Sunday, July 24, 2011

मी अटक झालो त्याची कथा...!

खरे तर मी हे स्पष्टीकरण देणार नव्हतो. पण काही मित्रांनी आग्रह केलाच आहे म्हणुन हे अल्प स्पष्टीकरण देत आहे. सविस्तर येत्या किर्लोस्करच्या दिवाळी अंकात वाचावे. कारण मुळात हा प्रश्न अत्यंत गहन असून सत्ताधारी हे प्रशासनाला कसे नाचवतात याचे उत्तम उदाहरण आहे.

वाशिंग्टन सोफ्टवेअर ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असुन ती मुम्बई स्टोक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. या कंपनीचा टर्नओव्हर हा किमान ९ कोटी ते ३२ कोटींच्या दर्म्यान गेली १६ वर्ष राहीला आहे. या कंपनीचा मी संस्थापक अध्यक्ष आजही असून या कंपनीची स्वताची IPR असनारी उत्पादने जगभर विकली जातात. याची सत्यता पडताळण्यासाठी मुंबई स्टोक एक्स्चन्ज च्या अधिक्रुत वेबसाईटवर जावे.

या कंपनीचे देशभर ३२ तर विदेशात ८ वितरक होते. बव्हंशी आजही आहेत. माय होम व माय बिझिनेस या घरगुती उपयोगाच्या व लघुअव्यावसायिकांच्या उपयोगाच्या प्रणाल्या आम्ही १९९९ सालापर्यंत विकसीत केल्या. त्याचे वितरण अधिकाधिक व्हावे यासाठी वितरक नेमण्याच्या फ़ेब. २००२ मधे जाहिराती दिल्या. त्या इच्छुकांत इस्लामपुर येथील संजय पाटील व अमोल गुरव होते. त्यांनी अर्ज दिला परंतु या भागात सोफ्टवेअर विकण्यासाठी किमान संगणक तर हवेत ना असा मी प्रश्न उपस्थित केला असता माझ्या सेल्स टीमने सांगीतले कि त्यांचा परफोर्मन्स बघु मग डीलरशीप द्यायची कि नाही हे ठरवू. त्यांनी कार्यालयातुन सी.डी. रोख पैसे देवुन (२५% कमिशन वजा जाता.) घेवुन जायच्या आणि विकायच्या असा क्रम जवलपास मे २००२ पर्यंत सुरू होता. आश्चर्य म्हणजे त्यांनी केवळ २ महिन्याच्या कालावधीत ३५० च्या आसपास उत्पादने विकली आणि उत्क्रुष्ठ विक्रेता हे पारितोषिक मिळवले. यानंतर त्यांनी विजय पाटील हे राजकीय प्रस्थ मधे आणुन माझ्या सेल्स टीमला प्रस्ताव दिला कि कर्नाटक, गोवा हे प्रांत आम्हाला द्या. आम्ही याहीपेक्षा मोठा सेल घडवून आणु. पण त्यासाठी आम्हा तीघांना तीन कार द्या. जेंव्हा आम्ही आमचे ५००० उत्पादने विकण्याचे टार्गेट पुर्ण करू तेंव्हा त्या कार आमच्या नावावर ट्रान्स्फेर करा. २५% कमिशन तर मिळायलाच हवे. हा प्रस्ताव माझ्या टीमला आवडने स्वाभाविक होते. मी त्यात तीन महिन्याची कालमर्यादा निस्चित करून करारनामा करुन घेण्यास सांगीतले. तसे स्ट्यम्पपेपरवर तीन प्रत्येकाशी विभागुन (५०००/३) करार करण्यात आले. विजय पाटील यांना टाटा इंडिका, संजय पाटील यांना मारुती ८०० व अमोल गुरव यांना मारुती ओम्नी दिली गेली. या गाड्या त्यांच्या नावावर नव्हे तर कंपनीचे संचालक अभय शास्त्री यांच्या नावावर घेतल्या गेल्या होत्या. जर त्यांनी टार्गेट मुदतीत पुर्ण केले तरच त्यांच्या नावावर केल्या जानार होत्या.

हा पहिला अध्याय झाला. याच काळात पी.टी.सी. या अमेरिकन कंपनीशी आमचा भागीदारीचा करार झाला. पाटील कंपुशी झालेला करार एवढा महत्वाचा नव्हताच. जुन २००२ मद्धे त्यांच्यासोबतच्या कराराची मुदत संपली. करार केल्यापासुन व गाड्या नेल्यापासुन या मंडळीने १ रुपयाचाही नवीन सेल केला नाही. फोनचे नंबर बदलले. संपर्क थांबवला. विजय पाटील तेवढे सतर्क होते. ते संजय पाटील व अमोल गुरवला शिव्या घालत होते कि तुम्ही काम का करत नाही. मी केवळ विजय पाटीलांवर विश्वास ठेवला. पण महिने उलटले...गाड्या परत नाहीत...हे पैसे भागधारकांचे...माझ्या बापाचे नव्हेत. मी स्प्टेंबर २००२ ला कायदेशिर नोटिस सर्वांना पाठवली. असा अनुभय अन्य ३२ वितरकांनी मला दिला नव्हता. या नोटीशीचे उत्तर आले नाही. मग मी माझ्या श्री. पगडे या अधिका-याला कायदेशिर गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला व त्यानुसार कोथरुड पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांच्या सुचनांनाही ही मंडळी जेंव्हा जुमानेना झाली तेंव्हा श्री विट्ठल शिंदे नामक पोलिस अधिकारी आपल्या ताफ्यासह इस्लामपुर येथे पोहोचले. ही रात्र ३१ डिसेंबर २००२ ची होती.

मध्यरात्री पुणे पोलिसांनी अमोल गुरव व संजय पाटील यांना अटक केली. त्यांच्या त्ताब्यातील कंपनीच्या दोन गाड्या जप्त केल्या. विजय पाटील त्यांना सापडले नाही. पोलिस जेंव्हा दुस-या
पोलिस क्षेत्रात एखाद्याला अटक करतात व आपल्या क्षेत्रात घेऊन जातात तेंव्हा पोलिस स्टेशन डायरीला नोंद अनिवार्य असते...तशी त्या दोघांची झाली.

आता गम्मत पहा...

अजामीनपात्र गुन्ह्यात अटक केली तर त्या आरोपीला सोडायचे, रिमांड द्यायचा हे सर्वस्वी न्यायालयाच्या हाती असते. पोलिस काय राष्ट्रपतींनाही त्यात हस्तक्षेप करता येत नाही.

पण....

विजय पाटील...जे अटक झाले नाही...त्यांनी जयंत पाटील यांचा उपयोग केला. तेंव्हा जयंत पाटील हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते. जयंत पाटील हे विजय पाटील यांचे काका...(हे मला तेंव्हा माहित नव्हते...) पुण्याचे पोलिस कमिशनर तेंव्हा होते श्री. Anamy Roy. श्री रोय यांनी इस्लामपुरात अटक झालेले दोन आरोपी कर्हाडपर्यंत पोहोचतात तोवर इन्स्पेक्टर शिंदे यांना एस्कोर्ट फ़ोर्स पाठवून वाटेत अडवायला लावले व त्या दोन्ही आरोपींना तेथेच सोडुन द्यायला सांगितले. ई. शिन्दे (त्यांनीच मला नंतर ही हकीकत सांगितली म्हणुन...) त्यांना सोडायला तयार नव्हते. यात त्यांचीच नोकरी धोक्यात येईल हे त्यांना कळत होते. पण अमिन रोय यांनी खात्याशी, कायद्याशी गद्दारी केली आणि विट्ठल शिन्दे यांना त्या आरोपींना सोडायला भाग पाडले. यामागे जयंत पाटील यांचा अलिखित आदेश होता हे उघड आहे. इस्लामपुरची ३१ डीसेंबर २००२ ची पोलिस डायरी कोणीही माहिती अधिकाराच्या कक्षेत मागवावी...सत्य समोर आहे.

हे येथे थांबले नाही. विट्ठल शिंदेंवर डिपार्टमेंटल मेमो निघाला. तेथील (कोथरुड पोलिस स्टेशन) मधील मुख्य ईन्स्पेक्क्टर पाटील यांची बदली केली.

नंतर २९ मार्च २००३ च्या मध्यरात्री गायकवाड नावाच्या सब-इंस्पेक्टरने भली मोठी ग्यांग घेवून मला घरात अटक केली. माझ्यावरचे आरोप सांगितले नाही वा मला इस्लामपुरच्या न्यायालयासमोर उभे न करता कस्टडी घेतली. मी व माझ्याबरोबर पुरेपुर निर्दोष असलेल्या मुकुंद मुळेलाही त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर इस्लामपुरात माझी व मुळेची धिंड या गायकवाड नामक इंस्पेक्तरने काढली. त्याचे फोटो तत्कालीन पुढारी, तरुण भारत या व्रुत्तपत्रांत आहेतच.

मी अनामी रोय, जयंत पाटील यांना जास्त दोषी मानतो. तुम्हाला आस्चर्य वाटेल...खुद्द विजय पाटील, ज्यांनी माझ्याविरुद्ध सुडापोटी गुन्हा दखल केला तेच विजय पाटील हे मी निमंत्रण देता जेंव्हा माझ्या चित्रपटाचा सांगलीत मुहुर्त होता त्याचे प्रमुख दीपप्रज्वलक होते. त्यांनी तोवर संजय पाटील आणि अमोल गुरवला कधीच बाहेरची वाट दाखवली होती.

कायदा म्हनजे नेमके काय असते रे भाऊ असा प्रश्न ज्यांना प्रश्न पदला असेल त्यांच्यासाठी सांगतो...

अमोल, संजय वा विजय....जे काही चुकले ते चुकले...

पण कायद्याच्या चौकटीत हस्तक्षेप करुन, आणि असंख्य अन्याय सहन करतात ते गप्पच बसतील या भ्रमात राहुन, आजही माझे वा सत्यान्विषेकाचे तोंड बंद करु पाहतील, त्यांना आपले नवे भविष्य शोधावे लागेल.

अनामी रोय आणि जयंत पाटील हे खरे आरोपी आहेत....
यांचे लांगे-बांधे आज ना उद्या काळच शोधेल....!

14 comments:

 1. वास्तविक पाहता तुम्हाला स्पष्टिकरण देण्याची मुळीच गरज नव्हती. पण काही विघ्नसंतोषी लोक उगाच एकाद्याच्या अब्रुवर शिंतोडे उडवण्यास सज्ज असतात. साल्यांना कोणी सांगितलेले नसतानाही डिटेक्टीव्ह चे काम सुरू करतात. एक सल्ला देतो दादा.. आज ना उद्या ह्या वाघ्यांना त्यांचा मालक सुद्धा गांडीवर लाथ मारुन हाकलून देईल तेव्हा हे बेरोजगार लोक उपाशी मरतील. तेव्हा ह्यांच्यावर एक उपकार म्हणून त्यांना तुमच्या डिटेक्टीव्ह एजन्सीमध्ये एखादे काम द्या. कारण त्यांना असे काही बाही शोधून काठण्याची सवय लागलीये ना .. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

  ReplyDelete
 2. he 'wagh' konte? and tyanche 'maalak' kon?

  ReplyDelete
 3. बहुजनांच्या नावावर मिळालेली राजकीय सत्ता ज्यांनी हायजेक केली आहे, ती मंडळी सत्तेच्या जोरावर कायद्याचे राज्य कसे खुंटीला बांधुन उजळ माथ्याने टेचात फिरतात आणि वर सोनवणी यांच्यासारख्यांना बळीचा बकरा करतात.{ ८ वर्षांपुर्वीची ही घटना जणु काल घडली आहे,अश्या थाटात ग्रुपमध्ये पोस्टींग टाकतात,} त्यांचा निषेध असो. हे पोस्टिंग टाकणा-यांच्या मालकांच्या सरकारी बंगल्यावर {ठाणे येथे ते कार्यकारी अभियंता असताना} काही वर्षांपुर्वी ईन्कमटेक्सची रेड का पडली होती याचा खुलासा ते करतील काय? संजयभाऊ, आम्ही आपल्यासोबत आहोत.ते तुमची बदनामी का करीत आहेत,याची जाणिव जाणकारांना आहे.सत्यमेव जयते.

  ReplyDelete
 4. सत्यमेव जयते.

  ReplyDelete
 5. सत्य कधिच लपत नाहि .................

  ReplyDelete
 6. संजय सर,
  हे सर्व वाचून अत्यंत वाईट वाटले.

  ReplyDelete
 7. पण श्री सोनवणी, तुम्हाला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली ते तुम्ही सांगितलेच नाही. कारण खोट्या गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर पोलीस आदिकार्याला शिक्ष्या होवू शकते. तुम्ही लढला का नाही मग. कि तुमचा या व्यवस्थेवरचा विश्वास उधळ आहे? मला जाली स्थळी काष्टी पाषाणी तुमच्यातला मराठा विरोध दिसतो कि तुमच्यात तो खरेच आहे. कारण प्रत्याक्ष्य अप्रत्यक्ष्य हि पोस्त आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ह्या असे दर्शवतात कि मराठ्यांनी तुमच्यावर अनन्य केला. सत्ता मराठ्यांच्या हातात असल्यामुळे कशी वाईट परिस्थिती आहे. असोचांगला प्रचार चालू आहे. मागे लातूरला लांबून नरके सरांचे भाषण ऐकण्याचा योग आला. नरके सर मराठ्यांच्या विरोधात असे बोलत होते जणू उमा भारती मुसलमानांच्या विरोधात.

  ReplyDelete
 8. VAACHUN KHUP VAIT VATLE SIR........PATIL ASOT KI AJUN KONI YANNA SAMPAVINYASATHICH AAMCHA JANMA ZAALA AAHE ASE MI MAANTO..WE WILL REVENGE....

  ReplyDelete
 9. संजय सर ,
  आपल्यामागे माझ्यासारखे असंख्य लोक आहेत
  एक मात्र खरे
  आमचा तुम्हाला काहीच उपयोग नाही
  कारण जे व्हायचे होते ते होऊन गेले
  पण माझ्यासारख्या अनेकांना आपल्याबद्दल नितांत आदर आहे आणि
  आम्ही मनापासून या प्रकारचा मुळापर्यंत तपास व्हावा अशा मताचे आहोत.
  आमच्यापैकी एकाला असेच समांतर अनुभव आल्यावर , त्याचा शेवट पर्यंत
  पाठ पुरावा करून त्या अधिकाऱ्यास क्षमा मागायला लावले !

  ReplyDelete
  Replies
  1. आगाशे साहेब, मी बाहेर आल्यानंतर मधल्या काळात माझा स्टाफ आणि संचालकांनी ज्या हेराफेरी करुन ठेवल्या त्या मी अजुनही निस्तरतो आहे. त्यामुळे संघर्षाची शक्ति मी बाहेर पडलो तेंव्हा हरपून बसलो होतो. संकट तेथेच संपले नव्हते...नंतर रांगच लागली म्हणा ना! तरीही मी कोणाकडेही कसलीही मदत मागितली नाही. सोअसून घेतले आणि अनुभवांत भर घालत माणुसकीनेच सर्वांकडे पहात राहिलो. त्यात माझी क्षमाशील प्रवृत्ती. मी विजय-संजयला एवढे करुनही माफ केले तसेच मी संचालकांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांनी केलेली घाण निपटत बसलो आहे. मी सांगली जेलमद्ध्ये ४१ दिवस होतो, जामीनाच्या प्रतीक्षेत. न्याय कसा विकला जातो व सत्ताधा-यांची मिरास आहे हे मी जीवंत अनुभवले आहे. असो. सांगली जेलमधील अनुभव फार मजेशीर आहेत...ते मी एका दिवाळी अंकासाठी लिहिले होते...येथेही खास आपल्यासाठी शेयर करतो. आपल्या सहृदयतेबद्दल धन्यवाद.

   Delete
 10. Sanjay Sir, Currently your Washington Software Ltd. is working or not because on BSE website it shows 'Suspended due to penal reasons' i.e company was bankrupted. Also what about your 'Rovers Detective Agency' is it currently working? or the same condition is happened..?Please answer the questions.

  ReplyDelete
 11. I think Sanjay, you already worked in many fields primarily you worked as Crime journalist in 'Aaj ka Aanand' then you left that job and started to write novels i.e you become author after that you became an entrepreneur and started companies in Ladhak(J&K) and in Gadchiroli(Maharashtra) in both cases you experienced heavy loss.Then you started a 'Washington Software Ltd' the same condition was happened the company bankrupted.In mid time you also produced one Marathi film in which you act a lead role which also not run successfully. Again after that you started 'Rovers Detective Agency' now I don't know what it's condition. But I observed that you are not consistent in any job. And now you started to writing a blog. What a controversy......The truth only knows you.

  ReplyDelete
  Replies
  1. Dear Anonymous, I would have been too happy to answer your questions, had you wrote in your real name. Only thing I state here is that I was not made for business. However still I do run two businesses...

   Delete
  2. प्रिय संजयजी,
   प्रयोगशील होकर असफल हो जाना कभी भी बेहतर है बजाय इसके कि हम सारा जीवन एकरस जीवन जी कर अंत में हताशा महसूस करें. केवल बेकार कि सुरक्षा की तलाश में लाखों लोग एक सामान्य जिंदगी की गिरफ्त में अपने आपको कैद कर लेते है और अंत में दुनिया को बिना कुछ दिए ही यहाँ से चले जाते है. उनके आने और जाने से कोई अंतर नहीं पड़ता. उनके रोने या हंसने से भी कोई अंतर नहीं पड़ता. कुछ कीड़े मकोडों की तरह उनका होना न होना कोई मायने नहीं रखता. आपको बधाई कि आप असफल भी रहे तो यात्रा करते करते न कि एक जगह बैठे बैठे. आप जैसे ही लोग भविष्य की मानवता का डीएनए बदलेंगे और उसे पशुओं से कुछ उपर उठाएंगे. मेरी शुभकामना आपकी इस बेमिसाल यात्रा को.
   एड दिनेश शर्मा

   Delete