Sunday, July 31, 2011

ऋग्वेदात आधुनिक विद्न्यान?

ऋग्वेदामद्धे अगदी बिग ब्यांग थीयरी आहे असे सांगणारे सनातनी मी पाहिले आहेत. मग तत्पुर्वी मान्य असलेली स्थीर विश्व वा तेजोमेघ थियरी तेंव्हा कोठे गेली होती? बरे आता स्टीफन हाकिंगने जी सुपर स्ट्रिन्ग थियरी मांडली व आधीची थियरी जवलपास बाद ठरवली...आता ते त्याचे पुरावे वेदातील ऋचांचा हवा तसा अर्थ काढुन सिद्धही करतील...हे सोडा...आकाशात निर्माण होणारी वीज अंटेना द्वारा ग्रहित करून सा-या जगाचा वीजेचा प्रश्न फुकटात सुटेल असे शास्त्र ऋग्वेदात आहे असे सांगनारे महामुर्ख वैदिक विद्न्यान दिन साजरा करतात...यांना नोबेल काय....त्याच्या कोटपट पुरस्कार मिळेल...पण सिद्ध का नाही करून दाखवत? हजार बिल गेट विकत घेता येतील कि! एक लक्षात घ्या...वेद हे महत्वाचे आहेत ते त्या काळातील नुसते (काही भाग प्रक्षिप्त असला तरी) वैदिक समाजव्यवस्थेचेच नव्हे तर तत्कालीन सांस्क्रुतीक संघर्षाचे चित्रण अभ्यासोपयुक्त आहे म्हणुन. विष्णु ही देवता ऋग्वेदात फक्त साडेतीन ऋचांत येते आणि तीही ईंद्राचा दुय्यम मित्र म्हणुन. यातील एका ऋचेत विष्णु हा (सुर्यरुप मानला असल्याने) तीन पावलात भुमी, पाताळ आणि अवकाश व्यापतो याचा आधार घेत पुढे पुराणकारांनी बळीराजाला विष्णुने वामनरुप घेवुन पातालात गाडले अशी भाकड कथा बनवली आहे. पण प्रत्यक्षात परंपरेने देशात पुजा होते ती बळीची...वामनाची नव्हे...पुराणकारांनी शिवाला दुय्यम करण्याच्या नादात त्याचे दहा अवतार बनवले. या अवतारांचा ऋग्वेद ते ब्राह्मणे ते उपनिषदे यात कसलाही उल्लेख नाही. त्यांनी बुद्धालाही विष्णुचा अवतार बनवुन टाकले. पण गम्मत ही लक्षात घ्या या दहा अवतारांत एकही, वामन वगळता, वैदिक नाही, आणि वामनाची मंदिरेही नाहीत वा त्याची जनसामान्य कधी पुजाही करत नाहीत. उलट या कथेतुन एकच सिद्ध होते कि बळी हा महान असुनही केवळ इंद्राला त्याच्या पदाची काळजी वाटु लागल्याने (ईंद्रपद हे बदलते होते...आणि पुण्यवंतच त्यावर आपसुक कब्जा मिलवत असे) विष्णुने (वा कोणा वैदिकाने) त्याला ठार मारले. आणि ॠग्वेदातील तीन पावलात विश्व व्यापणा-या विष्णुला ते श्रेय दिले गेले. शंबर ते व्रुत्र यांच्या हत्या तर ऋग्वेदातच उल्लेखित आहेत. आता त्यात आधुनिक विद्न्यान शोधा असे म्हनना-या सनातनी विद्वानांच्या बुद्धीची कीव करणे भाग आहे. ऋग्वेदातील विष्णु हे स्रुष्टीनियमाचे तात्कालिक प्रतीक आहे. त्याबद्दल ऋग्वैदिक ऋषिंच्या प्रतिभेला सलाम केलाच पाहिजे...पण हे आधुनिक वेडगळ स्वता: विद्न्यानाच्या शोधात आजही न जाता अंधारयुगात वावरत पुर्वज महत्ता, केवळ इतरांना संस्क्रुत समजत नाही या भ्रमात, धादांत खोटी विधाने करतात त्यांची कीवच केली पाहिजे. ऋग्वेदातील संस्क्रुत ही कुटभाषा असेही ते बिनदिक्कतपणे सांगतात...मग यांना शक, हुण, कुशाण, मुस्लिम, पोर्तुगीज़, ख्रिस्ती आक्रमणे रोखायला...एवढेच नव्हे तर त्यांना जंबुद्वीपाच्या स्वामित्वाखाली आनायला कोणी रोखले होते? त्यांना तर ते कुटार्थ माहित होते ना? कशाला गुलाम झाले आणि त्यांच्या चाक-या केल्या? इतरांचे ठीक होते कारण त्या बिचा-यांना वेद कोणी शिकवतच नव्हते...तर मग त्यांना दोष कसा देता येईल? शेवटी समाजाचे जे मुख त्यांनी तरी स्वता:ची आणि आपल्या शुद्रातिशुद्र दासांची काळजी घ्यायला नको होती का? ती घेतली नाही...घेऊ शकले नाही...त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही...पण आज सारे आधुनिक विद्न्यान वेदांत ठासुन भरले आहे हे सांगणे हे अश्लाघ्य आणि स्व-वंचना करनारे आहे.

अवतार कथा मुळात ऋग्वेद वा अन्य कोणत्याही वेदांत नाहीत. ऋग्वेदाबद्दल सर्वात मोठे आस्चर्य जागतीक वेदाभ्यासकांनी व्यक्त केले आहे ते हे कि वेदांत स्रुष्टीजन्माची कोणतीही कथा येत नाही. पुरुषसुक्त हे दहाव्या मंडलात येते आणि तेही प्रक्षिप्त आहे हे मी सिद्ध केले आहे कारण मुळात वर्णव्यवस्था ही अन्यत्र ऋग्वेदात यत्किंचितही दिसत नाही. एकच मनुष्य एकाच वेळीस तीन वर्णांचा असू शकत होता. उदा. गावात राहतो तो विश...तोच मंत्र रचत असेल तर त्या क्षणी ब्राह्मन...आणि तोच ज्या क्षणी युद्धात जातो तेंव्हा क्षत्र...म्हणजे वर्ण हे एकाच्याच हयातीत प्रसंगपरत्वे बदलत होते. हे एक समाजशास्त्र आहे. आणि तेच संयुक्तिक होते आणि आहे. तुम्ही विष्णुला उर्जा रुपात पाहता कि अजुन पौराणिक द्रुष्टीने हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण विष्णु हा आदित्यांपैकी एक मानला गेला आहे आणि आदित्य हेच मुळात ऋग्वेदानेच असूर मानले आहेत...त्याचे काय करणार?

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...