Sunday, July 24, 2011

मी अटक झालो त्याची कथा...!

खरे तर मी हे स्पष्टीकरण देणार नव्हतो. पण काही मित्रांनी आग्रह केलाच आहे म्हणुन हे अल्प स्पष्टीकरण देत आहे. सविस्तर येत्या किर्लोस्करच्या दिवाळी अंकात वाचावे. कारण मुळात हा प्रश्न अत्यंत गहन असून सत्ताधारी हे प्रशासनाला कसे नाचवतात याचे उत्तम उदाहरण आहे.

वाशिंग्टन सोफ्टवेअर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असुन ती मुम्बई स्टोक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. या कंपनीचा टर्नओव्हर हा किमान ९ कोटी ते ३२ कोटींच्या दर्म्यान गेली १६ वर्ष राहीला आहे. या कंपनीचा मी संस्थापक अध्यक्ष आजही असून या कंपनीची स्वताची IPR असनारी उत्पादने जगभर विकली जातात. याची सत्यता पडताळण्यासाठी मुंबई स्टोक एक्स्चन्ज च्या अधिक्रुत वेबसाईटवर जावे.

या कंपनीचे देशभर ३२ तर विदेशात ८ वितरक होते. बव्हंशी आजही आहेत. माय होम व माय बिझिनेस या घरगुती उपयोगाच्या व लघुअव्यावसायिकांच्या उपयोगाच्या प्रणाल्या आम्ही १९९९ सालापर्यंत विकसीत केल्या. त्याचे वितरण अधिकाधिक व्हावे यासाठी वितरक नेमण्याच्या फ़ेब. २००२ मधे जाहिराती दिल्या. त्या इच्छुकांत इस्लामपुर येथील संजय पाटील व अमोल गुरव होते. त्यांनी अर्ज दिला परंतु या भागात सोफ्टवेअर विकण्यासाठी किमान संगणक तर हवेत ना असा मी प्रश्न उपस्थित केला असता माझ्या सेल्स टीमने सांगीतले कि त्यांचा परफोर्मन्स बघु मग डीलरशीप द्यायची कि नाही हे ठरवू. त्यांनी कार्यालयातुन सी.डी. रोख पैसे देवुन (२५% कमिशन वजा जाता.) घेवुन जायच्या आणि विकायच्या असा क्रम जवळपास मे २००२ पर्यंत सुरू होता. आश्चर्य म्हणजे त्यांनी केवळ २ महिन्याच्या कालावधीत ३५ च्या आसपास उत्पादने विकली. यानंतर त्यांनी विजय पाटील हे राजकीय प्रस्थ मधे आणुन माझ्या सेल्स टीमला प्रस्ताव दिला कि कर्नाटक, गोवा हे प्रांत आम्हाला द्या. आम्ही याहीपेक्षा मोठा सेल घडवून आणु. पण त्यासाठी आम्हा तीघांना तीन कार द्या. जेंव्हा आम्ही आमचे ५००० उत्पादने विकण्याचे टार्गेट पुर्ण करू तेंव्हा त्या कार आमच्या नावावर ट्रान्स्फेर करा. २५% कमिशन तर मिळायलाच हवे. हा प्रस्ताव माझ्या टीमला आवडने स्वाभाविक होते. मी त्यात तीन महिन्याची कालमर्यादा निस्चित करून करारनामा करुन घेण्यास सांगीतले. तसे स्ट्यम्पपेपरवर तीन प्रत्येकाशी विभागुन (५०००/३) करार करण्यात आले. विजय पाटील यांना टाटा इंडिका, संजय पाटील यांना मारुती ८०० व अमोल गुरव यांना मारुती ओम्नी दिली गेली. या गाड्या त्यांच्या नावावर नव्हे तर कंपनीचे संचालक अभय शास्त्री यांच्या नावावर घेतल्या गेल्या होत्या. जर त्यांनी टार्गेट मुदतीत पुर्ण केले तरच त्यांच्या नावावर केल्या जानार होत्या.

हा पहिला अध्याय झाला. याच काळात पी.टी.सी. या अमेरिकन कंपनीशी आमचा भागीदारीचा करार झाला. पाटील कंपुशी झालेला करार एवढा महत्वाचा नव्हताच. जुन २००२ मद्धे त्यांच्यासोबतच्या कराराची मुदत संपली. करार केल्यापासुन व गाड्या नेल्यापासुन या मंडळीने १ रुपयाचाही नवीन सेल केला नाही. फोनचे नंबर बदलले. संपर्क थांबवला. विजय पाटील तेवढे सतर्क होते. ते संजय पाटील व अमोल गुरवला शिव्या घालत होते कि तुम्ही काम का करत नाही. मी केवळ विजय पाटीलांवर विश्वास ठेवला. पण महिने उलटले...गाड्या परत नाहीत...हे पैसे भागधारकांचे...माझ्या बापाचे नव्हेत. मी जून २००२ ला कायदेशिर नोटिस सर्वांना पाठवली. असा अनुभय अन्य ३२ वितरकांनी मला दिला नव्हता. या नोटीशीचे उत्तर आले नाही. मग मी माझ्या श्री. पगडे या अधिका-याला कायदेशिर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला व त्यानुसार कोथरुड पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांच्या सुचनांनाही ही मंडळी जेंव्हा जुमानेना झाली तेंव्हा श्री विट्ठल शिंदे नामक पोलिस अधिकारी आपल्या ताफ्यासह इस्लामपुर येथे पोहोचले. ही रात्र १ फेब्रुवारी २००३ ची होती.

मध्यरात्री पुणे पोलिसांनी अमोल गुरव व संजय पाटील यांना अटक केली. त्यांच्या त्ताब्यातील कंपनीच्या दोन गाड्या जप्त केल्या. विजय पाटील त्यांना सापडले नाही. पोलिस जेंव्हा दुस-या
पोलिस क्षेत्रात एखाद्याला अटक करतात व आपल्या क्षेत्रात घेऊन जातात तेंव्हा पोलिस स्टेशन डायरीला नोंद अनिवार्य असते...तशी त्या दोघांची झाली.

आता गम्मत पहा...

अजामीनपात्र गुन्ह्यात अटक केली तर त्या आरोपीला सोडायचे, रिमांड द्यायचा हे सर्वस्वी न्यायालयाच्या हाती असते. पोलिस काय राष्ट्रपतींनाही त्यात हस्तक्षेप करता येत नाही.

पण....

विजय पाटील...जे अटक झाले नाही...त्यांनी जयंत पाटील यांचा उपयोग केला. तेंव्हा जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते. जयंत पाटील हे विजय पाटील यांचे काका...(हे मला तेंव्हा माहित नव्हते...) पुण्याचे पोलिस कमिशनर तेंव्हा होते श्री. Anamy Roy. श्री रोय यांनी इस्लामपुरात अटक झालेले दोन आरोपी कर्हाडपर्यंत पोहोचतात तोवर इन्स्पेक्टर शिंदे यांना एस्कोर्ट फ़ोर्स पाठवून वाटेत अडवायला लावले व त्या दोन्ही आरोपींना तेथेच सोडुन द्यायला सांगितले. ई. शिन्दे (त्यांनीच मला नंतर ही हकीकत सांगितली म्हणुन...) त्यांना सोडायला तयार नव्हते. यात त्यांचीच नोकरी धोक्यात येईल हे त्यांना कळत होते. पण अनामी रोय यांनी खात्याशी, कायद्याशी गद्दारी केली आणि विट्ठल शिन्दे यांना त्या आरोपींना सोडायला भाग पाडले. यामागे जयंत पाटील यांचा अलिखित आदेश होता हे उघड आहे. इस्लामपुरची १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी २००३ ची पोलिस डायरी कोणीही माहिती अधिकाराच्या कक्षेत मागवावी...सत्य समोर आहे.

हे येथे थांबले नाही. विट्ठल शिंदेंवर डिपार्टमेंटल मेमो निघाला. तेथील (कोथरुड पोलिस स्टेशन) मधील मुख्य ईन्स्पेक्क्टर पाटील यांची बदली केली.

नंतर २९ मार्च २००३ च्या मध्यरात्री गायकवाड नावाच्या सब-इंस्पेक्टरने भली मोठी ग्यांग घेवून मला घरात अटक केली. माझ्यावरचे आरोप सांगितले नाही वा मला इस्लामपुरच्या न्यायालयासमोर उभे न करता कस्टडी घेतली. मी व माझ्याबरोबर पुरेपुर निर्दोष असलेल्या मुकुंद मुळेलाही त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर इस्लामपुरात माझी व मुळेची धिंड या गायकवाड नामक इंस्पेक्तरने काढली. त्याचे फोटो तत्कालीन पुढारी, तरुण भारत या व्रुत्तपत्रांत आहेतच.

मी अनामी रोय, जयंत पाटील यांना जास्त दोषी मानतो. तुम्हाला आस्चर्य वाटेल...खुद्द विजय पाटील, ज्यांनी माझ्याविरुद्ध सुडापोटी गुन्हा दखल केला तेच विजय पाटील हे मी निमंत्रण देता जेंव्हा माझ्या चित्रपटाचा सांगलीत मुहुर्त होता त्याचे प्रमुख दीपप्रज्वलक होते. त्यांनी तोवर संजय पाटील आणि अमोल गुरवला कधीच बाहेरची वाट दाखवली होती.

कायदा म्हनजे नेमके काय असते रे भाऊ असा प्रश्न ज्यांना प्रश्न पदला असेल त्यांच्यासाठी सांगतो...

अमोल, संजय वा विजय....जे काही चुकले ते चुकले...

पण कायद्याच्या चौकटीत हस्तक्षेप करुन, आणि असंख्य अन्याय सहन करतात ते गप्पच बसतील या भ्रमात राहुन, आजही माझे वा सत्यान्विषेकाचे तोंड बंद करु पाहतील, त्यांना आपले नवे भविष्य शोधावे लागेल.

अनामी रोय आणि जयंत पाटील हे खरे आरोपी आहेत....
यांचे लांगे-बांधे आज ना उद्या काळच शोधेल....!

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...