Wednesday, September 5, 2012

बाबासाहेब म. गांधींनंतरचे ग्रेटेस्ट इंडियन....

बाबासाहेबांनी फक्त पुर्वास्पृश्यांसाठीच नव्हे तर देशातील तमाम जनतेसाठी तर्कशुद्ध बुद्धीवादाचा पाया घातला. एक वैचारिक अव्यभिचारी नैतीक दृष्टी कशी असावी हे आपल्या चिंतन लेखन व वर्तनातुन मांडले. हे बाबासाहेब भारताला सोडा त्यांच्या अनुयायांनाही पचले नाही. त्यांनी सातत्याने बाबासाहेबांची एकच बाजु उचलुन धरली आणि इतरांनी सोयीने तीच बाजु मानत बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण चालु ठेवले. एकांगी उदात्तीकरणात बाबासाहेबांच्या मुलभुत तत्वज्ञानाचा पाया खचवण्यात अंधानुयायांनी जसा हातभार लावला तसाच मनुवाद्यांनीही लावला. एवतेव वैश्विक दृष्टीच्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला एक प्रकारे हरताळ फासण्यात आला. अत्यंत संयमी पण टोकदार भाषा वापरणारे बाबासाहेब शिवीतंत्राच्या अनुयायी म्हनवुन घेणा-यांच्या दुष्ट काव्याने अकारण दुरावले गेले. बाबासाहेब आवाक्यात आलेच नाहीत...किंबहुना येवू दिलेच गेले नाहीत...प्रा. नरकेंसारखे विचारवंत अज्ञात बाबासाहेब समजावुन सांगतात तर हे त्यांची डी.एन. ए. टेस्ट करा म्हणतात. पोलद्वारे बाबासाहेब म. गांधींनंतरचे ग्रेटेस्ट इंडियन ठरवणे हा भारतियांचा अडानीपणा आहे...जर भारतियांनी त्यांच्या कार्यावर, तत्वज्ञानावर पुढची इमारत बांधण्यचा हव्यास धरला असता तर प्रत्येक भारतीय ग्रेट इंडियन बनला असता. पण हे होणे नव्हते. अर्थशास्त्रज्ञ, कृषितज्ञ, समतावादी, राष्ट्रवादी बाबासाहेब दुरच फेकले गेले आणि फक्त दलितांचे कैवारी या मुखवट्यात त्यांना बंदिस्त करत एकाच जातीच्या चौकटीत त्यांना बांधत इतरांना त्यांच्यावर बोलण्याचीही चोरी वाटावी अशी स्थिती निर्माण केली गेली...बाबासाहेब सर्वांचेच कैवारी होते म्हणुन त्यांच्याबाबत चर्चा करण्याचा सर्वांना अधिकार आहे हे भान सुटले. सा-याच चर्चा आकसानेच वा भावना दुखावण्यासाठीच असतात असा ग्रह करुन घेतल्याने बाबासाहेब टाळण्याकडे प्रवृत्ती निर्माण झाली. निकोप मनाने त्यांचा अभ्यासही जवळपास थांबला. त्याला मिळाली ती जातीय परिमाणे जी कधीही बाबासाहेबांनाही अभिप्रेत नव्हती. मला वाटते पोलद्वारे जरी बाबासाहेब ग्रेटेस्ट इंडियन अफ्टर गांधी ठरले असले तरी त्यावर किती इंडियनांचा विश्वास आहे हेही तपासुन पहायला हवे. तो जर तसा नसेल तर बाबासाहेबांना सर्वांनीच नव्याने समजावून घेण्याची गरज आहे.

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय ...