Monday, September 3, 2012

... एकाच विराट समाजाचे हिस्से...काल दै. पुण्यनगरीमद्ध्ये वाघ्याबद्दल श्रीमंत कोकाटे यांच्या लेखाचा पुराव्यानिशी प्रतिवाद करणारा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. एकाच दिवसात अडिचशेपेक्षा जास्त फोन घेवुन मी अक्षरशा: थकुन गेलो.  आजही तीस-चाळीस फोन आले. यात फक्त तीन खोडसाळ फोन होते. ते कोणाचे असनार हे लक्षात आलेच असेल. महत्वाचे म्हणजे जवळपास ६०% फोन हे मराठा बांधवांकडुन होते. त्यात प्राध्यापक, प्राचार्य, वकील तसेच सामाजिक कार्यकर्तेही होते. संभाजी ब्रिगेडच्या उच्छादामुळे मराठे बदनाम होत आहेत अशी त्यांची खंत होती. वकीलांनी तर कायदेशीर कारवाईसाठी मोफत केसेस लढु असेही अभिवचन दिले. महाराष्ट्रात आजही तोच पुरोगामी बाणा जीवंत आहे याची ही साक्षच होय! प्रतिगामी पुरोगामित्वाचा आव आणत काम शुण्य पण तोडफोड ढिंढोराच फार (कि दहशत?) या न्यायाने वागत असल्याने ख-या पुरोगाम्यांना  Back seat वर बसावे लागले आहे हे चित्रही समोर आले.

जगात शेवटी का होईना जिंकते ते सत्यच...ते पटकनही जिंकु शकते...पण आपण भयभीत न होता आवाज उठवत राहिलो तरच! टागोरांची कविता माहितच असेल...Where the Mind is without fear...and head is held high! होय...आम्हाला भयमुक्त, जीवंत आणि रसरशित अशा चैतन्याने सळसळणारा समाज हवा आहे. आम्ही तो निर्माण करुच. कोणीही उठावे, तद्दन खोटा इतिहास सांगत झुंडीच्या बळावर आपलेच खरे करायचे हे चालणार नाही. बहुजनांचे नांव घेत एकाच जातीची महत्ता गाजवायची मर्दुमकी त्या जातीतील ९०% लोकांनाच मान्य नसतांनाही दाखवत एक संपुर्ण जातच बदनाम करण्यात हातभार लावत समाजात तेढ माजवायची हेही चालणार नाही. आम्ही सारे एकाच विराट समाजाचे हिस्से आहोत आणि प्रत्येक हिस्सा पुरातन काळापासुन समाजरचनेत महत्वाचा होता व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आम्हाला सर्वैक्याचे स्वप्न साकार करायचे आहे. फुटीचे नव्हे. आम्हाला आजची आव्हाने पेलत भविष्य घडवायचे आहे...निरर्थक ऐतिहासिक वाद निर्माण करत..त्यांत अडकवत समाजाला प्रतिगामी करणा-या गोटांच्या पापांत सहभागी व्हायचे नाहीहे.

मी तमाम मराठी बांधवांचा नितांत ऋणी आहे....जे सत्याकडे सत्य म्हणुनच पाहु इच्छितात...

http://www.facebook.com/photo.php?fbid=467584853274614&set=a.208135695886199.56048.100000693118742&type=1&theater

Pls see the link for original article. Thanks.)

9 comments:

 1. संजयजी - अतिशय सम्यक आणि सर्व-समावेशक विचार आहेत.
  विचार केला की कळते की ह्या कोकाटे, सोळुंके, खेडेकर सारख्या नतद्रष्ट लोकांनी जर असले फुटीर, दुहीचे विचार बोलणे, लिहिणे, आणि प्रसारित करणे सोडले तर, त्यांचा घरची चूल बंद पडेल, आणि कोणालाही कोकाटे कोण हे पण माहिती होणार नाही. मग मनात विचार येतो, ह्या येड्यांना विरोध कशाला करायचा? पण एक म्हण आहे, म्हातारी मेल्याचे दुख्ख नाही पण काळ सोकावतो. जर ह्यांना विरोध केला नाही तर ते पण सोकावतील. दुसरा मुद्दा म्हणजे ह्या बी-ग्रेडी, मूलनिवासी नालायक लोकांना चर्चा, सामंजस्य नको आहे तर त्यांना अराजक हवे आहे. कारण अराजकात त्याना वाटते की ते त्यांची पोळी भाजू शकतील. पण तो सुद्धा भ्रम आहे, कारण ह्यांना कोणताच जिवंत माणूस आदर्श अथवा नेता म्हणून चालत नाही. सध्या फुले आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व मेश्राम करीत आहेत, पण उद्या त्यांच्या विरुद्ध फळी उभारून कोकाटे, सोळुंके, गायकवाड वगैरे उभे राहिले तर नवल नको. सध्या मृत व्यक्तींचे/ नेत्यांचे श्राद्ध चालू आहे. काही दिवसांनी एकमेकाशी यादवी सुरु करतील ह्याची कोहमला खात्री आहे आणि कोहम ह्या समतेच्या लढ्यात आपल्या बरोबर आहे.
  - कोहम

  ReplyDelete
  Replies
  1. विवेक सुर्यवंशीSeptember 8, 2012 at 9:45 AM

   The brahmins from the vanguard of the movement for political reform & in some cases also of economic reform.but they are not to found even as comp-followers in the army raised to break down the barricades of caste. is there any hope of the brahmins even talking up a lead in the future in this matter ? i say no.(Vol.no 1 baw pg.70)
   अर्थात : राजनैतिक सुधारणासाठी आणि आर्थिक सुधारणासाठीच्या आंदोलनात ब्राह्मण हे बिनीचे सैनिक बनतात, पण जातिव्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या उद्धाच्या शिबिरात साधा सदस्य म्हणुन सुद्धा ब्राह्मण येत नाही. भविष्यात तो जातियव्यवस्थेविरुद्ध काही करतील अशी आशा करावी का ? मी म्हणतो बिलकुल नाही.

   Delete
  2. who is the writer of the VOL NO 1? ABOVE INTERPRETATION IS VERY MUCH WRONG AND ILL-MINDED. PLEASE READ THE HISTORY ESPECIALLY LAST 2/3 HUNDREDS OF MODERN INDIAN HISTORY. U WILL FIND MORE BRAHMINS THAN ANY OTHER CASTE TO LEAD THIS BATTLE OF CASTEISM.HOWEVER IS U DECIDED TO IGNORE ALL SOCIAL WORK OF BRAHMIN LEADERS AND SOCIAL THINKERS , THEN NO POINT IN ARGUE.

   Delete
 2. दादू कोंडदेवच्या विषयावर तुम्ही लिहिले तेव्हा किती ब्राह्मणांचे फोन आले होते? ते देखील जाहीर करा.

  ReplyDelete
  Replies
  1. आधी स्वत:कडे पहा मित्रा, मग दुसर्‍यांकडून अपेक्षा करा.

   Delete
 3. Changala lekh.. he nishchitach ahe ki bahusankya Maratha samaj ha hya brigedin barobar nahi.. shevati Maharashtra sathi prachand kaam kelela asa ha Maratha samaj ahe. Bramhan ani Marathe hyani anek vela hatat haat ghalun changale kaam kele ahe, tevha tyanni jaticha vichar kela nahi. Pan durdaivane tyanchi jaat kadhun aaj tya changalya kamache dakhale dyave lagat ahet. He Brigadi lok mhanje samajal lagaleli kid ahe. Sanatani, Brigadi, Gharaneshahi chalavanare sagalech hya samajache shatru ahet tyancha nishedh ani parabhav ha kelach pahije.

  ReplyDelete
 4. Chhan Lekh.Hya brigadi marathyanmule sagla maratha samaj badnaam hot aahe.maratha samaj sarwasamaweshak hota aani aahe dekhil.kadhich konabaddal vidwesh marathyanni hyaa brigade saarkha pasrawlaa naahi.ata fakta ek bhartiya mhanun jagnaare marathech khara shivraayacha siddhaant parat sthaapan kartil....

  ReplyDelete
 5. जगात शेवटी का होईना जिंकते ते सत्यच...ते पटकनही जिंकु शकते...पण आपण भयभीत न होता आवाज उठवत राहिलो तरच! टागोरांची कविता माहितच असेल...Where the Mind is without fear...and head is held high! होय...आम्हाला भयमुक्त, जीवंत आणि रसरशित अशा चैतन्याने सळसळणारा समाज हवा आहे. आम्ही तो निर्माण करुच. कोणीही उठावे, तद्दन खोटा इतिहास सांगत झुंडीच्या बळावर आपलेच खरे करायचे हे चालणार नाही. बहुजनांचे नांव घेत एकाच जातीची महत्ता गाजवायची मर्दुमकी त्या जातीतील ९०% लोकांनाच मान्य नसतांनाही दाखवत एक संपुर्ण जातच बदनाम करण्यात हातभार लावत समाजात तेढ माजवायची हेही चालणार नाही. आम्ही सारे एकाच विराट समाजाचे हिस्से आहोत आणि प्रत्येक हिस्सा पुरातन काळापासुन समाजरचनेत महत्वाचा होता व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
  very true.. i support you on this issue. all shld protest such hooligans. this is nothing but a taliban in maharashtra. actually i am not fully convince about the story of waghya, but it is most worst if any body threatened because his views not matching with my views then we are going to anarchic state.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Rahul ji. Towards history we may have different views. But talibani actions should be protested wholeheartedly. We really need to build the society on strong fundamentals...and we should strive for that.

   Delete