Sunday, July 31, 2011

ऋग्वेदात आधुनिक विद्न्यान?

ऋग्वेदामद्धे अगदी बिग ब्यांग थीयरी आहे असे सांगणारे सनातनी मी पाहिले आहेत. मग तत्पुर्वी मान्य असलेली स्थीर विश्व वा तेजोमेघ थियरी तेंव्हा कोठे गेली होती? बरे आता स्टीफन हाकिंगने जी सुपर स्ट्रिन्ग थियरी मांडली व आधीची थियरी जवलपास बाद ठरवली...आता ते त्याचे पुरावे वेदातील ऋचांचा हवा तसा अर्थ काढुन सिद्धही करतील...हे सोडा...आकाशात निर्माण होणारी वीज अंटेना द्वारा ग्रहित करून सा-या जगाचा वीजेचा प्रश्न फुकटात सुटेल असे शास्त्र ऋग्वेदात आहे असे सांगनारे महामुर्ख वैदिक विद्न्यान दिन साजरा करतात...यांना नोबेल काय....त्याच्या कोटपट पुरस्कार मिळेल...पण सिद्ध का नाही करून दाखवत? हजार बिल गेट विकत घेता येतील कि! एक लक्षात घ्या...वेद हे महत्वाचे आहेत ते त्या काळातील नुसते (काही भाग प्रक्षिप्त असला तरी) वैदिक समाजव्यवस्थेचेच नव्हे तर तत्कालीन सांस्क्रुतीक संघर्षाचे चित्रण अभ्यासोपयुक्त आहे म्हणुन. विष्णु ही देवता ऋग्वेदात फक्त साडेतीन ऋचांत येते आणि तीही ईंद्राचा दुय्यम मित्र म्हणुन. यातील एका ऋचेत विष्णु हा (सुर्यरुप मानला असल्याने) तीन पावलात भुमी, पाताळ आणि अवकाश व्यापतो याचा आधार घेत पुढे पुराणकारांनी बळीराजाला विष्णुने वामनरुप घेवुन पातालात गाडले अशी भाकड कथा बनवली आहे. पण प्रत्यक्षात परंपरेने देशात पुजा होते ती बळीची...वामनाची नव्हे...पुराणकारांनी शिवाला दुय्यम करण्याच्या नादात त्याचे दहा अवतार बनवले. या अवतारांचा ऋग्वेद ते ब्राह्मणे ते उपनिषदे यात कसलाही उल्लेख नाही. त्यांनी बुद्धालाही विष्णुचा अवतार बनवुन टाकले. पण गम्मत ही लक्षात घ्या या दहा अवतारांत एकही, वामन वगळता, वैदिक नाही, आणि वामनाची मंदिरेही नाहीत वा त्याची जनसामान्य कधी पुजाही करत नाहीत. उलट या कथेतुन एकच सिद्ध होते कि बळी हा महान असुनही केवळ इंद्राला त्याच्या पदाची काळजी वाटु लागल्याने (ईंद्रपद हे बदलते होते...आणि पुण्यवंतच त्यावर आपसुक कब्जा मिलवत असे) विष्णुने (वा कोणा वैदिकाने) त्याला ठार मारले. आणि ॠग्वेदातील तीन पावलात विश्व व्यापणा-या विष्णुला ते श्रेय दिले गेले. शंबर ते व्रुत्र यांच्या हत्या तर ऋग्वेदातच उल्लेखित आहेत. आता त्यात आधुनिक विद्न्यान शोधा असे म्हनना-या सनातनी विद्वानांच्या बुद्धीची कीव करणे भाग आहे. ऋग्वेदातील विष्णु हे स्रुष्टीनियमाचे तात्कालिक प्रतीक आहे. त्याबद्दल ऋग्वैदिक ऋषिंच्या प्रतिभेला सलाम केलाच पाहिजे...पण हे आधुनिक वेडगळ स्वता: विद्न्यानाच्या शोधात आजही न जाता अंधारयुगात वावरत पुर्वज महत्ता, केवळ इतरांना संस्क्रुत समजत नाही या भ्रमात, धादांत खोटी विधाने करतात त्यांची कीवच केली पाहिजे. ऋग्वेदातील संस्क्रुत ही कुटभाषा असेही ते बिनदिक्कतपणे सांगतात...मग यांना शक, हुण, कुशाण, मुस्लिम, पोर्तुगीज़, ख्रिस्ती आक्रमणे रोखायला...एवढेच नव्हे तर त्यांना जंबुद्वीपाच्या स्वामित्वाखाली आनायला कोणी रोखले होते? त्यांना तर ते कुटार्थ माहित होते ना? कशाला गुलाम झाले आणि त्यांच्या चाक-या केल्या? इतरांचे ठीक होते कारण त्या बिचा-यांना वेद कोणी शिकवतच नव्हते...तर मग त्यांना दोष कसा देता येईल? शेवटी समाजाचे जे मुख त्यांनी तरी स्वता:ची आणि आपल्या शुद्रातिशुद्र दासांची काळजी घ्यायला नको होती का? ती घेतली नाही...घेऊ शकले नाही...त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही...पण आज सारे आधुनिक विद्न्यान वेदांत ठासुन भरले आहे हे सांगणे हे अश्लाघ्य आणि स्व-वंचना करनारे आहे.

अवतार कथा मुळात ऋग्वेद वा अन्य कोणत्याही वेदांत नाहीत. ऋग्वेदाबद्दल सर्वात मोठे आस्चर्य जागतीक वेदाभ्यासकांनी व्यक्त केले आहे ते हे कि वेदांत स्रुष्टीजन्माची कोणतीही कथा येत नाही. पुरुषसुक्त हे दहाव्या मंडलात येते आणि तेही प्रक्षिप्त आहे हे मी सिद्ध केले आहे कारण मुळात वर्णव्यवस्था ही अन्यत्र ऋग्वेदात यत्किंचितही दिसत नाही. एकच मनुष्य एकाच वेळीस तीन वर्णांचा असू शकत होता. उदा. गावात राहतो तो विश...तोच मंत्र रचत असेल तर त्या क्षणी ब्राह्मन...आणि तोच ज्या क्षणी युद्धात जातो तेंव्हा क्षत्र...म्हणजे वर्ण हे एकाच्याच हयातीत प्रसंगपरत्वे बदलत होते. हे एक समाजशास्त्र आहे. आणि तेच संयुक्तिक होते आणि आहे. तुम्ही विष्णुला उर्जा रुपात पाहता कि अजुन पौराणिक द्रुष्टीने हा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण विष्णु हा आदित्यांपैकी एक मानला गेला आहे आणि आदित्य हेच मुळात ऋग्वेदानेच असूर मानले आहेत...त्याचे काय करणार?

12 comments:

 1. संस्कृतीच्या ठेकेदारांचा बुरखा फाडणारा लेख. अप्रतिम विवेचन. कदाचित या दीडशहन्याना आता तरी शहाणपण येईल.

  ReplyDelete
 2. अतिशय शान लेख. अभास्पूर्ण लेख. धन्यवाद. एवढे ज्ञान कमावले आहे श्री सोनवणी तुम्ही येवढा अभ्यास केला आहे तुम्ही.......हे असे लेख वाचल्या नंतर पटते. पण तुमचे काही लेख वाचल्या नंतर मनाला पटत नाही कि तुम्ही हेच का. म्हणजे तुम्ही श्री खेदेकारांचा विरोध करता म्हणून ते मला आवडत नाही असा अर्थ कृपा करून काढू नका. असो वैचारिक विरोध असावेतच.

  ReplyDelete
  Replies
  1. अहो रेव्होल्यूशन ,
   काय हो,
   जरा वाचन करत जा ,चार पुस्तके वाचा !
   म्हणजे संजय सरांच्या विचारांच्या अभ्यासाचे शिवधनुष्य पेलायची ताकद तुमच्यात येईल.
   ते तुमचे खेडेकर फारच हलक्या स्तराचे लेखक आहेत .छे ते लेखकच नाहीत.
   ते विचारवंत तर अजिबात नाहीत.
   ते काय किंवा त्या अनिताताई काय ,त्यांना काही समजतच नाही.अक्कलशून्य !
   त्या दोघांनी लिहिलेली पुस्तके अतिशय हीन दर्जाची आहेत आणि त्यांना काहीच दर्जा नाही.
   त्यांना कुठेही कुणी ओळखतही नाही.
   सतत ब्राह्मण द्वेष करणे आणि अनेक श्रेष्ठ लेखकांना नावे ठेवणे हाच त्यांचा उद्योग आहे.
   कुणीही विचारवंत त्यांना दाराशीसुद्धा उभे करणार नाही.इतकी त्यांची बौद्धिक पातळी खालची आहे.
   प्रचारकी लिखाणाने चार पाच तरुण तुमच्या आजूबाजूला जमा करता येतील.पण
   इकडे पुण्या मुंबईत -ठाणे नाशिकला त्यांच्याकडे कुत्रेसुद्धा ढुंकून बघणार नाही.कदाचित पाय वर करून त्यांची जागा दाखवेल ,
   तात्पर्य,
   तुम्ही जर संजय सरांचा मान ठेऊन त्यांच्या लेखनाचा अभ्यास कराल ,त्याने थोडा डोक्यात प्रकाश पडेल आणि
   हा असला फुकटचा साचलेला खेडेकर आणि पाटील चा कचरा निघून तुमच्याआयुष्याला योग्य दिशा मिळेल.

   अनिताताई तर इतक्या आचरट आहेत की त्या दुसर्याच्या विचारांशी त्यांच्या ब्लोग वरून मुकाबला करू शकत नाहीत.त्या तुलनेत
   संजय सर त्यांच्या ब्लोगवर कुणीही काही लिहिले तरी त्याला योग्य उत्तर देतात,वैचारिक चर्चा करतात.(अश्लील सोडून )
   अनितताई ना काही लिहिले की त्या त्यातील मजकूर वाचून ठरवतात की त्या मजकुराला त्यांच्या ब्लोग वर प्रसिद्धी द्यायची की नाही ते .!
   माझ्या मित्रांचा हा अनुभव सांगत आहे.
   ते अतिशय सभ्यपणे तिच्याशी विरोध करून चर्चा करतात पण या ताई त्यांना उत्तरेच देत नाहीत.हा पळपुटे पणा आहे. आहे.घाबरट पणा आहे.
   दुसर्यांबद्दल गरळ ओकायाची आणि तुम्ही चुकत आहात असे कुणी सांगत असेल तर त्याला गप्प बसवायचे हा बालिश पण आहे.

   Delete
 3. @ Revolution, आभारी आहे. मी व्यक्तीविरोधात नाही. माझे काही विचार अनेकांना पतत नाहीत याची मला जाणीव आहे. पण आपण म्हनाल्याप्रमाणे वैचारिक मतभेद असायलाच हवेत तरच आपण अधिक पुढे जावू शकतो.

  ReplyDelete
 4. सोनवणीजी माझ्याकडे एक पुस्तक आहे, मी नाव विसरलो लेखक बहुदा श्री शिखरे असावेत असो. त्यामध्ये ऋग्वेदातील रुचा आणि इतर श्लोकाचा व्यवस्थित अर्थ दिलेला आहे. त्यामध्ये तर आर्य हे परकेच असवेत असा समाज होतो. श्री नेमाडे सरांच्या हिंदू मध्ये पण आर्य परके हे धरूनच कादंबरी पुढे गेलेली आहे. आंबेडकरांनी सुद्धा आर्य परकेच होते हे सांगितलेले मी ऐकले आहे. त्यावर अधिक प्रकाश टाकावा...आणि परके म्हणजे कोण हा पण विषय येतोच कारण आज जी आपण हिंदू संस्कृती समजतो ती तर कंबोडिया थायलंड ह्या देश्यात पण आहे. विष्णूची मोठाली मंदिरे आणि बुद्ध विहार जवळ जवळच आहेत....वेरुळचे कैलाश मंदिर सुद्धा बुद्ध विहार असावे असे मला वाटते त्यावरील...चार सिंहाची मूर्ती आपण पहावी. म्हणजे मी विद्यार्थी पण नाही इतिहासाचा पण एक आवड आहे. मला तर वाटते सगळ्या ठेर्या खोट्या आहेत खरे काय कुणालाच नक्की सांगता येत नाही...एक वेळ आपण राम नव्हताच म्हणतो आणि तो जातीयवादी होता म्हणू टीका पण करतो....हि काय भांगढ आहे राव? डोके गर्र्र होवून जाते...

  ReplyDelete
 5. The book I was refering in above post is written by Mr. Deshmukh. not by Mr. shikhare

  ReplyDelete
 6. An eye opening article from Dr. Surendra Kumar Sharma (phd in sanskrut) about science in Veda's.
  Published in Sarita monthy 1980

  http://www.freeimagehosting.net/5a613
  http://www.freeimagehosting.net/38d0c
  http://www.freeimagehosting.net/8144d
  http://www.freeimagehosting.net/154d8
  http://www.freeimagehosting.net/d1584
  http://www.freeimagehosting.net/d1f06
  http://www.freeimagehosting.net/edfac

  ReplyDelete
 7. Thanks Zen for providing me this information in support with my argument.

  ReplyDelete
 8. तुम्ही म्हणाले कि विष्णू च्या साडेतीन रुचा आहेत ऋग्वेदात.....पण पहिल्या मंडलात २२व्या सूक्तात १६ ते २१ अशा ६ रुचा विष्णू च्या आहेत....
  तुम्ही म्हणता कि बली ची पूजा केली जाते वामनाची नाही ....मग आपण बलिप्रतिपदा का साजरा करतो???
  तुम्ही म्हणता विष्णूने बलीला ठार मारले....पण त्याने तर त्याला सुतालात पाठवले..मारले नाही.मद्भागवत ( ५.२४.१८) असे सांगते...
  तुम्ही म्हणता वामन सोडून कोणी वैदिक नाही...मग राम,कृष्ण हे कोण???

  ReplyDelete
  Replies
  1. ऋग्वेदात विष्णुला उद्देशुन फक्त साडेतीनच ऋचा आहेत. सुपर्नादि काही दैवतांचे नंतर विष्णुशी तादात्म्य साधले गेल्याने तसा समज होतो पण ते खरे नाही. सुपर्ण हे मुलात सुर्याचे प्रतीक होते...विष्णुचे नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मुलात हे मत सिद्ध केले आहे आणि मी त्याच्याशी पुरेपुर सहमत आहे.

   बलिप्रतिपदा ही मुलात बलीच्या स्मरणासाठी आहे...त्याच्याबद्दल्ची क्रुतद्न्यता म्हणुन आहे...वामनाबाबत नाही. वामनाची पुजा कोणीही करत नाही.

   वामनाने बळीला सुलतात..कि पातालात (कोणी म्हणतो केरलात तर कोणी म्हणतो दक्षीण अमेरिकेत (मेक्सिकोत) पाठवले. या भाकदकथा पुराणांनी निर्माण केल्या. मुळत वामनावतार झाला तोच मुळात बळीच्या विनाशासाठी.

   राम हा शैव होता. रावणाच्या हत्त्येनंतर त्याने रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. यद्न्य केला नाही. रामायणातील बालकांड आणि उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे (मुळ वाल्मिकीक्रुत नाही.) त्यामुळे दशरथाने ऋष्यश्रुंगाकरवी पुत्र प्राप्तीसाठी यद्न्य केला होता ही कथा भाकडकथा आहे हे सिद्ध होते.

   क्रुष्ण हा इंद्रमह उत्सवाच्या विरोधात होता. त्याने स्वत: कधीही यद्न्य करवुन घेतल्याचे एकही उदाहरण महाभारतात नाही. गीतेत वैदिक तत्वद्न्यानाचे/कर्मकांडाचे समर्थन नाही. मुळात क्रुष्ण हा असुर वंशीय होता. त्याचा नातु अनिरुद्धाने बानासुराच्या कन्येशी विवाह केला हे आपणास माहित असेल...तसेच जरासंघाला क्रुषणाच्या खानदानातील मुली दिल्या होत्या.

   प्रसिद्ध व्यक्तींचे एन-केन प्रकारेन वैदिकीकरण करणे हा स्वभाव आहे खरा...पण ते खोटे आहे...

   कारण वेदांना मुळात अवतार/पुनर्जन्म/संन्यास/मोक्ष अशा अनेक संकल्पनाच मान्य नाहीत!

   Delete
 9. Aw, this was a very nice post. Taking a few minutes and actual
  effort to generate a top notch article… but what can I say… I procrastinate a whole lot
  and never manage to get anything done.

  my website - How to Make Money on Facebook apps

  ReplyDelete
 10. सृष्टि या ब्रह्माण्ड रचना विषय
  http://aryamaratha.blogspot.in/2017/02/1-2-3-4-5-6-7-8-every-thing-persists-in.html

  सृष्टि कि उत्पत्ती वेद आधारपर
  http://aryamaratha.blogspot.in/2016/08/blog-post.html

  अवश्य वाचावे एकदा .....................

  ReplyDelete