महाराष्ट्राचा इतिहास अनेक जनसमुदायांनी घडवला आहे हे मी अनेक लेख-पुस्तकांतून माडला आहेच. येथे मी आज महाराष्ट्रातील आद्य वंशांबद्दल लिहिणार आहे आणि त्याचे वर्तमानाशी असलेले तादात्म्य दाखवत या आद्य वंशीयांशी कशी प्रतारणा होत आहे हे दाखवणार आहे.
पुंड्र आणि औंड्र (आणि मुतीब, शबर) हे महाराष्ट्राचे व दक्षीण भारताचे आद्य रहिवासी-राज्यकर्ते होते. या वंशांची माहिती आपल्याला सर्वप्रथम ऐतरेय ब्राह्मणा (इ.स. पु. ८००) मद्धे मिळते. हे मुळचे असूर वंशीय असून या समाजांचे मुळ पुरुष असूर बळीचे पुत्र होते असा निर्वाळा महाभारताने दिला आहे तर ऐतरेय ब्राह्मण या सरवच वंशांना शुद्र असे संबोधते. पुराणेही त्यांना शुद्रच संबोधतात.
औंड्र लोकांनी पश्चिम बंगाल, ऒडिसा आणि आंध्र (औंड्र चे आंध्र) प्रदेशात सत्ता स्तापत मुक्कम ठोकुन व्यापक शैव संस्क्रुती जोपासली. पुढे ते सातवाहनांच्या रुपात महाराष्ट्रातही आले. तो इतिहास आपल्याला माहितच आहे. पण तत्पुर्वीच पुंड्र लोक महाराष्ट्र ते पार तिरिवारुर पर्यंत पसरले होते. पुंड्रपूर (आजचे पंढरपुर) ही त्यांची येथील आद्य राजधानी होती. हेही शैवच होते हे आपण पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वर तथा पुंडरिक या शिवमंदिरावरून पाहू शकतो.
हा पुंड्र समाज मुलत: पशुपालक समाज होता. त्यांचीच महाराष्ट्रावर आद्य सत्ता होती. त्याचे लिखित पुरावे आज अप्रत्यक्ष असले तरी आजच्या माहाराष्ट्रीय दैवत-संकल्पनांवरून पुंड्रांचे आस्तित्व केवढे व्यापक होते याचे पुरावे ठाई ठाई विखुरलेले आढळतात. पुढे ईसपु २०० च्या आसपास त्यांचेच नातेसंबंधी औंड्र महाराष्ट्रात सत्ता स्थापू लागले आणि पौंड्र काहीसे मागे पडले. औंड्रही मुख्यता: पशुपालक होते. पण या काळात बौद्ध धर्माचा उत्कर्ष होत असतांना पुंड्रही बौद्ध धर्माच्या कक्षेत गेले. त्यांचाच पुरातन राजा विट्ठल या काळात बुद्ध रुपी मानला जावू लागला.
याचे विस्त्रुत विवेचन मी "विट्ठलाचा नवा शोध" या प्रबंधात केले असल्याने येथे जास्त खोलात न जाता एवढेच सांगतो कि आज धनगर-गवळी व महादेव कोळी या समाजाची पाळेमुळे या पुंड्र व औंड्र समाजात आहेत. पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वराची पुजा करण्याचा पहिला मान हा महादेव कोळ्यांना आहे तसेच महादेव कोळीही पशुपालक धनगर समाजाप्रमाणे खंडोबाचे अपरंपार भक्त आहेत.
महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात ते दक्षीण भारतात (कुरुब) धनगर समाज अवाढव्य आहे कारण हेच या प्रदेशाचे आध्य संस्थापक आणि राज्यकर्तेही होते. यात अहिरही आले. पण कालांतराने क्रुषी संस्क्रुती जशी सबळ होत गेली हे पशुपालक समाज दुय्यम झाले असले तरी कष्टाळुपणा आणि पुर्वज-व्यवसायाशी असलेल्या अनिवार आस्थेपोटी हा व्यवसाय बंद पडला नाही. खरे तर धनगर ही जात नसून एक जीवनपद्धती आहे आणि त्याचे प्रतिबिंब धनगरे दैवतांत दिसते. विट्ठल हा कुरूब-धनगरांचा देव हे मत डा. रा, चिं, ढेरे यांनी "श्रीविट्ठल एक महासमन्वय" या ग्रंथात व्यक्त केलेच आहे आणि माझेही त्याला अनुमोदन आहे. जेजुरीचा खंडोबा हाही धनगरांचेच मुळ दैवत आहे हे तर स्पष्टच आहे. विट्ठल आणि खंडोबा ही अवैदिक दैवते महाराष्ट्राचे कुलदैवते आहेत. यातच धनगरी (पुंड्र) सत्ता किती महनीय होती आणि त्यातुनच हा धर्म-महाराष्ट्र कसा घडला याचे दिग्दर्शन मिळते. परंतु इतिहासकारांनी हे श्रेय धनगर समाजाला नाकारले आहे (अपवाद वगळता) याचे वैशम्य वाटने स्वाभाविक आहे.
मराठा ही मुळात जात नसून महारास्ट्रातील सातवाहनोत्तर काळात अनेक सरंजामदारांतील वंशमिश्रणातून बनलेली जात आहे हे मी "मराठा कोण आहेत" या लेखात लिहिलेले आहेच. त्यामुळे त्याबद्दल येथे चर्चेत न जाता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.
पशुपालकाच्या जीवनात कुत्राचे स्थान फार महत्वाचे आहे. खंडोबा हा कुत्र्याशिवाय नसतो. वाघ्या-मुरळी ही त्याचीच लोकमानसात रुजलेली प्रतिके आहेत. कुत्रा हा नुसता संरक्षक मित्र नसून तो धनगर समाजाने दैवतासारखा मानला आहे. गुरू दत्त सुद्धा श्वानांखेरीज नाही. ही प्रतिके धनगरी आत्मश्रद्धेतून आलेली आहेत. जीवनव्यवस्थेतून आलेली आहेत. आणि त्याची परंपरा पुरातन आहे.
शौकासाठी धनगर (पुंड्र) कुत्रा पाळत नसून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो नुसता कुत्रा नसतो तर खंडोबाचा पाठीराखा असतो अशी श्रद्धा आहे. असंख्य लोक आजही कुत्रा पाळतात तो एकमेव जीवाभावाचा सखा आहे म्हणुन. माझ्या एका मित्राच्या कुत्र्याला क्यन्सरमुळे मारावे लागले तेंव्हा पोटचा मुलगा मेला असता तरी रडला नसता एवढा रडलेला मित्र मी पाहिला आहे.
मग धनगरांसाठी कुत्रा काय असतो याची कल्पना करता येते. अशा स्थितीत तुकोजी होळकरांनी देनगी देवून नुसती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लौकिक स्वरुपात आणली त्यांनीच महाराजांच्या स्म्रुतीशेष, दंतकथा बनलेल्या कुत्र्याची समाधीही पुनरुज्जीवित केली नसेल तरच नवल. येथे एक बाब लक्षात येते...या दुर्लक्षित शिव-समाधीच्या जीर्णोद्धारासाठी महाराजांचा एकही वंशज देणगी द्यायला समोर आला नाही. हे एक दुर्दैव आहे. आणि आता तुकोजींच्या देणगीतुन उभ्या वाघ्याचे स्मारक हटवा असे म्हटले जात आहे.
हा महाराष्ट्राच्या पुरातन सांस्क्रुतीक इतिहासाचा अवमान नाही काय? वाघ्याच्या स्मारकामुळे शिवरायांचा वा इतिहासाचा काय अवमान होतो? मी गोंधळुन गेलो आहे. हे काय चालले आहे आणि कोठे थांबणार हेच कळेनासे झाले आहे. इतिहास कोठे सुरू होतो आणि प्रांजळ जनमानसीय भावना कोठे सुरू होतात हे न कळताच फक्त भावना भडकावण्याचे कार्य जेंव्हा सुरू होते तेथेच विवेकाचा भीषण म्रुत्यू पहावा लागतो...आणि हे दुर्दैव अजून कितिवेळा येणार आहे हेच समजेनासे झाले आहे.
Saturday, May 21, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
जगाचे भविष्य आमच्याच हातात!
मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...