Wednesday, May 18, 2011

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

इतिहास हा नेहमी जेत्यांच्याच द्रुष्टीकोनातून लिहिला जात असतो. ब्रिटिश द्रुष्टीकोनातील इतिहास आपण नाकारला आहे. आज कोणी ग्रांट डफ क्रुत इतिहास मानत नाही. ब्राह्मणांनी खोटा इतिहास रचला असा आरोप आहे, पण तो खोटा इतिहास ऐकतच तेंव्हाच्या आणि आताच्याही पीढ्या वाढत आहेत त्याचे काय करायचे? याच पीढ्यांनी या इतिहासकार ब्राह्मणांना आश्रय दिला होता त्याचे काय करायचे...कि खोटा इतिहास लिहवून घेण्यात त्यांचाच हातभार होता असे मानायचे?

ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेश्ठ असे स्म्रुतींनी सांगितले होते पण या स्म्रुती कोणत्या भारतीय राजाने पाळल्या? अनेक राजे शुद्र वर्णीय होते...(सातवाहन-नंद), काही वैश्य होते (गुप्त) काही ब्राह्मण होते (श्रुंग) काही नागवंशीय होते ( बिंबिसार)...ही अल्प पण महत्वाची उदाहरणे आहेत. आणि गम्मत म्हनजे क्षत्रिय वगळता राज्याधिकार कोणत्याही वर्णाला नाही...मग स्म्रुत्योक्त हा शब्द हा बदमाशीचा नाही काय?

समजा ब्राह्मनच राजा आहे...(इतिहासात होते) तर मग ब्राह्मण राजापेक्षा सामान्य ब्राह्मण कसा श्रेष्ठ होईल? ब्राह्मण राजा ब्राह्मणाच्याच आदेशाने कसा जाईल? अशा स्थितीत स्म्रुतींचे कायदे काय करतील? आणि क्षत्रिय तेंव्हा काय करत होते? गम्मत खरी अशी आहे कि हे सारे ऐतिहासिक वाद हे फक्त कोण कोणाचा मालक या सामंतशाहीतुन निर्माण झालेले आहेत. इतिहास त्या-त्या काळात राज्यकर्त्याच्या द्रुष्टीकोनातुनच लिहिला गेला आहे. मग तो कोणीही असो-कोणत्याही जाती-वर्णाचा असो. यात कालौघात लबाडी झालेली आहेच. धर्मपुरोहित या लबाडीत फक्त भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. उदा. ख्रिस्ती धर्म येशुने नव्हे तर त्याचा अनुयायी संत पालने प्रचलित केला. बुद्धाचा धर्म त्याच्याच अनुयायांनी त्यांच्या पद्धतीने प्रचलीत केला आणि असा गोंधळ माजवून दिला के बुद्धाला नेमके काय सांगायचे होते यावर तीनदा धर्मसंगती काही शतकांच्या अंतरातच भरवाव्या लागल्या. गीतेत मुळ नेमके काय होते हे आज सांगता येत नाही. रामायणातील बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त आहे हे आता सिद्ध झाले आहे. ऋग्वेदात अनेक प्रक्षित ऋचा आहेत. महाभारताबद्दल तर बोलायलाच नको कारण मुळ ८००० श्लोकांचे जय नावाचे काव्य लक्ष श्लोकांच्या संहितेत बदलले.

हे सारे ब्राह्मण हिताचे होते म्हणुन असे घडले असे जरी मान्य केले तरी त्यात राज्यकर्त्यांचा फायदा होताच कारण जो-तो क्रुष्ण, नल, लव-कुश, पांडवादि रक्तरेखेशी आपला संबंध जुळवू लागण्याच्या प्रयत्नात लागला. जेथे हे शक्य दिसत नाही तेथे तेथे प्रक्षिप्त श्लोक घुसडत त्या त्या पुर्वजांचे (खरे वा खोटे) माहात्म्य घुसवले गेले. भ्रुगू वंशीयांचे महाभारतातील अपरंपार माहात्म्य पाहून असे वाटते कि हे कौरव-पांडवांच्या संघर्षाची कहानी कमी पण भ्रुगुंमाहात्म्याचीच जास्त आहे. पुर्ण आदिपर्व हे भ्रुगु माहात्म्यानेच भरले आहे.

धर्मसत्ता ही वेगळी बाब आहे आणि इतिहास हा राज्यकर्त्यांच्या सोयीची बाब आहे. राज्यकर्त्यांचे अनेकदा अवास्तव उदातीकरण करत असता धर्मसत्ता आपलेही उदातीकरण केल्याखेरीज कसे राहील? त्यात कधीही कोणत्याही राज्यकर्त्याचे, मग तो कोणत्याही वर्णाचा असो, हस्तक्षेप असण्याचे कारणच असू शकत नाही. कारण सत्तेचे, अगदी पुरोहितही गुलाम असतात म्हणुनच ते राज्यकर्त्याला पार ईश्वरी अवतार ते प्रत्यक्ष ईंद्र अति-उदारपणे ठरवत त्यांचे मानसिक अभिमानात्मक समाधान करत त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लायकिपेक्षा वर उठवत स्वता:चे माहात्म्य सिद्ध करत असतील तर त्यांना दोष कोणत्या तोंडाने द्यावा?

रामायण-महाभारत ते अगदी ३-४०० वर्षांपुर्वेची महाकाव्ये पाहिली तर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

जोवर राजा श्रेस्ठच ठरवला जातो आहे आणि त्याची उत्पत्ती अत्यंत पवित्र अशा वंशातुन झाली आहे असा अहंकारात्मक भाव दिला जातो तोवर तो मुळ वंश ही पुरोहितांची अंतिम वर्चस्वता सिद्ध करणारी बाब आहे याकडे कोणत्याही राजवंशाने लक्ष दिलेले दिसत नाही.

आणि खोटा म्हणवला जाणारा इतिहास या राजकीय आणि धार्मिकांमधील युती आणि परस्पर वर्चस्वाच्या अनैतिक युतीतुन निर्माण झाला कि काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आणि याला समर्थन देणारे अनेक पुरावे उपलब्धच आहेत.

ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला कारण त्याला येथील राज्यकर्ते जबाबदार नव्हते का हा प्रश्न अनेकांना अडचणीचा वाटु शकतो. आणि त्याउलट ब्राह्मण हे येथील मुळ राज्यकर्ते बदलताच...परकीय सत्ता येऊ लागताच अधिक जोमाने मुळ इतिहासाची मोडतोड करायला सिद्ध झाले कारण तसे करणे हे नव-राज्यकर्त्यांच्या हिताचे होते आणि त्यांचे हित होणे हे ब्राह्मणांच्या हिताचे होते, असे नव्हे काय?

हा एक कुट प्रश्न आहे आणि याबद्दल उभयपक्षी जबाबदार आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे. आज मराठा समाज बेधडक स्वरचित इतिहास कसल्याही पुराव्यांची तर्कसंगती न लावता सांगत आहे. यामागे पुर्वज प्रतिष्ठेची भारतीय पुरातन मानसिकता आहे. म्हणुन तर प्रत्येक जातीचे संत त्या त्या जातीत ख-या खोट्या दंतकथा निर्माण करत श्रेष्ठ ते जगद्गुरु बनवले जात आहेत. बौद्ध धर्माची खरी मुलतत्त्वे समजावून न घेता एक नवा अर्ध-कच्च इतिहास मांडला जातो आहे. यामागे तथागत बुद्धाची, त्याच्या महनीय तत्वांचेच आपण पायमल्ली करत आहोत हे काही समाज-घटकांना कळत नाही. रामाचा धड इतिहास माहित नाही पण "जय श्रीराम"वाले धडधडीत थापा मारत असतात वा असत्यावर विश्वास ठेवत असतात. एवढेच नव्हे तर त्यावर हिंसा माजवत असतात.

याचे कारण एक आणि एकच आहे ते म्हणजे भारतीय माणुस मुळात असत्यावर-भ्रमांवर-खोट्या आत्मप्रशंसेवर विश्वास ठेवणारा आहे. जगातही असे भरपूर आहेतच. पण जे महान संस्क्रुतीचे वारसदार समजतात. ते कोण वर्तक...थापा मारतात कि मायादि संस्क्रुत्यांचे आद्य जनक हिंदू...त्यावर विश्वास ठेवणा-या मुढांचीही कमतरता नाही...ते पार मंगळावर आत्मबलाने जावुन आले हे बेधडक सत्य (?) स्वीकारले जाते.

आणि येथे हे नवे सत्तेचे दलाल जिजाऊ महार होत्या (हे बहुदा प्रथम सम्राट नावाच्या दैनिकात आले होते आणि नंतर बाम्सेफ ने हे उचलले आणि त्यातुनच मराठा-महार युतीची प्रक्रिय सुरु झाली असावी...वा राजकीय कारणांसाठी या अभिनव (?) सिद्धांताचा उदय झाला असावा.)म्हणजे नवब्राह्मण येथेही आहेत. तेही सत्तेसाठीच आहेत. सुजीत कांबळे यांनी (आता तेही खरे कि खोटे हे मला माहित नाही...कारण फ़ेसबुकवरील लोक अत्यल्प विश्वासार्ह असतात.) जे प्रश्न उपस्थित केले ते महत्वाचे आहेतच पण त्याकडे अजून अधिक व्यापक परिप्रेक्षात पहावे लागणार आहेत. आजतागायतपर्यंत प्रेमविवाह वगळता ब्राह्मण वा मराठा वा अन्य कोणी जातीयाने खुषीने खालच्या जातीयांशी रोटी-बेटी व्यवहार केल्याचे उदाहरण नाही. आजही नाही. प्रेमविवाहही स्वीकारले गेलेले नाहीत...गेले तर जेंव्हा नाईलाज होतो तेंव्हा. हो...पण सत्ताधारी समाजाने सत्तेची गणिते सांभाळण्यासाठी पार शक-हुण-कुशाण ते मुस्लिमांना आपल्या मुली देण्यात धन्यता मानली आहे ती सत्ता टिकवण्यासाठी. यावर बोलावे तेवढे कमीच आहे.

थोडक्यात, असे सारे असुनही राजपुत इतिहास थोर आहे, शिख इतिहास थोर आहे, इस्लामचाही इतिहास थोर आहे, अशोकाचाही इतिहास थोर आहे (अशोक हा खुनी होता...त्याने आपल्यच थोरला भाऊ कालाशोकाचा खुन करुन सत्ता मिळवली)...हाही थोर आणि तोही थोर...

यातील थोरांची चिकित्सा नाकारुन आणि सत्ताधार-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादातुन पुराणकार जेवढे भरकटत गेले तसे आताच्या सत्ताधा-यांना अनूकुल इतिहास लिहिण्याच्या नादात हे नव्य ब्राह्मण इतिहासकार एवढे भ्रकटत गेले आहेत कि पुराणकारांनी लाजेने मान खाली घालावी. इतिहासाची फाटलेली लक्तरे शिवून त्यांना पांघरण्याजोगी बनवायचे काम सोडा ती मानवतेच्या वेशीवर टांगायची महत्कार्ये सुरू केली. ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी राहिले होते ते हे मर्द मराठा जातीचे म्हणवणारे काही विद्वान (?) इतिहासकार करत आहेत.

त्यांना शुभेछ्छा देण्याखेरीज माझ्या हाती काय आहे?

5 comments:

  1. १) रामायणातील उत्तर खंडातील.. भले प्रक्षिप्त असली तरीही... रामाने एका ब्राह्मणाच्या सांगण्या वरून शंबूक वध केला... ह्यात कोणत्या राज्यकर्त्याचा स्वार्थ दिसून येतो...??
    २) शिवरायांच्या राज्याभिषेकाला...तत्कालीन ब्राह्मण वृन्दांचा विरोध होता.. ह्यातून कुठल्या प्रकारचा धर्मशक्ती वर राज्यशक्तीचा अंकुश दिसून येतो...?? उलट मी तर म्हणेल आधीच्या राज्यांना धर्म शक्तीपासून थोडे सांभाळून राहावे लागत असे.. कारण तत्कालीन समाजात लोकप्रियता मिळवण्यासाठी धर्माचे पालन हा देखील एक महत्वाचा मुद्दा असावा.. शिवरायांनी क्षत्रियत्व सिद्ध केले आत्ता मला सांगा काय गरज होती क्षत्रियत्व सिद्ध करायची.. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा विरोध होता म्हणून अथवा दुसऱ्या कारणा वरून म्हणा, काय गरज होती गागा भट्टाना बोलावून राज्याभिषेक करण्याची????इतर जातीतील कुणालाच राज्याभिषेकाचा विधी करण्याची पद्धत माहित न्हवती का??? आणि जर माहित नसेल तर राज्याभिषेकाची नवीन पद्धत का बरे रुजवण्यात आली नाही....कुठे तरी राजा जरी असला तरी त्याला लोकप्रियतेसाठी म्हणा.. अथवा त्याच्या वर लहान पणा पासून असलेल्या धर्माच्या पगड्या मूळे म्हणा..तो वावरत असलेल्या वातावरणा मूळे म्हणा, धर्म शक्ती.. अथवा धर्माच्या दलालांचे ऐकणे भाग पडत असावे असे म्हणता येणार नाही का??
    ३) आपण म्हणता त्या नुसार वादासाठी मान्य केले कि प्रक्षिप्त इतिहास अथवा.. खोटा इतिहास ह्यात त्या त्या काळातील राज्यकर्त्यांचे हित होते..असे जरी मान्य केले तरी महत्वाचा मुद्दा असा आहे.. कि राज्यकर्त्यांनी त्या त्या काळात जो इतिहास लिहिला गेला त्याचे किती प्रमाणात वाचन केले होते....स्वतः वाचन करायचे कि दुसऱ्या कडून वाचन करवून घ्यायचे...???
    अजूनही अनेक प्रश्न उपस्थित राहतात....
    मला असे म्हणायचे नाही कि जे काही झाले त्यात फक्त ब्राह्मणांची चूक होती.. पण ज्यांचा लिखाणा वर पगडा होता.. त्यांची जास्त चूक असणे.. हे अगदी साहजिक आणि सद्सद विवेक बुद्धीला पटेल असे आहे...
    राज्यकर्त्यांची जशी आपण चूक म्हणता.. त्यांचा फायदा म्हणता.. तशीच मग बहुजनांची देखील चूक म्हणायची का?? कारण असा इतिहास लिहिला गेला.. मग त्यांनी त्या त्या इतिहासाला तेव्हा तेव्हा विरोध का बरे केला नाही???? तसे बघायला गेले तर चूक सगळ्यांचीच आहे असेही म्हणता येते..आत्ता विषय आहे.. चूक कोणाची होती त्या पेक्षा.. आत्ता चूक कोण करत आहे...
    आणि आत्ताच्या काळातही जर काही लोकांकडून चुकीचा इतिहासच पुढे आणला जात असेल.. तर त्यास विरोध का करू नये...???

    ReplyDelete
  2. ब्राह्मणी इतिहासकारांकडुन अध:पतनाचे जे कार्य बाकी राहिले होते ते हे मर्द मराठा जातीचे म्हणवणारे काही विद्वान (?) इतिहासकार करत आहेत.
    ==============
    १] ह्याचा अर्थ ब्राह्मणी इतिहास करा कडून अधः पतन झाल्याचे तुम्हाला मान्य आहे...
    २] ह्यात जे तुम्ही मराठा समाजातील इतिहासकारा वर टीकेची झोड उठवलेली दिसते...बहुजन समाजात मराठा जातीतले सोडून असे कोणीच करत नाहीयेत का??? त्यावर तुम्ही काही भाष्य केलेले आहे का???
    जसे लिखाण मर्द मराठयां कडून आत्ता होत आहे असे तुमचे म्हणणे आहे.. तसेच लिखाण बहुजन समाजातील मराठा सोडून इतर जातीतील कोणीतरी केले तर त्याला तुम्ही विरोध करणार का???
    ३] स्पष्टच विचारतो.. इतिहासाच्या राजकारणातून जी ब्राह्मण विरोधी चळवळ उभी राहू बघते आहे.. त्याचे सगळे श्रेय अथवा फायदा मराठा समाजातील राजकीय नेत्यांना होईल असा पूर्वग्रह ठेऊन मराठा जातीतील इतिहासकारांना अथवा चळवळ कर्त्यांना निशाणा केले जात आहे का??? ह्यात विशेषता OBC च्या मतांसाठी हि टीकेची झोड उठवली जात नाही कशावरून... इतिहासातील ब्राह्मण विरोधी चळवळीचे श्रेय मराठयां कडे जाईल.. आणि मग.. त्यातून ब्राह्मणविरोधी(ब्राह्मण्यविरोधी म्हणा) अश्या फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची सूत्रे देखील मराठयां कडे जातील.. त्यातून OBC आणि भीमशक्ती हि मराठा नेत्यांच्या मागे जाईल....असे झाले तर.. OBC , आणि प्रस्थापित भीमशक्तीचे नेते..व इतिहास तज्ञ मागे पडतील अश्या ह्या अस्वस्थतेतून जर कोणी मराठा जातीतील लेखकांवर टीका करणार असतील तर ती टीका किती योग्य असणार ह्याची कल्पना आल्यावाचून राहत नाही...नेते पद त्या त्या जातीतील इतिहास तज्ञांना, सामाजिक विचारवंतांना, नेत्यांना पाहिजे असेल तर त्यांनी स्वतंत्र उपक्रम राबवा,...पण समांतर लढा देणाऱ्यांवरच टीका हे उत्तर मला तरी योग्य वाटत नाही...

    ReplyDelete
  3. कुळवाडी भुषण, फक्त मराठेच नव्हेत तर खोटा इतिहास सांगण्यात अनेक आघाड्या बनत आहेत. त्यामुळे तेवढ्यापुरते आपले म्हणने मी खरे आहे असेच मानतो. परंतू खोट्या इतिहासाच्या नादी मराठ्यांसारख्या समाजाने लागावे हे अधिक खटकण्यासारखे आहे कारण त्यांचा खरोखर राजकीय इतिहासही आहे आणि त्याचे अधिक वस्तुनिष्ठ संशोधन-विश्लेषन करता येवू शकते. अन्य समाजांचा मुळात इतिहस असा कधी लिहिलाच गेलेला नाही त्यामुळे त्यात केवळ आत्मसंतुष्टीसाठी खोटे उदात्तीकरण केले जात असेल तर त्याला विशेष असा आक्षेप घेता येत नाही हे येथे लक्षात घ्यायला हवे. मी राजकारणी नाही त्यामुळे मराठा-ओबीसी या वादात मी नाही आणि नसले पाहिजे. इतिहासाच्या मोडतोडीची कारणे शोधणे हे काम आहे आणि ते एका लेखावरून जज करता येणार नाही. तुमच्या प्रतिक्रियेमुळे उलट त्याला चांगली चालना मिळेल. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. अन्य समाजांचा मुळात इतिहस असा कधी लिहिलाच गेलेला नाही त्यामुळे त्यात केवळ आत्मसंतुष्टीसाठी खोटे उदात्तीकरण केले जात असेल तर त्याला विशेष असा आक्षेप घेता येत नाही हे येथे लक्षात घ्यायला हवे.
    =========
    मग मराठ्यांनी करावे काय?
    महात्मा फ़ुलेंनी सूरवात केली, राजर्षि शाहू आणी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आणी अनेक जनांनी खोट्या इतिहासा विरुद्ध लढा दिला, त्यात सर्वच जातिच्या लोकांनी सहभाग घेतला, अगदी काही पुरोगामी ब्राह्मणांनी देखिल सहभाग घेतला असणार.....
    १०० वर्षे होऊन गेली, इतिहासात किती सुधारणा झाली ते सांगा..??
    णात कमी झाले आहे ते ही सांगा.. की ह्या ५०-६० वर्षात दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी ह्यांच्या गुरूपदा बाबतचे विकृतीकरण किती प्रमाणात थांबले ते ही सांगा ?? थांबायचे तर नावच नाही पण ते विकृतिकरण वाढतच चालले आहे...
    मग आत्ता ह्या बाबतच्या लढ्याची पद्धतीचे आत्मपरिक्षण नको का करायला ??? समजाऊनही जर पुढचा विकृती करण कमी करण्याचे नाव घेत नसेल तर....आत्ता पुढच्या वर अक्रमण नको का करायला?? कधी पर्यन्त आपण आपल्याच गडाचे संरक्षण करायचे?? कधी आपण बाहेर पडून जो आपल्या गडावर वारं वार आक्रमण करतोय त्यांचेच गड का नाही उ्ध्द्वस्त करायचे??
    तुमच्या बद्दल माहित नाही पण हरी नरके सरांनी जो सध्याचा STAND घेतलाय, तो तरी योग्य वाटत नाही...काहि काळापुर्वी जे ब्रिगेडच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते..तेच आत्ता ब्रिगेड वर तोंडसुख घेतांना दिसतात... मान्य कि ब्रिगेड चे काही त्यांना खटकले असेल..पन साळंखे सरांसारखे ते देखिल आपले अंग बाजुला काढून घेउ शकले असते..पन उलट त्यांनी ब्रिगेडवरच धावा बोलला आहे..त्यामुळे काही तरी राजकारण जरुर शिजलेले असनार..तुमच्या बाबतही तसेच असु नये अशी अपेक्षा बाळगतॊ...

    ReplyDelete
  5. Mi ekanda shiledar ahe ani mala je patate tech mi lihito. Mi kadheehee konatyaahee sanghatanet navhato ani nahi.

    Itihasat sudharana karanyache kaam mi barech kele ahe, he aapalyala mahit nasave. Vitthalaabaabat, sindhu sanskrutibabat te asur sanskrutibabat mi bharapur lekhan kele ahe ani te prasjiidhahi aahe.

    Nava itihaas haa tarkashuddh puravyanvarach asalaa pahije...mag to maraatrhaa lihot ki any koni. Pan durdaivane tase hot naahee yaachi khant ahech.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...