दसरा हा स्रुष्टीजन्माचा अद्भुत सोहोळा आहे. क्रुषीवल संस्क्रुतीने प्राचीन काळी या उत्सवाची सुरुवात केली. जगन्माता नऊ महिने स्रुष्टीगर्भ धारण करुन दहाव्या महिन्यात स्रुष्टीचे स्रुजन करते ही मुलभुत कल्पना या सणामागे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे नऊ महिन्यांचे प्रतीक बनता. घट्स्थापना ही स्रुष्टीगर्भाची शिव या चैतन्यातुन झालेली विश्वनिर्मितीची सुरुवात असते. घट हे जगन्मातेच्या ओटीपोटाचे प्रतीकरुप आहे. एका अर्थाने दसरा म्हणजे आपण स्रुष्टीचा जन्मसोहोळा साजरा करत असतो.
या उत्सवाची सुरुवात क्रुषीवल संस्क्रुतीने करणे स्वाभाविक आहे. वर्षाकाल सरत असता, सुगीचा हंगाम ओसरत असता, नव्य चैतन्याची चाहुल मानवी मनाला लागणे स्वाभाविक आहे. आदिशक्ती ही आपल्या पुर्वजांनी भुमीच्या रुपात पाहिली. तीच मानवी जीवनाची गंगोत्री, आधार आणि अंतिम विश्रामस्थळ. मानवी जीवनाचे स्रुष्टीनियमांवर आरोपन प्राचीन काळी मानवाने केले. त्याला एक उदात्त अर्थ दिला आणि आपल्या जीवनप्रवाहाला स्रुष्टीशी नाळ जुळवुन घेणारी व्यापक दिशा दिली.
त्या अर्थाने दसरा हा एक महन्मंगल उत्सव आहे. या सणाला रावणवधाचे मित्थक जोडुन त्याचा मुलार्थ मात्र घालवुन टाकला गेला आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. रावणवधाचा दस-याशी काडीइतकाही संबंध नाही. दस-याला रावणवध झाला असता तर आधीच्या नवरात्रींचे प्रयोजनच रहात नाही हे सांस्क्रुतीक भेसळ करणा-यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
पावसाळा संपला कि लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच सैनिक असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला कि मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या स्रुष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.
स्रुष्टीचा जन्म खरोखर कसा झाला याचा शोध विद्न्यान घेत राहीलच. पण क्रुतद्न्य क्रुषिवलांनी स्रुष्टीजन्माचे एक मित्थक रचले आणि हजारो वर्ष श्रद्धेने ते जपले हे महत्वाचे आहे.
माझ्या सर्व वाचकांना दस-याच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
Wednesday, October 5, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!
पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...