१ जुन २०१२ रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आघाडीचे विचारवंत प्रा. हरी नरके यांना पहिल्या महाराजा यशवंतराव होळकर सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. कोणताही जातीविद्वेष न ठेवता सर्व समाजाची पुरोगामी वैचारीक बैठक सम्म्रुद्ध व्हावी यासाठी ते गेली ३५ वर्ष अहोरात्र झटत आहेत. १ जुन रोजी ते वयाच्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हे औचित्य साधुन हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून जातीय विद्वेषाने बरबटु लागलेल्या महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आता कोणत्या मार्गाने पुढे न्यायचे यावरही त्यात विचारमंथनही होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डा. सुधाकर जाधवर असणार असून डा. सु. दा. तुपे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह व मानपत्र प्रदान केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वश्री. शुद्धोदन आहेर, राजाराम पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित असणार आहेत.
हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशीव पेठ, खजीना विहीरीजवळ, पुणे येथे १ जुन १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास आपली उपस्थिती आम्हास नक्कीच नवे बळ देईल.
धन्यवाद.
आपला,
संजय सोनवंणी