हिंदू धर्मासमोरील समस्या-५.
वर्णव्यवस्था-जातीव्यवस्था ही हिंदु धर्माचे अव्यवच्छेदक लक्षण आहे हे उघड आहे. जन्माधारीत वर्ण-जात ठरवणारी ही जगातील एकमेव धर्मव्यवस्था आहे. सर्वच समाजशास्त्रद्न्यांना आव्हान देणारी ही व्यवस्था कशी उदयाला आली, हजारो वर्ष कशी टिकली याचे गुढ उलगदण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला आहे परंतू समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. ही व्यवस्था अन्याय्य आहे म्हणुन तिचे समुळ उच्चाटन व्हायला हवे असे मत मांडनारे इतिहासात झाले नाहीत असे नाही पण असे म्हनणारेही जातीय चौकटीत एवढे घट्ट बसवले गेले कि जातीच्या बेड्या (?) तुटने अशक्यच झाले.
वर्णव्यवस्थेचे मुळ ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्तात आहे आणि त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.
पुरुषसुक्ताच्या सर्वच ऋचांचा खालील अनुवाद पहा.
ऋचा १) पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.
२. पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.
३. ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.
४. तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.
५. त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.
६. देवतांनी पुरुषाला यद्न्यात बळी दिले. त्यात (यद्न्यात) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.
७. पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.
८. या वैष्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातुन पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.
९. या वश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची निर्मिती झाली.
१०. त्यातुनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले.
११. देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?
१२. तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.
१३. चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासुन सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासुन तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले. १४. त्याच्या बेंबीपासुन हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून प्रुथ्वी, त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.
१५. देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधुन बळी दिला.
आता वरील सुक्त बारकाईने वाचले तर एक लक्षात येइल कि हे खरे तर विश्वनिर्मितीचे पुरातन मित्थक आहे. डा. बाबासाहेब आंबेडकरांनीही या सुक्ताचे अत्यंत विद्वत्तापुर्वक विश्लेषन केले असून त्यांनी म्हटले आहे कि खरे तर तत्कालीन विश्वात स्रुष्टीजन्माची अशी कथा मिळत नाही.(Who were shudra's?) ही अनेकार्थाने एकमेवद्वितीय अशी कथा आहे. ते म्हणतात...The Purusha Sukta is a theory of the origin of the Universe. In other words, it is a cosmogony. No nation which has reached an advanced degree of thought has failed to develop some sort of cosmogony. The Egyptians had a cosmogony somewhat analogous with that set out in the Purusha Sukta. According to it, it was god Khnumu, ' the shaper,' who shaped living things on the potter's wheel, "created all that is, he formed all that exists, he is the father of fathers, the mother of mothers... he fashioned men, he made the gods, he was the father from the beginning... he is the creator of the heaven, the earth, the underworld, the water, the mountains... he formed a male and a female of all birds, fishes, wild beasts, cattle and of all worms." A very similar cosmogony is found in Chapter I of the Genesis in the Old Testament.
पुरुषसुक्ताबद्दल बाबासाहेबांनी पुढे अत्यंत विस्ताराने लिहिले असून विश्वनिर्मितीच्या सिद्धांतात वर्णव्यवस्थेचा उगम दर्शवला जाणे आणि त्याला धर्ममान्यता देणे हे सुद्धा जागतीक मित्थकथांमद्धे न आढळनारे वैशिष्ट्य आहे असे स्पष्ट केले आहे. बाबासाहेबांनी या सर्व सुक्तात जो महत्वाचा आक्षेप (कोडे) नोंदवले आहेत ते सुक्तातील ११ आणि १२ क्रमांकाच्या ऋचांबद्दल. बाबासाहेब पुढे म्हणतात "But it is quite different with regard to verses 11 and 12. Primafacie these verses do no more than explain how the four classes, namely. (1) Brahmins or priests, (2) Kshatriyas or soldiers, (3) Vaishyas or traders, and (4) Shudras or menials, arose from the body of the Creator. But the fact is that these verses are not understood as being merely explanatory of a cosmic phenomenon. It would be a grave mistake to suppose that they were regarded by the Indo-Aryans as an innocent piece of a poet's idle imagination. They are treated as containing a mandatory injunction from the Creator to the effect that Society must be constituted on the basis of four classes mentioned in the Sukta.Such a construction of the verses in question may not be warranted by their language."
हे विवेचन लक्षात घेवुन मला या सुक्ताबाबत ठळक मुद्दे स्पष्ट करायचे आहेत आणि या सुक्तातील विसंगती टिपायची आहे ती अशी:
१. पुरुषाला हजार मस्तके, हजार नेत्रे आणि हजार पाय आहेत असे हे सुक्त म्हनते.
२. ऋचा क्र. १४ मद्धे हेच सुक्त पुरुषाच्या पावलापासुन प्रुथ्वीची निर्मिती झाली असे म्हणते.
३. ११ व १२ ऋचा मात्र पुरुषाच्या मस्तकापासुन ब्राह्मण, बाहुंपासुन राजन्य (क्षत्त्रिय नव्हे) मांड्यांपासुन वैश्य तर पायांपासुन शुद्र निर्माण झाले असे म्हणतात.
हाच सिद्धांत (ऋचा ११ व १२) पुढे नेत ऐतरेय ब्राह्मण व शेवटी मनुस्म्रुतीने वर्णव्यवस्थेवर सैधांतिक/धार्मिक शिक्कामोर्तब केले असल्याने यावर चर्चा आवश्यक आहे. यासाठी प्रथम खुद्द ऋग्वेदात हे सुक्त कसे आले हे पहाणे गरजेचे आहे.
पुरुषसुक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येते. हा भाग वैदिक धर्माच्या अपकर्शकाळी रचला गेला आहे. त्यावेळी सुदासाचा (ऋग्वेद निर्मिती ज्या वंशाच्या कालखंडात झाली) वंश संपलेला होता. इतका कि ज्यांचा द्वेष वैदिक ऋषिकुळे करत त्या पणींकडुनही देणग्या मिळवाव्या लागत होत्या. (पहा आप्रीसुक्ते...दानस्तुती)
दुसरे असे कि ऋग्वेद अविक्रुत नाही. कालौघात त्याच्यातील काही भाग वगळला गेला आहे तर काही भागाची भर पडलेली आहे. उदाहरणार्थ ईसपु सहाव्या शतकात होवुन गेलेल्या झरठ्रुष्टाचे नाव ऋग्वेदात येते. आणि विद्वानांच्या मते कसल्याही स्थीतित ऋग्वेदनिर्मितीचा काळ ईसपु १५०० च्या अलीकडे आणता येत नाही. मग ऋग्वेद अविक्रुत असेल तर त्यात झरठ्रुष्ट कसा डोकावू शकतो? दुसरे असे कि वेदव्यासांनी मुळच्या विस्म्रुत होत चाललेल्या वेदाला पुन्हा संकलीत करून त्याचे चार भागात विभाजन केले ही दंतकथाही या संदर्भात विचारात घ्यावी लागेल. मुळचे वेदार्थ नष्ट होत चालल्यानेच ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली हे ऐतिहासिक वास्तवही लक्षात घ्यावे लागेल.
आता पुरुषसुक्त एकुणात पाहिले तर लक्षात येते कि ते विसंगत असून ऋचा ११ व १२ यांचे मुलार्थात काहीएक स्थानच नाही. पुरुष हे प्रतीक मानुन त्याच्या बळीतुन विश्वाची निर्मिती कशी झाली हे दर्शवण्याचा हा पुरातन प्रयत्न आहे आणि तो स्प्रुहणीय आहे. या सुक्तात मुळात मनुष्यप्राण्याची निर्मिती कशी झाली याबद्दल मात्र एकही अवाक्षर नाही ही तर खुप मोठी विसंगती आहे. अन्य प्राणी, पक्षी, आकाश, प्रुथ्वी ई. ची निर्मिती कशी झाली हे या सुक्तात आहे पण मनुष्याची निर्मिती कशी झाली याबाबत या सुक्तात मौन आहे हे एक कोडेच आहे असे बाबासाहेब म्हणतात ते योग्यच आहे. कोणत्याही विश्वनिर्मितीच्या मित्थकात मनुष्यच कसा जन्माला आला याचा सिद्धांत नसणे हे असंभाव्य आहे.
अशा स्थीतित सरळ ११ व १२ ऋचा मात्र सरळ वर्णव्यवस्थेबाबतच बोलतात ही तर सर्वात मोठी विसंगती आहे हे उघड आहे. मुळात सर्व ऋग्वेद अभ्यासला तर वर्णव्यवस्थेबाबत ऋग्वेद कोठेही भाष्य करतांना दिसत नाही. किंबहुना वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा ऋग्वेदाच्या प्राचीन भागांत दिसत नाही. कोठेही शुद्र हा शब्दही येत नाही. तो येतो तो फक्त या पुरुषसुक्तात हे नवलच नाही काय?
बरे विश्वनिर्मितीचा हा एकच सिद्धांत ऋग्वेदात नाही. दहाव्या मंडलात तो पुन्हा एकदा येतो पण त्यात पुरेपुर वेगळे मित्थक मांडलेले आहे. (दक्ष प्रजापतीचे). एवढेच नव्हे तर दीर्घतमा ऋषिचेही एक विलक्षण सुक्त आहे त्यात स्रुष्टीजन्माविषयीचे अनिवार कुतुहल अभिव्यक्त झाले आहे.
एकाच वेदात विभिन्न विश्वनिर्मितीच्या कथा/मित्थके येणे आस्चर्यकारक नाही. आश्चर्य आहे ते या तर्कविसंगत २ ऋचा ऋग्वेदातील या पुरुषसुक्तात आल्या कशा?
या आश्चर्यामागील कारणे अशी...
१. मुळात जन्माधारीत वर्णव्यवस्था ऋग्वेदाला मान्य नाही हे जवळपास १०,००० ऋचांमधुन स्पष्ट होते. म्हणजे मंत्र रचतो तो त्याक्षणी ब्राह्मण आहे, शेती करतो त्यावेळीस तो विश आहे तर तोच युद्धात भाग घेतो तेंव्हा क्षत्र आहे.
२. ऋचा रचनारे अनेक व्यवसाय करनारे आहेत. त्यात रथकार आहेत, लोहकर्मी आहेत तसेच शेतकरीही आहेत.
३. ऐतरेय ब्राह्मणाचा रचनाकार हा इतरा नामक दासीचा पुत्र आहे, म्हणजे तदार्थाने शुद्र आहे. पण त्याचे ब्राह्मण आजही पुज्य आहे.
४. भ्रुगु हे असूर वंशीय असुनही त्यांनीही ऋग्वेदातील मोठा भाग लिहिला/रचलेला आहे.
असे असता जी व्यवस्था ज्या काळात मुळात जन्मालाच आलेली नाही तीचा उगम, तोही विसंगत रीतिने एका सुक्तात व्हावा असे दिसावे यात काहीतरी गफलत आहे हे उघड आहे.
आणि ती गफलत म्हणजे या विश्वनिर्मितिविषयकच्या सुक्तात ती नंतर कोणीतरी घुसवली आहे. मुळ सुक्ताला विक्रुत केले गेले आहे. मुळात मनुष्य कसा निर्माण झाला हे सांगणारी ऋचा वगळुन वर्णव्यवस्थेला वेदमान्यता आहे, पावित्र्य आहे हे दाखवण्याचा हा खोटा प्रयत्न जाणीवपुर्वक केला गेला आहे.
हे कधीतरी उत्तरकाळात...म्हणजे मनुस्म्रुतीच्या काही काळ आधी कोणीतरी केले आहे. मुळ ऋग्वेदातील पुरुषसुक्ताचा या ११ व १२ क्रमांकाच्या ऋचांशी संबध असू शकत नाही हे वरील विवेचनावरुन लक्षात आले असेलच.
पण याच २ ऋचांमुळे (आज ब्राह्मणांना नेमक्या याच दोन ऋचा पाठ असतात. आधीच्या आणि नंतरच्या त्यांनाही माहित नसतात.) वर्णव्यवस्थेला ऋग्वेदाचीच मान्यता आहे असा समज आहे आणि तो समूळ चुकिचा आहे हे मला येथे स्पष्ट करायचे आहे. या दोन्ही ऋचा कोणीतरी अनाम ग्रुहस्थाने ऋग्वेदात घुसवल्या आहेत हे स्पष्ट व्हावे एवढ्या त्या मुळ पुरुषसुक्तात विसंगत आहेत. अन्यथा पुढील ऋचांतच पुरुषाच्या पायापासुन प्रुथ्वी निर्माण झाली असे विसंगत विधान आले नसते. जर पायापासुन प्रुथ्वी आली तर शुद्र कोठुन आले? आणि शुद्र आले तर प्रुथ्वी कोठुन आली? एवतेव या दोन्ही ऋचांना प्रक्षिप्त मानणे भाग आहे. परंतु याच दोन ऋचांनी वर्णव्यवस्थेला एक sanctity दिली हेही विसरता येत नाही. म्हणुन ती दुरुस्त करुन घ्यावी लागणार आहे.
पण प्रश्न येथेच संपत नाहीत. ऋग्वदिक मान्यता घेण्यासाठी खोटेपणा करणे हा एक भाग झाला. पण तो समाजाने मानला काय याबाबत मी मागील प्रकरणात विवेचन केलेच आहे. मुळात याची (जन्माधारीत वर्णव्यवस्थेची) गरज का भासली? पुढे चार वर्ण जावून अवर्ण कोठुन आले? त्याही पुढे मग कलियुगात क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण आस्तित्वात नसुन फक्त ब्राह्मण आणि शुद्र हेच दोन वर्ण असतेल या टोकाला भारतीय धर्मशास्त्र का गेले यावरही आपल्याला क्रमाक्रमाने विचार करायचा आहे. आपल्या मौलिक विचार-सुचनांचे स्वागत आहे.
Wednesday, June 15, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
Linguistic Theories
The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...