त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही....
सडे सांडले रक्ताचे...कोणाचे हो कोणाचे?
जगणे केले निंध्य....कोणाचे हो कोणाचे?
स्पर्शावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
जगण्यावरतीही बंधन...कोणाच्या हो कोणाच्या?
उष्ट्यावरती जेही जगले...होते कोण ते होते कोण?
हाणा रट्टे...उडवा मस्तके...म्हणनारे ते होते कोण?
पोटासाठी पोरी विकल्या...विकणारे ते होते कोण?
अबलांची ती अब्रु लुटली...लुटणारे ते होते कोण?
मंदिरांतही प्रवेश नाही...बजावणारे होते कोण?
अतिशुद्रांची नावे अभद्र असावी...सांगणारे होते कोण?
ही गतजन्माची पापसजा...हे रटनारे होते कोण?
सत्तेच्या पालख्या केल्या पुण्यवत...हे करणारे होते कोण?
ज्या सत्तांनी समाज लुटला...नागवणारे होते कोण?
जगण्या साधन येता हाती...लुबाडणारे हे आहेत कोण?
यांना काही समजत नाही...
यांना काही उमजत नाही...
सांगुन सांगुन थकले जेही
थकणा-यांना विचारी कोण?
मदमत्त पिपासा अन्यायाची
सत्ता सत्ता कित्ता गिरवण्याची
रडती त्यांना रडविण्याची
आपुल्या टे-या बडवत बडवत...
गाथा कालच्या वदणा-यांची
शोषण आणि अधिक शोषण
हीच भाषा या तद्वद्न्यांची
बोला हे जन आहेत कोण?
वेळ बदलला काळ बदलला
उगा कशा इतिहास उगळीता?
पणजोबाने जर खुन केला
शिक्षा नातवा देतो कोण?
ज्यांना द्यावी खरीच शिक्षा
असे पडद्याआडे लपले कोण?
आम्हीही बहुजन...बहुजन आम्ही
असले नारे देती कोण?
धर्माचे फळ खावून झाले
सत्तेचे बळ घेवून झाले
तरी मदांध ते असती कोण?
त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
दिसत नाही पाठीवरचे वळ
चल उठ गड्या, जरा हिम्मत धर...!
सत्तेचे चालक...मालक...शासक
होतात जेंव्हा तेही याचक
ज्यांना लुटले अविरत काळ
त्यांच्यासाठी बनती काळ
एक शिवबाचा जपत मंत्र ते
पापांना पाठी घालत काय?
अरे डोळे उघडा...उघडा कवाडे
नवनिर्मितीची पहाल स्वप्ने
तलवारींचा मंत्र पुरा तो
माज नि गुर्म्या उतरवील तो
हे तोडु ते फोडु सोडा
उभारण्या तो येई कोण?
पण त्यांना काही समजत नाही
त्यांना काही उमजत नाही
रक्ताची भाषा सुटत नाही
पण मज एकच कळते...गड्या धीर धर...गड्या धीर धर!
Friday, July 8, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
जगाचे भविष्य आमच्याच हातात!
मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...