Monday, September 3, 2012

... एकाच विराट समाजाचे हिस्से...



काल दै. पुण्यनगरीमद्ध्ये वाघ्याबद्दल श्रीमंत कोकाटे यांच्या लेखाचा पुराव्यानिशी प्रतिवाद करणारा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. एकाच दिवसात अडिचशेपेक्षा जास्त फोन घेवुन मी अक्षरशा: थकुन गेलो.  आजही तीस-चाळीस फोन आले. यात फक्त तीन खोडसाळ फोन होते. ते कोणाचे असनार हे लक्षात आलेच असेल. महत्वाचे म्हणजे जवळपास ६०% फोन हे मराठा बांधवांकडुन होते. त्यात प्राध्यापक, प्राचार्य, वकील तसेच सामाजिक कार्यकर्तेही होते. संभाजी ब्रिगेडच्या उच्छादामुळे मराठे बदनाम होत आहेत अशी त्यांची खंत होती. वकीलांनी तर कायदेशीर कारवाईसाठी मोफत केसेस लढु असेही अभिवचन दिले. महाराष्ट्रात आजही तोच पुरोगामी बाणा जीवंत आहे याची ही साक्षच होय! प्रतिगामी पुरोगामित्वाचा आव आणत काम शुण्य पण तोडफोड ढिंढोराच फार (कि दहशत?) या न्यायाने वागत असल्याने ख-या पुरोगाम्यांना  Back seat वर बसावे लागले आहे हे चित्रही समोर आले.

जगात शेवटी का होईना जिंकते ते सत्यच...ते पटकनही जिंकु शकते...पण आपण भयभीत न होता आवाज उठवत राहिलो तरच! टागोरांची कविता माहितच असेल...Where the Mind is without fear...and head is held high! होय...आम्हाला भयमुक्त, जीवंत आणि रसरशित अशा चैतन्याने सळसळणारा समाज हवा आहे. आम्ही तो निर्माण करुच. कोणीही उठावे, तद्दन खोटा इतिहास सांगत झुंडीच्या बळावर आपलेच खरे करायचे हे चालणार नाही. बहुजनांचे नांव घेत एकाच जातीची महत्ता गाजवायची मर्दुमकी त्या जातीतील ९०% लोकांनाच मान्य नसतांनाही दाखवत एक संपुर्ण जातच बदनाम करण्यात हातभार लावत समाजात तेढ माजवायची हेही चालणार नाही. आम्ही सारे एकाच विराट समाजाचे हिस्से आहोत आणि प्रत्येक हिस्सा पुरातन काळापासुन समाजरचनेत महत्वाचा होता व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आम्हाला सर्वैक्याचे स्वप्न साकार करायचे आहे. फुटीचे नव्हे. आम्हाला आजची आव्हाने पेलत भविष्य घडवायचे आहे...निरर्थक ऐतिहासिक वाद निर्माण करत..त्यांत अडकवत समाजाला प्रतिगामी करणा-या गोटांच्या पापांत सहभागी व्हायचे नाहीहे.

मी तमाम मराठी बांधवांचा नितांत ऋणी आहे....जे सत्याकडे सत्य म्हणुनच पाहु इच्छितात...

http://www.facebook.com/photo.php?fbid=467584853274614&set=a.208135695886199.56048.100000693118742&type=1&theater

Pls see the link for original article. Thanks.)

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय ...