भारतीय संस्क्रुतीत सहा दर्शने अत्यंत महत्वाची मानली जातात, त्यापैकी एक म्हणजे सांख्य दर्शन. या तत्वद्न्यानाचा प्रवर्तक म्हनजे कपिल मुनी. हा असुर प्रल्हादाचा पुत्र. भग्वद्गीतेत श्रीक्रुष्णाने "मुनीनां कपिलास्मि" म्हणुन त्याचे अभिवादन केले आहे. कपिलाने प्रवर्तीत केलेले सांख्य दर्शन पुढे त्याचा मुख्य शिष्य आसुरी याने प्रचारीत केले. या तत्वद्न्यानालाच सांख्ययोग असेही म्हनतात.
या तत्वद्न्यानाला सांख्य म्हटले जाण्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे सांख्यांनी विश्वनिर्मिती व जीवनासाठी २५ विभिन्न तत्वांची कल्पना केली आहे. दुसरे व्युत्पत्ती अशी कि विवेकद्न्यान हेच या तत्वद्न्यानात महत्वाचे मानले गेले असल्याने त्यास सांख्य म्हतले जाते. हे दर्शन भगवद्गीतेच्या निर्मितीपुर्वी किमान १००० वर्ष आधी आस्तित्वात आले.
या तत्वद्न्यानाची महत्ता म्हणजे ईश्वरी सार्वभौम सत्ता यात ठोकरून लावण्यात आली असून तत्वेच विश्वाच्या निर्मितीचे कारण मानन्यात आले आहे. प्रक्रुती व पुरुष हीच आद्य दोन मुलतत्वे आहेत व प्रक्रुती ही जड असून पुरुष हा चेतन आहे असे मानण्यात आले आहे. यात पुरुष म्हणजे धनात्मक उर्जा तर प्रक्रुती म्हनजे ऋणात्मक उर्जा असे महत्वाचे वैद्न्यानिक ग्रुहितक धरण्यात आले आहे.
हे तत्वद्न्यान संक्षिप्तपणे असे आहे....
१. जर जगातील सर्वच पदार्थ सीमित (Limited) आणि परतंत्र (dependent) असतील तर त्याचे मुलकारण मात्र असीमित (unlimited) व स्वतंत्र (independent) असले पाहिजे. आजही विश्व सीमित असले तरी उर्जा मात्र असीमित आहे या निष्कर्षाशी भौतिकविद पोहोचले आहेत.
२. प्रत्येक पदार्थात सत्व, रज, तम हे गुण द्रुष्टीस येतात. आणि प्रत्येक पदार्थ हा सुख, दु:ख वा मोह उत्पन्न करणारा आहे. याचाच अर्थ ही सर्व वैशिष्ट्ये एकाकार असनारे मुलकारण कोठेतरी असले पाहिजे.
३. प्रत्येक कार्य हे कारणात अव्यक्तपणे दडलेले असते. हे जग म्हनजे अन्य काही एक नसून असंख्य कार्यांचा एक समूह आहे. या कार्यांत जे कारण अव्यक्त रुपाने असते ते म्हणजेच प्रक्रुती होय.
४. कोणतेही कार्य कोणत्यातरी कारणातुन निर्माण होते आणि शेवटी कार्य हे कारणातच विलीन होते. प्रक्रुती हीच सर्व कार्यांचे कारण आहे. विश्वाची निर्मिती या प्रक्रुतीमुळेच होते. प्रक्रुती (कारण) ही अद्रुष्य पातळीवर वावरत असून विश्व (कार्य) मात्र द्रुष्य असते. या दोहोंच्या संयोगाने विश्व निर्माण होते व जेंव्हा कार्य हे कारणाच्या दिशेने उलट वाटचाल सुरु करते तेंव्हा विश्व लय पावते.
एकच घटना दु:ख, आनंद वा उदासीनता निर्माण करू शकते आणि ते त्या घटनेत सहभागी असणा-यांच्या स्वाभाविक अपेक्षांवर अवलंबून असते असेही हे दर्शन सांगते आणि ते महत्वाचे आहेच. जे गुणधर्म कार्यात असतात तेच कारणातही असल्याने मुलतत्वात शेवटी एकाकारता सिद्ध होते. या सत्व-रज-तम यांतील साम्यावस्था म्हणजे प्रक्रुती होय असेही हे दर्शन सांगते. तसेच द्न्यानाची उत्पत्ती ही एकटी स्वतंत्रपणे होत नसून ती आत्मा (चैतन्य) आणि बुद्धी यांच्या सहायातेनेच होते. पुरुषाला बुद्धी, मन, इंद्रिये आणि चैतन्य याच्या समागमाने द्न्यान होते.
सर्वात महत्वाचे म्हनजे सांख्य तत्वद्न्यान हे भावनीक नाही. ते श्रद्धेवर अवलंबुन नसून निखळ बौद्धिक तर्कशास्त्रे व वास्तव अनुभव यावर आधारीत आहे. येथे कर्ता-करवित्या परमेश्वर या संद्न्येला महत्व नसून मानवी प्रद्न्या आणि तर्काच्या बुद्धीनिष्ट पातळीवर जीवनाचे, स्रुष्टीचे अवगाहन महत्वाचे मानले गेले आहे.
पुढे ही तर्कनिष्ठ परंपरा मागे पडली आणि सांख्य दर्शनही. भारत देश हा श्रद्धाळु अंधविश्वासू समुदाय बनला आणि विद्न्यानाची झेप थांबली ती थांबलीच. ईहवाद मागे पडला आणि काल्पनिक परलोकवादाच्या मागे सारे लोक लागले. या देशाची प्रागतीक गती खुंटली ती खुंटलीच. आजही कपिलाचे हे तत्वद्न्यान पुढे नेले गेले पाहिजे...फक्त तात्विक पातळीवर नव्हे तर आचरणात. आज विद्न्यानात मानले जाणारे महत्वाचे सिद्धांत बीजरुपात का होईना , सांख्य दर्शनात आढलतात याबद्दल आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे आणि त्या बुद्धीनिष्ठ तत्वद्न्यानाची आपण कास सोडली याबद्दल शरमही!
Sunday, July 24, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
जगाचे भविष्य आमच्याच हातात!
मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...