सर्वच मराठेतर समाजाला झंझोडुन जागे व्हावे लागणार आहे कारण त्यांचा गैरवापर केला जात आहे. ब्राह्मणांना शत्रू म्हणुन प्रोजेक्ट करत इतरांना फसवून एका झेंड्याखाली आनण्याची ही चाल आहे. येथे हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि जसे सारेच ब्राह्मण रा.स्व.संघवादी नाहीत तसेच सर्वच मराठे हेही मराठा सेवा संघवादी नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे सारेच दलितही आंबेडकरवादी नाहीत...पण सोयीचा बुरखा घेतात. त्यामुळे या सर्वच संघीयांचे आंतर्गत हितसंबंध तपासुन घ्यायची गरज आहे.
मराठी समाजापुढची आव्हाने वेगळी आहेत. समस्या दिवसेंदिवस विकराल होत चालल्या आहेत. जगण्याचा मुलभुत प्रश्न गहन होत चालला आहे. असंतुलित विकासामुळे, विकेंद्रीकरणाकडे लक्षच न दिल्याने महाराष्ट्र रसातळाला जावु लागला आहे. गुन्हेगारी, झुंडशाही, एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे शेतकरी-कामकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारांच्या संख्येत एकीकडे वाढ होतेय पण परप्रांतीय येवुन प्रत्येक क्षेत्रात याच भुमीत रोजगार मिळवताहेत...पुढे जात आहेत. म्हणजे याच संध्या मराठी माणसाला सहज उपलब्ध असतांनाही केवळ मानसिकतेमुळे त्यांनी त्या गमावल्या आहेत. मराठी माणसाची ही कुपमंडुक मानसिकता बदलण्यासाठी या संघीयांनी एक सामाजिक चळवळ म्हणुन प्रयत्न करणे अभिप्रेत होते. श्रमाची-उद्योगीपणाची-कोर्पोरेट होण्याची महत्ता गावो-गाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता होती. पण ख-या प्रश्नांकडे पहायचेच नाही असे ठरवून आणि इतरांचेही लक्ष त्या प्रश्नांकडे जाउ नये म्हणुन पण मंडळी फक्त द्वेष आणि द्वेष याचाच आधार घेत समाजाचे सर्वस्वी वाटोळे करायला निघाली आहे आणि त्याचा निषेध करणे क्रमप्राप्त आहे.
कारण यामागे सर्वस्वी सत्तेचे राजकारण आहे. प्रजा मेली तरी त्यांचे काहीएक जात नाही. पण प्रजाच नसली तर हे कोणावर राज्य करणार आहेत हे काही केल्या या बावळ्यांच्या लक्षात येत नाही. पण समाज टीकला पाहिजे एवढेच नव्हे तर त्याची द्न्यान-व्विद्न्यान-सांस्क्रुतीक-आर्थिक-सामाजिक प्रगती व्हायला हवी हे काही केल्या त्यांना समजत नाही उलट गेली ६-७ वर्ष महाराष्ट्रात द्वेशाचे राजकारण होते आहे. यांच्यामुळे रा.स्व. चा फायदा असा झाला कि जे अर्थद्रुष्ट्या प्रगत झाल्याने जातीय कोंदनाबाहेर चालले होते त्यांना (ब्राह्मणांना) भयग्रस्त यांनी केल्यामुळे ते पुन्हा ब्राह्मणवादी संघटनांकडे वळु लागले...देणग्या देवू लागले. पुर्वी ब्राह्मण समाजात उपजातींची स्वतंत्र सम्मेलने व्हायची...जशी देशस्थ...चित्पावन...ई....यांच्यामुळे ब्राह्मणही बहुभाषिक संयुक्त सम्मेलने भरवु लागले आणि जे रा.स्व. ला अभिप्रेत आहे त्या नवसनातनवादाची जाहीर चर्चा व्हायला लागली. त्याचे समर्थन व्हायला लागले. याबद्दल मी किर्लोस्कर मासिकात वारंवार निषेध करणारे लेख लिहिले आहेत. पण ही सनातनवादी प्रतिक्रिया उमटवण्यास भाग पाडणारे आणि अंतत: रा.स्व.संघचे इप्सित साध्य करायला मदत करणारे हेच नव-संघीय होते याचे विस्मरण करून चालणार नाही. याचा अर्थ या दोहोंची वैचारीक युती आहे असा होत नाही काय?
हेच सत्य दडपले जावे, कोणीही त्यावर बोलू नये...बोलला तर त्याला संपवा हा उद्योग हे नव-संघीय करत आहेत. माझे साहित्यिक, विचारवंत आणि विचारी मित्र म्हणतात कि "ज्यांचे तुमचे तळवे चाटायची लायकी नाही त्यांच्याशी वाद का घालता? तुमची वैचारीक उंचीच ज्यांच्याकडे नाही त्यांना झटकून टाका." तर माझे काही संतप्त मित्र म्हणतात..."ठोकायचे का त्यांना?"
माझे उत्तर असे आहे कि ही मंडळी आज जे विषारी विचार पेरत आहेत त्याचा वटव्रुक्ष होत वंशसंहार होण्याची वाट पहायची आहे काय? मुस्लिमांना-ख्रिस्चनांना कसे अमानुश पद्धतीने मारले गेले आहे हा इतिहास जुना नाही. त्याला किमान ७५ वर्षांची उत्तरोत्तर वर्धिष्णु वैचारीक परंपरा होतीच. हे नव-संघीय ८-१० वर्षांची बालके...अजून काही वर्षांनी ब्राह्मणांचा संहार करणार नाहीत या भ्रमात राहु नका. द्वेषाची वीषवल्ली फार झपाट्याने वाढते. प्रेम आणि शांतीची रोपे हजारो वर्षांपुर्वी रुजवली गेलीत पण ती अजुन खुरटतच वाढत आहेत...प्रत्येक शतकात त्याच्या फांद्या छातणारेच जास्त जन्माला येतात....हा विरोधाभास लक्षात घ्या हे माझे सर्वांना विनम्र आवाहन आहे.
"ठोकायचे का त्यांना?" याला माझे अर्थातच उत्तर आहे ते म्हनजे "नाही." हाणामा-या -शिवीगाळ हे काही केल्या समाजावरील अन्याय दूर व्हावा-प्रगती व्हावी अशा उद्देशाने काम करणा-यांचे काही केल्या उद्द्दिष्ट असू शकत नाही आणि संस्क्रुतीही. आपले काम हे आणि हेच आहे कि सर्वच समाजघटकांची सर्वांगीण उन्नती. मतभेदांसहचे सहजीवन. सत्य मान्य करण्याची मानसीक तयारी. जेही काही उदात आहे, सुंदर आहे, ते कोणत्याही जातीयाचे असो, त्याला अभिवादन करण्याची व्रुत्ती. चार पावले तुम्ही पुढे या चार पावले आम्हीही पुढे येतो असे करण्याची मनाची उंची.
शेवटी समाजात विभिन्न विचारप्रवाह राहणारच आहेत. ते नैसर्गिकही आहे. ते असायलाच हवे तेंव्हाच समाज पुढेही जात असतो. द्वेषामुळे प्रगत झालाय असा एकही समाज यच्चयावत विश्वात नाही...नव्हता आणि होणारही नाही. द्वेशपुर्ण विचारप्रवाहांशी सा-याच सुजाण समाजाने लढायचे असते आणि तीच त्या-त्या समाजाची नैतीक पात्रता सिद्ध करत असते.
आपण किती नैतीक आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा ही विनंती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
मुळात आजच्या किंबहूना जागतिकरणाच्या रेट्यानंतर आलेल्या शैक्षणिक पद्धती आणि व्यवस्था नैतिकतेची परिभाषा मांडू शकतील अशी सशक्त मुल्ये रुजविण्यात अपयशी ठरलीये .. त्यामुळे नैतिकतेच्या आयचा घो म्हणत .. गेल्या दशकभरात केवळ द्वेषावर आधारितच चळवळी उभ्या राहील्या आणि तितक्याच ने़टाने जोपासल्या गेल्या आहेत ...
ReplyDeleteमग त्या सांस्कृतिक असोत किंवा भाषिक असोत किंवा धार्मिक नाहीतर जातीय चळवळी असोत ....
ही व्यवस्था ह्या सगळ्यांचं मुळ आहे ....
संजयजी आपण म्हणतात ते एकदम योग्य आहे.विकेंद्रित विकास झाला नसल्यामुळे,तसेच नैतिक मूल्यांचे शिक्षण नसल्यामुळे आजची तरुण पिढी भरकटत आहे.आजची व्यवस्था हि शोषणाची झाली आहे.आणि त्यातून जातीद्वेष,सत्येसाठीचा झगडा वाढत आहे.आणि त्यातून आपण म्हणतात तो नरसंहार अटळ आहे.सत्ता आणि पैसा हे आजच्या पुढाऱ्यांचे अजेंडे आहेत.त्यामुळे हि विषवल्ली ते पोसत आहेत.आणि समाज निर्लाज्यपणे ह्याच्याकडे बघतो आहे.
ReplyDeleteसत्ताधारी जातीतील आणि बहुजनातील गरिबानी बन्ड करु नये, यासाठी त्यान्चे लक्श दुसरीकडे वेधन्याची ही चाल आहे.सत्ताधार्यान्चे हीतसम्बन्ध जपण्यासाठी नकली शत्रु उभा केला गेला आहे.त्यासाठी शिव्यान्ची बाराखडी गिरीवली जात आहे.हा कट तुम्ही आता उघडा पाडीत आहात.ग्रेट....गो अहेड...
ReplyDeleteपण नरके सर, तुम्हाला पण सत्ताधारी जात होयाचे आहे त्यासाठीच हे सगळे चालले आहे ना? मराठे हे सत्ताधारी आहेत त्यात अनैसर्गिक काहीच नाही कारण लोकशाहीत बहुसंख्यान्काचे राज्य येणार याबाबत तुमचे पण दुमत नसावे. एवढ्या दिवस इतर मागासवर्गीयांचे राजकीय महात्वाकांक्ष्या पुढे येत नवत्या त्या येत आहेत म्हणून मराठ्या विरुद्ध एक होण्याचे मनसुबे रचण्यात येत आहेत. त्यात वाईट असे काही नाही तुम्हाला माच्या सुभेछ्या तो पण तुमचा हक्कच आहे. पण म्हणून मराठ्यांना राखीव जागांची गरज नाही असे तुम्ही म्हणू नका. मराठ्यांना नसेल तर तुम्हाला पण नाही कारण तुमच्यावर सामाजिक बहिष्कार कधीच नवता तुमच्या सामाज्याची आणि मराठ्यांची आर्थिक परिस्थिती पण सारखीच आहे. मग तुम्ही का घेतले आरक्षण तो अधिकार फक्त दलितांचा आहे. आणि आरक्ष्यान हा काय गरिबी हटवण्याचा मार्ग नाही. तर तुम्हाला राजकारणात आरक्षण पाहिजे हे खरे नाही का? फक्त जात वेगळी म्हणनू तुम्ही आरक्षण मागू शकत नाही कारण सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मराठ्यांची पण आणि मागासवर्गीयांची पण सारखीच आहे. आता राम्तेकेचे तुम्हाला खूप कौतुक वाटत आहे, कारण तो माणूस मराठ्यांच्या रागशिवाजी महाराजावर काढत आहे (म्हणे शिवाजी राजा गोब्राह्मण प्रतीपालाकच ) तुम्हाला हे मान्य आहे का? असेल तर मग महात्मा फुल्यांनी लिहिलेले कुळवाडी भूषण कुन्ब्यांच राजा हे तुम्हाला मान्य नसेलच ....असे असेल तर जय ज्योती म्हणू नका! आणि रामटेके साहेबाना इतिहास शिकवा ते तुमचे कामच आहे.
ReplyDeleteSanjeevaji,
ReplyDeleteI had written a comment on this post, referring to Mr. Hari Narke, you and Mr. Ramteke. Did you find it offending, was that having any abusive stuff? I think no. Then my question is why did you delete that?
Or you are not ready to listen another people’s view? Or was it offending Mr. Hari Narke very respected person in intellectual society?
I think I had written my observation only. And I did not expect from you such behavior.
Dear Revolution, I never delete any comment. There must be some troble or other problem. YOu may kindly report the same. Thanks and sorry for inconvinience.
ReplyDeleteDear Revolution, I meant repeat the comment. I too am vetry eager to read it. As mentionedd, I never received comment from you on this thread.
ReplyDelete