Wednesday, May 18, 2011

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

इतिहास हा नेहमी जेत्यांच्याच द्रुष्टीकोनातून लिहिला जात असतो. ब्रिटिश द्रुष्टीकोनातील इतिहास आपण नाकारला आहे. आज कोणी ग्रांट डफ क्रुत इतिहास मानत नाही. ब्राह्मणांनी खोटा इतिहास रचला असा आरोप आहे, पण तो खोटा इतिहास ऐकतच तेंव्हाच्या आणि आताच्याही पीढ्या वाढत आहेत त्याचे काय करायचे? याच पीढ्यांनी या इतिहासकार ब्राह्मणांना आश्रय दिला होता त्याचे काय करायचे...कि खोटा इतिहास लिहवून घेण्यात त्यांचाच हातभार होता असे मानायचे?

ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेश्ठ असे स्म्रुतींनी सांगितले होते पण या स्म्रुती कोणत्या भारतीय राजाने पाळल्या? अनेक राजे शुद्र वर्णीय होते...(सातवाहन-नंद), काही वैश्य होते (गुप्त) काही ब्राह्मण होते (श्रुंग) काही नागवंशीय होते ( बिंबिसार)...ही अल्प पण महत्वाची उदाहरणे आहेत. आणि गम्मत म्हनजे क्षत्रिय वगळता राज्याधिकार कोणत्याही वर्णाला नाही...मग स्म्रुत्योक्त हा शब्द हा बदमाशीचा नाही काय?

समजा ब्राह्मनच राजा आहे...(इतिहासात होते) तर मग ब्राह्मण राजापेक्षा सामान्य ब्राह्मण कसा श्रेष्ठ होईल? ब्राह्मण राजा ब्राह्मणाच्याच आदेशाने कसा जाईल? अशा स्थितीत स्म्रुतींचे कायदे काय करतील? आणि क्षत्रिय तेंव्हा काय करत होते? गम्मत खरी अशी आहे कि हे सारे ऐतिहासिक वाद हे फक्त कोण कोणाचा मालक या सामंतशाहीतुन निर्माण झालेले आहेत. इतिहास त्या-त्या काळात राज्यकर्त्याच्या द्रुष्टीकोनातुनच लिहिला गेला आहे. मग तो कोणीही असो-कोणत्याही जाती-वर्णाचा असो. यात कालौघात लबाडी झालेली आहेच. धर्मपुरोहित या लबाडीत फक्त भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. उदा. ख्रिस्ती धर्म येशुने नव्हे तर त्याचा अनुयायी संत पालने प्रचलित केला. बुद्धाचा धर्म त्याच्याच अनुयायांनी त्यांच्या पद्धतीने प्रचलीत केला आणि असा गोंधळ माजवून दिला के बुद्धाला नेमके काय सांगायचे होते यावर तीनदा धर्मसंगती काही शतकांच्या अंतरातच भरवाव्या लागल्या. गीतेत मुळ नेमके काय होते हे आज सांगता येत नाही. रामायणातील बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त आहे हे आता सिद्ध झाले आहे. ऋग्वेदात अनेक प्रक्षित ऋचा आहेत. महाभारताबद्दल तर बोलायलाच नको कारण मुळ ८००० श्लोकांचे जय नावाचे काव्य लक्ष श्लोकांच्या संहितेत बदलले.

हे सारे ब्राह्मण हिताचे होते म्हणुन असे घडले असे जरी मान्य केले तरी त्यात राज्यकर्त्यांचा फायदा होताच कारण जो-तो क्रुष्ण, नल, लव-कुश, पांडवादि रक्तरेखेशी आपला संबंध जुळवू लागण्याच्या प्रयत्नात लागला. जेथे हे शक्य दिसत नाही तेथे तेथे प्रक्षिप्त श्लोक घुसडत त्या त्या पुर्वजांचे (खरे वा खोटे) माहात्म्य घुसवले गेले. भ्रुगू वंशीयांचे महाभारतातील अपरंपार माहात्म्य पाहून असे वाटते कि हे कौरव-पांडवांच्या संघर्षाची कहानी कमी पण भ्रुगुंमाहात्म्याचीच जास्त आहे. पुर्ण आदिपर्व हे भ्रुगु माहात्म्यानेच भरले आहे.

धर्मसत्ता ही वेगळी बाब आहे आणि इतिहास हा राज्यकर्त्यांच्या सोयीची बाब आहे. राज्यकर्त्यांचे अनेकदा अवास्तव उदातीकरण करत असता धर्मसत्ता आपलेही उदातीकरण केल्याखेरीज कसे राहील? त्यात कधीही कोणत्याही राज्यकर्त्याचे, मग तो कोणत्याही वर्णाचा असो, हस्तक्षेप असण्याचे कारणच असू शकत नाही. कारण सत्तेचे, अगदी पुरोहितही गुलाम असतात म्हणुनच ते राज्यकर्त्याला पार ईश्वरी अवतार ते प्रत्यक्ष ईंद्र अति-उदारपणे ठरवत त्यांचे मानसिक अभिमानात्मक समाधान करत त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लायकिपेक्षा वर उठवत स्वता:चे माहात्म्य सिद्ध करत असतील तर त्यांना दोष कोणत्या तोंडाने द्यावा?

रामायण-महाभारत ते अगदी ३-४०० वर्षांपुर्वेची महाकाव्ये पाहिली तर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

जोवर राजा श्रेस्ठच ठरवला जातो आहे आणि त्याची उत्पत्ती अत्यंत पवित्र अशा वंशातुन झाली आहे असा अहंकारात्मक भाव दिला जातो तोवर तो मुळ वंश ही पुरोहितांची अंतिम वर्चस्वता सिद्ध करणारी बाब आहे याकडे कोणत्याही राजवंशाने लक्ष दिलेले दिसत नाही.

आणि खोटा म्हणवला जाणारा इतिहास या राजकीय आणि धार्मिकांमधील युती आणि परस्पर वर्चस्वाच्या अनैतिक युतीतुन निर्माण झाला कि काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आणि याला समर्थन देणारे अनेक पुरावे उपलब्धच आहेत.

ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला कारण त्याला येथील राज्यकर्ते जबाबदार नव्हते का हा प्रश्न अनेकांना अडचणीचा वाटु शकतो. आणि त्याउलट ब्राह्मण हे येथील मुळ राज्यकर्ते बदलताच...परकीय सत्ता येऊ लागताच अधिक जोमाने मुळ इतिहासाची मोडतोड करायला सिद्ध झाले कारण तसे करणे हे नव-राज्यकर्त्यांच्या हिताचे होते आणि त्यांचे हित होणे हे ब्राह्मणांच्या हिताचे होते, असे नव्हे काय?

हा एक कुट प्रश्न आहे आणि याबद्दल उभयपक्षी जबाबदार आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे. आज मराठा समाज बेधडक स्वरचित इतिहास कसल्याही पुराव्यांची तर्कसंगती न लावता सांगत आहे. यामागे पुर्वज प्रतिष्ठेची भारतीय पुरातन मानसिकता आहे. म्हणुन तर प्रत्येक जातीचे संत त्या त्या जातीत ख-या खोट्या दंतकथा निर्माण करत श्रेष्ठ ते जगद्गुरु बनवले जात आहेत. बौद्ध धर्माची खरी मुलतत्त्वे समजावून न घेता एक नवा अर्ध-कच्च इतिहास मांडला जातो आहे. यामागे तथागत बुद्धाची, त्याच्या महनीय तत्वांचेच आपण पायमल्ली करत आहोत हे काही समाज-घटकांना कळत नाही. रामाचा धड इतिहास माहित नाही पण "जय श्रीराम"वाले धडधडीत थापा मारत असतात वा असत्यावर विश्वास ठेवत असतात. एवढेच नव्हे तर त्यावर हिंसा माजवत असतात.

याचे कारण एक आणि एकच आहे ते म्हणजे भारतीय माणुस मुळात असत्यावर-भ्रमांवर-खोट्या आत्मप्रशंसेवर विश्वास ठेवणारा आहे. जगातही असे भरपूर आहेतच. पण जे महान संस्क्रुतीचे वारसदार समजतात. ते कोण वर्तक...थापा मारतात कि मायादि संस्क्रुत्यांचे आद्य जनक हिंदू...त्यावर विश्वास ठेवणा-या मुढांचीही कमतरता नाही...ते पार मंगळावर आत्मबलाने जावुन आले हे बेधडक सत्य (?) स्वीकारले जाते.

आणि येथे हे नवे सत्तेचे दलाल जिजाऊ महार होत्या (हे बहुदा प्रथम सम्राट नावाच्या दैनिकात आले होते आणि नंतर बाम्सेफ ने हे उचलले आणि त्यातुनच मराठा-महार युतीची प्रक्रिय सुरु झाली असावी...वा राजकीय कारणांसाठी या अभिनव (?) सिद्धांताचा उदय झाला असावा.)म्हणजे नवब्राह्मण येथेही आहेत. तेही सत्तेसाठीच आहेत. सुजीत कांबळे यांनी (आता तेही खरे कि खोटे हे मला माहित नाही...कारण फ़ेसबुकवरील लोक अत्यल्प विश्वासार्ह असतात.) जे प्रश्न उपस्थित केले ते महत्वाचे आहेतच पण त्याकडे अजून अधिक व्यापक परिप्रेक्षात पहावे लागणार आहेत. आजतागायतपर्यंत प्रेमविवाह वगळता ब्राह्मण वा मराठा वा अन्य कोणी जातीयाने खुषीने खालच्या जातीयांशी रोटी-बेटी व्यवहार केल्याचे उदाहरण नाही. आजही नाही. प्रेमविवाहही स्वीकारले गेलेले नाहीत...गेले तर जेंव्हा नाईलाज होतो तेंव्हा. हो...पण सत्ताधारी समाजाने सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी पार शक-हुण-कुशाण ते मुस्लिमांना आपल्या मुली देण्यात धन्यता मानली आहे ती सत्ता टिकवण्यासाठी. यावर बोलावे तेवढे कमीच आहे.

थोडक्यात, असे सारे असुनही राजपुत इतिहास थोर आहे, शिख इतिहास थोर आहे, इस्लामचाही इतिहास थोर आहे, अशोकाचाही इतिहास थोर आहे (अशोक हा खुनी होता...त्याने आपल्यच थोरला भाऊ कालाशोकाचा खुन करुन सत्ता मिळवली)...हाही थोर आणि तोही थोर...

यातील थोरांची चिकित्सा नाकारुन आणि सत्ताधार-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादातुन पुराणकार जेवढे भरकटत गेले तसे आताच्या सत्ताधा-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादात हे नव्य ब्राह्मण इतिहासकार एवढे भ्रकटत गेले आहेत कि पुराणकारांनी लाजेने मान खाली घालावी. इतिहासाची फाटलेली लक्तरे शिवून त्यांना पांघरण्याजोगी बनवायचे काम सोडा ती मानवतेच्या वेशीवर टांगायची महत्कार्ये सुरू केली. ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी राहिले होते ते हे मर्द मराठा जातीचे म्हणवणारे काही विद्वान (?) इतिहासकार करत आहेत.

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...