ब्रेकींग न्युज:
आज पुण्यात रोजप्रमाणेच डोंबकावळ्यांची बैठक भरली. त्यात खेड्यातुन आलेले तसेच शहरांतुन (उपनगरांतुन...कारण शहरांत त्यांना जागाही नाही आणि पक्षीसंग्रहालयांत कोणी ठेवून घेत नाही...) आलेले आणि दिवसेंदिवस उग्र आणि हिंसक होत चाललेले डोंबकावळे होते. या बैठकीचे अध्यक्षपद निर्विवादपणे (कारण वाद घातला तर मरणाची आफत कोण घेणार?) म्हणुन भाई डोंबकावळा यांच्याकडे दिले गेले. बैठकीतील उपस्थित बहुतेक डोंबकावळे हे फ़ेसबुकवरील त्या भाईच्याच अन्य प्रतिमारुपे असल्याने ही निवड तर जवळपास स्वयंघोषित असल्यासारखीच होती. "विश्व म्हणजे माझीच प्रतिमा आहे" हे तत्वद्न्यान किती खरे आहे याचा साक्षात्कार या भाई डोंबकावळ्याने देत सरळ विषयाला हात घातला आणि विचारले..."आज कोण कोणाला किती आणि कशा शिव्या देणार?"
सर्व उपस्थितांनी काव काव केली आणि एकसुरात सांगितले..."१००० शिव्या भटांना..."
"एवढ्याच?" भाईने विचारले.
"काल ९९९ दिल्या होत्या...म्हनुन आज १०००..."
"नाही हे चालनार नाही. तुम्ही चळवळ कशी पुढे नेणार?"
"पण साहेब भटही आजकाल आम्हाला उलट शिव्या देतात....त्यांना आम्ही पुन्हा शिव्या देतो...त्या मोजल्या तर कोटभर होतील..."
"नाही, हे पुरेसे नाही..." असे भाई डोंबकावळे डोळे वटारुन बोलले. "तुम्हाला एवढे १००० फ़ेक अकाउंट फ़ेसबूकवर काय फक्त १००० शिव्या द्यायला निर्माण करुन दिले? माझे एकट्याचेच पहा...१२० आहेत...कोठे मीच ब्राह्मण असतो...तर कोठे बौद्ध...मी कोठे ओ बी सी असतू तर कोठे भटका विमुक्त...अरे गाढवांनो क्रुष्णालाही एवढे चमत्कार करता आले नसते ते मी करतो...बौद्ध होवुन ओबीसींना शिव्या देतो...आणि ओबीसी होवुन भटांना शिव्या देतो...आणि तुम्ही साले रोज फक्त १००० शिव्या हासडता?"
भाई रागावला आहे हे कळाले तसे सारे (भाईची प्रतिरुपे सोडुन) बाकी कावळे सावध झाले. भाईचे खेडे म्हनजे एक राजधानीच आहे हे लक्षात घेउन गयावया करत म्हणाले...
"भाई...बामनांच्या शिव्यांचा कोटा १०,००० ने वाढवतो...आपल्यावर जेही कोणी टीका करतात त्यांच्यावर त्याच्या हजारपटीने कोटा वाढवतो...पण एक अडचण आहे..."
"काय?" भाई कावळ्याने डोळे वटारुन विचारले.
घाबरलेल्या डोंबकावळ्याने इतस्तता: पाहिले...पण कोणी समर्थक दिसेना तसा तो गयावया करत बोलला..."पण भाई, शत्रुच्या गोटांत आपलेच कावळे आहेत...तेच साले आपल्याविरुद्ध काव-काव करतात...त्यांचे काय करायचे?"
भाई डोंबकावळ्याने आपल्या खेड्याला फोन लावला. तेथील महान डोंबकावळा नेता त्याच्याशी प्रत्यक्ष बोलला. भाइने हा...हुं केले...आणि मग फोन ठेवून कावला...
"साले....xxxxxxxxxxxxxxxxx तुम्ही कावळे ते कावळेच. जे विरोध करतात ते कावळे नाहीत तर xxxxx मावळे आहेत. त्यांना अजुन झोडा...सापडतील तेथे त्यांच्या टाळक्यावर चोचा मारा...आणि xxxxx जमत नसेल तर "क" चा "म" करा. भटांनी ध चा मा नाही केला?...आपणही वारंवार करत नाही आलो? या मावळ्यांना कावळे करुन टाका..."
"मग आपण कोण?" कोप-यात बसलेल्या एका डोंबकावळ्याने विचारायचे दु:स्साहस केले...
"आजपासुन आपण मावळे...ते कावळे..."
असे उग्र कावकावीत भाई डोंबकावळ्याने सांगितल्यावर कोनाची हिम्मत होती...आपण कावळे कि मावळे यावर वाद घालण्याची?
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता
वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
विनोदाचे महत्वाचे अंग म्हणजे उपरोध. विडंबन. याठिकाणी उपरोधाच्या आधारे मर्मावरच बोट ठेवले आहे. सतत चढा सुर लावण्यापेक्षा अश्या तिरकस शैलीतुन काढलेले चिमटे हे आसुडाच्या फटक्यांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात.फ़ेक अकाऊंटस,आदेशयंत्रणा,शिव्यांचा कोटा ...मस्तच...सणसणीत चपराक देणारे...जखम न करता, गुदगुल्या करणारे..पण कानफाड सोलणारे..वा..अगदी परिणामकारक...
ReplyDeleteअरे बाल हरी नरके
Deleteतू अजून लहानच राहणा आहेस का ?
कुणाच्याही लिखाणाला काहीही म्हणत सुटायचे.
त्यापेक्षा गप्प बस !
गडबड करू नको !
डोळे मित !
शांत झोप
काय ?किती बोलतो रे बाबा तू !
तुला आपला लिंबू टिंबू केला पुणे विद्यापीठात मुख्य तर फारच नखरे करून रहायालास तू !
नको रे बाबा असं करू !
संजयजी नमस्कार, खुप छान.
ReplyDeleteKhup apratim lekh aahe.....
ReplyDeletekhup chhan
ReplyDeleteतुमच्या ब्लोगवर प्रतिक्रिया देणारे सर्व बाल कलाकार आहेत असे वाटते .आणि तुमच्या लेखनाच्या दर्जाचे हरी नरके यांनी केलेले कौतुक अगदीच फालतू आहे ,तसेच इतरांचेपण .
ReplyDeleteतुमचा लेख चांगला असला तरी आमच्या अनिता ती इतका ग्रेट अजिबात नाही.
तिच्या लेखनात जो एक वेगळेपणा आहे तो तुमच्यात नाही ,
तुम्ही भातात राहून भात झाला आहात असे दिसते.
सोडा हा धंदा !
ते तुम्हाला कधी तंग मारतील ते समजणारही नाही तुम्हाला आणि त्या नाराक्याना !
मस्त ॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥।
ReplyDelete