Saturday, May 21, 2011

पुंड्र-धनगर-वाघ्या आणि आम्ही...

महाराष्ट्राचा इतिहास अनेक जनसमुदायांनी घडवला आहे हे मी अनेक लेख-पुस्तकांतून माडला आहेच. येथे मी आज महाराष्ट्रातील आद्य वंशांबद्दल लिहिणार आहे आणि त्याचे वर्तमानाशी असलेले तादात्म्य दाखवत या आद्य वंशीयांशी कशी प्रतारणा होत आहे हे दाखवणार आहे.

पुंड्र आणि औंड्र (आणि मुतीब, शबर) हे महाराष्ट्राचे व दक्षीण भारताचे आद्य रहिवासी-राज्यकर्ते होते. या वंशांची माहिती आपल्याला सर्वप्रथम ऐतरेय ब्राह्मणा (इ.स. पु. ८००) मद्धे मिळते. हे मुळचे असूर वंशीय असून या समाजांचे मुळ पुरुष असूर बळीचे पुत्र होते असा निर्वाळा महाभारताने दिला आहे तर ऐतरेय ब्राह्मण या सरवच वंशांना शुद्र असे संबोधते. पुराणेही त्यांना शुद्रच संबोधतात.

औंड्र लोकांनी पश्चिम बंगाल, ऒडिसा आणि आंध्र (औंड्र चे आंध्र) प्रदेशात सत्ता स्तापत मुक्कम ठोकुन व्यापक शैव संस्क्रुती जोपासली. पुढे ते सातवाहनांच्या रुपात महाराष्ट्रातही आले. तो इतिहास आपल्याला माहितच आहे. पण तत्पुर्वीच पुंड्र लोक महाराष्ट्र ते पार तिरिवारुर पर्यंत पसरले होते. पुंड्रपूर (आजचे पंढरपुर) ही त्यांची येथील आद्य राजधानी होती. हेही शैवच होते हे आपण पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वर तथा पुंडरिक या शिवमंदिरावरून पाहू शकतो.

हा पुंड्र समाज मुलत: पशुपालक समाज होता. त्यांचीच महाराष्ट्रावर आद्य सत्ता होती. त्याचे लिखित पुरावे आज अप्रत्यक्ष असले तरी आजच्या माहाराष्ट्रीय दैवत-संकल्पनांवरून पुंड्रांचे आस्तित्व केवढे व्यापक होते याचे पुरावे ठाई ठाई विखुरलेले आढळतात. पुढे ईसपु २०० च्या आसपास त्यांचेच नातेसंबंधी औंड्र महाराष्ट्रात सत्ता स्थापू लागले आणि पौंड्र काहीसे मागे पडले. औंड्रही मुख्यता: पशुपालक होते. पण या काळात बौद्ध धर्माचा उत्कर्ष होत असतांना पुंड्रही बौद्ध धर्माच्या कक्षेत गेले. त्यांचाच पुरातन राजा विट्ठल या काळात बुद्ध रुपी मानला जावू लागला.

याचे विस्त्रुत विवेचन मी "विट्ठलाचा नवा शोध" या प्रबंधात केले असल्याने येथे जास्त खोलात न जाता एवढेच सांगतो कि आज धनगर-गवळी व महादेव कोळी या समाजाची पाळेमुळे या पुंड्र व औंड्र समाजात आहेत. पंढरपुरच्या पुंड्रिकेश्वराची पुजा करण्याचा पहिला मान हा महादेव कोळ्यांना आहे तसेच महादेव कोळीही पशुपालक धनगर समाजाप्रमाणे खंडोबाचे अपरंपार भक्त आहेत.

महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात ते दक्षीण भारतात (कुरुब) धनगर समाज अवाढव्य आहे कारण हेच या प्रदेशाचे आध्य संस्थापक आणि राज्यकर्तेही होते. यात अहिरही आले. पण कालांतराने क्रुषी संस्क्रुती जशी सबळ होत गेली हे पशुपालक समाज दुय्यम झाले असले तरी कष्टाळुपणा आणि पुर्वज-व्यवसायाशी असलेल्या अनिवार आस्थेपोटी हा व्यवसाय बंद पडला नाही. खरे तर धनगर ही जात नसून एक जीवनपद्धती आहे आणि त्याचे प्रतिबिंब धनगरे दैवतांत दिसते. विट्ठल हा कुरूब-धनगरांचा देव हे मत डा. रा, चिं, ढेरे यांनी "श्रीविट्ठल एक महासमन्वय" या ग्रंथात व्यक्त केलेच आहे आणि माझेही त्याला अनुमोदन आहे. जेजुरीचा खंडोबा हाही धनगरांचेच मुळ दैवत आहे हे तर स्पष्टच आहे. विट्ठल आणि खंडोबा ही अवैदिक दैवते महाराष्ट्राचे कुलदैवते आहेत. यातच धनगरी (पुंड्र) सत्ता किती महनीय होती आणि त्यातुनच हा धर्म-महाराष्ट्र कसा घडला याचे दिग्दर्शन मिळते. परंतु इतिहासकारांनी हे श्रेय धनगर समाजाला नाकारले आहे (अपवाद वगळता) याचे वैशम्य वाटने स्वाभाविक आहे.


मराठा ही मुळात जात नसून महारास्ट्रातील सातवाहनोत्तर काळात अनेक सरंजामदारांतील वंशमिश्रणातून बनलेली जात आहे हे मी "मराठा कोण आहेत" या लेखात लिहिलेले आहेच. त्यामुळे त्याबद्दल येथे चर्चेत न जाता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.

पशुपालकाच्या जीवनात कुत्राचे स्थान फार महत्वाचे आहे. खंडोबा हा कुत्र्याशिवाय नसतो. वाघ्या-मुरळी ही त्याचीच लोकमानसात रुजलेली प्रतिके आहेत. कुत्रा हा नुसता संरक्षक मित्र नसून तो धनगर समाजाने दैवतासारखा मानला आहे. गुरू दत्त सुद्धा श्वानांखेरीज नाही. ही प्रतिके धनगरी आत्मश्रद्धेतून आलेली आहेत. जीवनव्यवस्थेतून आलेली आहेत. आणि त्याची परंपरा पुरातन आहे.

शौकासाठी धनगर (पुंड्र) कुत्रा पाळत नसून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो नुसता कुत्रा नसतो तर खंडोबाचा पाठीराखा असतो अशी श्रद्धा आहे. असंख्य लोक आजही कुत्रा पाळतात तो एकमेव जीवाभावाचा सखा आहे म्हणुन. माझ्या एका मित्राच्या कुत्र्याला क्यन्सरमुळे मारावे लागले तेंव्हा पोटचा मुलगा मेला असता तरी रडला नसता एवढा रडलेला मित्र मी पाहिला आहे.

मग धनगरांसाठी कुत्रा काय असतो याची कल्पना करता येते. अशा स्थितीत तुकोजी होळकरांनी देनगी देवून नुसती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लौकिक स्वरुपात आणली त्यांनीच महाराजांच्या स्म्रुतीशेष, दंतकथा बनलेल्या कुत्र्याची समाधीही पुनरुज्जीवित केली नसेल तरच नवल. येथे एक बाब लक्षात येते...या दुर्लक्षित शिव-समाधीच्या जीर्णोद्धारासाठी महाराजांचा एकही वंशज देणगी द्यायला समोर आला नाही. हे एक दुर्दैव आहे. आणि आता तुकोजींच्या देणगीतुन उभ्या वाघ्याचे स्मारक हटवा असे म्हटले जात आहे.

हा महाराष्ट्राच्या पुरातन सांस्क्रुतीक इतिहासाचा अवमान नाही काय? वाघ्याच्या स्मारकामुळे शिवरायांचा वा इतिहासाचा काय अवमान होतो? मी गोंधळुन गेलो आहे. हे काय चालले आहे आणि कोठे थांबणार हेच कळेनासे झाले आहे. इतिहास कोठे सुरू होतो आणि प्रांजळ जनमानसीय भावना कोठे सुरू होतात हे न कळताच फक्त भावना भडकावण्याचे कार्य जेंव्हा सुरू होते तेथेच विवेकाचा भीषण म्रुत्यू पहावा लागतो...आणि हे दुर्दैव अजून कितिवेळा येणार आहे हेच समजेनासे झाले आहे.

15 comments:

  1. तुमची मते व विचार खासच चिंतनीय व लक्षणीय आहेत.

    ReplyDelete
  2. तुमचे संशोधन महत्वाचे आहे. माझे काही प्रश्न आहेत. १.वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर बसवला त्याची तारीख काय? २.संभाजी ब्रिगेड ही संघटना जुनी आहे, त्यांनी ही मागणी याआधी का केली नव्हती? ३.महाराजांच्या वंशजांनी आजवर हरकत का घेतली नव्हती? ४.त्यांनी जर तो पुतळा बसवलाच नसेल तर तो आत्ताच का खटकू लागलाय? ५.इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहीजे, परंतु इमानी कुत्रा नको, तर मग त्याला इतिहासकारांनी आजवर कधीच आक्शेप का घेतला नव्हता? याची उत्तरे ’ब्रिगेडचे इतिहासका’ मा.जयसिंगराव पवार सर देतील काय?

    ReplyDelete
  3. कुत्रा सुद्धा ह्या लोकांना स्वजातीय पाहिजे..
    नाहीतर तो उद्ध्वस्त करण्याचा त्यांना अधिकार आहे!

    ReplyDelete
  4. लेख अगदी सुरेख झालाय... मी वरिल लेखावर विश्लेषण करणार नाही पण एक मात्र जरूर सांगेन की, आज तुम्ही ब्लॉगकारीता काय असते हे उदाहरणासहीत पटवून दिले आहे ...

    ReplyDelete
  5. कुत्र्याचीही जात आता महत्वाची आहे.वाघ्याच्या पुतळ्याची डी.एन.ए.टेस्ट करून हा प्रश्न सोडविता येवू शकेल काय?

    ReplyDelete
  6. मला तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हनाव का तालिबानी म्हनाव हे समजेनासे झाले आहे कारन अफ्हनिस्तान व् महाराष्तामद्ये पुतले पाड्न्याची स्पर्धा लागलेली आहे आणि त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

    ReplyDelete
  7. कोणाचा अवमान होणे वा न होणे हा प्रश्न नाही. इतिहास हा अस्सल पुराव्यांवर आधारलेला असावा की दंतकथांवर हा प्रश्न आहे. आज वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबद्दल अस्सल पुरावे उपलब्ध नसताना केवळ दंतकथा म्हणून त्याला इतिहासाचा भाग मानायचे असेल तर ह्याच विचारसरणीचा आधार घेऊन काही मंडळी उद्या जेम्स लेन ची दंतकथा देखील खरी मानायला लागतील आणि त्याचा प्रचारही करू लागतील. तेव्हा इतिहास हा दंतकथांपेक्षा अस्सल पुराव्यांवर आधारलेला असावा. मग त्यात मराठ्यांचा, ब्राह्मणांचा किंवा आणखी कोणत्याही जाती धर्माचा अवमान होत असेल तरी त्याचे इतिहासाला सोयर-सुतक असू नये.

    ReplyDelete
  8. @ amit, जेम्स लेन व् वाघ्या कुत्र्याची तुलना होऊ शकत नाही कारन वाघ्या कुत्र्याच्या दंतकथा मुले कोणत्याही समाजाच्या भावना दुखावत नाही. आणि इतिहास बद्दल जरी तुम्ही बोलत असल तर भारताचा ९०% इतिहास हा दंतकथा वरच आधारित आहे लिखित स्वरूपात नाही त्यामुले प्रत्येक गोष्टीचा पुरावा मिलने फार अवघड आहे.

    ReplyDelete
  9. ऐकलेली माहीती अशी : विस्म्रूतीत गेलेली महाराजांची कबर महात्मा फुलेंनी शोधून काढली. तिची साफसफाई केली. त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवजयंतीही साजरी केली. या घटनेनंतर टिळकांनी खात्री करून घेऊन सार्वजनिक शिवजयंती सुरू केली. त्याच वेळी वाघ्याची दंतकथाही प्रसृत झाली. आत दोन्हीपैकी महाराजांची कबर कोणती हा वाद आहे. महात्मा फुलेंनी जी कबर शोधली ती म्हणजे फक्त चौथरा होता. तो उद्ध्वस्त झाला होता. तर धड असलेली समाधी शिवरायांची हे तिळकांचं म्हणणं. मग जीर्णोद्धार झालेली समाधी कुणाची आणि यावर कुत्रा आहे ही समाधी कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो. इथं दिलेले सातवाहनांचे संदर्भ तर्कशुद्ध विचारानंतर अप्रस्तुत वाटतात. कारण महाराजांनी कुत्रा पाळला होता असे उल्लेख नाहीत. तसे पोवाडेही नाहीत. ती दंतकथा नसून त्ञा समाधीवरच संदर्भ म्हणून राम गणेश गडकरींच्या नाटकातल्या कथेचा संदर्भ दिला आहे. मग धनगर किंवा इतर जातीच्या द्वेषाचा संबंध कुठे आला ?

    या उलट, दोन कबरी नेमक्या कुणाच्या हे उघड व्हावे असं का नाही वाटत तुम्हाला ? ज्या समाधीवर कुत्रा आहे ती कुणाची आहे समजल्यावर यावर बोलता येईल. पण कुत्रा काल्पनिक असल्यास ज्या कुणाची ही कबर आहे त्या व्यक्तीचा मरणोत्तर अपमान होतो असं संबंधितांच्या लक्षात आलं नसेल का ?

    ReplyDelete
  10. कोणती समाधी कोणाचे याचा शोध घेण्यापुरता हा प्रश्न असता तर विरोधाचे कारणच नाही. पण येथे समधीच हटवण्याचा कार्यक्रम आहे, त्याचे काय करायचे? कोणती समाधी कोणाची हे शोधण्यासाठी दोन्ही समाध्यांचे पहिले उत्खनन करावे लागेल...त्याला कोण तयार होईल का? शक्यच नाही. मुळात ह वाद अप्रस्तूत आहे.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. congratulations mr sonavani for a wonderful article and mr shendge's comments are very pertinent.

    ReplyDelete
  14. Sanjay Sonawaniji,vivekvadachya aadun tumhi kay karat aahat? Vad vadhavnare lekhan karanyapeksha tumchi pratibha satya shodhanyasathi vapara na!

    ReplyDelete
  15. http://satyashodhak.com/2011/05/29/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...