ऐतिहासिक महामानवांना दैवी अवतार वा देवाचाच दर्जा देण्याचा भारतीय वैदिक उध्योग पुरातन आहे. राम-क्रुष्ण या मानवी व्यक्तिमत्वांना अवताराचा दर्जा देवुन बराच काळ उलटला आहे. बुद्ध तर विष्णुचा दहावा अवतार म्हणुन पुराणकारांनी प्रसिद्धच करुन ठेवला. महावीराला मात्र थोडे दुरच सारले...कारण त्याने निर्माण केलेल्या धर्माचा यांना फटका विशेष बसला नसावा. गत सहस्त्रकात शिवाजी महाराज झाले. त्यांना आधी शिवाचा अवतार व नंतर आधुनिक शंकराचार्यांनी विष्णुचा अवतार ठरवण्याचे धोरण राबवले. राजाराम महाराजांनीच पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर समुद्रतटकिनारील किल्ल्यात बनवले असे सांगण्यात येते...पण त्या मंदिरातील शिवमुर्ती श्मश्रु रहित आहे आणि आम्ही दाढीखेरीज शिवाजी महाराजांची कल्पनाही करु शकत नाही. त्यामुळे जशी आम्ही दाढीखेरीज शिवाजीमहाराजांची कल्पना करु शकत नाही तसेच जटाविरहीत पण स्म्श्रुधारी शिवाचीही कल्पना करु शकत नाही. त्यामुळे राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर हे शिवाचे होते कि शिवाजीमहाराजांचे हा प्रश्न उपस्थित होतो.
दै. सकाळ या दैनिकातील ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. शिर्षक आहे "फ्रेंच अभ्यासक उभारतोय शिवस्रुष्टी". या बातमीत म्हटलेय कि फ्रांसिस गोतिये नामक फ़्रेंच अभ्यासक शिवैतिहासाने एवढअ प्रभावित झालाय कि त्याने लोहगांव येथे पाच एकरांत शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले असुन पुढील टप्प्यात त्यांच्या पराक्रमांची माहिते देणारे संग्रहालय उभारायला सुरुवात केली आहे. या पाच एकरांच्या संग्रहालयात वेदांचे महत्व सांगणारी विविध शिल्पे, चित्रे, दुर्मिळ साहित्य या माध्यमातुन संपुर्ण भारतीय संस्क्रुती दाखवली जाणार आहे.
खरे तर कोणालाही तसा आनंद वाटायला हरकत नाही कि एक परकीय माणुस शिवस्रुष्टी उभारत आहे. त्याला वैदिकत्वाची जोड मिळत असल्याने तर तो आनंद काही समाजघटकांत अद्वितीय असेल यात शंका नाही.
पण माझे प्रश्न आहेत. या शिवमंदिरात शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणा-या आईभवानीचे पहिले ब्रोंझ शिल्प उभारले आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला तो दैवी शक्तीने याचे हे शिल्प म्हनजे प्रतीक आहे आणि जो फ्रांसिस गोतिये ज्या संस्क्रुतीतुन आला आहे त्या सआंस्क्रुतीत हे बसत नाही हे उघड आहे. शिवाजी महाराजांनी जोही काही पराक्रम गाजवला असेल तो त्यांच्या स्वकर्तुत्वाने नव्हे तर दैवी शक्तीने असे सुचवण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि त्याचे कवतुक करावे अशी दुर्भावना सुचावी हे आमचे दुर्दैव आहे.
गोतिये यांना एवढेच शिवप्रेम आहे तर हीच स्रुष्टी त्त्यांनी त्यांच्या मायभुमीत निर्माण करायला हवी होती. कधीकाळी योग आला तर आम्हीही फ्रांसला भेट देवुन त्यांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचे आम्ही प्रवासवर्णनात कौतुक केले असते.... पण येथे, याच पुण्यात ज्या पुण्यात दादोजीवरुन नुकताच वाद झाला त्याच पुण्यात आता शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याचे काय कारण? शिवाजीमहाराजांचे अवमुल्यन करणारे शिल्प वा स्रुष्टी सहन केली जावु शकत नाही.
पण येथील मुठभर वर्गाला पाश्चात्य लोकांबद्दल अधिकच प्रेम असते. येथे जीवनभर शिवप्रेमाबाबत जागे असतात ते निंद्य ठरवले जातात. जे शिवाजी महाराजांच्या आरत्या ओवाळण्यात मागे पडत नाही असे दाखवतात त्यांचे शिवप्रेम हे नेहमीच बेगडी असते. यांना शिवाजी महाराज समजलेलेच नाहीत...त्याच्याच काळात समजले नाहीत तर आता कोठुन?
कोण आहे हा गोतिये? काय अभ्यास आहे याचा शिवाजीचा? दंतकथांना आधार मानत भवानी तलवार देते हे शिल्प उभारायचा त्याचा हेतु काय आहे? कोण आहे त्याच्या मागे? कोणी दिली या महामानवाला लोहगांवला जागा? काय संबंध आहे शिवाजी महाराजांचा वेदांशी? फक्त राज्याभिषेकापुरता...आणि तत्कालीन सामाजिक गरज म्हणुन...एरवी...त्यांनी कोणती वैदिक आद्न्या पार पाडली? आणि हा गोतिये म्हणे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारत त्या शिवस्रुष्टीत वेदांचे माहात्म्य सांगनार आहे...
माझे स्पष्ट मत असे आहे कि शिवाजी अपर्हुत करण्याचा हा नवा डाव आहे. लेनमार्फत जे उरले ते या गोतियेमार्फत पुर्ण करायचा निंद्य हेतु आहे. यांनी शिवाजी वैदिक बनवण्याचा डाव घातला, तसा सतत प्रयत्न केला आणि आता एका पाश्चात्याचे (जो मुळात कोण आहे, त्याची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची लायकी सोडता त्याचा हेतु काय आहे...हे न कळता. याने कोनत्या विद्यापीठात वेदांचे आणि शिवकालीन इतिहासाचे अध्ययन केले?) पण एक पाश्चत्य शिवमंदिर उभारतो या फुका अभिमानापोटी कवतुकाचे फटाके उडवणारे सावध होणार नाहीत याची मला जाणीव आहे. लेनने जे केले त्याची ही पुढची पायरी आहे. जमले तर बदनाम करा...नाहीच जमले तर देवत्व देवुन मोकळे व्हा आणि विसर्जित करुन टाका...गणपतीला नाही का दहाव्या दिवशी पाण्यात टाकुन देत?
हा गोतिये कोण आहे हे प्रथम पहायला हवे त्याखेरीज त्याच्या ख-या प्रेरणा लक्षात येणार नाहीत.
हा फ्रांसिस गोतिये नसुन फ्रन्कोइस गोतिये आहे. हा माणुस मुळचा फ्रेंच. भारतात तो गेली तो आता नुसता भारतीय नाही तर स्वत:ला हिंदु समजतो. त्याचे वडील एक चित्रपट दिग्दर्शक होते. हिंदु धर्माच्या ओढीपोटी तो भारतात आला. पोंडिचेरी येथील आश्रमात रहत असतांना ध्यानधारणेचे धडे गिरवत तो पत्रकारिताही करु लागला. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली असुन "अराईज ओ इंडिया" हे त्याचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याची विस्त्रुत माहिती (व त्याचे लेखही)http://www.francoisgautier.com या वेबसाइटवर आहे. त्यातील त्याचे लेख वाचले कि त्याची विचारधारा कळते. तो कट्टर हिंदुत्ववादी असुन दलित व इस्लामविरोधात आहे. महात्मा गांधींबद्दल संघाला असेल नसेल तेवढा द्वेष याच्या मनात भरलेला आहे हे स्पष्ट होते. याची स्वत:ची शंभर कोटी रुपये खर्च करण्याची योग्यता नाही, म्हणजे त्याच्या मागे कोणत्या फ्यसिस्ट शक्ती उभ्या आहेत हे शोधणे क्रमप्राप्त ठरते.
बहुजनीय महात्म्यांना असे नाही जमत तर तसे संपवा असा नवा उद्योग गेली अनेक शतके सुरु आहे. लेनमार्फत शिवाजी महाराजांचे पित्रुत्व हिरावण्याचा घाट घातला गेला होता...आता त्यांचे कर्तुत्व हिरावण्याचा घाट घालण्यात आला आहे ही अत्यंत नेषेधार्ह घटना आहे. शिवाजी महाराज पुज्य आहेत त्याचा असा अर्थ नाही कि त्यांना देवत्व देत कर्मकांडांच्या बंदिस्ततेत अडकवावे. हा अधिकार यांना कोणी दिला? या मागे कोण आहेत? ते मानव होते...त्यांच्यात महत्ता होती आणि त्यांचे अनुकरण होवु शकते. एकदा देवत्व दिले कि शिवाजी महाराजांच्या एकाही पराक्रमाला खरा अर्थ रहात नाही, कारण ती दैवी घटना बनते. मानवी प्रयत्नांचे खरे महात्म्य संपते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे या गोतियेक्रुत मंदिराचा, शिवाजीमहाराजांना देवत्व देण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणुन पाडला पाहिजे...नाहीतर मंदिर होईल, तेथे पुजारी...बडवे रुजु होतील, पुजा...नवस सायास सुरु होतील...अकराव्या अवतारात त्यांची गणना करुन टाकत नवे पुराण लिहिले जाईल...
माणसाची मानवी आदर्शे घेत परिस्थितीशी झुंझण्याची प्रेरणाच नष्ट होईल!
शिवाजीप्रेमींना तरी हे नक्कीच समजावे...आणि हा गोतिये... त्याचा आणि त्याच्या सर्वच हितचिंतकांचा निषेध करावा ही अपेक्षा...!
------संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक
शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
यात अवमूल्यन कसे ? कळू शकेल ?
ReplyDeleteउलट हा तर सम्मान आहे .
आणि हो सकाळला कशाला त्यांचा बायो डेटा प्रसिद्ध करायला सांगताय ?
ReplyDeleteतुम्ही इतके मोठे लेखक असून तुम्हाला साधे गुगल वापरता येत नाही का ?
त्यांचा बायो डेटा तर त्यांच्या वेबसाईटवर आहेच .
अतिशय प्रसिद्ध पत्रकार व लेखक आहेत . हिंदू धर्म व बौद्ध संस्कृती व भारतीय दर्शनाचे गाढे अभ्यासक आहेत .
राजीव गांधी , अडवाणीजी , इंद्रकुमार गुजराल तसेच बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्याबरोबर फ़ोटो आहेत ..
http://www.francoisgautier.com/en-art/about-fr.html
आणि कालगांवकर साहेब, महत्वच्या प्रश्नाला क्रुपया बगल देवु नका...शिवाजीला भवानी तलवार देते या शिल्पाबद्द्लचे आपले मत सांगा...
ReplyDeleteते काल्पनिक शिल्प आहे ...
ReplyDeleteती महाराजांची वैयक्तिक श्रद्धा होती .
परंतु यात नेमके काय चुकीचे आहे . भोसले घराण्याचे कुलदैवत आहे तुळजाभवानी त्यांनी तलवार दिली यात गैर काय अनेक असे शिल्प व चित्र अगोदरच आहेत ..
शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली...म्हणुन महाराजांनी पराक्रम गाजवले...अन्यथा ते शक्य नव्हतेच...अनेक चित्रे आधी होतीच...(?) शिल्पे??????? ठीक आहे आपण म्हणता तर असतीलही...म्हणजे मानवी प्रद्न्येची महत्ता काहीच रहात नाही...नाही काय? आपण वर्तमानात वा नजिकच्य भविश्ढ्यकाळात भवानीमातेने कोणातरी पुत्राहाती तलवार द्यावी अशीच वाट पहात बसुयात...तोवर जय राम क्रुष्णहरीचा जप करुयात!
ReplyDeleteआजच सकाळ वाचला आणि डोक्यात भिनला पण. हे सकाळचे काय चालले आहे तेच काळात नाही. त्याचे मालक पवार आहेत याच्यावर विश्वास बसत नाही....साम टीवी वर पण २४ तास हिंदू धर्माचा आणि वेदाचा प्रसार चालू असतो.....सकाळ दैनिक फक्त सदाशिव पेठे करता आहे कि काय असा संशय येतो........असो खूप चान लिहिले आहे सर.
ReplyDeleteभवानी मातेने दिलेली तलवारीची शिल्पे व चित्रे मी अनेक वेळा पाहिलेली आहेत
ReplyDeleteअहो सोनावणी साहेब तुम्ही आम्हाला शिवराय सांगावेत एवढी तुमची कुवत व वकुब नाही आहे .
शिवरायांची प्रज्ञा काय होती ते रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहलेल्या पत्रात चांगले वर्णवले आहे .
"त्याहूनी करावे विशेष , तरच म्हणावे पुरुष "
या ओळींचा अर्थ समजतो का ?
जरा अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ऎका .
http://www.esnips.com/displayimage.php?album=&cat=0&pid=5221926
ते ऎकल्यावर आम्हाला प्रज्ञातर कळालीच पण त्याच प्रज्ञेपासून प्रेरणा घेऊन कसे कार्य करायचे तेसुद्धा आम्हाला बरोबर समजले .
आम्ही आमच्या जीवनात आदर्श बाळगून आपपल्या कामात त्या प्रेरणेने कार्य करायचा प्रयत्न करतच असतो .
तलवार देण्याची गरजच काय तलवार तर दिलेलीच आहे राष्ट्रभक्तीची , राष्ट्रसेवेची .
उगा नाही ते शोधून त्यावर वाद निर्माण करुन वितंडवाद करणे म्हणजे राष्ट्रसेवा व राष्ट्रप्रेम काय ?
मला माझे भविष्य घडवण्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नकोय . माझ्या जीवनात अनेक प्रेरणास्थाने मला समोर दिसलेली आहेतच .
ते सल्ले तुम्ही ज्यांच्यासाठी प्राण देण्यास आतुर आहात अशा रामटेकेला द्या . जो उठसूठ शिवराय , मासाहेब , संत तुकाराम यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करत असतो . त्याच्यावर केसेस करा किंवा विरोध करा तिथे तुमची जीभ नेहमी लुळी पडलेली असते , यावरुनच तुमचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम तर सिद्ध होतेच तसेच तिथे तुम्हाला त्याचे आविष्कार स्वातंत्र्य आठवते .
तेच आविष्कार स्वातंत्र्य इतरांनाही असते हे लक्षात ठेवावे .
kunabaddalahi lihitana va boltana kalji ghetali pahije kalgaonkar, snajy sonavanichi kuvat va vakub kadhu naka, thode vachan vadhava mahnaje tumchyahi dokyat prakash padel
Deleteसंजय सोनावणी सरांबद्दल बोलताना विचार करून बोला....त्यांची कुवत तुम्ही सांगण्याची गरज नाही..
Deleteकाय आहे कालगांवकर साहेब, ब-याच गोष्टी खरोखरच आपल्याकडुन समजावुन घेतल्याच पाहिजेत. पण काय आहे, डोके बत्थड आहे ना...काही गोष्टी डोक्यात घुसत नाहीत हे खरे. पण तुम्ही तरी विद्वान असाल आणि मी वर लेखात काय लिहिले आणि का लिहिले हे समजला असाल असे वाटले होते. येथे प्रश्न एकच आहे जर शिवाजी महाराजांचे सर्व कर्तुत्व भवानीने दिलेल्या तलवारीकडे जात असेल तर मानवी स्वातंत्र्याला काही अर्थ असतो कि नाही? वेदांचा आणि शिवाजी महाराजांचा नेमका संबंध काय? म्हणजे शिवाजी कोणत्यातरी दैवी प्रेरणांनी वाहवत जाणारा नि यशापयश दैवी देनगी म्हणुन पचवत जाणारा पुरुष होता कि काय? ते संभाजी महाराजांचे रामदासांना वा रामदासांनी लिहिलेले कथित पत्र सांगु नका कारण त्यांना कसलाही ऐतिहासिक आधार नाही. रामदासांना लिहिलेल्या (दिवाकरस्वामी मार्फतच्या) पत्रात संभाजीनीही त्यांच उल्लेख रामदास गोसावि असा केलेला आहे. त्यामुलॆ फालतु गुरुपदाच्या काळज्या आपण वाहने सोडावे. रामटेकेंचा मुद्दा आपण येथे का आणला हे समजले नाही. तुम्हाला जसे स्वातंत्र्य आहे तसे त्यांनाही आहे. येथे रामटेकेंचा प्रश्न नसुन गोतियेचा आहे. पण तुम्ही अत्यंत विकारी आणि अविचारी महितीवर लिहुन अकारण तुमच्याबद्दलचा वैचारिक आदर कमी करत आहात. शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे ना...हरकत नाही,,,जातील तेथेही लोक नवस करायला. बळी द्यायला. होवुद्यात तेही एक तीर्थस्थान...कंदुरी करत म्हणुयात ...जय शिवाजी...जय भवानी...अजुन काय?
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteHimanshuji, pls try to understand, why this news was hidden till first phase of the temple was completeted? I too am worshipper of Shivaji, but in human form, not in divine form. And if at all we the Indian wanted to give Him divine form why we waited for a man who in fact is a fascist person? I simply cant understand pcyche of we the people. Pls read his boomk "Awaken O India" and you shall know his philosophy. I am not against praising Shivajio maharaj...but against making of nhim as a God...if it is done we have no real humane idol...thats my concern.
ReplyDeleteसंजय सर, तुमचा लेख वाचला. आनंद झाला महाराष्ट्राच्या दैवताच उदात्तीकरण एक परकीय माणुस करत आहे, हे पाहुन.पण सर तुम्ही जो भवानी मातेने तलवार दिल्याचा मुद्दा मांडत आहात, ह्यात अंध्श्रद्धा पसरविणे ही गोष्ट नसुन,महाराजांना देवा कडुन प्रेरणा आणि आशिर्वाद मिळाले असा ही घेतल्या जाऊ शक्तो.वाटल तर आपण त्या शिल्पा समोर अशी एक पाटी ही लावू शकतो जेणेकरुन महाराज हे दैवी चमत्कार वगैरे होते असा भ्रम लोकांमध्ये पसरवू नये.फ़्रांस मध्ये सुद्धा जोन ऑफ़ आर्क चे असे शिल्प आहेत की देवदूत तिला आशिर्वाद वगैरे देत आहेत. त्याने तिच्या बलिदानाचे आणि तिच्या कर्तृत्वाचे श्रेय थोडेच आपण त्या देवदूतांना देतो.ते तसेच राहते.हे फ़क्त लोक भावनेला आदर देण्याचे प्रतीक आहे की देव सुद्धा तिच्या योग्य कार्याच्या मागे आहेत ,तसेच महाराजांच्या बाबतीत ही लागू पड्ते. ही त्या पुतळ्याची लिंक:http://www.maidofheaven.com/joanofarc_pictures11c.asp
ReplyDeleteमाझे असे मत आहे. काही चुकल्यास क्षमस्व....
Sanjay Sir, I too praise him as my icon and don't want to give him any godly image. I don't know the philosophy of the above person , so its not right from my part to comment on things unknown to me.I'd definitely read the book given by you.I re posted the note as it was deleted by my younger brother .Sorry for that.
ReplyDeleteशिवाजी महाराजांचे सर्व कर्तुत्व भवानीने दिलेल्या तलवारीकडे जात असेल तर मानवी स्वातंत्र्याला काही अर्थ असतो कि नाही?
ReplyDelete=================================================
शिवरायांचे कर्तृत्व झाकोळण्याचा कसा प्रयत्न होतोय ते कळेल का ? भवानी तलवारीचा शिवरायांना दृष्टांत झाला अशी अख्यायिका आहे . बर्याच ठिकाणी हे वाचनात आलेले आहे .
शिवाजी महाराज हे आई भवानीचे निस्सम भक्त होते हे सत्य आहे .
मुळात देवावर भक्ती म्हणजे प्रयत्नात केलेली कसर किंवा श्रेय झाकोळणे नसते .
शिवरायांचे कर्तृत्व हे काय आहे ते समर्थ रामदासांचे पत्र जर तुम्ही चुकून वाचले असेल तर कळेल . शिवरायांच्या कार्याची वैशिष्ठ्ये लिहली आहेत त्यामध्ये .
कवी भूषणाने लिहलेल्या काव्यात जसे रावणाला राम , कंसाला कृष्ण तसे म्लेच्छांना शिवराय असे लिहले आहे यातही शिवरायांचे कर्तृत्व व्यवस्थितपणे लिहलेले आहेच .
स्वत: संभाजीराजांनी बुद्धभूषणम मध्ये शिवरायांचे कर्तृत्व सुद्धा अधिरेखित केलेले आहेच .
ते सोडा , निकोलस मनुची (स्टोरिया द मॉर्जर) , फ़्रान्कोसिस बर्नियर (ट्रॅव्हल्स इन मोगल इंडीया ), जॉन फ़्रायर (द न्यू अकाऊंट ऑफ़ इस्ट इंडीया अॅण्ड पर्शिया )यातही युरोपीय वाटसरुंनी फ़ारच छान वर्णन केलेले आहे शिवरायांच्या कर्तृत्वाचे .
अहो इतकेच काय , पातशहानामा , आलमगीरनामा सारख्या पुस्तकातही शिवरायांच्या कर्तृत्वाची कशी जरब होती हे दिसून येतेच .
उत्तरकालीन अनेक बखरी तसेच शकावलींमध्येसुद्धा शिवरायांचे कर्तृत्व नमूद केलेले आहेच .
शिवरायांची अनेक पत्रे त्याची साक्ष देतातच .
अनेक इतिहासकारांनी शिवरायांचे कर्तृत्व तसेच त्यावरचे विश्लेषण लिहलेलेच आहे .
त्यामुळे एका पुतळ्यामुळे शिवरायांचे श्रेय हिरावून घेतले जात असेल अशी आपली भिती म्हणजे केवळ फ़ोबिया आहे असे वाटत आहे .
मंदीरे म्हणजे वैदीकच असतात व वेदांमधील फ़क्त चुकीच्या प्रथांचा (जातीयवाद किंवा स्त्री पुरुष भेद )सतत वर्षाव केला जातो हा समज तर अत्यंत हास्यास्पद आहे . महाराष्ट्रातील अनेक मंदीरांमधून चांगले उपक्रमही होत असतात . तुकाराम महाराजांची भजने सुद्धा गायली जातात हे लक्षात घ्यावे .
मागे तुम्हीच म्हणाला होता की सर्व मंदीरे वैदीक नसतात व पंढरपुरचे मंदीर हे वैदीक नाही . जर असे असेल तर तुम्ही हे मंदीर वैदीक नाही असे समजावे . प्रश्नच संपेल .
सत्य हे आहे की शिवाजी महाराज हे धर्माभिमानी हिंदू होते हे कोणही नाकारु शकत नाही . हिंदुस्थानात विशेषत: हिंदूंमध्ये लोकप्रिय व्यक्तींचे मंदीर उभारणे यात काही विशेष नाही . माझ्या घराजवळ भारतमातेचे मंदीर आहे . पुण्यात रामकृष्ण परमहंसाचे मंदीरही आहे .
तामिळनाडूत प्रसिद्ध कलाकारांचे मंदीरसुद्धा आहेत जसे रजनीकांत व अभिनेत्री खूशबू (ती तर धर्माने मुस्लीम आहे तरीसुद्धा ...) .
राजेश खन्नाचे फ़ोटो तरुणी देव्हार्यात लावत व आरत्या करत अशा मी सुरस कथा ऎकत अनेकवेळा ऎकत असतो .
स्व. इंदीरा गांधी यांचेही मंदीर आहे असे म्हणतात .
चाहत्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीचे पुतळे , मंदीरे उभारणे ही काही पहीली घटना नाही .
तुम्ही त्यांना कोण्या एका व्यक्तीला देव मानावे याची जबरदस्ती नाही . पण जर एखादा देवत्व देत असेल तर त्यात नेमके अयोग्य आहे असे मला वाटत नाही . मी फ़ार तर फ़ार त्याला अड्युलेशन म्हणू शकेन . अपमान वगैरे नाही
साहेब, प्रथम म्हनजे आपण मला काय म्हणायचे होते ह समजलाच नाहीत. देअव्त्व मानवाला देवु नये हे माझे मत आहे. युमचे मत समजा विरोधी आहे...तर तुम्ही शिवाजीचे मंदिर का बांधले नाहीत? तुमच्या देव्हा-यात शिवाजीचा छोटा का होईना पुतळा/मुर्ती असेल अशी मी आशा करतो. शिवाजी महाराजांचे कर्तुत्व अचाट होते...पण ते दैवी क्रुपेने होते कि त्यांच्या व्यक्तिगत पराक्रमाने...हा खरा प्रश्न होता...पण आपण त्याचे नेमके उत्तर देत नाही. शिवाजी महाराजांची मंदिरे उभारुन त्यांच्या कर्तुत्वाचे खरे गुणगाण होणार असेल तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु गोतियेक्रुत या मंदिराला मात्र विरोध केला जाणार याची नोंद घ्यावी. माझ्या मते उदात मानवी कर्तुत्वांना दैवत्व देवुन त्यांना मंदिरांत/अवतारांत बंदिस्त करणे हा घोर सामाजिक/सांस्क्रुतिक आणि धार्मिक अपमान आहे आणि कायदे याबाबत पुरेसे सक्षम आहेत.
ReplyDeleteगोतिये हा कट्टर हिंदुत्ववादी आहे. तो स्वत:ला नुसता हिंदु म्हणवुन थांबत नाही तर बाबरी मशिदीच्या पतनाबद्दल हिंदुत्ववाद्यांच्या बाजुने लिहितो. हा दलितांच्या व मुस्लिमांच्या विरोधात आहे असे त्याच्याच लेखावरुन स्पष्ट होते. त्याच्या धिक्रुत वेबसाईटला भेट द्यावी आणि ठरवावे. http://www.francoisgautier.com
ReplyDeleteकेवळ पाश्चात्य आहे (आता तो भारतीय आहे) म्हणुन गौरव करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. शिवरायांना देव बनवण्याचा प्रयत्न तो का करत आहे हे आता लक्षात यायला हरकत नाही. असे धर्मांतरीत कोणत्या वैदिक गोटाचे असतात हे वेगळे सांगायची गरज नाही. उद्या फुले-शाहु-आंबेडकरांची मंदिरे बनवण्यात आली तरी आश्चर्य वाटणार नाही एवढ्या पद्धतशीरपणे हे क्रुत्य चालु आहे. याचा निषेध सर्वांनी करणे आवश्यक आहे.
संजय सोनावणीसाहेब ,
ReplyDeleteमी दिलेली समर्थ रामदास , कवी भूषण , बुद्धभूषणम , युरोपिय वाटसरु , बखरी , शकावल्या , आलमगीरनामा , पातशहानामा , विविध ऎतिहासिक ग्रंथ यामध्ये शिवरायांचे कर्तृत्व हे मानवी स्वरुपात सांगितले आहे की दैवी कृपेने ? माहीत नसल्यास पुन्हा खात्री करण्याची तसदी घ्यावी .
मी शिवरायांना कशा स्वरुपात मानवंदना द्यावी हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे . आपल्या माहीतीसाठी , सरस्वती पूजनामध्ये माझ्याकडे असलेल्या अनेक शिवचरित्रांचे मी पूजन करतो . शिवरायांच्या प्रतिमेची पूजा अनेक दशके आमच्या घरात सुरु असतेच .
शिवरायांच्या कर्तृत्वाचे खरे गुणगाण हे फ़क्त चिकित्सक व नास्तिक व्यक्ती करतात यावर माझा विश्वास नाही .
गोतियेकृत शिवमंदीर काय संपूर्ण भारतात असलेल्या विविध शिवाजी महाराजांच्या मंदिरांना तुमचा विरोध असला तरी हरकत नाही जी प्रथा छत्रपती राजाराम महाराजांनी सुरु केलेली आहे त्याबद्दलच्या विरोधासाठी करण्यासाठी शुभेच्छा .
मी फ़क्त इतकेच सांगू इच्छितो हा अपमान तर नाहीच उलट ही शिवभक्तांनी त्यांच्या आवडत्या स्वरुपात दिलेली मानवंदना आहे असे माझे मत आहे व अगदी नरहर कुरंदकर यांच्यासारख्या चिकित्सक इतिहास समीक्षकाची सुद्धा . आणि अर्थातच त्या गोष्टीचे त्यांना आविष्कार स्वातंत्र्य आहेच व त्यास कोणही रोखू शकत नाही .
बाकी जे दिवसाढवळ्या निर्लज्जपणे व अज्ञानीपणाने ऎकेरी उल्लेख करत असलेल्या गोष्टी आपणास अपमान वाटत नाहीत तर आविष्कार स्वातंत्र्य वाटतात , यासारखी दुसरी दांभिकता मी पाहिलेली नाही .
बाकी कोर्टकचेरी इत्यादी गोष्टीसाठी शुभेच्छा , तिथूनही जर काही झाले नाही तर राजकीय मत तयार करुन बहुमताच्या जोरावर या गोष्टी बंद पाडू शकता (हि जाता जाता टीप) .
धन्यवाद .... जय भवानी जय शिवराय ...
आपल्याही दैवी (कि दुर्दैवी?) मतांबद्दल आभार. सत्यनारायण पुजेप्रमाणेच शिवपुजा आपण सुरु करायला हरकत नाही. शिवाजी महाराजांना विष्णुचा ११ वा अवतार घोषित करावे...एक नवे शिवपुराणही आपण लिहिण्यास हरकत असण्याचे कारण नाही. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपणास आहेच आणि ते हिरावुन घेतले जाणार नाही. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सर्वच इतिहासकारांनी केला आहे, आपणास निषेधच करायचा असेल तर त्यांचाही करा. आम्ही राम-क्रुष्णाचा उल्लेख बहुवचनी करत नाही. बहुदा आपण करत असावात. शिवप्रतिमेला हार घालुन अभिवादन करणे आणि त्यांना देवत्व बहाल करत पुजा बांधणे यातील फरक आपणास कळु नये याचे नवल वाटते. समर्थ रामदासांबद्दल लिहित नाही कारण तो विषय नाही. भुषण हा कवि होता आणि काव्यात आलंकारिकता असते हे समजावुन घ्यावे लागते. बाकी काय वाचायची मी तसदी घ्यावी हे सांगण्यचे तसदी आपण घेतल्याबद्दल आभार.
ReplyDeleteअप्रतिम लेखं. बाकी संजय सरांची कुवत काढण्याची सध्यातरी कोणाची कुवतही नाही आणि कर्तृत्वही नाही.
ReplyDeleteआजपासून दोनशे वर्षांनी कदाचित एखादे कसाब-पुराण लिहिले जाईल. त्यात एक ब्रह्मराक्षस हिंदू साधूंना कसा छळत होता आणि त्याचा नाश करण्यासाठी कसाब अवतार कसा अवतीर्ण झाला याची सुरस आणि चमत्कारिक कथा असली तर आश्चर्य वाटू नये. जे लोक बुद्धाला आणि शिवाजीला अवतार ठरवू शकतात ते कोणालाही काहीही ठरवू शकतात.
ReplyDeleteचला, अफझल साहेब पीर बनले आता शिवाजी राजे देव बनतील. मग काही वर्षांनी एक पालखी प्रतापगडावरून लोहगावकडे येत जाईल आणि या ठिकाणी शिवाजी - अफझलखान यांची आध्यात्मिक भेट होऊन खानसाहेब परत प्रतापगडी रवाना होतील !
ReplyDeleteसंजय जी,
ReplyDeleteतुम्ही आस्तिक आहात का..हे आधी सांगा..?आस्तिक असाल तर कुठल्या देवावर विश्वास आहे...?
अजून एक प्रश्न शिवाजी महाराज आणि सगळे मावळे,
ReplyDelete"हर हर महादेव" म्हणून आरोळी का देत असत,लढाई च्या वेळी..?
जिजाऊ ह्यांची "आरती" शिवधर्म वाले "लग्न" आणि "धार्मिक" कार्यक्रमात म्हणाली जाती....त्याबद्दल आपले काय मत आहे..?
माझा शिवधर्माशी कसलाही संबंध नाही. मी आस्तिक आहे. व्यक्तीला देवत्व देणे मला सर्वस्वी अमान्य आहे. हर हर महादेव ही युद्धगर्जना होती आणि ती योग्यच आहे. धन्यवाद.
ReplyDeleteसंजय सोनवणी साहेबांचा हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस !
ReplyDeleteit's a legend buddy...it sounds rather poetic that Goddess handed over a sword to the king...lokanni tithe jaoon baLi dyavet kinva navas bolavet yasathi he mandir ubharle jaat aahe ase ajibaat vatat nahi...it's a museum of some kind...and it woukld take them several hundred years to turn it into typical mandir you are talking about
ReplyDeleteगर्जना होती पण का.....?कशा साठी..?
ReplyDeleteमहादेव हे देवच आहेत ना..?
आस्तिक आहात आणि दैव मनात नाही,तुम्ही आपल्या देवाला "नमस्कार" करता ना...?(कशा साठी..?)
माझ्या मते दैव तुम्हाला योग्य दिशा दाखवते आणि तुम्ही त्यावर चालणे हे तुमच्या हातात असते....
शिवधर्म बद्दल असे लेख लिहा की वर्तमानपत्रात...जिजाऊ ना देव केले जातंय हे लिहा की....??
ReplyDeleteकुणाकडून केले जातंय हे सांगायला नको.....
आणि माझ्या साठी शिवाजी राजे देव आहेत आणि किल्ले ही त्यांची मंदिरे,
पण तुम्ही ज्या पद्धतीने लेख लिहिला..
तो पूर्णपणे चुकीचा आहे..त्यात फक्त द्वेष दिसतो....
त्यापेक्षा त्यांनी मंदिरे म्हणजे "किल्ले" ह्यांचा बद्दल लिहा....
आम्ही तुम्हाला साथ देऊ..तिथे चालणारी गैरकृत्ये बंद झाली तर खूप बरे वाटेल महाराजांना...
शिवाजी महाराज का जिनकी सहायता से पराक्रम सफल हुआ वही हमारे मित्र हैं । जिन्होने शिवाजी महाराज का अपमान किया, राज्य हड़पा व हत्या की वे ही आज भी दुश्मनी निभा रहे हैं । दुश्मनी निभाने वालों के वंशजों से किसी अच्छे की उम्मीद करना व्यर्थ है । वे जो भी करेंगे षड्यंत्र के तहत ही करेंगे यही भारत का इतिहास है । सावधान ! निगाहें सतर्क रखो जीत सत्य की होगी। सनातन असत्य के साथ संघर्ष अटल है ।
ReplyDeleteशिवाजी महाराज का जिनकी सहायता से पराक्रम सफल हुआ वही हमारे मित्र हैं,उनके साथ कोण थे..?
ReplyDeleteसभी जातिके लोग भी थे...
आप जिनको दुश्मन कहते है......
उन्होंने "मराठा साम्राज्य" के "भगवे" झंडे को "अटक" तक ले गए थे...
कोण हा संजय सोनावनी? महाराजांना आम्ही कोणत्या रुपात पाहावे वा पाहू नये हे सांगणार्या ह्या पुस्तके लिहून पोटाची खळगी भरणाऱ्या अति सामान्य माणसाची लायकी काय? गोतीये यांनी ५० कोटी उभे केले आणी शिवश्रुष्टी उभारली. या स्वयंघोषित बुद्धीजीवी माणसाने त्याच्या मताप्रमाणे तसे काही करून दाखवावे, आम्ही अवश्य भेट देऊ...उठसूट नुसती टीका करणाऱ्या माणसा साठी आमच्या अस्सल सातारी भाषेत एक म्हण आहे...कुत्रं भूकं बोचा दुखं!!!
ReplyDeleteमनुष्यामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात. एक सुर असतो दुसरा असुर म्हणजेच एक विधायक कार्ये करतो आणि दुसरे विघातक कार्ये. आणि म्हणूनच एक देव असतो तर दुसरा राक्षस. आपल्या संस्कृतीमध्ये मनुष्य जेव्हा उत्तम कार्य करतो तेव्हाच तो देवत्वाला प्राप्त होतो. प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे देखील एकेकाळी मनुष्यमात्र होते. परंतु काही काळानंतर जेव्हा लोकांना असे लक्षात आले की पूर्वी असा एक राजा राम होऊन गेला तसा नंतरच्या काळात झाला नाही तेव्हाच लोकसहभागातून त्याचे सुरुवातीला पुतळे उभे केले आणि कालांतराने त्यांना देवत्व दिले गेले. आज प्रभु राम क्षत्रिय असून देखील आज सर्व धर्मातील लोक त्याची पूजा करतांना दिसतात. त्यांना देवळांच्या भिंतींमध्ये बंदिस्त करणे असा अर्थ नसून एक आदर्श म्हणून कायमस्वरूपी पूजण्याचे ठिकाण म्हणून बघावे लागेल. याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असणे पुढील पिढीसाठी आवश्यक आहे.
ReplyDeleteश्रीनिवासजी, सुर आणि असुर या शब्दांशी तुम्ही ज्या अर्थाने हे शब्द वापरले आहेत त्यांशी मी असहमत असलो तरी तुम्हाला चांगले आणि वाईट असे म्हणावेसे वाटतेय हे गृहित धरुन हा प्रतिसाद. महनीय व्यक्तींना देवत्व/अवतारत्व बहाल करणे ही भारतीय समाजाची एक मनोविकृती आहे. अन्य धर्मियांतही ती काही ना काही प्रमाणात सापडते हेही एक वास्तव आहे. पण आपले जरा जास्तच विशेष...विपूल, एवढेच. शिवाजी महाराजांमुळे देवतांच्या मांदियाळीत मग फक्त एकाने भर पडत नाही...पेशवे हे परशुरामाचे अवतार...त्यांचीही मंदिरे का नकोत? रामदास हे प्रत्यक्ष हनुमंताचे अवतार...त्यांचीही विपुल मंदिरे का नकोत? तुकाराम हे साक्षात विष्णुचे अवतार...त्यांची तशीही देहुत दशावतारी शिल्पे बनत आहेत असे ऐकुन आहे...मग बाबासाहेब आंबेडकरांची मंदिरे हिंदु उद्या का निर्माण करनार नाहीत? बुद्ध जर विष्णुचा अवतारच आहे असा हिंदुंचा दावा आहेच आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहेच तर मग त्यांचीही मंदिरे का नकोत? महात्मा गांधी तर मंदिरे निर्माण व्हायला अत्यंत योग्य व्यक्तिमत्व आहे. सारे जगच तसेही मानते कि त्यांना आणि म्हणतात कि यच्चयावत जगात सर्वाधिक पुतळे त्यांचेच आहेत! जगभर आहेत. सावरकरांची मंदिरे मग का नकोत? आणि रहिलेच एक...नथुरामाचीही मंदिरे हवीतच कि...तशीही तुरळक का होईना रावणाची मंदिरे आहेतच ना?
Deleteआपण मंदिरे आधी उभारुयात...त्शीही झोपड्यांत राहण्याची या भारतीय पामरांना सवय होतीच...फार तर नव्याने ती पुन्हा एकदा करुन घ्यावी लागेल.
श्रीनिवासजी, माझे म्हनने नीट समजावुन घ्या. व्यक्तींना एक माणुस म्हणुन जगु द्या आणि मरु द्या. त्याची एक माणुस म्हणुन चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य निर्विवाद आणि निरपवाद राहु द्यात. तसा म्हटला तर प्रत्येक इश्वरी अंशच असतो. तुम्हीही आहात...मीही आहे. कोणकडुन अधिक कार्य होते तर कोणाकडुन कमी...पण या कमी-अधिकतेचे कोनतेही अंतिम गणित नाही. फार तर त्याला आपण परिस्थितीचे अपत्य म्हणु शकतो. आज गांधी, शिवाजी, आंबेडकर, रामदास, तुकाराम...ते पार राम, कृष्ण, बुद्ध आणि महावीरही (आणि असे अनेक) इतिहासातील (त्या त्या जाती/विचारपंथियांना वाटणा-या) महनीय व्यक्ती या आज विशिष्ट मर्यादेतच रेलेव्हंट आहेत. आज धर्म आणि वैचारिकतेचे आयाम पुरेपुर बदललेले आहेत. मंदिरे बनवली म्हनजे गतकाळातील महनियांवर उपकार होत नसुन ते अपकारच आहेत. उद्याचे परिप्रेक्ष काय असतील हे कोणीही सांगु शकत नाही. रामाचा वंश लव-कुशाबरोबर संपला. कृष्णचा वंश त्याच्या डोळ्यादेखत नष्ट झाला. शिवाजी महाराजांची महत्ता दोन पिढ्यांतच मोगलांचे स्वामित्व मानत गमावुन बसली. पहिल्या बाजीरावाची इज्जत नानासाहेबाने काढली आणि अधोगती दुस-या बाजीरावाने केली. क्षमा करा...परखड लिहितोय...पण ते सत्य आहे. स्वता:च्याच पिढ्यांची जे नीट वैचारिक म्हणा कि दैवत्ववादी....रचना करु शकले नाहीत त्यांना देव बनवणे हा मानवी मनाचा मुढपणा आहे. नाकर्तेपना आहे.
मनुष्य हा मनुष्यच आहे असतो आणि त्याचे मनुष्यत्व हेच त्याच्या माणुस असण्याचा चिरंतन पुरावा असतो. आणि मनुष्यत्व हेच खरे वंदनीय असते...एवढेच...
उदय कालगांवकर :’सत्य हे आहे की शिवाजी महाराज हे धर्माभिमानी हिंदू होते हे कोणही नाकारु शकत नाही.’ ‘तामिळनाडूत प्रसिद्ध कलाकारांचे मंदीरसुद्धा आहेत जसे रजनीकांत व अभिनेत्री खूशबू (ती तर धर्माने मुस्लीम आहे तरीसुद्धा ...)’.
ReplyDelete=> आपली वरील सर्व प्रतिक्रीया वाचल्या. यावरुन आपली देवावरची अपार श्रद्धा दिसुन आली. ती तशीच राहुद्या आमचा त्यास अजिबात विरोध नाही.
आपण सांगितल्या प्रमाणे भवानी माता महाराजांची कुलदैवत होती. असे आपण म्हणता तर मला देवी कुलदैवत असणारी त्याकाळची काही घराणे उदाहरण म्हणुन देता काय? मला तर आजही कुलदैवत म्हणुन कोणतीही देवी आहे हे ऐकणेत व बघणेत नाही. इथे महाराष्ट्रात तर एखाद्या घराण्याचे लगभग सगळे ‘बा’ कुलदैवत आहेत, म्हणजे पुरुषच आहेत. जरा यावर आपला प्रकाश पडला तर आम्ही सुद्धा उजळुन निघु...
बरं भवानी मातेचे प्रताप, चमत्कार इतिहास वा पौराणिक कथां काय आहेत? मला माहीत नाहीत पण आपल्या महाराष्ट्रात आगाऊ, तोंडवळ, फटकळ, किंवा वेगळ्या अर्थाची पराक्रमी महीलांना भवानी उच्चारले जाते. ते काही हल्लीच्या काळात नाही तर 150 वर्षापुर्वीपासुनच उच्चारले जात आहे. याला कधी कोणी विरोध का करत नाही? तो केला पाहीजे, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानीस असे कोणासही विशेषण द्यावे, मला तर ते पटत नाही.
शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली आणि त्या दिव्य तलवारीमुळेच ते मोठमोठे पराक्रम गाजू शकले, अस सांगून सनातनी लोक हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे महत्व कमी करू पाहत आहेत, त्यांचे दैवीकरण करू पाहत आहेत. त्यामुळे मला इथे निक्षून सांगावेसे वाटते कि, शिवाजी महाराजांना देवी भवानीने तलवार वगैरे दिलेली नसून त्यांनी ती गोव्याच्या सावंतांकडून विकत घेतली होती, जी पोर्तुगीज बनावटीची होती... आणि अशा एकूण ६ तलवारी राजेंकडे होत्या. भवानी तलवार हि त्यापैकीच एक.
महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी 'भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही.
ज्या शिवरायांनी मनगटांच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले त्याला दैव वादाचे रूप देणे योग्य आहे का? ‘शिवरायांना देवी प्रसन्न झाली, म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले.’ असा प्रचार करणे योग्य आहे का?
मग एव्हढे सगळे पटत नसेल तर मग काय भवानी मातेने ती पोर्तुगीज बनावटीची चोरुन आणलेली तलवार महाराजांना भेट दिली काय? प्रत्येकाने वरील पुरावा जरूर तपासावा आणि आपल्या बुद्धीप्रमाणे नंतर प्रतिक्रीया नोंदवावी !
तुमच्या दुसर्या मुद्याकडे वळु, ‘महाराज धर्माभिमानी होते’. म्हणजे ते धर्म काटेकोर पणे पाळत असणार. ते धर्माभिमानी होते तर त्यांनी बलुतेदारांची फौजच उभारली नसती. तुमच्या माहीतीसाठी शिवताशिवत जातीभेद त्या काळात चालुच होता. चला काळाची गरज म्हणुन उभारली तर, जेंव्हा जेंव्हा त्यांचा त्या बलुतेदारांशी संबंध आल्यानंतर त्यांनी अंघोळ किंवा शुद्धीकरण करण्याचा पुरावा मला तर कुठे इतिहासात वाचणात आलेला नाही. तसा आपणास संदर्भ भेटल्यास जरुर सादर करावा...
तिसरे एक उदाहरण दिले आहे की, वास्तव मानवांचे मंदीर होणे वैदीकामधे नवीन नाही. व त्यासाठी ‘तामिळनाडूत प्रसिद्ध कलाकारांचे मंदीरसुद्धा आहेत जसे रजनीकांत व अभिनेत्री खूशबू (ती तर धर्माने मुस्लीम आहे तरीसुद्धा ...)’. अहो अतिशयोक्ती नाही परंतु सत्य कोणी नाकारत नाही सगळे द. भारतीय बर्याचदा बुद्धी गहाण ठेवणारे व एक कल्ली विचार करणारेच आढळतील. म्हणुनच तिथे टुकार सिनेमे देखिल हीट होतात. राजकर्तेवर एव्हढे सिनेमे बनुन देखिल त्या राजकर्त्यांची अचानक जमा झालेली संपत्ती यांना खटकत नाही.
एकुण काय संजय सोनावणीने जे तटस्थ राहुन प्रामाणिकपणे स्पष्ट मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही त्या द. भारतीयांचे अनुकरण करत दैववादा खत पाणी घालण्याचा प्रयत्न करत आहात...
--
सिद्धार्थ सरवदे
धैर्यशील जी ,
ReplyDeleteआपण काय म्हणत आहात ?
कोण हा संजय सोनावणी ?
आणि ते पुस्तके लिहून पोटाची खळगी भारतात हा जावैशोध तुम्ही कसा लावता ?
ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पुस्तके चापट नसतील ?कशावरून ?
आणि जो दुसऱ्याची विनाकारण लायकी काढतो त्याची लायकी समाज आपोआप ओळखतो -
संजय सोनवणी हे स्वतः हा ब्लोग लिहितात , त्यासाठी आपला वेळ आणि बुद्धी खर्च करतात -
आपली अतिशय उद्धत मते ते मोकळेपणे मांडतात - यापेक्षा मनाचा दिलदारपणा तो काय असतो ?
तुम्ही आमच्या राज्यात जर असे बेगुमान वक्तव्य केले असते तर या असंस्कृत पणाबद्दल
मासाहेबानीच कुणाचीही तमा न बाळगता आपल्याला हत्तीच्या पायाखाली दिले असते - म्हणजे तुमची धैर्यशीलता दिसली असती -
आपण खरेतर संजय साराची क्षमा मागितली पाहिजे !
आणि कुणालाही नालायक ठरवण्यापूर्वी त्याजागी आपले आई वडील आहेत अशी कल्पना करून लिहित जा !
जय !भवानी
धैर्यशील ,
ReplyDeleteअसला उद्दामपणा न केल्यास बरे होईल
आपली बुद्धी फारच कमी वाटत आहे लोकांना उद्धट बोलून स्वतःच्या आई वडिलांचे नाव बदनाम करण्यापेक्षा ,आपण या चर्चासत्रात भाग नाही घेतला तरी स्वतः महाराजही आपल्यास दोष नाही देणार -
अगदी समजा आपले बौद्धिक वय धरले - १-१-२- समज अजून थोडे जास्त - दहा वीस तीस चाळीस ,
तरी काय फरक पडणार ?
समजा वय चाळीस पन्नास धरले तरी - आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार ?
तात्पर्य आपले काम फुशारक्या मारत शिवाजीची चित्रे असलेल्या गाड्या उडवत फिरणे -
तात्विक चर्चा करण्याची आपली पोच नाही -
त्यामुळे गप्प बसावे - हळूहळू शिकायला मिळेल
अडाण्याचा गाडा आणि वेशीपुढे धाडा असे होणार नाही याची काळजी घ्या !
महाराज कसे वागले असते या परिस्थितीत , त्याचा विचार करा
जय शिवाजी , जय भवानी !
दैवतीकरण का करतात तेच कळत नाही. महाराजांना देव मानल तरच त्यांची महत्ता कळणार आहे का?
ReplyDeleteआम्हा गिर्यारोह्कांमध्येही काही लोक गुड मोर्निंग, गुड इविनिंग च्या धर्तीवर शिव सकाळ, शिव दुपार चा जागर करतात.
संजय सोनावणे यांजबरोबर सिद्धार्थ सरवदे यांचही अभिनंदन.. महाराजांचे गड, किल्ले व्यवस्थित जतन झाले पाहिजेत, तिथे चालणारे घाणेरडे धंदे बंद झाले पाहिजेत, शिवजयंतीच स्वरूप बदलल पाहिजे, येणा-या पिढीला शिवाजी महाराजांचा खरा इतिहासच कळायला हवा.. भावनिक, धार्मिक, कपोलकल्पित पुराण कथा नकोत.. त्यसाठी नवीन पुतळे, म्युझियम नकोत तर आहेत तेच गड , किल्ले जपले पाहिजेत.. आहे ती संपदा नाश पावणे चुकीच आहे.. आम्हला आणि येणा-या पिढीला गडावर जाउनच शिवाजी समजून घ्यायचे आहेत.. कुठल्या मंदिर आणि मठात नाही..
ReplyDelete