ऐतिहासिक महामानवांना दैवी अवतार वा देवाचाच दर्जा देण्याचा भारतीय वैदिक उध्योग पुरातन आहे. राम-क्रुष्ण या मानवी व्यक्तिमत्वांना अवताराचा दर्जा देवुन बराच काळ उलटला आहे. बुद्ध तर विष्णुचा दहावा अवतार म्हणुन पुराणकारांनी प्रसिद्धच करुन ठेवला. महावीराला मात्र थोडे दुरच सारले...कारण त्याने निर्माण केलेल्या धर्माचा यांना फटका विशेष बसला नसावा. गत सहस्त्रकात शिवाजी महाराज झाले. त्यांना आधी शिवाचा अवतार व नंतर आधुनिक शंकराचार्यांनी विष्णुचा अवतार ठरवण्याचे धोरण राबवले. राजाराम महाराजांनीच पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर समुद्रतटकिनारील किल्ल्यात बनवले असे सांगण्यात येते...पण त्या मंदिरातील शिवमुर्ती श्मश्रु रहित आहे आणि आम्ही दाढीखेरीज शिवाजी महाराजांची कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे जशी आम्ही दाढीखेरीज शिवाजीमहाराजांची कल्पना करु शकत नाही तसेच जटाविरहीत पण स्म्श्रुधारी शिवाचीही कल्पना करु शकत नाही. त्यामुळे राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर हे शिवाचे होते कि शिवाजीमहाराजांचे हा प्रश्न उपस्थित होतो.
दै. सकाळ या दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. शिर्षक आहे "फ्रेंच अभ्यासक उभारतोय शिवस्रुष्टी". या बातमीत म्हटलेय कि फ्रांसिस गोतिये नामक फ़्रेंच अभ्यासक शिवैतिहासाने एवढअ प्रभावित झालाय कि त्याने लोहगांव येथे पाच एकरांत शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले असुन पुढील टप्प्यात त्यांच्या पराक्रमांची माहिते देणारे संग्रहालय उभारायला सुरुवात केली आहे. या पाच एकरांच्या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे, दुर्मिळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे.
खरे तर कोणालाही तसा आनंद वाटायला हरकत नाही कि एक परकीय माणुस शिवस्रुष्टी उभारत आहे. त्याला वैदिकत्वाची जोड मिळत असल्याने तर तो आनंद काही समाजघटकांत अद्वितीय असेल यात शंका नाही.
पण माझे प्रश्न आहेत. या शिवमंदिरात शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणा-या आईभवानीचे पहिले ब्रोंझ शिल्प उभारले आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला तो दैवी शक्तीने याचे हे शिल्प म्हनजे प्रतीक आहे आणि जो फ्रांसिस गोतिये ज्या संस्क्रुतीतुन आला आहे त्या सआंस्क्रुतीत हे बसत नाही हे उघड आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला असेल तो त्यांच्या स्वकर्तुत्वाने नव्हे तर दैवी शक्तीने असे सुचवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि त्याचे कवतुक करावे अशी दुर्भावना सुचावी हे आमचे दुर्दैव आहे.
गोतिये यांना एवढेच शिवप्रेम आहे तर हीच स्रुष्टी त्त्यांनी त्यांच्या मायभुमीत निर्माण करायला हवी होती. कधीकाळी योग आला तर आम्हीही फ्रांसला भेट देवुन त्यांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचे आम्ही प्रवासवर्णनात कौतुक केले असते.... पण येथे, याच पुण्यात ज्या पुण्यात दादोजीवरुन नुकताच वाद झाला त्याच पुण्यात आता शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे काय कारण? शिवाजीमहाराजांचे अवमुल्यन करणारे शिल्प वा स्रुष्टी सहन केली जावु शकत नाही.
पण येथील मुठभर वर्गाला पाश्चात्य लोकांबद्दल अधिकच प्रेम असते. येथे जीवनभर शिवप्रेमाबाबत जागे असतात ते निंद्य ठरवले जातात. जे शिवाजी महाराजांच्या आरत्या ओवाळण्यात मागे पडत नाही असे दाखवतात त्यांचे शिवप्रेम हे नेहमीच बेगडी असते. यांना शिवाजी महाराज समजलेलेच नाहीत...त्याच्याच काळात समजले नाहीत तर आता कोठुन?
कोण आहे हा गोतिये? काय अभ्यास आहे याचा शिवाजीचा? दंतकथांना आधार मानत भवानी तलवार देते हे शिल्प उभारायचा त्याचा हेतु काय आहे? कोण आहे त्याच्या मागे? कोणी दिली या महामानवाला लोहगांवला जागा? काय संबंध आहे शिवाजी महाराजांचा वेदांशी? फक्त राज्याभिषेकापुरता...आणि तत्कालीन सामाजिक गरज म्हणुन...एरवी...त्यांनी कोणती वैदिक आद्न्या पार पाडली? आणि हा गोतिये म्हणे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारत त्या शिवस्रुष्टीत वेदांचे माहात्म्य सांगनार आहे...
माझे स्पष्ट मत असे आहे कि शिवाजी अपर्हुत करण्याचा हा नवा डाव आहे. लेनमार्फत जे उरले ते या गोतियेमार्फत पुर्ण करायचा निंद्य हेतु आहे. यांनी शिवाजी वैदिक बनवण्याचा डाव घातला, तसा सतत प्रयत्न केला आणि आता एका पाश्चात्याचे (जो मुळात कोण आहे, त्याची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची लायकी सोडता त्याचा हेतु काय आहे...हे न कळता. याने कोनत्या विद्यापीठात वेदांचे आणि शिवकालीन इतिहासाचे अध्ययन केले?) पण एक पाश्चत्य शिवमंदिर उभारतो या फुका अभिमानापोटी कवतुकाचे फटाके उडवणारे सावध होणार नाहीत याची मला जाणीव आहे. लेनने जे केले त्याची ही पुढची पायरी आहे. जमले तर बदनाम करा...नाहीच जमले तर देवत्व देवुन मोकळे व्हा आणि विसर्जित करुन टाका...गणपतीला नाही का दहाव्या दिवशी पाण्यात टाकुन देत?
हा गोतिये कोण आहे हे प्रथम पहायला हवे त्याखेरीज त्याच्या ख-या प्रेरणा लक्षात येणार नाहीत.
हा फ्रांसिस गोतिये नसुन फ्रन्कोइस गोतिये आहे. हा माणुस मुळचा फ्रेंच. भारतात तो गेली तो आता नुसता भारतीय नाही तर स्वत:ला हिंदु समजतो. त्याचे वडील एक चित्रपट दिग्दर्शक होते. हिंदु धर्माच्या ओढीपोटी तो भारतात आला. पोंडिचेरी येथील आश्रमात रहत असतांना ध्यानधारणेचे धडे गिरवत तो पत्रकारिताही करु लागला. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली असुन "अराईज ओ इंडिया" हे त्याचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याची विस्त्रुत माहिती (व त्याचे लेखही)http://www.francoisgautier.com या वेबसाइटवर आहे. त्यातील त्याचे लेख वाचले कि त्याची विचारधारा कळते. तो कट्टर हिंदुत्ववादी असुन दलित व इस्लामविरोधात आहे. महात्मा गांधींबद्दल संघाला असेल नसेल तेवढा द्वेष याच्या मनात भरलेला आहे हे स्पष्ट होते. याची स्वत:ची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची योग्यता नाही, म्हणजे त्याच्या मागे कोणत्या फ्यसिस्ट शक्ती उभ्या आहेत हे शोधणे क्रमप्राप्त ठरते.
बहुजनीय महात्म्यांना असे नाही जमत तर तसे संपवा असा नवा उद्योग गेली अनेक शतके सुरु आहे. लेनमार्फत शिवाजी महाराजांचे पित्रुत्व हिरावण्याचा घाट घातला गेला होता...आता त्यांचे कर्तुत्व हिरावण्याचा घाट घालण्यात आला आहे ही अत्यंत नेषेधार्ह घटना आहे. शिवाजी महाराज पुज्य आहेत त्याचा असा अर्थ नाही कि त्यांना देवत्व देत कर्मकांडांच्या बंदिस्ततेत अडकवावे. हा अधिकार यांना कोणी दिला? या मागे कोण आहेत? ते मानव होते...त्यांच्यात महत्ता होती आणि त्यांचे अनुकरण होवु शकते. एकदा देवत्व दिले कि शिवाजी महाराजांच्या एकाही पराक्रमाला खरा अर्थ रहात नाही, कारण ती दैवी घटना बनते. मानवी प्रयत्नांचे खरे महात्म्य संपते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे या गोतियेक्रुत मंदिराचा, शिवाजीमहाराजांना देवत्व देण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणुन पाडला पाहिजे...नाहीतर मंदिर होईल, तेथे पुजारी...बडवे रुजु होतील, पुजा...नवस सायास सुरु होतील...अकराव्या अवतारात त्यांची गणना करुन टाकत नवे पुराण लिहिले जाईल...
माणसाची मानवी आदर्शे घेत परिस्थितीशी झुंझण्याची प्रेरणाच नष्ट होईल!
शिवाजीप्रेमींना तरी हे नक्कीच समजावे...आणि हा गोतिये... त्याचा आणि त्याच्या सर्वच हितचिंतकांचा निषेध करावा ही अपेक्षा...!
------संजय सोनवणी
Friday, November 4, 2011
Subscribe to:
Posts (Atom)
Linguistic Theories
The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...