Friday, December 2, 2011

गोतिये तर जेम्स लेनचा बाप निघाला...

"I am a Frenchman brought up in the ideals of liberty, equality, fraternity and to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was..."

हे आहे फ़्रांकोइस गोतिये यांच्या डी. एन.ए. मधील त्यांच्या २३ नोव्हेंबर २०११ रोजी प्रकाशित झालेल्या माझ्या लोकमतमधील लेखाच्या प्रत्युत्तरातील विधान. यातील "who his father was" हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची जात (खरे तर वर्ण...शुद्र कि क्षत्रिय) कोणती याबाबत वाद होवु शकतो, किंबहुना इतिहासात तो वारंवार झाला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु नेमके कोण, हा वाद आजही जीवित आहे. शिवाजी महाराजांचे वडील कोण ही बाब हे ग्रुहस्थ त्यांच्याच धावत्या विधानात irrelevent मानतात, याचा अर्थ शहाजी राजे हे महाराजांचे वडील होते कि नव्हते याबाबत हे ग्रुहस्थ लेनच्या धावत्या स्ट्रीट जोकप्रमाणे वाद आहे असेच सुचित करतात, असे होत नाही कि काय?

शिवाजी महाराजांची जात, वडील व गुरु कोण होते हे गोतियेच्या द्रुष्टीने संदर्भहीन आहे (irrelevent). या विधानाचा अर्थ एवढाच होतो कि गोतियेनेही महाराजांचे पित्रुत्व संशयाच्या भोव-यात आणले आहे. या विधानात पित्रुत्वाचा संदर्भ का घेतला? जात आणि गुरु याबाबत वाद मान्य होवु शकतो, त्याबाबतची विधाने irrelevent असु शकतात. पण पित्रुत्वाचा वाद या गोतियेने निर्माण केला आहे आणि तो अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कि कोणाच्या सहज लक्षातही येवु नये.

या मतिमंद हिंदुत्ववाद्याला आणि त्याच्या पाठीराख्यांना मला सांगायचे आहे ते हे कि, हा इशारा समजा वा नव्या सांस्क्रुतिक लढ्याची सुरुवात, शिवाजी महाराजांना देव वा विभुती बनवणारे मंदिर माझ्या जीवात जीव असेतोवर होवु देणार नाही. काल मला एका कट्टर हिंदुत्ववाद्याचा प्रदिर्घ फोन आला होता. शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो आणि त्यांचे किल्ले ही मंदिरे आहेत तर मग या मंदिराला आक्षेप कशाला घेताय? माझे उत्तर हे होते कि जर एवढाच पुळका आहे तर मंदिर उभारायचा खर्च किल्ल्यांच्या डागडुजीसाठी केला असता तर तुमचे शिवप्रेम कळाले असते.

माझे स्पष्ट मत आहे कि या देशात खरे शिवप्रेमी अस्तित्वात नाहीतच. सगळे भोट आहेत आणि वांझ शिवप्रेम जागवत आहेत. अरे मर्दांनो, जरा आपल्या बाह्या सरसावा, बुद्धी पणाला लावा...हे काय चालले आहे? ..असले कडवे बाटगे हिंदुत्ववादी या देशाला कलंक आहेत.




Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...