Sunday, May 8, 2011

आपण किती नैतीक आहोत?

सर्वच मराठेतर समाजाला झंझोडुन जागे व्हावे लागणार आहे कारण त्यांचा गैरवापर केला जात आहे. ब्राह्मणांना शत्रू म्हणुन प्रोजेक्ट करत इतरांना फसवून एका झेंड्याखाली आनण्याची ही चाल आहे. येथे हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि जसे सारेच ब्राह्मण रा.स्व.संघवादी नाहीत तसेच सर्वच मराठे हेही मराठा सेवा संघवादी नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे सारेच दलितही आंबेडकरवादी नाहीत...पण सोयीचा बुरखा घेतात. त्यामुळे या सर्वच संघीयांचे आंतर्गत हितसंबंध तपासुन घ्यायची गरज आहे.

मराठी समाजापुढची आव्हाने वेगळी आहेत. समस्या दिवसेंदिवस विकराल होत चालल्या आहेत. जगण्याचा मुलभुत प्रश्न गहन होत चालला आहे. असंतुलित विकासामुळे, विकेंद्रीकरणाकडे लक्षच न दिल्याने महाराष्ट्र रसातळाला जावु लागला आहे. गुन्हेगारी, झुंडशाही, एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे शेतकरी-कामकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारांच्या संख्येत एकीकडे वाढ होतेय पण परप्रांतीय येवुन प्रत्येक क्षेत्रात याच भुमीत रोजगार मिळवताहेत...पुढे जात आहेत. म्हणजे याच संध्या मराठी माणसाला सहज उपलब्ध असतांनाही केवळ मानसिकतेमुळे त्यांनी त्या गमावल्या आहेत. मराठी माणसाची ही कुपमंडुक मानसिकता बदलण्यासाठी या संघीयांनी एक सामाजिक चळवळ म्हणुन प्रयत्न करणे अभिप्रेत होते. श्रमाची-उद्योगीपणाची-कोर्पोरेट होण्याची महत्ता गावो-गाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता होती. पण ख-या प्रश्नांकडे पहायचेच नाही असे ठरवून आणि इतरांचेही लक्ष त्या प्रश्नांकडे जाउ नये म्हणुन पण मंडळी फक्त द्वेष आणि द्वेष याचाच आधार घेत समाजाचे सर्वस्वी वाटोळे करायला निघाली आहे आणि त्याचा निषेध करणे क्रमप्राप्त आहे.

कारण यामागे सर्वस्वी सत्तेचे राजकारण आहे. प्रजा मेली तरी त्यांचे काहीएक जात नाही. पण प्रजाच नसली तर हे कोणावर राज्य करणार आहेत हे काही केल्या या बावळ्यांच्या लक्षात येत नाही. पण समाज टीकला पाहिजे एवढेच नव्हे तर त्याची द्न्यान-व्विद्न्यान-सांस्क्रुतीक-आर्थिक-सामाजिक प्रगती व्हायला हवी हे काही केल्या त्यांना समजत नाही उलट गेली ६-७ वर्ष महाराष्ट्रात द्वेशाचे राजकारण होते आहे. यांच्यामुळे रा.स्व. चा फायदा असा झाला कि जे अर्थद्रुष्ट्या प्रगत झाल्याने जातीय कोंदनाबाहेर चालले होते त्यांना (ब्राह्मणांना) भयग्रस्त यांनी केल्यामुळे ते पुन्हा ब्राह्मणवादी संघटनांकडे वळु लागले...देणग्या देवू लागले. पुर्वी ब्राह्मण समाजात उपजातींची स्वतंत्र सम्मेलने व्हायची...जशी देशस्थ...चित्पावन...ई....यांच्यामुळे ब्राह्मणही बहुभाषिक संयुक्त सम्मेलने भरवु लागले आणि जे रा.स्व. ला अभिप्रेत आहे त्या नवसनातनवादाची जाहीर चर्चा व्हायला लागली. त्याचे समर्थन व्हायला लागले. याबद्दल मी किर्लोस्कर मासिकात वारंवार निषेध करणारे लेख लिहिले आहेत. पण ही सनातनवादी प्रतिक्रिया उमटवण्यास भाग पाडणारे आणि अंतत: रा.स्व.संघचे इप्सित साध्य करायला मदत करणारे हेच नव-संघीय होते याचे विस्मरण करून चालणार नाही. याचा अर्थ या दोहोंची वैचारीक युती आहे असा होत नाही काय?

हेच सत्य दडपले जावे, कोणीही त्यावर बोलू नये...बोलला तर त्याला संपवा हा उद्योग हे नव-संघीय करत आहेत. माझे साहित्यिक, विचारवंत आणि विचारी मित्र म्हणतात कि "ज्यांचे तुमचे तळवे चाटायची लायकी नाही त्यांच्याशी वाद का घालता? तुमची वैचारीक उंचीच ज्यांच्याकडे नाही त्यांना झटकून टाका." तर माझे काही संतप्त मित्र म्हणतात..."ठोकायचे का त्यांना?"

माझे उत्तर असे आहे कि ही मंडळी आज जे विषारी विचार पेरत आहेत त्याचा वटव्रुक्ष होत वंशसंहार होण्याची वाट पहायची आहे काय? मुस्लिमांना-ख्रिस्चनांना कसे अमानुश पद्धतीने मारले गेले आहे हा इतिहास जुना नाही. त्याला किमान ७५ वर्षांची उत्तरोत्तर वर्धिष्णु वैचारीक परंपरा होतीच. हे नव-संघीय ८-१० वर्षांची बालके...अजून काही वर्षांनी ब्राह्मणांचा संहार करणार नाहीत या भ्रमात राहु नका. द्वेषाची वीषवल्ली फार झपाट्याने वाढते. प्रेम आणि शांतीची रोपे हजारो वर्षांपुर्वी रुजवली गेलीत पण ती अजुन खुरटतच वाढत आहेत...प्रत्येक शतकात त्याच्या फांद्या छातणारेच जास्त जन्माला येतात....हा विरोधाभास लक्षात घ्या हे माझे सर्वांना विनम्र आवाहन आहे.

"ठोकायचे का त्यांना?" याला माझे अर्थातच उत्तर आहे ते म्हनजे "नाही." हाणामा-या -शिवीगाळ हे काही केल्या समाजावरील अन्याय दूर व्हावा-प्रगती व्हावी अशा उद्देशाने काम करणा-यांचे काही केल्या उद्द्दिष्ट असू शकत नाही आणि संस्क्रुतीही. आपले काम हे आणि हेच आहे कि सर्वच समाजघटकांची सर्वांगीण उन्नती. मतभेदांसहचे सहजीवन. सत्य मान्य करण्याची मानसीक तयारी. जेही काही उदात आहे, सुंदर आहे, ते कोणत्याही जातीयाचे असो, त्याला अभिवादन करण्याची व्रुत्ती. चार पावले तुम्ही पुढे या चार पावले आम्हीही पुढे येतो असे करण्याची मनाची उंची.

शेवटी समाजात विभिन्न विचारप्रवाह राहणारच आहेत. ते नैसर्गिकही आहे. ते असायलाच हवे तेंव्हाच समाज पुढेही जात असतो. द्वेषामुळे प्रगत झालाय असा एकही समाज यच्चयावत विश्वात नाही...नव्हता आणि होणारही नाही. द्वेशपुर्ण विचारप्रवाहांशी सा-याच सुजाण समाजाने लढायचे असते आणि तीच त्या-त्या समाजाची नैतीक पात्रता सिद्ध करत असते.

आपण किती नैतीक आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा ही विनंती.

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...