Friday, December 2, 2011

गोतिये तर जेम्स लेनचा बाप निघाला...

"I am a Frenchman brought up in the ideals of liberty, equality, fraternity and to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was..."

हे आहे फ़्रांकोइस गोतिये यांच्या डी. एन.ए. मधील त्यांच्या २३ नोव्हेंबर २०११ रोजी प्रकाशित झालेल्या माझ्या लोकमतमधील लेखाच्या प्रत्युत्तरातील विधान. यातील "who his father was" हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. शिवाजी महाराजांची जात (खरे तर वर्ण...शुद्र कि क्षत्रिय) कोणती याबाबत वाद होवु शकतो, किंबहुना इतिहासात तो वारंवार झाला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु नेमके कोण, हा वाद आजही जीवित आहे. शिवाजी महाराजांचे वडील कोण ही बाब हे ग्रुहस्थ त्यांच्याच धावत्या विधानात irrelevent मानतात, याचा अर्थ शहाजी राजे हे महाराजांचे वडील होते कि नव्हते याबाबत हे ग्रुहस्थ लेनच्या धावत्या स्ट्रीट जोकप्रमाणे वाद आहे असेच सुचित करतात, असे होत नाही कि काय?

शिवाजी महाराजांची जात, वडील व गुरु कोण होते हे गोतियेच्या द्रुष्टीने संदर्भहीन आहे (irrelevent). या विधानाचा अर्थ एवढाच होतो कि गोतियेनेही महाराजांचे पित्रुत्व संशयाच्या भोव-यात आणले आहे. या विधानात पित्रुत्वाचा संदर्भ का घेतला? जात आणि गुरु याबाबत वाद मान्य होवु शकतो, त्याबाबतची विधाने irrelevent असु शकतात. पण पित्रुत्वाचा वाद या गोतियेने निर्माण केला आहे आणि तो अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कि कोणाच्या सहज लक्षातही येवु नये.

या मतिमंद हिंदुत्ववाद्याला आणि त्याच्या पाठीराख्यांना मला सांगायचे आहे ते हे कि, हा इशारा समजा वा नव्या सांस्क्रुतिक लढ्याची सुरुवात, शिवाजी महाराजांना देव वा विभुती बनवणारे मंदिर माझ्या जीवात जीव असेतोवर होवु देणार नाही. काल मला एका कट्टर हिंदुत्ववाद्याचा प्रदिर्घ फोन आला होता. शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो आणि त्यांचे किल्ले ही मंदिरे आहेत तर मग या मंदिराला आक्षेप कशाला घेताय? माझे उत्तर हे होते कि जर एवढाच पुळका आहे तर मंदिर उभारायचा खर्च किल्ल्यांच्या डागडुजीसाठी केला असता तर तुमचे शिवप्रेम कळाले असते.

माझे स्पष्ट मत आहे कि या देशात खरे शिवप्रेमी अस्तित्वात नाहीतच. सगळे भोट आहेत आणि वांझ शिवप्रेम जागवत आहेत. अरे मर्दांनो, जरा आपल्या बाह्या सरसावा, बुद्धी पणाला लावा...हे काय चालले आहे? ..असले कडवे बाटगे हिंदुत्ववादी या देशाला कलंक आहेत.




4 comments:

  1. अत्यंत उठवळ आणि सत्याचा विपर्यास करून वाचकांची दिशाभूल करणारा लेख. तुमच्याकडून अर्थातच ही अपेक्षा नव्हती. परंतू, लेखकाने लेखात तुमचा उल्लेख केल्याने तुम्ही आंधळेपणे लेखकावर टिका केली आहे.

    लेखकाच्या मूळ लेखाची सुरुवात जरी वाचली तर लेखकाला काय सांगायचे आहे ते कळेल. लेखातले पहिले २ परिच्छेद आहेत:

    Marathas should not only be proud that Chhatrapati Shivaji Maharaj was a Maratha, but they should also acknowledge that he has had a lasting influence on the Marathi psyche, which makes their people more nationalistic and self confident than those of many other Indian states.

    At the same time, Shivaji should be elevated to the status of a ‘national hero for modern India’, for he embodied all the qualities that are so badly needed in today’s Indian politicians: Shivaji was fearless and his courage was extraordinary. He was devoted to his own country, call it Bharat or Bhavani Bharati, or India. He was truly secular, never harming his enemies’ wives and children and though he was a devoted Hindu, he never destroyed a mosque.

    तुम्ही ज्या वाक्याचा संदर्भ दिला आहे ते वाक्य वाचले. त्यावरून तुम्ही काढलेल्या अनुमानावर हसावे तितके कमीच आहे.
    to me it is absolutely irrelevant what caste Shivaji belonged to, who his father or guru was. ह्या वाक्याचा अर्थ आहे "छत्रपती शिवाजी महाराज हे काय होते, कोण होते त्यांचे वडील कोण होते, जात काय होती ह्याला महत्व नसून त्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी समाजासाठी काय केले." छत्रपतींशी संबंधीत असलेल्या प्रत्येक गोष्टी वरून जे दळभद्री राजकारण सुरू आहे त्यावर ही टिका आहे. माणसाची जात बघू नका, कर्तुत्व बघा.

    तसंच ह्या वाक्याच्या पुढे तो लिहितो
    He was an extraordinary being. It matters not either, whether he related himself to the Vedas or any Hindu scriptures. I doubt it: he was a warrior who wanted to preserve his culture and protect his people.
    हे तुम्ही वाचलं नसेलंच.

    तुमचे अनुमान कसे बालीश आहे हे सिद्धच होते आहे.

    १. याचा अर्थ शहाजी राजे हे महाराजांचे वडील होते कि नव्हते याबाबत हे ग्रुहस्थ लेनच्या धावत्या स्ट्रीट जोकप्रमाणे वाद आहे असेच सुचित करतात, असे होत नाही कि काय?
    २. शिवाजी महाराजांची जात, वडील व गुरु कोण होते हे गोतियेच्या द्रुष्टीने संदर्भहीन आहे (irrelevent). या विधानाचा अर्थ एवढाच होतो कि गोतियेनेही महाराजांचे पित्रुत्व संशयाच्या भोव-यात आणले आहे.


    तुमच्यासारखा माणूस डोकं बाजूला ठेऊन असे अनुमान काढू शकतो ह्यावर विश्वास बसत नाही.

    जाता जाता सल्ला: "इंग्रजी सुधारा". शब्दांचे योग्य अर्थ न कळल्यामुळे अर्थाचा अनर्थ केला तुम्ही. irrelevant म्हटलंय questionable नाही.

    ReplyDelete
  2. संजय ,
    अडी जोशी यांनी थोडक्यात आणि छान आपली मते खोडून काढली आहेत .
    त्यांचे अभिनंदन !

    आपण काबुल केले आहे कि शिवाजीच्या जातीबद्दल विविध मते असू शकतात ,
    आपले मत काय आहे ?तो राजपूत होता का मराठा का धनगर ?
    जीजाबींची जात काय होती ते पण कृपया विस्ताराने सांगावे .
    आपण दुसर्या एका ठिकाणी असे म्हटले आहे कि जिजाबाई यांच्या माहेरचे शिवाजीला कनिष्ठ
    ( जातीचे ? ) समाजात असत ते किती बरोबर आहे ?
    अनोनिमास ला मध्यस्त करून उत्तर देण्यापेक्षा आपण स्वतःच्या नवे खुलासा करावा हि विनंती.
    इतर जन भाषेचा सुसंस्कृतपणा जपतील आणि तशी काळजी आपण घ्याल हि खात्री आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. dattatreya, I will answer all the questions later on Joshi's objections. This small answer is to let you know I never reply under any assumed name or anonymous title. Thanks.

      Delete
  3. धन्यवाद ,
    आपल्या त्वरित आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
    माझ्या मते आपण दत्तावताराबद्दल सुद्धा लिहिले तर ते डिसेंबर - मार्गशीर्षात येणाऱ्या दत्त जयंतीला समयोचित ठरेल.
    सुफी महंतांची लाट ज्या वेळेस दक्षिणेत आली त्या वेळेस - श्री.रा.चिं.ढेरे यांनी त्यांच्या दत्त या दैवता बद्दलच्या
    संशोधनात म्हटल्याप्रमाणे , श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांचे चमत्कार आणि त्यांचे विचार आणि चरित्र
    यामुळे ती लाट थोपवण्यास हातभार लागला.प्रत्येक गोष्ट तलवारीच्या जोरावर होते असे नाही , त्यामागे श्रद्धेचाही हातभार असतो
    हे पण तितकेच महत्वाचे आहे.
    आपण वेळात वेळ काढून याबद्दल ४ शब्द लिहावेत असे वाटते.
    धन्यवाद.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...