Thursday, February 7, 2013

माझ्या लेखनाला प्रतिसाद देणा-यां.....



माझ्या लेखनाला प्रतिसाद देणा-यांना बव्हंशींना एकच विचारायचे आहे कि तुम्ही कोणत्या विचाराचे आहात? समजा माझा विचार पटत नाही तर तुम्ही समर्थपणे तुमचे विचार का मांडत नाहीत?  ठाम प्रतिवाद का करत नाहीत?
आणी हेही कारायचे नाही तर, मला एक गोष्ट कळत नाही ती ही कि लोक कशाला आपल्या (नसलेल्या) डोक्याला त्रास करुन घेतात? मी हे का लिहिलं ते का लिहिलं...याच भाषेत का लिहिलं...अमूक विषयावर मी का लिहित नाही...यावर आपला वेळ आणि उर्जा खर्च करून का टंकत बसतात? साधं उत्तर आहे...लेको वाचुच नका ना...कोणी जबरदस्ती केलीय काय? माझ्या ब्लोगला ०% वाचक असले म्हणुन मी काही लिहायचे थांबणार नाही. मी तुमच्या नव्हे, माझ्या बौद्धिक मनोरंजनासाठी लिहित असतो.  आता यावरही तुम्हाला कोटी करता येईल...करा...पण तुमचे बौद्धिक दारिद्र्य वारंवार का दाखवता? तुम्हाला भाषा कळत नाही...तुम्हाला जागतिक मित्थकथा समजत नाहीत, तुम्हाला तुमचेच दैनंदिन प्रोब्लेम समजत नाहीत...मला विचारायचेय...मग लेको तुम्ही जगताच कशाला? नळाखालच्या थारोळ्यात डुबकी मारत आपला जीवनोद्धार का करत नाही?
मला कल्पना आहे, हे लोक कोण आहेत. त्यांची लायकी दाखवण्याची नालायकी मला करायची नाहिहे. दोन-चार लोक शतश: होत आपापले वर्तन येथे दाखवत आहेत. त्यांना मला एकच सांगायचे आहे ते हे कि तुम्ही एकतर विचारार्थ विचार, भाषार्थ म्हणुन भाषा व जात्यर्थ म्हणुन जाती दर्शवू शकता, पण ना इकडचे ना तिकडचे असे बांडगुळ म्हणुन माती ओकत बसाल तर भविष्य तुम्हाला क्षमा करणार नाही. मी एकाचीही प्रतिक्रिया माझ्या हातात असतांनाही वगळत का नाही त्याचे उत्तर हे आहे. तुमची लायकी काळच ठरवेल....मी नाही कि तुम्ही नाही. सर्वांना मन:पुर्वक धन्यवाद.

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...