही वर्णलोप झाला आहे...कारण ते ब्राह्मनांना एक वर्ण म्हणुन जी कर्तव्ये दिली आहेत त्याचे पालन बहुसंख्य ब्राह्मण करत नाहीत. त्यामुळे स्म्रुतींच्याच आधारे हे सांगता येते कि अगणित ब्राह्मण हे शुद्रच बनले आहेत.

परंतु स्वजाती-अभिमान हा या समतेच्या तत्वातील फार मोठा अडथळा आहे. ब्राह्मण वर्णलोप झाला असुनही स्वता:ला श्रेष्ठ समजतात तर मराठे हे आजही मानसिक पातळीवर क्षत्रिय असतात तर व्यावहारिक पातळीवर कुणबी...बहुजन असतात...

खरा लढा या मनोव्रुतीबाबतचा आहे...आणि तो जिंकला जाणार नसेल...तर या सा-या बहुजनीय म्हनवणा-या जात-केंद्रित चळवळी संपणार यात शंका असण्याचे कारणच नाही.

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...