Thursday, February 7, 2013

माझ्या लेखनाला प्रतिसाद देणा-यां.....



माझ्या लेखनाला प्रतिसाद देणा-यांना बव्हंशींना एकच विचारायचे आहे कि तुम्ही कोणत्या विचाराचे आहात? समजा माझा विचार पटत नाही तर तुम्ही समर्थपणे तुमचे विचार का मांडत नाहीत?  ठाम प्रतिवाद का करत नाहीत?
आणी हेही कारायचे नाही तर, मला एक गोष्ट कळत नाही ती ही कि लोक कशाला आपल्या (नसलेल्या) डोक्याला त्रास करुन घेतात? मी हे का लिहिलं ते का लिहिलं...याच भाषेत का लिहिलं...अमूक विषयावर मी का लिहित नाही...यावर आपला वेळ आणि उर्जा खर्च करून का टंकत बसतात? साधं उत्तर आहे...लेको वाचुच नका ना...कोणी जबरदस्ती केलीय काय? माझ्या ब्लोगला ०% वाचक असले म्हणुन मी काही लिहायचे थांबणार नाही. मी तुमच्या नव्हे, माझ्या बौद्धिक मनोरंजनासाठी लिहित असतो.  आता यावरही तुम्हाला कोटी करता येईल...करा...पण तुमचे बौद्धिक दारिद्र्य वारंवार का दाखवता? तुम्हाला भाषा कळत नाही...तुम्हाला जागतिक मित्थकथा समजत नाहीत, तुम्हाला तुमचेच दैनंदिन प्रोब्लेम समजत नाहीत...मला विचारायचेय...मग लेको तुम्ही जगताच कशाला? नळाखालच्या थारोळ्यात डुबकी मारत आपला जीवनोद्धार का करत नाही?
मला कल्पना आहे, हे लोक कोण आहेत. त्यांची लायकी दाखवण्याची नालायकी मला करायची नाहिहे. दोन-चार लोक शतश: होत आपापले वर्तन येथे दाखवत आहेत. त्यांना मला एकच सांगायचे आहे ते हे कि तुम्ही एकतर विचारार्थ विचार, भाषार्थ म्हणुन भाषा व जात्यर्थ म्हणुन जाती दर्शवू शकता, पण ना इकडचे ना तिकडचे असे बांडगुळ म्हणुन माती ओकत बसाल तर भविष्य तुम्हाला क्षमा करणार नाही. मी एकाचीही प्रतिक्रिया माझ्या हातात असतांनाही वगळत का नाही त्याचे उत्तर हे आहे. तुमची लायकी काळच ठरवेल....मी नाही कि तुम्ही नाही. सर्वांना मन:पुर्वक धन्यवाद.

19 comments:

  1. तुम्ही इंग्लिश लिहून दमलात का ?
    बरे झाले
    आता उसवले
    आणि दुष्काळ ,
    परशुराम आणी
    वैदिक
    बुद्ध आणि वेद,
    हा आठवडा तर यादी पुरेल.

    .

    ReplyDelete
    Replies
    1. asutosh prasanna,

      You are representing FALTU Marathi readers.

      Delete
  2. आपण नम्रपणे सर्व ब्राह्मण वर्गाची क्षमा मागावी

    ReplyDelete
    Replies
    1. मागायला ते काय माफीवीर आहेत का सावरकरांसारखे?

      Delete
  3. मराठा समाज आपणास कधीच क्षमा करणार नाही.
    आपण ब्राह्मणाचे हितरक्षक आहात .

    ReplyDelete
  4. तुमच्या विरुद्ध लिहिणार्यांची नावे तुम्ही जाहीर का करत नाही ? म्हणजे सर्वाना त्याचा पर्दाफाश तरी होईल

    ReplyDelete
  5. SANJAY SAR ,
    WE REQUEST YOU TO TELL ALL THE NAMES OF THE CULPRITS WHO ARE DISTURBING YOUR WRITTINGS AND YPUR PEACE OF MIND.
    PL. SIR,
    TELL US THE NAMES .

    ReplyDelete
  6. , your Marathi as well and English writing style is very appealing and good. Please do not (and I am sure you will not) worry and care about what readers think. The classic paradigm of blog writing is that, writer wants lot of readers so should he write in a style or about what readers care. I feel that writer should keep writing in his style and whatever he wants, and readers will/ shall follow.

    We as a society has to learn about "agreeing to disagree", but we are in the era of writing books about killing a group, upon disagreement. Not much dialog possible, under the barrel of a gun :-)

    Koham

    ReplyDelete
  7. संजय सर ,
    आमच्या सरांनी
    we HAVE to learn ase shikavale hote.
    भारत सोडला तर इंग्रजीत बोलताना आपल्या देशाची लाज निघू नये म्हणून थोडी काळजी घेणे आपल्या इतर बांधवांसाठी चांगले ठरेल
    मी एकदा इंग्रजाना सांगून पाहिले कि आमच्याकडे " बहुजन " समाज जरा कच्चे इंग्लिश बोलतो ,
    पण त्यांनी ऐकून घेतले नाही.ते म्हणाले कि वुई डोन्ट केअर ,
    आपल्याला अजून मराठी नित लिहिता बोलता येत नाही तर आपण ते तरी आधी पक्के करुया - नाहीका ?
    आपले हिंदी सुद्धा " बम्बैय्या " हिंदी म्हणून प्रसिद्ध आहे.
    आपण काहीतरी चांगले करून दाखवू या .

    ReplyDelete
  8. संजय सर ,
    आपले फेसबुक वरचे पान वाचले की जास्त समाधान होते.
    आपला मित्रांचा गोतावळा पाहिला की आनंद होतो.
    आपण लिहित जावे आणि आम्ही वाचत जावे - हा अखंड वाहणारा झरा असाच गढूळ न होता
    वाहात राहो हि सदिच्छा !

    कोहम आणि परिणीता ताई ,
    आपण सांगत आहात त्यात तथ्य आहेच,
    ते मान्य करूनही असे सांगावेसे वाटते की ,भाषा आणि माणूस यात कोण कोणासाठी असते ?
    संजय सर जे लिहित आहेत इंग्रजीमध्ये त्याचा आशय काय आहे?
    ते जाणून घ्यावे.त्यातील सौंदर्य टिपावे.त्यातील भावना समजून घ्याव्यात .
    भाषा ही दोन मने किंवा दोन वा अनेक व्यक्ती यांच्यात विचारांची देवाण घेवाण होण्याचे एक हत्यार आहे.
    कोणती भूमिका जास्त तीव्र ते ठरवणे महत्वाचे.
    विचाराना महत्व असेल तर व्याकरण थोडेसे बाजूला ठेवले तर काय बिघडले ?
    छ.शिवाजी किंवा भगतसिंग किंवा तुकाराम यांचे , समजा व्याकरण तितकेसे चांगले नव्हते असे क्षणभर मानले तर ते काय निकामी ठरतात का ?
    मुक्या लोकांनी काय करायचे ?

    तरीही भाषा म्हटली की व्याकरण आलेच आणि ते अपरिहार्य पणे नेटकेच हवे.
    त्याचा उद्देश एकाच असतो ,व्याकरण हे गणितासारखे शिस्तीचे काम आहे.
    परदेशी माणसाला आपली भाषा शिकण्यासाठी ते आवश्यक असते.
    बाकीच्यांची नावे आणि मते दुर्लक्ष करण्याच्या लायकीची आहेत ,
    हे त्रिवार सत्य आहे.

    ReplyDelete
  9. आपण मांडत असलेल्या विचारावरून असे सुचवावेसे वाटते कि वाचकाची भूमिका काय अपेक्षित आहे ?
    वाचक हा शिपायाचे काम करणारा असावा
    वाचक हा शिष्य असावा
    वाचक हा अनुयायी असावा
    वाचक हा मित्र असावा
    वाचक हा सल्लागार असावा
    त्याला किती स्वातंत्र्य असावे ?
    तर असे वाटते की त्याने सर्व प्रथम आपली हद्द ओलांडू नाये.
    ही हद्द आहे सभ्यपणाची.
    ती अलिखित असते.

    ReplyDelete
  10. आगाशेजी, वाचकाने काय असावे हे सांगायचा अधिकार लेखकाला नसतो तसेच लेखकाने काय असावे हे सांगायचा अधिकार वाचकालाही नसतो. दोहोंचे स्वातंत्र्य अबाधित असलेच पाहिजे. अतिक्रमण करायला गेले कि मग समस्या निर्माण होणारच. खरे तर हे येथे कदाचित अप्रस्तूत वाटेल...पण व्याकरणाच्या नियमांची मोडतोड केल्याखेरीज साहित्य जन्माला येत नाही. मी व्याकरण मानत नाही. माझ्या पाश्चात्य वाचकांनी कधी माझ्या भाषेचा बाऊ केलेला नाही. पण येथे झग्यातून पडल्यासारखे वावरणारे मात्र "राणीचे इंग्रजी" आजही घट्ट कवटाळुन बसलेत. आणि मी पुणेरी नाही. माझे मराठी "माहाराष्ट्री मराठी" आहे. व्याकरणाचा माज मला कोणी शिकवू नये. माझा ब्लोग वाचावा असा माझा हट्ट नाही. लोकांनी आपापला वाट्टेल तशा प्रतिक्रिया द्यायचा त्यांचा हक्क मी अबाधित ठेवला आहे. मी आज प्रतिक्रियांवरची प्रतिक्रिया द्यायचा माझा हक्क वापरला आहे.

    ReplyDelete
  11. संजयजी,
    ब्रेल लिपी वापरणाऱ्यानी व्याकरण शिस्त सोडून चालेल का ?
    तो तर त्यांचा या जगाला समजून घेण्याचा एकमेव आधार असतो - नाही का ?

    आपण महाराष्ट्री मराठी म्हणता तो काय पद्धतीचा मराठीचा प्रकार आहे ते समजून घेणे आवडेल.ती बोलीभाषा असेल का ?
    व्याकरणाच्या नियमांची मोडतोड म्हणजे बोलीभाषेचा लेखनात मुक्त वापर असे आपण सुचवत असाल तर ते १०० टक्के खरे आहे.

    कारण आपल्या सर्व भाषाच मुळात तशाच विकसित झाल्या असाव्यात असे वाटते - कधी तरी .त्यावर पण आपण प्रकाश टाकावा अशी विनंती.
    आपण म्हणता लेखक वाचक अधिकार या बाबत - ते मात्र पटत नाही.दोघांचाही एकमेकांवर हक्क असतोच !
    गायकाचे उदाहरण घेऊया आपण .
    भीमसेनजी बसले आहेत,,मैफिल उभी राहात आहे,माहोल जमला आहे,तानपुरे लावले जात आहेत - प्रेक्षकवर्ग कानाने तयार आहे ,
    अशा वेळी श्रोत्यांनी गायकाकडे प्रेमाचा हट्ट धरणे ,एखाद्या चीजेसाठी,अप्रस्तुत होणार नाही - नाही का ? गायक त्याच्या शिस्ती प्रमाणे गाणारच ,
    पण श्रोत्यानापण डावलणार नाही.
    हा आपल्या इथला इतिहास आहे.शिवकुमार शर्मा बिस्मिल्लाखान,आमोणकर,पं.जसराज,अशी अगणित उदाहरणे आहेत.
    दिवाळीच्या नरकचतुर्दशीचा दिवस आहे. सकाळी छान सडा संमार्जन होऊन रांगोळ्या घातल्या जात आहेत अशा वेळी कुणी एका अनामिकेने
    एखाद्या सुबक रांगोळीची फर्माईश केली तर तो त्या चित्रकलाकारावर जुलूम होतो का ?
    एखादा भ्रमर हा जसा फक्त निमित्त ठरतो नवनिर्मितीला , तसाच आमच्यासारखा प्रेक्षकवर्ग किंवा
    श्रोतृवर्ग हा आपल्या सारख्या उत्तुंग लेखकाच्या नवनिर्मितीला निमित्तमात्र असतो !
    त्याचा अधिकार असो वा नसो ,आपल्यासारख्या लेखकाच्या लेखनाने एखादा वाचक भावनेच्या आहारी जाउन आपल्याकडे काही आग्रह धरू लागला तर तसे करणे हेसुद्धा आपल्या लेखनशैलीचे कौतुकच असते- नाही का ?मग तो विषयाचा आग्रह पण असू शकतो ! आपलेच उदाहरण पाहिले तर आपल्याला सुद्धा श्रीकृष्णाबद्दल असा बराच आग्रह चालू आहे.
    ते आपल्या विचार विस्तार करण्याच्या शैलीचे कौतुक असते .त्यात संकोचून जाण्यासारखे काहीच नाही ! तो प्रकार आपण तुमच्या लेखनावरील अतिक्रमण मानू नये असे सांगावेसे वाटते.
    मी कधीही आपणास व्याकरणाचा माज दाखवला असे मला स्मरत नाही.
    एक गोष्ट मात्र वाचन प्रेमापोटी स्पष्ट करावीशी वाटते - मग ते आपणास आवडो वां न आवडो - आम्ही मियामितपणे आपला ब्लोग वाचत राहणार ! त्यावर बारीक लक्ष ठेवणार - जर कुणी त्यावर असभ्य चाळे करेल तर मी त्यावर आपल्या सहमतीने आग्रही टिपण्णी करणार,
    आपण जरी चुकताय असे वाटले तरी तसे लिहिणार ! हे कदाचित आपणास आक्रमण वाटेल ! पण - -
    लेखन हा आपला करमणुकीचा प्रकार मानता हे वाचून वाईट वाटते !
    लेखन हा आत्मोन्नतीचा आणि समाज प्रबोधनाचा विलक्षण प्रभावी मार्ग आहे.
    नाहीतर संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांनी काहीच लिहिले नसते !
    खुद्द आपणपण काहीच लिहिले नसते !.
    मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete
  12. loak wachat astatat, kahi pratikriya lagech milatat, kahi ushira, tar kahi krutitituen disate, kahi likhaanatuen ,tyamule ghaie karu naka, lihiet raha.

    ReplyDelete
  13. छ्यान लिहिले आहे, आणि व्याकरण बाबतची प्रतिक्रिया तर धमालच आहे. मस्त वाटले.....महाराष्ट्री मराठी हीच खरी त्यात मराठवाडी, वर्हाडी, कोकणी, सगळ्या बह्षा आल्या.....मला चपाती म्हणतो म्हणून हसणारे लोक आहेत, मी लई म्हणतो म्हनून हसणारे लोक आहेत...मी त्यांना पोळी म्हणतात म्हणून हसायचे....हाहाः...गावाकडल्या लोकाचे बहुमत असले कि आम्ही पुण्याच्या भासेह्वर हसतो.....पण पुण्याच्या लोकाच्या बहुमत असले कि ते हसत नाहीत एकमेकाकाद्डे बघतात.....काय गावठी आहे म्हणून.....त्यावरून माझी जातीचा अंदाज पण बांधतात पण मी त्याला जागा ठेवत नाही.....असो विषय बदलला.....पण एकूण १००% सहमत...

    ReplyDelete
  14. संजयजी, मला असे वाटते की तुम्ही मराठीत लिहिणे पूर्णपणे बंद करावे. हे मी आपणास प्रत्यक्षातही अनेकदा बोललो आहे. तुमचा पिंड इंग्रजी लेखकाचा आहे. तुम्ही तुमचे विचार इंग्रजीमध्ये लिहावेत. त्याचा फायदा असा होईल की तुमच्या लिखाणाला जागतिक पातळीवर अधिक समंजस, प्रगल्भ विचाराचा वाचक मिळेल. वाचकांची संख्या अनेकपटीने वाढेल, आणि ते वाचक तुमचे व्याकरण, भाषा यावर बोलण्या ऐवजी तुमच्या विचारावर बोलतील. त्यांच्या कॉमेंट्स या संतुलित असतील. सध्या तुमचे जे खडूस वाचक आहेत ते तुमच्या इंग्रजी लिखाणाकडे फिरकणारही नाहीत, कारण ज्यांना मराठी नीट कळत नाही, ते इंग्रजी कशाला वाचायला जातील? हे सगळे मी मला स्वत:ला आलेल्या अनुभवातून लिहित आहे.

    तुमच्या लिखाणाची, संशोधनाची जगाला गरज आहे. मराठीत लिहिणे म्हणजे एका संकुचित जगातील अपात्र लोकांसाठी लिहिणे होय. हे संकुचित लोक अजूनही प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद, वर्णवाद, व्याकरणवाद, व्यक्तिपूजा, कलहप्रियता यातच अडकून बसले आहेत. यांच्यासाठी लिहिताना आपणही तसे व्हायची शक्यता असते, तेंचा यातून बाहेर पडणे, तेही ताबडतोब, फार गरजेचे आहे.

    ReplyDelete
  15. बोंबलुद्या त्यांना तुंम्ही लिहित रहा

    ReplyDelete
  16. आजकाल स्वत्ताचे नाव लपवना-या भामट्यांचा खुप सुळसूळाट झाला आहे
    मैंदाळा ऊत आलाय आसल्या भामट्यांना

    ReplyDelete
  17. Dear Mr. Sonavani,

    Whether you write or do not write; whether we read or do not read; whether after reading your articles I change or do not change at all; nothing matters. not your skills, not our knowledge, nothing really matters. What matters is as Tukaram puts it "Apalachi vaad aapanasi".

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...