Wednesday, July 27, 2011

"आजपासुन आपण मावळे...ते कावळे..."

ब्रेकींग न्युज:

आज पुण्यात रोजप्रमाणेच डोंबकावळ्यांची बैठक भरली. त्यात खेड्यातुन आलेले तसेच शहरांतुन (उपनगरांतुन...कारण शहरांत त्यांना जागाही नाही आणि पक्षीसंग्रहालयांत कोणी ठेवून घेत नाही...) आलेले आणि दिवसेंदिवस उग्र आणि हिंसक होत चाललेले डोंबकावळे होते. या बैठकीचे अध्यक्षपद निर्विवादपणे (कारण वाद घातला तर मरणाची आफत कोण घेणार?) म्हणुन भाई डोंबकावळा यांच्याकडे दिले गेले. बैठकीतील उपस्थित बहुतेक डोंबकावळे हे फ़ेसबुकवरील त्या भाईच्याच अन्य प्रतिमारुपे असल्याने ही निवड तर जवळपास स्वयंघोषित असल्यासारखीच होती. "विश्व म्हणजे माझीच प्रतिमा आहे" हे तत्वद्न्यान किती खरे आहे याचा साक्षात्कार या भाई डोंबकावळ्याने देत सरळ विषयाला हात घातला आणि विचारले..."आज कोण कोणाला किती आणि कशा शिव्या देणार?"

सर्व उपस्थितांनी काव काव केली आणि एकसुरात सांगितले..."१००० शिव्या भटांना..."
"एवढ्याच?" भाईने विचारले.
"काल ९९९ दिल्या होत्या...म्हनुन आज १०००..."
"नाही हे चालनार नाही. तुम्ही चळवळ कशी पुढे नेणार?"
"पण साहेब भटही आजकाल आम्हाला उलट शिव्या देतात....त्यांना आम्ही पुन्हा शिव्या देतो...त्या मोजल्या तर कोटभर होतील..."
"नाही, हे पुरेसे नाही..." असे भाई डोंबकावळे डोळे वटारुन बोलले. "तुम्हाला एवढे १००० फ़ेक अकाउंट फ़ेसबूकवर काय फक्त १००० शिव्या द्यायला निर्माण करुन दिले? माझे एकट्याचेच पहा...१२० आहेत...कोठे मीच ब्राह्मण असतो...तर कोठे बौद्ध...मी कोठे ओ बी सी असतू तर कोठे भटका विमुक्त...अरे गाढवांनो क्रुष्णालाही एवढे चमत्कार करता आले नसते ते मी करतो...बौद्ध होवुन ओबीसींना शिव्या देतो...आणि ओबीसी होवुन भटांना शिव्या देतो...आणि तुम्ही साले रोज फक्त १००० शिव्या हासडता?"

भाई रागावला आहे हे कळाले तसे सारे (भाईची प्रतिरुपे सोडुन) बाकी कावळे सावध झाले. भाईचे खेडे म्हनजे एक राजधानीच आहे हे लक्षात घेउन गयावया करत म्हणाले...
"भाई...बामनांच्या शिव्यांचा कोटा १०,००० ने वाढवतो...आपल्यावर जेही कोणी टीका करतात त्यांच्यावर त्याच्या हजारपटीने कोटा वाढवतो...पण एक अडचण आहे..."

"काय?" भाई कावळ्याने डोळे वटारुन विचारले.

घाबरलेल्या डोंबकावळ्याने इतस्तता: पाहिले...पण कोणी समर्थक दिसेना तसा तो गयावया करत बोलला..."पण भाई, शत्रुच्या गोटांत आपलेच कावळे आहेत...तेच साले आपल्याविरुद्ध काव-काव करतात...त्यांचे काय करायचे?"

भाई डोंबकावळ्याने आपल्या खेड्याला फोन लावला. तेथील महान डोंबकावळा नेता त्याच्याशी प्रत्यक्ष बोलला. भाइने हा...हुं केले...आणि मग फोन ठेवून कावला...
"साले....xxxxxxxxxxxxxxxxx तुम्ही कावळे ते कावळेच. जे विरोध करतात ते कावळे नाहीत तर xxxxx मावळे आहेत. त्यांना अजुन झोडा...सापडतील तेथे त्यांच्या टाळक्यावर चोचा मारा...आणि xxxxx जमत नसेल तर "क" चा "म" करा. भटांनी ध चा मा नाही केला?...आपणही वारंवार करत नाही आलो? या मावळ्यांना कावळे करुन टाका..."

"मग आपण कोण?" कोप-यात बसलेल्या एका डोंबकावळ्याने विचारायचे दु:स्साहस केले...

"आजपासुन आपण मावळे...ते कावळे..."

असे उग्र कावकावीत भाई डोंबकावळ्याने सांगितल्यावर कोनाची हिम्मत होती...आपण कावळे कि मावळे यावर वाद घालण्याची?

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...